In this Article
आईचे दूध हे अतिशय पौष्टिक असते. बाळाच्या आयुष्याच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये आईचे दूध म्हणजे ऊर्जा आणि पोषक तत्वांचा उत्तम स्रोत असते. म्हणून, स्तनपान करणाऱ्या आईने तिच्या आहारात निरोगी पदार्थांचा समावेश केला पाहिजे. निरोगी आहार घेतल्याने तुमच्या दुधाद्वारे बाळाला सुद्धा पौष्टिक घटक मिळतील. आपण पौष्टिक आहाराबद्दल बोलत असताना आम्हाला वाटले की स्तनपान करताना कोणती फळे खावीत आणि टाळावीत याबद्दल आम्ही तुम्हाला सांगितले पाहिजे. चला तर मग ही फळे कोणती ते जाणून घेऊयात!
व्हिडिओ: स्तनपान करताना खाण्यासाठी 6 सर्वोत्तम फळे
स्तनपान करताना खावीत अशी फळे
सर्व फळे पौष्टिक आणि चवदार असतात. परंतु काही विशिष्ट फळे बाळंतपणानंतर आणि स्तनपान करताना निर्माण होणाऱ्या गुंतागुंती पासून आराम देतात. स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी इथे काही फळे दिलेली आहेत आणि ही फळे स्तनपानादरम्यान कशी मदत करू शकतात याबद्दलची माहिती सुद्धा ह्या लेखात दिलेली आहे.
1.हिरवी पपई
हिरव्या पपईमध्ये गॅलॅक्टॅगॉग असतात. गॅलॅक्टॅगॉग हे पदार्थ आईच्या दुधाच्या उत्पादनास प्रोत्साहन देतात. त्यामुळे ज्या स्त्रियांना त्यांचे स्तनपान सुधारायचे आहे त्यांच्यासाठी हे फळ फायदेशीर ठरू शकते. हिरवी पपई खाल्ल्याने तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत होते आणि ते स्तनपानादरम्यान आवश्यक आहे. हिरवी पपई हे नॉन-ऍसिडिक व्हिटॅमिन सीचे समृद्ध स्त्रोत देखील आहे आणि नैसर्गिक रेचक म्हणून कार्य करते. अशा प्रकारे हे फळ बद्धकोष्ठता टाळण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करू शकते. ह्या फळाचा आहारात समावेश करण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्लास स्मूदीमध्ये अर्धा कप हिरवी पपई टाकू शकता. तुम्ही ते टेम्परिंग केल्यानंतर सॅलड म्हणूनही खाऊ शकता.
2. केळी
केळी रेचक देखील आहे आणि केळ्यांमुळे पचनास मदत होऊ शकते. केळी फायबरचा समृद्ध स्रोत असल्याने बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते. परंतु, हे फळ स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी योग्य आहे. ह्याचे कारण म्हणजे त्यामध्ये असलेले पोटॅशियमचे समृद्ध प्रमाण होय . पोटॅशियम गरोदरपणात महत्वाचे आहे. तुमच्या शरीरातील द्रवपदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासाठी स्तनपान करताना तुम्हाला त्याची अधिक आवश्यकता असेल.
3. एवोकॅडो
एवोकॅडो हे आरोग्यदायी फळ आहे. आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी हे फळ फायदेशीर ठरू शकते. केळ्यांप्रमाणेच एवोकॅडोमध्येही भरपूर पोटॅशियम असते. स्तनपानादरम्यान एवोकॅडो खाल्ल्याने तुमच्या बाळाची दृष्टी, केसांची गुणवत्ता, हृदयाचे आरोग्य आणि पचन विकसित होण्यास मदत होते.
4. टरबूज
टरबूज हे व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, नियासिन, थायामिन आणि फोलेट्स इत्यादीने समृद्ध आहे. हे फळ खाल्ल्याने हायड्रेटेड राहण्यास मदत होते. या फळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने, स्तनपानादरम्यान आणि इतरवेळी देखील शरीरातील द्रव संतुलन राखण्यास टरबुजाची मदत होऊ शकते.
5. चिकू
चिकू मध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी चिकू चांगला असतो. चिकू खाल्ल्याने तुम्ही स्तनपानादरम्यान बर्न होणाऱ्या कॅलरी भरून काढू शकता. चिकूमध्ये फायबर आणि असंख्य खनिजे तसेच जीवनसत्त्वे देखील असतात. ह्यामध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ असतो त्यामुळे स्तनपान करणा-या स्त्रियांसाठी हे फळ म्हणजे निरोगी पर्याय आहे.
6. अंजीर
अंजिरामध्ये मॅंगनीज, मॅग्नेशियम, तांबे, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम ह्यासारखी अनेक खनिजे असतात. अंजीर तंतुमय पदार्थ, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन बी 6 इत्यादींचा उत्तम स्रोत आहे. ह्याच कारणामुळे सॅलेडच्या अनेक पाककृतींमध्ये अंजीर वापरले जाते आणि अनेक बेबी फूड कंपन्या, बेबी फूडमध्ये अंजीरचा समावेश करतात.
7. जर्दाळू
जर्दाळू मध्ये भरपूर प्रमाणात सी, ए, ही जीवनसत्वे असतात. जर्दाळू हे कॅल्शियम आणि पोटॅशियमचे उत्कृष्ट स्रोत आहेत. हे जादुई फळ फायटोएस्ट्रोजेन्स नावाच्या महत्त्वाच्या रसायनांची पातळी कमी करते. हे रसायन इस्ट्रोजेन प्रमाणेच कार्य करते. त्यामुळे स्त्रियांमधील दूध उत्पादक हार्मोन्सचे नियमन करण्यासाठी देखील मदत होते. जर्दाळू मुळे दूध पुरवठा वाढतो.
8. स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरी मध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. लोहामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ह्यासारखी जीवनसत्वे असतात. पण स्ट्रॉबेरीचा आहारात समावेश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
9. ब्लूबेरी
ब्ल्यूबेरी हे स्तनपान करताना खाण्यासाठी सर्वोत्तम फळांपैकी एक आहे. ब्लूबेरीमध्ये आवश्यक पोषक घटक असतात आणि त्यांचे अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करतात. ब्लूबेरीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे, कॅल्शियम, पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स देखील समृद्ध प्रमाणात असतात.
10. आंबा
आंब्यामध्ये फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. हे फायबर आणि पोटॅशिअम स्तनपान करणा-या स्त्रियांना त्यांच्या पोषक तत्वांची भरपाई करण्यास मदत करते. आंब्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन के देखील जास्त असते.
बाळाला स्तनपान करताना काही फळे टाळावीत का?
बाळाला स्तनपान करताना काही फळे टाळली पाहिजेत. ही फळे म्हणजे स्तनपान करणारी आई आणि तिच्या बाळाला आवश्यक असलेल्या पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहेत. म्हणून, बाळाला स्तनपान देणाऱ्या स्त्रियांनी आपल्या आहारामध्ये विविध प्रकारच्या फळांचा समावेश केला पाहिजे. परंतु, तुम्ही तुमच्या आहारात विशिष्ट फळाचा समावेश केल्यानंतर तुमच्या बाळाने त्यास पुरळ, सूज आणि उलट्या ह्यासारख्या नकारात्मक प्रतिक्रिया दिल्यास तुम्ही स्तनपान करत असताना हे फळ खाणे टाळा. जर तुमच्या बाळाला लवकर बरे वाटत नसेल तर बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या. येथे काही फळे आहेत जी तुम्ही स्तनपानादरम्यान टाळली पाहिजेत:
1. लिंबूवर्गीय फळे
स्तनपान करणाऱ्या आईने लिंबूवर्गीय फळांच्या सेवनावर लक्ष ठेवले पाहिजे कारण आईच्या दुधाद्वारे बाळाच्या पचनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे किवी, अननस, संत्री आणि द्राक्षे यासारखी फळे खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
2. चेरी
चेरीमुळे कधी कधी बाळाला गॅसची समस्या होऊ शकते. म्हणून, स्तनपान करताना चेरी खाणे टाळावे.
तुमच्या बाळाचे आरोग्य तुमच्या आरोग्यावर अवलंबून असते आणि तुमचे आरोग्य तुम्ही काय खाता यावर अवलंबून असते. काही वेळेला तुम्हाला जंक फूड खावेसे वाटेल परंतु अशा वेळी बाळाचा विचार करा – आम्हाला माहित आहे की तुम्ही निरोगी पदार्थांची निवड कराल. तुम्ही बाळाला स्तनपान करत असताना भरपूर पाणी प्या आणि तुमच्या आहारात फळे आणि भाज्या (ज्यामुळे गॅस होत नाही) इत्यादींचा समावेश करा. स्तनपान करत असताना तुम्हाला योग्य आहार योजना हवी असल्यास तुम्ही पोषणतज्ञांचा सल्ला देखील घेऊ शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. स्तनपान करताना मी डाळिंब आणि सफरचंद खाऊ शकते का?
होय, तुम्ही स्तनपान करताना डाळिंब आणि सफरचंद सारखी पौष्टिक फळे खाऊ शकता.
2. स्तनपान करताना काही फळे पोषक घटक किंवा औषधे शोषू शकतात का?
काही फळांमध्ये विरोधी पोषक घटक असतात, परंतु अननस, टरबूज, पपई आणि सफरचंद यांसारख्या फळांमध्ये आढळणारी ह्या घटकांची पातळी सुरक्षित असते. याव्यतिरिक्त, काही विरोधी पोषक घटकांचे फायदे देखील असल्याचे सिद्ध झाले आहे. अशाप्रकारे, या फळांचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते.
3. एखादे फळ आईच्या दुधावर परिणाम करत आहे की नाही हे मी कसे ठरवू शकते?
ह्यासाठी तुम्ही तुमच्या बाळाचे डायपर तपासून पाहू शकता. जर बाळाला दररोज सहा पेक्षा जास्त ओले डायपर लागत असतील आणि त्यामध्ये स्पष्ट किंवा खूप फिकट लघवी असेल तसेच दररोज चार पेक्षा जास्त बियाणांएवढे शौचास झालेले असेल तर बाळाला पुरेसे दूध मिळते.
डायपर कमी प्रमाणात ओले होत असतील आणि लघवीचा रंग गडद पिवळा असेल तर बाळाला पुरेसे दूध मिळत नसल्याचे सूचीत होते.
आणखी वाचा:
स्तनपान करताना मधाचे सेवन करणे
शाकाहारी,मांसाहारी आणि वेगन आहार घेणाऱ्या स्त्रियांसाठी स्तनपान आहार विषयक टिप्स