बाळाच्या जन्मापासून पहिले काही महिने चांगले गेले आणि परिस्थिती अजून चांगली होणार आहे. परंतु बाळाची वाढ खूप वेगाने होत असल्याने वाढणारे हे बाळ खूप आश्चर्ये घेऊन येते.
पहिल्या चार महिन्यात तुमच्या बाळाचे नुसते पुढे सरकण्यापासून थोडे रांगण्यापर्यंत प्रगती होते आणि बाळ आई बाबांना ओळखू लागते तसेच वेगवेगळे आवाज बाळांना कळू लागतात. जेव्हा तुमचे बाळ तुमच्या डोळ्यात टक लावून बघू लागेल तेव्हा तुम्ही पालकत्वाच्या आनंदाच्या शिखरावर असाल!
४ महिन्यांच्या बाळाचा वाढीचा तक्ता
४ महिन्यांच्या बाळाच्या आयुष्यात विकासाच्या दृष्टीने खूप बदल होत असतात. ४ महिन्यांच्या बाळामध्ये सर्वात सामान्यपणे आढळणारे विकासाचे टप्पे खालीलप्रमाणे -
पार केलेले विकासाचे टप्पे |
ह्या पुढील विकासाचे टप्पे |
डोळ्यांनी जवळच्या वस्तू पाहणे |
हलणाऱ्या वस्तूंचा मागोवा घेऊ लागेल |
वेगवेगळया भावनांना रडून प्रतिसाद देते |
वेगवेगळ्या भावनांनुसार चेहऱ्यावर वेगवेगळे भाव दर्शवेल |
आधाराने बाळ बसू लागते |
थोडा वेळ आधार न देता सुद्धा बसू शकेल |
दोन्ही हातानी खेळणी धरू लागते |
खेळणं एका हातातून दुसऱ्या हातात घेऊ शकेल |
नवीन खेळणी आणि चेहऱ्यांचे जवळून निरीक्षण करते |
वेगवेगळे चेहरे आणि वस्तू बघण्यास उत्सुक असेल |
वेगवेगळे आज आणि शब्द बाळ ओळखू लागते |
स्वतःचे नाव समजू लागेल आणि त्यानुसार बाळ प्रतिक्रिया देऊ लागेल |
पोटावर झोपवल्यावर हळू हळू पुढे सरकते |
पोटावर झोपवल्यावर पुढे सरकू लागेल |
४ महिन्यांच्या बाळामध्ये दिसून येणारे विकासाचे टप्पे
दररोज बाळाला सांभाळणे हे आपण अनुभवलेले नसते. म्हणून त्यांचा विकास योग्य दिशेने होतो आहे किंवा नाही हे ह्यावर लक्ष ठेवणे अवघड आहे. बाळाचे एवढे रडणे ठीक आहे ना? तसेच माझे बाळ आधाराशिवाय डोक्याचे संतुलन नीट करत असेल ना?
आणि बाळाला भरवण्यापासून ते बाळाचा संज्ञात्मक आणि भावनिक विकासाबरोबरच तुमचे बाळ जेव्हा ४ महिन्यांचे होईल तेव्हा ते विकासाचे वेगवेगळे टप्पे पार पाडेल.
आकलन विषयक विकास
तुमचे बाळ आता खऱ्या जगातील वस्तू, चेहरे आणि भावना ह्यांचा संबंध लावू शकेल
- वेगवेगळ्या आवाजात बाळ रडू लागेल: जेव्हा बाळाची नॅपी ओली होते, किंवा बाळ दुःखी असेल किंवा कोणाची तरी आठवण येत असेल तर प्रत्येक भावना पोहचवण्यासाठी बाळ वेगवेगळ्या स्वरात रडू लागेल. रडणं एकसारखे नसेल आणि तुमच्या लक्षात येईल की रडण्याचा पॅटर्न हा कारणे आणि प्रसंग ह्यानुसार वेगवेगळा असतो.
- प्रतिक्रिया आणि प्रतिसाद - जेव्हा तुम्ही बाळला पाजण्याच्या स्थितीत घेता तेव्हा बाळ त्याप्रमाणे तोंड उघडते. त्यांच्याप्रमाणे जर तुम्ही बाळाला खेळणं दाखवले तर ते हसू लागते आणि बाळाला समजते की आता खेळायची वेळ झाली आहे. ह्या सगळ्या मुळे बाळे लगेच प्रतिसाद देतात. बाळाला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्यापासून ते लांब राहू लागते. तुमचे बाळ वेगवेगळ्या भावनांना प्रतिसाद देऊ लागते. जेव्हा तुम्ही बाळाला मिठी मारता तेव्हा किंवा बाळाची पापी घेता तेव्हा बाळाचा प्रतिसाद त्याप्रमाणे असतो.
- स्मरणशक्ती सुधारेल - तुमच्या बाळाला त्याची आवडती खेळणी, लोक, क्षण किंवा वस्तू लक्षात राहतील. जर तुम्ही बाळाला खेळणी दिलीत तर बाळ त्याचे सर्वात आवडते खेळणे घेते. तेच लोकांच्या बाबतीत सुद्धा होते. आवडीच्या लोकांकडे बाळ जाते आणि नावडत्या लोकांपासून ते दूर जाते किंवा रडू लागते.
- बाळ दुःख दाखवू लागेल - तोंडावरील हावभावावरून तुमचे बाळ चेहऱ्यावरील दुःख दाखवू लागेल आणि सहानुभूती सुद्धा दाखवू लागेल
शारीरिक विकास
४ महिन्यांच्या बाळाचे शारीरिक विकासाचे टप्पे :
- वस्तूंपर्यंत पोहोचणे आणि त्या तोंडात घालणे - तुमचे बाळ वस्तूंपर्यंत पोहोचते आणि त्या तोंडात घालू लागते तसेच स्वच्छ कापड तोंडात घालू लागते किंवा आनंदाने खुळखुळा वाजवू लागते.
- पालथे पडणे - रांगायला शिकताना किंवा बाळ पालथे सुद्धा पडू लागते. तुमच्या लक्षात येईल की बाळ डोके, खांदे आणि पाय उंचावून बघण्याची धडपड करेल आणि पोटावरून पाठीवर आणि पाठीवरून पोटावर पालथे पडू लागेल.
- बसणे आणि उभे राहणे - तुमचे बाळ थोड्या वेळ आधाराशिवाय बसू लागेल आणि तुम्ही थोडा आधार दिला तर उभेसुद्धा राहू लागेल
- मान धरू लागेल - तुमचे बाळ मान धरू लागेल आणि आधी सारखे आधार दिला नाही तर डोके मागे जाणार नाही. बाळ डोके वेगवेगळ्या दिशेला वळवू लागेल आणि लोकांकडे बघेल
झोपेच्या सवयी
झोपेच्या सवयीच्या विकासाविषयी खालील गोष्टी तुम्हाला माहित असणे जरुरीचे आहे
- झोपेच्या वेळा - तुमच्या बाळाच्या झोपेच्या वेळा आता ठरल्या असतील आणि तुमच्या लक्षात येईल की बाळ ठराविक वेळेला झोपेल आणि सरासरी दररोज १४ तास झोपेल.
- पाजण्याचा वेळा कमी होतील - पाजले नाही किंवा भरवले नाही तरी सुद्धा तुमचे बाळ रात्री ८ तास झोपेल.
- काही मंतरलेल्या वेळा - तुमचे बाळ संध्याकाळी (साधारणपणे ५:३०) च्या सुमारास चिडचिडे होईल त्यामुळे त्याआधीच तुम्ही बाळाला झोपवा.
- जास्त वेळ झोपणे - खरंतर ४ महिन्यांचे बाळ कमीत कमी ९० मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ झोपले पाहिजे. बाळाला पाळण्यात जास्त वेळ झोप लागेल ह्याकडे लक्ष द्या.
सामाजिक आणि भावनिक टप्पे
४ महिन्यांच्या बाळामध्ये सामाजिक आणि भावनिक टप्पे खालीलप्रमाणे दिसून येतात -
- वेगवेगळ्या संकेतांना प्रतिक्रिया आणि प्रतिसाद देणे - उदा: जर तुम्ही बाळासोबत हसलात आणि बाळावर प्रेमाचा वर्षाव केलात तर बाळ छान आनंदाने प्रतिसाद देते आणि मनात तो आनंद जपून ठेवते. पुन्हा त्या आनंदाची तो वाट बघत बसतो. तुम्ही बाळाच्या पोटाला गुदगुल्या केल्यात तर त्याला हसू येईल किंवा तुम्ही बाळाला पाठीवर सुद्धा घेऊ शकता
- स्वःच स्वतःचे मन रमवणे - जेव्हा भूक लागेल तेव्हा अंगठा चोखणे हे मन रमवण्याचे चिन्ह आहे.
- उत्सुकता आणि उत्साह वाढेल - जेव्हा आई बाबा किंवा नातेवाईक येतात तेव्हा बाळ उत्साही होते आणि त्यांना पुन्हा भेटण्याची वाट पहात राहते.
- सामाजिक संवाद - तुमचे बाळ त्याच्या वयाच्या लहान मुलांना भेटण्यास उत्सुक असेल आणि मित्र मैत्रिणीशी खेळताना सुद्धा ते योग्य ती प्रतिक्रिया देईल.
डॉक्टरांशी केंव्हा संपर्क साधावा?
तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा जर :
- जर तुमचे बाळ अचानक बडबड करायचे थांबले असेल तर
- बाळाजवळ जाऊन सुद्धा ते इतरांशी संवाद साधत नसेल तर
- भावनिक संकेतांना प्रतिसाद देत नसेल तर
- खेळणी घेण्यात किंवा खेळण्यांशी खेळण्यात रस वाटत नसेल तर
- तुमच्या ४ महिन्यांच्या मुलाला वाढीचे मोठे टप्पे गाठण्यासाठी मदत करण्याचे मार्ग
तुमच्या ४ महिन्यांच्या बाळाला विकासाचे टप्पे गाठण्यास मदत होण्यासाठी खाली काही मार्ग दिले आहेत
बाळाला टी. व्ही. पासून दूर ठेवा आणि बाळाचा स्क्रीन टाईम सुद्धा मर्यादित ठेवा कारण ह्या वयात बाळाच्या मेंदूला उत्तेजना देण्याची गरज नाही. बाळ गुंतून राहावे किंवा बाळाचे लक्ष नीट असावे म्हणून आवाजाचा वापर करा
- बाळाला वेगवेगळी खेळणी द्या त्यामुळे बाळ वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेईल तसेच कारणे व त्यांचे परिणाम ही संकल्पना सुद्धा त्यांना कळेल. चुरगळलेला कागद आणि सेलोफेन ह्या गोष्टी ह्या वयातील आवडीच्या आहेत.
- रोग आणि गंभीर आजार होऊ नये म्हणून बाळाचे वेळेवर लसीकरण होत आहे ना ह्याकडे लक्ष द्या
- तुमचे घर स्वच्छ ठेवा. घर खूपही जास्त स्वच्छ ठेवू नका कारण थोडी धूळ आणि काजळी ठेवल्याने त्यांची प्रतिकार प्रणाली मजबूत होण्यास मदत होते.
- तुमचे घर नीट आवरुन ठेवा, ज्या वस्तू टेबलावरून खाली पडण्याची शक्यता असते त्या बाजूला ठेवा. त्यामुळे बाळाला इकडे तिकडे फिरण्यास जागा मिळेल आणि त्यामुळे मांड्या आणि पायांच्या स्नायूंना व्यायाम होईल आणि त्यामुळे रांगण्यास प्रोत्साहन मिळेल
आता साठी इतकंच! पालक होण्यासाठी कुठलाही जादुई घटक नाही. फक्त बाळावर बारीक लक्ष ठेवा, बाळाने दिलेल्या संकेत, प्रतिक्रिया आणि प्रतिसादाकडे लक्ष द्या बाळाला दूध पाजा आणि वेळेवर झोपवा. तुमच्या बाळाला झोप आवडेल आणि ह्या वयात त्याचा वाढीसाठी सुद्धा उपयोग होईल त्यामुळे बाळाची दिनचर्या हा जादुई शब्द आहे.