दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

७ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

तुमचे ७ महिन्यांचे बाळ आता हसू लागले आहे, बाळाला मूलभूत हावभाव आणि भावना समजत आहेत आणि बाळ रांगू लागले आहे तसेच ते खेळकर सुद्धा झाले आहे आणि हे सगळं बघणे म्हणजे तुम्हाला पर्वणीच नाही का! बाळ आता घन पदार्थ खाऊ लागले आहे तसेच तुमचा संपूर्ण दिवस आश्चर्याने भरलेला जात आहे. तुमचे बाळ इथून पुढे फार जिज्ञासू होईल आणि त्याच्याभोवतालच्या जगाविषयी बाळाचा दृष्टिकोन मोठा होईल.

७ महिन्यांच्या बाळाच्या विकासाच्या टप्प्याचा तक्ता

बाळाने पार केलेले विकासाचे टप्पे पुढील विकासाचे टप्पे
लपवलेल्या वस्तू शोधते वस्तू शोधू शकते
' नाही' हा शब्द समजतो एका शब्दातील सूचना समजतात
आवाजाची पट्टी समजते अगदी नजीकच्या आठवणी लक्षात राहू लागतात आणि आवाजाची वेगवेगळी पट्टी समजते.
काही गोष्टी खूप घट्ट पकडते ' pincer grasp' विकसित होते
वस्तूंजवळ लवकर पोहोचते आणि त्या तोंडाजवळ नेते वस्तू उचलण्यासाठी हाताचा वापर करते
आरसा आणि प्रतिबिंब समजते स्वतःला आणि मोठया माणसांना जास्त चांगले ओळखू लागते
कारणे आणि परिणाम समजतात काही क्रियांचे परिणाम लक्षात ठेवेल

७ महिन्यांच्या वयात तुमच्या बाळाने पार केले पाहिजेत असे विकासाचे टप्पे

जेव्हा तुमचे बाळ सातव्या महिन्यात प्रवेश करेल तेव्हा खालील विकासांवर लक्ष ठेवा

आकलन विषयक विकास

तुमच्या बाळाचे आकलन आणि समज सातत्याने वाढते. तुमच्या बाळाचा मेंदू शरीराच्या मानाने खूप झपाट्याने वाढतो जेणेकरून बाळाला त्याच्याभोवतीच्या वातावरणाशी जुळवून घेता येईल. तुमच्या बाळाला कारणे आणि परिणाम समजतील आणि वेगवेगळ्या गोष्टींमधील नाते समजेल. तुम्ही तुमच्या बाळाच्या आकलन विषयक विकास खालील बाबींद्वारे समजून घेऊ शकता

शारीरिक विकास

आकलन शक्ती मध्ये झालेल्या विकासामुळे जेव्हा बाळ आरशात बघते तेव्हा स्वतःकडे बघते आणि लोकांचे हावभाव जवळून वाचू शकते. शारीरिक दृष्ट्या बाळ मजबूत आणि स्थिर होते. इथे काही लक्षणे दिली आहेत ज्यावर तुम्ही लक्ष ठेवून बाळाच्या हालचाल कौशल्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. बाळ त्याच्या तर्जनी आणि अंगठ्यामध्ये अन्नपदार्थ किंवा काही गोष्टींचे छोटे तुकडे पकडते त्यास इंग्रजी मध्ये 'pincer grip' असे ,जमतात.

सामाजिक आणि भावनिक विकास

सामाजिक आणि भावनिक विकास हा बाळाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे कारण मोठ्यांच्या जगात पाऊल ठेवण्याआधी तो संवाद साधण्याचा एक पाया आहे. तुमच्या बाळामध्ये काही जीवनावश्यक गोष्टींचा विकास होईल त्यापैकी काही खालीलप्रमाणे
  1. स्मितहास्य, हसणे किंवा भावना व्यक्त करणे अगदी योग्य रित्या करेल
  2. पालकांच्या किंवा बाळाची काळजी घेणाऱ्या लोकांच्या भावनांचे अगदी जवळून निरीक्षण करून त्याचे अनुकरण करेल
  3. आवडी आणि नावडींसह वैयक्तिक व्यक्तिमत्त्व विकसित करण्यास प्रारंभ करेल
  4. आजूबाजूच्या लोकांसोबत क्रियाकलापांमध्ये सहभाग घ्यावासा वाटतो
  5. दुसऱ्या मुलांविषयी संवेदनशील असणे आणि ती मुले रडू लागल्यास बाळ सुद्धा रडू लागेल
  6. मोठ्या आवाजाकडे लक्ष देणे आणि भीती आणि काळजीने प्रतिक्रिया देऊ लागेल

संवाद कौशल्य

तुमचे बाळ संवाद कौशल्य विकसित होताना वेगवेगळे हावभाव आणि आवाजाद्वारे लक्ष वेधून घेणेह्यापैकी काहीतरी करत असेल. त्यापैकी काही खालीलप्रमाणे

दात येताना

तुमच्या ७ महिन्यांच्या बाळामध्ये होणाऱ्या मूलभूत बदलांपैकी एक म्हणजे दात येणे. ह्या प्रक्रियेदरम्यान तुमच्या बाळाला छोटेसे दात येतील. तुम्ही तुमच्या बाळाच्या दात येतानाच्या वेदना किंवा अस्वस्थता बाळाला कुस्करलेले अन्नपदार्थ, तसेच केळं, फळांचे काप किंवा काकडी देऊन कमी करू शकता. हे अन्नपदार्थ चावण्यास आणि पचनास सोपे असतात त्यापैकी काही लक्षणे ज्यावर तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे ती खालीलप्रमाणे

खाणे

ह्या टप्प्यावर, तुमचे बाळ ११३-२५० ग्रॅम्स अन्नपदार्थ खाईल ह्यामध्ये स्तनपान आणि फॉर्म्युला दुधाचा समावेश होतो.

डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधावा?

तुम्ही तुमचे बाळ साधे शिंकले किंवा बाळाला उचकी लागली तर डॉक्टरांना फोन करण्याची गरज नाही परंतु तुम्ही काही लक्षणांकडे लक्ष देत आहात ना ह्याची खात्री करा.

तुमच्या बाळाला विकासाचे टप्पे पार करण्यासाठी मदत व्हावी म्हणून काही टिप्स

तुम्ही तुमच्या बाळाला विकासाचे टप्पे पार करण्यास काही सोप्या टिप्सच्या आधारे मदत करू शकता
  1. शारीरिक विकासासाठी, म्हणजेच बाळाने जेव्हा नुसतेच हालचाल कौशल्य शिकण्यास सुरुवात केलेली असते तेव्हा छोट्या कप मधून कसे प्यावे हे बाळास शिकवावे
  2. काही खेळणी बाळापासून दूर ठेवा जेणेकरून बाळ ते घेण्यासाठी रांगत जाईल.
  3. बाळ खेळण्यांऐवजी आजूबाजूच्या महत्वाच्या वस्तू उचलेल. त्यामुळे ह्यावर उत्तम मार्ग म्हणजे बाळाचे लक्ष दुसरीकडे वेधून घ्यावे.
  4. महत्वाच्या वस्तू बाळापासून दूर ठेवा जेणेकरून बाळ त्याच्या जवळ असलेल्या खेळण्यांशी खेळेल.
  5. पिकबु खेळण्यास सुरुवात करात्यामुळे बाळ लपवलेल्या वस्तू कशा शोधाव्यात हे कौशल्य शिकेल.
  6. तुमच्या बाळाशी बोलत रहा आणि बाळासाठी गाणी म्हणा. त्यामुळे हळूहळू तुमचे बाळ त्यातील काही शब्द घेऊन तुमच्या गाण्यात बाळ सहभाग घेऊ शकते.
  7. बाय करा, हाय म्हणा आणि रोजच्या जीवनात साधे नियम पाळा.
  8. गोष्टीची पुस्तके निवडा आणि त्यामध्ये चित्रे असलेली पुस्तके जास्त असू द्या आणि बाळासाठी ती मोठ्याने वाचा.
बाळासाठी घरात सुदृढ आणि शोधक असे वातावरण तयार करा ज्यामुळे बाळ आनंदी आणि निरोगी राहील आणि बाळाचा विकासाचा प्रत्येक टप्पा नीट पार पडेल. तसेच एखादा टप्पा बाळ पार करू शकत नसेल तर सौम्य रहा. प्रत्येक बाळ हे वेगळे असते आणि त्यांचे वाढीचे चक्र वेगळे असते. त्यामुळे संयम राखा आणि बाळाच्या विकासास मदत करा.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved