Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे आठवडे भ्रूणाची दर आठवड्याला होणारी वाढ – लांबी आणि वजन

भ्रूणाची दर आठवड्याला होणारी वाढ – लांबी आणि वजन

भ्रूणाची दर आठवड्याला होणारी वाढ – लांबी आणि वजन

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच गर्भाच्या वाढीस सुरुवात होते. गरोदरपणात अल्ट्रासाऊंड स्कॅन नियमित अंतराने केले जातात. त्यामुळे बाळाचे अंदाजे वजन आणि लांबी समजण्यास मदत होते. गर्भाशयातील बाळाचा आकार वाढत असल्यामुळे पोटाचा आकार सुद्धा वाढतो.

व्हिडिओ: दर आठवड्याला होणाऱ्या गर्भाच्या वाढीचा तक्ता लांबी आणि वजन

गर्भाच्या वजनाचा तक्ता

खालील तक्ता गर्भाच्या वजनात दर आठवड्याला होणारी सरासरी वाढ दर्शवतो. खालील तक्त्यामध्ये दिलेल्या संख्या केवळ सरासरी आहेत आणि गर्भाचे खरे वजन आणि लांबी लक्षणीयरीत्या बदलू शकते. ही सामान्य मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि तुमच्या बाळाचे वजन टेबलमध्ये नमूद केलेल्या वजनाशी तंतोतंत जुळत नाही. परंतु, ते काळजीचे कारण असू नये.

गर्भधारणा आठवडा सरासरी वजन
८ आठवडे १ ग्रॅम
९ आठवडे २ ग्रॅम
१० आठवडे ४ ग्रॅम
११ आठवडे ७ ग्रॅम
१२ आठवडे १४ ग्रॅम
१३ आठवडे २३ ग्रॅम
१४ आठवडे ४३ ग्रॅम
१५ आठवडे ७० ग्रॅम
१६ आठवडे १०० ग्रॅम
१७ आठवडे १४० ग्रॅम
१८ आठवडे १९० ग्रॅम
१९ आठवडे २४० ग्रॅम
२० आठवडे ३०० ग्रॅम
२१ आठवडे ३६० ग्रॅम
२२ आठवडे ४३० ग्रॅम
२३ आठवडे ५०१ ग्रॅम
२४ आठवडे ६०० ग्रॅम
२५ आठवडे ६६० ग्रॅम
२६ आठवडे ७६० ग्रॅम
२७ आठवडे ८७५ ग्रॅम
२८ आठवडे १ किग्रॅ
२९ आठवडे १.२ किलो
३० आठवडे १.३ किलो
३१ आठवडे १.५ किलो
३२ आठवडे १.७ किलो
३३ आठवडे १.९ किलो
३४ आठवडे २.१ किलो
३५ आठवडे २.४ किलो
३६ आठवडे २.६ किलो
३७ आठवडे २.९ किलो
३८ आठवडे ३.१ किलो
३९ आठवडे ३.३ किलो
४० आठवडे ३.५ किलो

गर्भाच्या लांबीचा तक्ता

बाळाच्या वजनासोबत बाळाच्या लांबीची सुद्धा डॉक्टर नोंद ठेवतात. हा तक्ता गर्भाच्या लांबीमध्ये दर आठवड्याला होणाऱ्या बदलांचे मार्गदर्शक आहे. गर्भाची लांबी डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत मोजली जाते. बाळ गर्भाशयात असताना पाय पोटाजवळ दुमडून घेते त्यामुळे डोक्यापासून तळव्यापर्यंत लांबी मोजणे कठीण होते. २० व्या आठवड्यापासून, गर्भाची लांबी डोक्यापासून तळव्यापर्यंत मोजली जाईल.

गरोदरपणाचा आठवडा गर्भाची लांबी
८ आठवडे १.६ सेमी
९ आठवडे २.३ सेमी
१० आठवडे ३.१ सेमी
११ आठवडे ४.१ सेमी
१२ आठवडे ५.४ सेमी
१३ आठवडे ७.४ सेमी
१४ आठवडे ८.७ सेमी
१५ आठवडे १०.१ सेमी
१६ आठवडे ११.६ सेमी
१७ आठवडे १३ सेमी
१८ आठवडे १४.२ सेमी
१९ आठवडे १५.३ सेमी
२० आठवडे २५.६ सेमी
२१ आठवडे २६.७ सेमी
२२ आठवडे २७.८ सेमी
२३ आठवडे २८.९ सेमी
२४ आठवडे ३० सेमी
२५ आठवडे ३४.६ सेमी
२६ आठवडे ३५.८ सेमी
२७ आठवडे ३६.६ सेमी
२८ आठवडे ३७.६ सेमी
२९ आठवडे ३८.६ सेमी
३० आठवडे ३९.९ सेमी
३१ आठवडे ४१.१ सेमी
३२ आठवडे ४२.४ सेमी
३३ आठवडे ४३.७ सेमी
३४ आठवडे ४५ सेमी
३५ आठवडे ४६.२ सेमी
३६ आठवडे ४७.४ सेमी
३७ आठवडे ४८.६ सेमी
३८ आठवडे ४९.८ सेमी
३९ आठवडे ५०.७ सेमी
४० आठवडे ५१.२ सेमी

अल्ट्रासॉनिक गर्भमापन मानके

बायोमेट्रिक मोजमापे करण्यासाठी आणि गर्भाची वाढ सामान्य आहे की नाही हे समजण्यासाठी गॅस्टेशनल एजचा तक्ता वापरला जातो. गर्भधारणेपूर्वी स्त्रीला शेवटच्या मासिक पाळीची तारीख सांगता येत असेल, तर प्रसूतीच्या तारखेचा अधिक चांगल्या पद्धतीने अंदाज बांधला जातो. प्रसूतीच्या तारखेच्या ५ दिवस आधी किंवा नंतर बाळाचा जन्म होऊ शकतो.

गरोदरपणाच्या कालावधीचा अंदाज लावण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅन पद्धत वापरली जाते. बाळाची वाढ सामान्यपणे होत आहे आणि बाळाचे वजन हे वजन तक्त्यानुसार वाढत आहे हे गृहीत धरले जाते. जर कोणत्याही स्थितीमुळे गर्भाच्या वाढीमध्ये बदल होत असेल तर अंदाज चुकू शकतो. अल्ट्रासाऊंड पद्धतीमुळे भ्रूणांची संख्या मोजता येते, परंतु त्यापैकी फक्त काही विश्वसनीय असतात. अल्ट्रासाऊंड मध्ये गर्भाचे मोजमाप विविध भ्रूण आलेख आणि कॅल्क्युलेटर वापरून केले जाते.

गर्भाच्या अंदाजे वजनाची गणना करणारे कॅल्क्युलेटर

गर्भाच्या अंदाजे वजनाची गणना करणाऱ्या कॅल्क्युलेटरद्वारे गर्भाच्या वजनाचे पेर्सेन्टाइल तसेच प्रसूतीच्या वेळी असणारे गर्भाचे अंदाजे वजन समजते. गर्भाशयातील बाळाचे वय, द्विपेशीय व्यास, हाताच्या हाडांची लांबी , डोक्याचा घेर, मांडीच्या हाडांची लांबी आणि पोटाचा घेर इत्यादी माहिती तुम्हाला ह्या कॅल्क्युलेटर मध्ये भरायची असते. त्यानंतर कॅल्क्युलेटर प्रत्येक घटकासाठी टक्केवारी, तसेच प्रसूतीच्या वेळी असणारे बाळाचे अंदाजे वजन देतो.

समजा गरोदरपणाच्या ३० व्या आठवड्यांत बाळाचे वजन ६० पर्सेन्टाइल असेल तर ६०% बाळांचे वजन तुमच्या ३० आठवड्यांच्या बाळाइतकेच किंवा कमी असते असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच ४० % बाळांचे वजन तुमच्या ३० आठवड्यांच्या बाळापेक्षा जास्त असते.

गरोदरपणाच्या शेवटी, गर्भाच्या वजनाचा अंदाज घेण्यासाठी अल्ट्रासाऊंड स्कॅन वापरणे खूप सामान्य आहे. ह्या पद्धतीचा अचूकता दर खूपच कमी आहे. गणना केलेल्या वजनामुळे आई आणि डॉक्टर दोघांचाही प्रसूतीबाबतचा दृष्टिकोन बदलतो. म्हणून, वैद्यकीय क्षेत्रात ह्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. जोपर्यंत कुठलीही वैद्यकीय समस्या नसते तो पर्यंत ह्या पद्धतीची शिफारस केली जात नाही.

गर्भाच्या वजनाचे कॅल्क्युलेटर, वॉर्सॉफ, शेपर्ड, हॅडलॉक, कॅम्पबेल इत्यादी अनेक सूत्रांचा वापर करून अल्ट्रासाऊंड डेटानुसार प्रसूतीच्या वेळी बाळाचे वजन किती असेल ह्याचा अंदाज लावते.

गणना चार मूलभूत पॅरामीटर्स वापरून केली जाते: डोक्याचा घेर (एचसी), द्विपरीय व्यास (बीपीडी), पोटाचा घेर(एसी) आणि मंदीच्या हाडाची लांबी (एफएल).

गणना केलेले गर्भाचे वजन सरासरी वजनाच्या १६% अधिक किंवा कमी असू शकते. वास्तविक वजन १६% पेक्षा जास्त किंवा कमी असू शकते.

सुमारे ६८% बाळे १ मानक विचलन (एसडी) च्या मर्यादेत असतील आणि २ एसडी मध्ये वास्तविक वजनाच्या सुमारे ९५% बाळे समाविष्ट असावीत. तथापि, सुमारे ५% बाळे एस डी मर्यादेपेक्षा एकतर जास्त असतील किंवा २.% बाळे एसडी मर्यादेपेक्षा कमी असतील. त्यामुळे गर्भाच्या वजनासाठी हे कॅल्क्युलेटर तितकेसे अचूक नाही.

गर्भाच्या वाढीचे पर्सेन्टाइल मोजणारे कॅल्क्युलेटर

वाढीचे पर्सेंटाइल कॅल्क्युलेटर, सरासरी मूल्याच्या तुलनेत बाळ किती मोठे किंवा लहान आहे याची गणना करते. जर बाळ वाढीच्या ४० व्या टक्केवारीत असेल, तर त्याच वयाच्या ४० % मुलांपेक्षा बाळ मोठे आहे आणि त्याच वयाच्या ६०% बाळांपेक्षा ते लहान आहे असा त्याचा अर्थ होतो. ५० हे सरासरी मूल्य आहे. ५० पेक्षा कमी मूल्य म्हणजे बाळाची वाढ सरासरी मूल्यापेक्षा कमी आहे. ५० पेक्षा जास्त मूल्य म्हणजे बाळाच्या वाढीचा दर सरासरीपेक्षा जास्त आहे.

१० आणि ९० पर्सेंटाइल दरम्यान असणारा गर्भ सामान्य मानला जातो.

गर्भाशयातील गर्भाच्या वाढीचा मागोवा घेण्यासाठी किंवा गणना करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या विविध संज्ञा खाली चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेल्या आहेत.

1. क्राउनरंप लेन्थ

क्राउनरंप लेन्थ ह्या पॅरामीटर मुळे गर्भाचे गर्भाशयातील वय समजते. तसेच गर्भाच्या सरासरी लांबीचा अंदाज लावता येतो. गर्भाचे गर्भाशयातील वय अधिक किंवा उणे ३ ते ५ दिवसांच्या अचूकतेपर्यंत मोजले जाऊ शकते. हातपाय आणि योक सॅक ह्या गणनेतून वगळण्यात आले आहेत. क्राउनरंप लेन्थचा वापर गरोदरपणाच्या कालावधीची गणना करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. हा पॅरामीटर वापरून डॉक्टर तुमच्या प्रसूतीच्या तारखेचा अंदाज लावू शकतात.

2. डोक्याची रुंदी आणि घेर (बायपेरिएटल डायमीटर अँड हेड सर्कमफेरन्स)

बीपीडी किंवा बायपेरीएटल व्यास म्हणजे डोक्याच्या सर्वात रुंद भागाची लांबी होय. ह्याचे मोजमाप डोक्याच्या हाडाच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत केले जाते. हे मोजमाप करताना चुका होण्यास फारसा वाव नाही कारण डोक्याचा आकार अंडाकृती असतो. म्हणूनच ही पद्दत पुन्हापुन्हा वापरली जाते. डोक्याचा आकार मेंदूच्या वाढीद्वारे निर्धारित केला जातो आणि मेंदूच्या विकासाच्या इतर पैलूंचा विचार केला जात नाही.

3. हातापायांच्या हाडांची लांबी (फेमर अँड ह्यूमरस लेन्थ)

ही पद्दत देखील विश्वसनीय आहे आणि त्याची पुनरावृत्ती केली जाऊ शकते. स्केलेटल डिसप्लेसीयास असल्यास त्याचा परिणाम होतो परंतु ही स्थिती अत्यंत दुर्मिळ आहे. हे मापन डोक्याच्या मापनाची पुष्टी करते. ह्या मापनाचे सर्वोत्तम मूल्य १४ आठवड्यांनंतर मिळू शकते. गरोदरपणाच्या कालावधीचा अंदाज लावण्यासाठी, किमान २ किंवा कधीकधी ४५ मोजमापांची आवश्यकता असू शकते.

4. गर्भाचे अंदाजे वजन (एस्टीमेटेड फिटल वेट)

विविध प्रकारचे संगणक सॉफ्टवेअर आणि तक्ते आहेत. गर्भाच्या वजनाची गणना करण्यासाठी तसेच पोटाचा घेर, द्विपेशीय व्यास, हाताच्या हाडांची लांबी आणि इतर मोजमापांसाठी डॉक्टरांना ह्या तक्त्यांची मदत होऊ शकते.

5. पोटाचा घेर (ऍबडॉमिनल सर्कमफरन्स)

पोटाचा घेर गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये मोजला जातो. गर्भाची वाढ किती होते आहे हे समजण्यासाठी हे पॅरामिटर वापरले जाते. ही एक अंदाजे पद्धत आहे. ही पद्दत गर्भाच्या वाढीचे प्रमाण योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी वापरली जाते. नाभीजवळच्या भागात यकृत आणि पोटाच्या पातळीवर मोजमाप केले जाते.

6. गेस्टेशनल सॅक

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात हे मोजमाप केले जाते तसेच हे मोजमाप तीन आयामांमध्ये केले जाते. ‘मीन सॅक व्यास’ हे सरासरी मूल्य आहे आणि ते गॅस्टेशनल एजचा अंदाज लावण्यासाठी वापरले जाते. ही पद्धत गरोदरपणाच्या ५ व्या आणि ८ व्या आठवड्यादरम्यान लागू केली जाऊ शकते. ह्या पद्धतीमध्ये अधिक किंवा वजा ३ दिवस इतकी अचूकता आहे.

गॅस्टेशनल सॅक बाळ आणि गर्भजल दोघांना सामावून घेते. सुरुवातीच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनमध्ये ही पिशवी दिसून येते. गरोदरपणाच्या आठवड्यांची संख्या मोजण्यासाठी (अधिक किंवा वजा ५ दिवसांच्या फरकाने) डॉक्टरांना ह्याची मदत होते.

7. योक सॅक

ही एक पारदर्शक पिशवी आहे आणि ती गर्भाच्या भोवती असते. गर्भ आणि गॅस्टेशनल सॅकच्या दरम्यान योक सॅक दिसू शकते. रक्ताभिसरण प्रणाली विकसित होण्याआधी ह्या पिशवीद्वारे गर्भाला पोषण मिळते. गर्भाला आवश्यक पोषण देण्यासाठी नाळ विकसित होते.

8. फिटल पोल

हे पेशींचे एक वस्तुमान आहे. भ्रूण स्पष्ट दिसू लागण्याआधी फिटल पोल दिसतो . ह्याचा वाढीचा दर दिवसाला अंदाजे १ मिमी असतो. गरोदरपणाच्या ६ व्या आठवड्यापासून ह्याची वाढ होण्यास सुरुवात होते. गरोदरपणाच्या आठवड्याचा अंदाज लावण्यासाठी ह्याचा वापर केला जातो.

बहुतेक प्रकरणांमध्ये गरोदरपणाच्या कालावधीचा अंदाज लावण्यासाठी बीपीडी, मांडीच्या हाडांची लांबी, डोक्याचा घेर आणि पोटाचा घेर मोजला जातो. ते नक्की कसे केले जाते हे फार महत्वाचे नाही. आधुनिक अल्ट्रासाऊंड मशीनमध्ये संगणकीय बायोमेट्रिक ऍनालिसिस प्रोग्रॅम असतो. त्याद्वारे अंदाजे प्रसूती तारखेची गणना केली जाते.

गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीनंतर डॉक्टर गर्भाशयातील बाळाच्या वयाचे मूल्यांकन करू शकतात. द्विपरीय व्यास आणि मांडीच्या हाडाची लांबी मोजली जाते. ओसीपीटोफ्रंटल डायमीटर, डोक्याचा घेर किंवा खांद्यांच्या हाडाची लांबी देखील विचारात घेतली जाते.

गर्भावस्थेच्या वयाची गणना करण्यासाठी सुरुवातीच्या काळात केलेले मोजमाप सामान्यतः एक निश्चित मूल्यांकन म्हणून घेतले जाते. २० आठवड्यांनंतर अचूकता कमी होते. अल्ट्रासाऊंड पॅरामीटर्स नीट नसल्यास डॉक्टर पुढील मूल्यांकन करतात . गर्भारपणाचा अंदाजे कालावधी मिळण्यासाठी सर्व मूल्यांची सरासरी काढली जाते.

कृपया लक्षात घ्या की, वजन आणि लांबीची ही आंतरराष्ट्रीय मानके आहेत. युके ची मार्गदर्शक तत्वे वापरून ती तयार केलेली आहेत. भारतीय बाळाचे सरासरी वजन आणि लांबी आंतरराष्ट्रीय मानकांपेक्षा वेगळे असू शकते.

गर्भारपणाची प्रगती आणि बाळाची वाढ समजण्यासाठी ह्या वजन व वाढीच्या तक्त्यांची खूप मदत होते. नियमित मोजमाप करताना कोणतीही समस्या आढळल्यास, पुढील उपाय किंवा प्रक्रिया काय करावी ह्याविषयीचा निर्णय डॉक्टर घेतात. गरोदरपणात सर्व तपासण्या आणि चाचण्या करून घेण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून हे तक्ते अचूकपणे ट्रॅक केले जात आहेत ह्याची खात्री होते.

आणखी वाचा:

गरोदरपणात तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकणे
गरोदरपणात दर आठवड्याला बाळाच्या वाढणाऱ्या आकाराचे फळे आणि भाज्यांच्या आकाराशी तुलनात्मक विश्लेषण

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article