दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

९ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

तुमचं बाळ जन्मल्यापासून ते तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही बाळाबरोबर एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण, बाळाच्या कानात तुम्ही कुजबुजलेला प्रत्येक गोड शब्द आणि तुम्ही बाळाला प्रेमाने कुरवाळलेला प्रत्येक क्षण आणि तुमच्या चेहऱ्यावरील प्रेमळ हावभाव बाळाला संवाद साधण्यास शिकवत असतो. बाळाच्या सामाजिक, भावनिक तसेच संवादकौशल्य विकासाच्या दृष्टीने हे महत्वाचे ठरते. ९ व्या महिन्यात तुमचे बाळ दुसऱ्या अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती दाखवू लागते.

९ महिन्यांच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्यांचा तक्ता

बाळाने पार केलेले विकासाचे टप्पे बाळ लवकरच पार पाडेल असे विकासाचे टप्पे
थोडे अंतर रांगून बसते भरभर आणि जास्त अंतर रांगू लागेल
थोडी मदत घेऊन उभे राहते आधाराने पाऊल टाकेल
"मामा" " दादा" ह्या सारखे सोपे शब्द बोलते आणखी काही छोटे शब्द बोलू लागेल
"नाही" हा शब्द समजतो "हो" " इकडे ये" "जा" असे शब्द समजतील
काही हावभावांचे अनुकरण करते अनेक क्रियांचे अनुकरण करेल
दृष्टी सुधारते दृष्टी सुधारल्यामुळे दूरचे पाहू शकेल
वस्तू धरते आणि सोडते वस्तू पकडणे आणि सोडून देणे ह्यास प्रतिसाद देईल
काही खेळणी विशेष आवडतात काही विशेष खेळणी किंवा लोक आवडतील
एका हातातून दुसऱ्या हातात वस्तू घेणे भांड्यात गोष्टी ठेवू शकेल

९ व्या महिन्यांपर्यंत तुमच्या बाळाने पार केले पाहिजेत असे विकासाचे टप्पे

तुमचे बाळ घरातील फर्निचरला धरून तर चालेलच परंतु तुम्हाला बाळाचे बोबड्या बोलांचे भाषण सुद्धा ऐकायला मिळेल. मदतीशिवाय खाली बसणे हे बाळासाठी अजूनही थोडे कठीण असू शकते परंतु तुमच्या बाळावर लक्ष ठेवा आणि नॅपी मध्ये जास्तीचे पॅडिंग लावा.

आकलन विषयक विकासाचे टप्पे

तुमच्या बाळाच्या मेंदूचा विकास खुप वेगाने होतो! ९ महिन्यांच्या तुमच्या बाळाने आकलनविषयक विकासाचे खालील टप्पे पार केले पाहिजेत.

सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे

तुमच्या बाळाचे सामाजिक आणि वर्तणूक कौशल्य विकसित होण्याची गरज आहे. इथे काही गोष्टी दिल्या आहेत ज्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

हालचाल कौशल्य आणि शारीरिक विकासाचे टप्पे

तुमच्या बाळाचा शारीरिक विकास होत आहे आणि हालचाल कौशल्ये सुद्धा विकसित होत आहेत. इथे काही शारीरिक विकासाचे टप्पे दिले आहेत त्यावर तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे.

मज्जातंतूंच्या विकासकौशल्याचे टप्पे

बाळाच्या मज्जातंतूंचा विकास हा जन्मपूर्व काळापासून होतो आणि तो ३ वर्षापर्यत सुरु राहतो. ९ महिन्यांपर्यंत तुमच्या बाळाने पार केलेले मज्जातंतूंच्या विकासाचे टप्पे खालीलप्रमाणे

संवाद कौशल्ये

ह्या वयात बाळाने संवाद साधावा म्हणून काही मार्ग दिले आहेत.

डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधावा?

जर तुमच्या बाळाची वाढ नीट होत नसेल तर बाळाच्या भविष्यातील विकासावर परिणाम होतो. इथे काही गोष्टी आहेत त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे:

तुमच्या बाळाने ९ महिन्यांचे विकासाचे टप्पे पार करावे म्हणून मदतीसाठी काही टिप्स

इथे काही सध्या टिप्स दिल्या आहेत त्यामुळे तुमच्या बाळाच्या विकासास मदत होईल आणि बाळ ९ महिन्यांच्या विकासाच्या टप्प्यांपर्यंत पोहोचेल. सर्वात महत्वाची आणि लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे तुमच्या बाळासोबत कौटुंबिक वेळ घालवा. त्यामुळे बाळाला सामाजिक नाती समजतील तसेच तुमच्या सोबत बाळाचा बंध घट्ट होईल. आणि त्यामुळे बाळ आनंदी राहील. बरेचसे विकासाचे टप्पे हे कुठल्याही समस्येशिवाय पार पडतात जेव्हा बाळाच्या जवळची मंडळी त्याच्या सोबत असतात आणि त्याला प्रोत्साहन देत असतात. आनंदी आणि निरोगी बाळे चांगली विकसित होतात आणि विकासाचा कुठलाही टप्पा पार करायचा रहात नाही. तथापि, जर तुम्हाला बाळाच्या विकास होताना समस्यांची छोटीशी लक्षणे जरी आढळली तर तुम्ही लगेच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. लवकर निदान होणे म्हणजे उपचारासारखे असते.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved