काळानुरूप मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांना सणाच्या शुभेच्छा देण्याची पद्धत बदललेली आहे. ग्रीटिंग कार्ड्स देण्यापासून ते झटपट अँपच्या माध्यमातून आता शुभेच्छा दिल्या जातात. आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा प्रत्येकाकडून मिळतात आणि आपणही त्यांना शुभेच्छा देतो. पण जर तुम्ही नेहमी त्याच जुन्या दिवाळीच्या शुभेच्छा पाठवत असाल, तर तुम्ही सर्जनशील होण्याची वेळ आली आहे. आता तुम्ही तुमच्या जवळच्या कुटुंबियांना आणि मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या काही अनोख्या शुभेच्छा किंवा कोट्स पाठवा! तुमच्याकडून मिळालेल्या छान छान दिवाळीच्या शुभेच्छा प्रियजनांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणतील म्हणून आपल्या प्रियजनांवर छाप पाडण्यासाठी आम्ही ह्या लेखात दिलेल्या काही सर्वोत्तम शुभेच्छा पाठवून पहा!
तुम्ही शेअर करू शकता अशा काही दिवाळीच्या शुभेच्छा!
दिवाळी अगदी जवळ आलेली आहे! आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा संदेश पाठवून दिवाळी साजरी करण्याचा तो एक चांगला मार्ग आहे! येथे दिवाळीच्या शुभेच्छांचा संग्रह आहे त्यामधून तुम्ही तुमच्या आवडीच्या शुभेच्छा निवडून तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.
तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी दिवाळीसाठी शुभेच्छासंदेश आणि मेसेजेस
मित्रमैत्रिणींना आपल्या जीवनात एक विशेष स्थान आहे – मित्रमैत्रिणी आपल्या जीवनात आनंद आणि मजा घेऊन येतात! जर तुम्ही तुमच्या जिवलग मित्रमैत्रिणींसाठीदिवाळीच्या शुभेच्छा शोधत असाल, तर हा लेख नक्की वाचा, कारण आमच्याकडेही काही खास शुभेच्छा आहेत!
1. चला दिवाळीचा हा शुभ दिवस आनंदाने साजरा करूया. हा उज्ज्वल दिवस तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो. हि दिवाळी आणि पुढील वर्ष तुम्हाला आनंदात जावो!
2. चला दिव्यांच्या प्रकाशाने अंधारावर विजय मिळवू आणि देवी लक्ष्मी व गणपतीला प्रार्थना करून वाईटांवर चांगल्याचा विजय साजरा करू. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे जो कुटुंबांना एकत्र आणतो. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा!
3. नमस्कार माझ्या प्रिय मित्रा! तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
4. मला आशा आहे की ही दिवाळी तुमच्या सर्व चिंता दूर करेल आणि तुम्हाला आनंद देईल. माझ्या जीवनात प्रकाश बनून आल्याबद्दल धन्यवाद, नेहमीच मला असेच मार्गदर्शन कराल अशी आशा आहे. दिवाळीच्या शुभेच्छा!
5. चमचमणारे दिवे आणि फटाक्यांच्या आवाजासोबत तुमचे आयुष्य आनंदाच्या क्षणांनी भरून जाऊदेत! दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
6. मला आशा आहे की ही दिवाळी तुमच्यासाठी भरघोस यश आणि समृद्धी घेऊन येवो. दिवाळीच्या शुभेच्छा
7. गरजेला आणि वेळेला धावून येतात ते खरे मित्र! म्हणून काळजी करू नका, मी संध्याकाळी तुमच्या घरी येत आहे! तुम्ही खरेदी केलेले सर्व फटाके फोडण्यात मी तुम्हाला मदत करीन! मित्रा, दिवाळीच्या शुभेच्छा!
8. जसा हा सण तुमचे जीवन उजळून टाकतो, तसेच येणाऱ्या वर्षात तुम्हाला भरपूर सुख आणि समृद्धी मिळो. तुम्हाला आनंदी दिवाळीच्या शुभेच्छा!
9. भरपूर फराळ खा आणि तुमच्या कुटुंबासोबत मजा करा! तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
10. तुम्हाला खूप आनंदी आणि समृद्ध दिवाळीच्या शुभेच्छा. हा दिव्यांचा सण तुमच्या जीवनात आनंद आणि प्रकाश घेऊन येवो!
11. हा दिव्यांचा सण तुमचे भविष्य उज्वल करू दे आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. दिवाळीच्या शुभेच्छा!
12. या दिवाळीत तुम्ही खाल्लेल्या मिठाईंचा गोडवा तुमच्या आयुष्यात कायम राहो. आपल्या कुटुंबासह प्रकाशाच्या सणाचा आनंद घ्या! दिवाळीच्या शुभेच्छा!
13. दिवाळी आली! दरवाजे उघडा आणि आपल्या घरात लक्ष्मीचे स्वागत करा. शुभ दीपावली.
14. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ह्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पाठवत आहे! आपणा सर्वांना पुढील वर्ष उत्तम जावो अशी आशा आहे दिवाळीच्या शुभेच्छा!
15. दिवाळी सगळ्यांना एकत्र आणते. मिठाई, फटाके आणि फराळ तयार आहे ना! दिवाळीच्या शुभेच्छा!
16. ही दिवाळी तुमच्या आयुष्यात उदंड यश घेऊन येवो. तुम्हाला हवी तितकी मिठाई खा, फटाके फोडा, पण सुरक्षित रहा! असा एकही दिवस नाही जेव्हा मी तुझी आठवण काढत नाही, माझ्या प्रिय मित्रा. शुभ दीपावली!
17. आपली मैत्री जीवनाला एक उत्सव बनवते. माझ्या प्रिय मित्रा, तुला सुरक्षित आणि आनंदी दिवाळी च्या शुभेच्छा!
18. चला ही दिवाळी आनंदी आणि उज्ज्वल बनवूया, खऱ्या अर्थाने हा प्रकाशाचा सण साजरा करूया. दिवाळीच्या शुभेच्छा!
19. दिव्याच्या प्रकाशात तुमचे आयुष्य उजळून जावो. ही दिवाळी तुम्हाला समाधानाची आणि आनंदाची जावो!
20. उटण्याचा सुगंध, फराळाची लज्जत, प्रेमाचा गंध आणि मनसोक्त खरेदी! अशी ही दिवाळी तुमच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येवो! दिवाळीच्या खूप शुभेच्छा!
कुटुंबासाठी दिवाळीच्या शुभेच्छा आणि कोट्स
दिवाळी हा सण आहे जो कुटुंबांना एकत्र आणतो. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत असाल किंवा त्यांच्यापासून दूर असाल, तरीसुद्धा तुम्ही त्यांना दिवाळीचा गोड संदेश पाठवू शकता. तुम्ही त्यांना फोन करू शकता, परंतु संदेश पाठवणे हे विशेष आहे. तुमच्या प्रियजनांना दिवाळीच्या शुभेच्छा पाठवा आणि तुमच्यासाठी त्यांचे असलेले महत्व त्यांना कळू द्या!
1. ही दीपावली तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येवो. तुम्हाला दिवाळीच्या अनेक अनेक शुभेच्छा!
2. जवळ प्रेमाची माणसं, खमंग फराळ आणि निवांत क्षण ह्या पेक्षा सण साजरा करण्यासाठी आणखी कशाची गरज आहे? देव तुम्हाला अशा अनेक दिवाळ्या साजऱ्या करण्याची संधी देवो!
3. लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया! ही दिवाळी तुमच्यासाठी उदंड यश आणि आनंद घेऊन येवो!
4. ही दिवाळी तुमच्या आयुष्य खूप आनंद, तेज, यश, भाग्य आणि एकमेकांसाठी भरपूर वेळ घेऊन येवो! दिवाळीच्या खूप शुभेच्छा!
5. दिवाळीचा दिव्य प्रकाश तुमच्या जीवनात शांती, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो.
6. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे,हा सण गोड आठवणी घेऊन येतो कुटुंबासोबत वेळ घालवण्याची ही संधी आहे, आणि तुम्ही माझे प्रिय कुटुंबीय आहात. श्री गणेश आणि देवी लक्ष्मी तुम्हाला नेहमी एकत्र, सुरक्षित, आनंदी आणि यशस्वी ठेवू दे.
7. दिवाळी हा गोड आठवणींचा सण आहे, दिवे आणि फटाक्यांचा सण आहे, गोड फराळाचा आस्वाद घेण्याचा सण आहे, माझ्या प्रिय कुटुंबाला दिवाळीच्या शुभेच्छा!
8. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मी प्रार्थना करतो की ही दिवाळी तुमच्यासाठी सर्वांसाठी उत्तम असेल. ही दिवाळी तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सदैव यश घेऊन येवो.
9. सर्वत्र आनंद आहे, आणि प्रदूषण देखील आहे. यंदाच्या दिवाळीत फटाके न फोडता थोडा वेळ एकत्र घालवूया. दिवाळी फक्त फटाके फोडण्यापुरती नाहीतर एकमेकांप्रती काळजी,प्रेम आणि जिव्हाळा दर्शवण्यासाठी आहे.
10. आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मला आशा आहे की ह्या दिवाळीमध्ये आपण स्वतःमध्ये चांगला बदल घडवू शकू.
11. दिवाळीच्या या शुभ आणि पवित्र प्रसंगी तुम्हाला हवं ते सर्व मिळू दे.
12.माझ्या गोड कुटुंबाला, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिव्याचा हा सण भरपूर मिठाई खाऊन साजरा करा!
13. जगातील सर्वात आदरणीय कुटुंबाला दिवाळीच्या शुभेच्छा पाठवत आहे. स्वादिष्ट फराळ, उजळलेले दिवे आणि एकमेकांसोबतचा वेळ ह्या सगळ्याचा तुम्ही आनंद घ्यावा हीच सदिच्छा!
14. श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहोत. दिवाळी आनंदी जावो!
15. ह्या दिवाळीला तुमचे आयुष्य आनंद आणि उत्साहाने भरून जावो. हे वर्ष यश आणि समृद्धी घेऊन येवो.
16. आपल्या आवडत्या लोकांच्या उपस्थितीत घालवलेल्या दिवाळीपेक्षा अधिक समाधानकारक काहीही नाही.
17. उटण्याचा सुवास, रांगोळीची आरास, दारी तोरणे बांधून, सज्ज राहू दिवाळीच्या स्वागतास
18. तुमच्या कर्तृत्वाला दिशा मिळून तुम्ही यशाची अनेक शिखरे पार करावीत हीच सदिच्छा!
19. सुख, समृद्धी घेऊन दिवाळी आली! रांगोळीच्या सप्तरंगांनी ही धरती नटली
20. तुझे प्रेम आणि साथ अशीच अखंड राहूदे
21. भावा-बहिणीचे अतूट नाते, नाते अमाप विश्वासाचे
22. दिव्याच्या ज्योती घेऊन हाती, तू ह्या घराची लक्ष्मी
23. पणती, दीप दारी उजळले दिवाळीचे वेध लागले
24. फराळाचा सुवास, रांगोळीची आरास, दिव्यांची माळ आणि मोती साबणाचा सुगंध, तुमच्याही जीवनात येऊदे सुख आणि आनंद!
25. रोषणाईची आरास, रांगोळीची नक्षी खास, पणती दारी पळाली, आली आली ही दिवाळी
26. लक्ष्मीची प्रार्थना, भावाच्या भेटीची ओढ, दिवाळीचा सण आहे खूपच गोड
27. लक्षदीप हे उजळले घरी, दारी सांडली सडा रांगोळी,आली दिवाळी
28. दारी तुमच्या सुखाचे दीप उजळू दे, घरी तुमच्या लक्ष्मी नांदुदे
29. सगळी स्वप्ने पूर्ण होवोत संकटे दूर होवोत धन धान्याची होउदे बरसात दिवाळीचा सण आला दारात
30. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे
आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा पाठवून दिव्यांच्या ह्या सणाचा आनंद द्विगुणित करा. प्रत्येकाला मनापासून शुभेच्छा पाठवून त्यांची दिवाळी अविस्मरणीय बनवा! फर्स्टक्राय च्या वतीने तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा!