एक आई म्हणून बाळासाठी एकाच प्रकारची खिचडी करताना तुम्हाला कंटाळा येईल. तुमच्या बाळाला सुद्धा सारखी तशीच खिचडी खायला आवडणार नाही. खिचडी हा एक अत्यंत पौष्टिक अन्नपदार्थ आहे, त्यामुळे तो बाळाच्या अन्नपदार्थांच्या मेनूमधून काढून टाकणे हा काही योग्य पर्याय नाही.
लहान मुलांसाठी खिचडीचे १० वेगवेगळे प्रकार कसे करावेत ह्याविषयी हा लेख आहे. खिचडीचे वेगवेगळे प्रकार करताना तुम्हाला काही प्रयोग करावे लागतील जेणे करून खिचडी अधिक पौष्टिक होईल. ह्या लेखात दिलेल्या खिचडीच्या पाककृती करताना तुम्हाला स्वयंपाक घरात कंटाळवाणे होणारे नाही ह्याची आमहाला खात्री आहे!
लहान मुलांसाठी खिचडीच्या १० सोप्या पाककृती
येथे खिचडीच्या १० सोप्या पाककृती दिलेल्या आहेत,
१. बाळासाठी साधी मूग डाळ खिचडी
तुमच्या बाळाने अजून खिचडी खाण्यास सुरुवात केली नसेल तर त्यासाठी ही एक पहिली पायरी आहे. तांदूळ आणि डाळीचे मिश्रण खाण्याची सवय झाल्यावर तुमच्या बाळाला खायला देण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.
साहित्य
- तांदूळ – १ टीस्पून
- मूग डाळ – १ टीस्पून
- हळद – एक चिमूटभर
कृती
प्रथम तांदूळ आणि डाळ धुवून गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. नंतर प्रेशर कुकरमध्ये कपभर पाणी घालून ३ शिट्ट्या होऊ द्या. जर मिश्रण खूप घट्ट असेल तर तुम्ही आणखी थोडे गरम पाणी घालू शकता आणि हे मिश्रण खायला देण्याआधी ते चमच्याने चांगले एकत्र करून घ्या.
२. लहान मुलांसाठी भाज्या घालून केलेली बिनमिठाची खिचडी
एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांसाठी खिचडीचा हा प्रकार आहे, भातानंतर घन पदार्थाची ओळख करून देण्यासाठी ह्या प्रकारची खिचडी देणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.
साहित्य
- तांदूळ – १/२ कप
- मूग डाळ -१/२ कप
- मिश्र भाज्या धुऊन चिरून (बटाटे, गाजर, मटार, बीन्स) – १ कप
- तूप – १ टीस्पून
- हळद – १ चिमूटभर
- जिरे – १/२ टीस्पून
कृती
डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. कुकरमध्ये तूप जिरे तडतडेपर्यंत गरम करा, नंतर इतर साहित्य आणि पाणी घाला. हे मिश्रण ४ शिट्ट्या पर्यंत शिजू द्या आणि नंतर ते चमच्याने मिसळा आणि तुमच्या बाळाला द्या.
३. लहान मुलांसाठी तूर डाळ खिचडी
तूर डाळ हा प्रत्येक घरातील प्रमुख पदार्थ आहे, परंतु लहान मुलांसाठी तूर डाळ ही मूग डाळीपेक्षा पचायला किंचित जड आहे. मोठ्या बाळांना (८ महिने आणि त्याहून अधिक) तूर डाळ खिचडी देणे अधिक योग्य आहे.
साहित्य
- तांदूळ – १/२ कप
- तूर डाळ – १/४ कप
- तूप – १ टीस्पून
- जिरे – १/२ टीस्पून
- हिंग – एक चिमूटभर
- हळद – १/२ टीस्पून
कृती
डाळ आणि तांदूळ चांगले धुऊन अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर, हळद आणि २ कप पाणी दोन्ही प्रेशर शिजवून सुमारे ४-५ शिट्ट्या होऊ द्या. एका तव्यावर थोडं तूप गरम करा आणि त्यात जिरे आणि हिंग घाला, हे मिश्रण चांगले तडतडल्यावर खिचडीमध्ये घालून तुमच्या बाळाला सर्व्ह करा.
४. लहान मुलांसाठी पालक खिचडी
पालक लहान मुलांसाठी अत्यंत पौष्टिक असते. हिरव्या पानांमध्ये भरपूर पोषक घटक आणि खनिजे (विशेषतः लोह) असतात, आणि हे सर्व घटक तुमच्या बाळाच्या वाढीसाठी उत्तम असतात.
साहित्य
- तांदूळ – १/२ कप
- तूर डाळ – १/४ कप
- पालक (बारीक चिरून) – १/२ कप
- तूप – १ टीस्पून
- जिरे – १/२ टीस्पून
- लसूण – २ लवंगा
- हळद – एक चिमूटभर
कृती
डाळ आणि तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर, हळद घालून सुमारे ५ शिट्ट्या होईपर्यंत चांगले शिजवून घ्या. नंतर कढईत तूप आणि जिरे तडतड होईपर्यंत गरम होऊ द्या आणि त्यात लसूण घाला. त्यानंतर, पालक घाला, चांगले एकत्र करून मिश्रण शिजवून घ्या. पाने शिजल्यावर त्यात तांदूळ-डाळ घाला. काही मिनिटे शिजू द्या आणि सर्व्ह करण्यापूर्वी लसणाच्या पाकळ्या काढून टाका.
५. मसूर डाळ खिचडी
पारंपारिकपणे बंगाली डिश, तरीही ही डिश मुलांसाठी चांगली आहे
साहित्य
- तांदूळ – १/२ कप
- मसूर डाळ – १/४ कप
- बटाटा – १/२
- कच्ची पपई – १ तुकडा
- तूप – १टीस्पून
- १ तमालपत्र
- जिरे – १/२ टीस्पून
- हळद – एक चिमूटभर
कृती
तांदूळ आणि डाळ धुतल्यानंतर पाण्यात भिजत ठेवा. प्रेशर कुकरमध्ये ४-५ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या. भाज्या स्वच्छ करा आणि भाज्यांचे लहान तुकडे करा. तूप गरम करून त्यात जिरे घाला आणि चांगले तडतडू द्या. आता त्यात तमालपत्रासोबत मिश्रण घाला. मिश्रण थोडे परतून घ्या/ त्यामध्ये बटाटा आणि पपई घाला आणि नंतर मिश्रण ५-६ मिनिटे शिजवून घ्या. खिचडी चमच्याने मॅश करा आणि तुमच्या मुलाला सर्व्ह करा.
६. टोमॅटो खिचडी
टोमॅटोची खिचडीमुळे तोंडाला पाणी सुटते आणि तुमच्या लहान मूल ही खिचडी पुन्हा मागेल!
साहित्य
- तांदूळ – २/३ कप
- तूर डाळ – १/३ कप
- कांदा, टोमॅटो – प्रत्येकी १
- जिरे – १/२ टीस्पून
- हळद आणि तूप – आवश्यकतेनुसार
कृती
तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्या आणि पाण्यात अर्धा तास भिजत घाला. आता टोमॅटो आणि कांदा चिरून घ्या. प्रेशर कुकरमध्ये तूप आणि जिरे घाला आणि ते तडतड होईपर्यंत गरम करा. नंतर कांदे घाला आणि तांबूस होईपर्यंत परतून घ्या. त्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद सोबत टोमॅटो, तांदूळ आणि डाळ घाला. तीन कप पाणी घालून ३ शिट्ट्या करून घ्या.
७. मसाला खिचडी
खिचडीचा हा आणखी एक प्रकार आहे. ही खिचडी तिखट, चवदार चव असू शकते.
साहित्य
- तांदूळ – १/२ कप
- तूर डाळ आणि मूग डाळ – प्रत्येकी २ चमचे
- कांदा – १
- जिरे – १/२ टीस्पून
- दालचिनीची काठी – एक लहान
- हळद पावडर आणि आवश्यकतेनुसार तूप
कृती
तांदूळ आणि डाळ धुवून सुमारे अर्धा तास भिजत ठेवा. कुकरमध्ये तूप घाला. नंतर तुपात जिरे, लवंगा आणि दालचिनी घालून परतून घ्या – तुपात चिरलेला कांदा घाला आणि तांबूस होईपर्यंत गरम करा. नंतर, त्यामध्ये तांदूळ आणि डाळ घाला. त्यानंतर ते एक मिनिटासाठी परतून घ्या. ३ कप पाणी घालून ३ शिट्ट्या करा. मॅश करून सर्व्ह करा.
८. दही खिचडी
बाळाला गॅस्ट्रिक समस्या असल्यास ह्या प्रकारची खिचडी बाळाला देणे चांगले असते.
साहित्य
- तांदूळ – १ कप
- मूग डाळ – २ चमचे
- जीरा – १/२ टीस्पून
- दही – १/४ कप
- तूप
कृती
सर्वात आधी मूग डाळ आणि तांदूळ घालून साधी खिचडी बनवा. नंतर, दही घालून चांगले एकत्र करून घ्या. कढईत तूप घाला आणि गरम झाल्यावर जिरे टाका – मिश्रण तडतडू द्या. नंतर त्यात खिचडी घालून २ मिनिटे गरम करा. गरम गरम सर्व्ह करा.
९. गव्हाची दलिया खिचडी
गव्हाच्या दलियामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ते पचन समस्या सोडवण्यास मदत करते.
साहित्य
- गहू दलिया – ३/४ कप
- मूग डाळ – १/४ कप
- जिरा – १ टीस्पून
- हिंग आणि हळद – एक चिमूटभर
- कांदा – १
- लसूण आणि आले – लहान तुकडे, एकत्र मॅश करा
- भाज्या (बटाटा, गाजर) कापून घ्या – आवश्यकतेनुसार
- तूप
कृती
दलिया धुवून अर्धा तास भिजत ठेवा. प्रेशर कुकरमध्ये तूप घाला आणि हिंग आणि जिरे घालून ते चांगले तडतडेपर्यंत गरम करा. नंतर, भाज्यांसह कांदे आणि आले घाला. हे एक मिनिट चांगले परतून घ्या. त्यानंतर, मूग-दालियाच्या मिश्रणामध्ये ४ कप पाणी घाला – ४ शिट्ट्या करून चांगले शिजवून घ्या.
१०. लहान मुलांसाठी ओट्स खिचडी
ओट्समध्ये देखील तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात तसेच त्यामध्ये भरपूर खनिजे असतात. ही खनिजे बाळाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असतात.
साहित्य
- ओट्स – २/३ कप
- मूग डाळ – १/३ कप
- हिंग आणि लसूण – पर्यायी
- तूप
कृती
डाळ आणि ओट्स धुवून सुमारे अर्धा तास एकत्र भिजत ठेवा आणि नंतर पाणी काढून टाकल्यानंतर कुकरमध्ये हे मिश्रण घाला. त्यामध्ये लसणाच्या दोन पाकळ्या आणि एक चिमूटभर हिंग आणि ३ कप पाणी घाला. ३ शिट्ट्या होऊ द्या. मिक्सर मधून काढून सर्व्ह करा.
खिचडीच्या अनेक पाककृती आहेत, आणि प्रयोगाला भरपूर वाव आहे – त्यामुळे तुमच्या बाळाला काय आवडते हे शोधण्यासाठी भरपूर कॉम्बिनेशन वापरून पहा!
आणखी वाचा:
बाळांसाठी ओट्स – आरोग्यविषयक फायदे आणि रेसिपीज
बाळांसाठी तांदळाची पेज – आरोग्यविषयक फायदे आणि ती कशी तयार करावी