In this Article
तुम्ही घरी केलेल्या गर्भधारणा चाचणीचा निकाल सकारात्मक आल्यावर गर्भधारणेची सगळी लक्षणे लवकरच दिसू लागतील असे अपेक्षित असते. मॉर्निग सिकनेस, नाजूक स्तन, थकवा आणि मळमळ सुरु होईल असा तुमचा अंदाज असतो. तुम्ही हे वाचत असल्यास, कदाचित वरील लक्षणे अद्याप दिसत नाहीयेत त्यामुळे काहीतरी समस्या आहे असे तुम्हाला वाटेल.
प्रत्येक स्त्रीसाठी गरोदरपण वेगळे असते. काहींना सर्व लक्षणे जाणवतात तर काहींना कुठलीच लक्षणे जाणवत नाहीत.
कोणत्याही लक्षणांशिवाय गर्भधारणा – हे शक्य आहे का?
ज्या स्त्रियांचा गर्भधारणा चाचणीचा निकाल सकारात्मक येतो आणि लक्षणे दिसत नाहीत त्यांना अनेकदा आश्चर्य वाटते की “मी कोणत्याही लक्षणांशिवाय गर्भवती होऊ शकते?” उत्तर आहे, होय. लक्षणांशिवाय गर्भधारणा सामान्य आहे आणि तसेच ह्याचा अर्थ असा नाही की आपल्या बाळाला त्रास आहे.
प्रत्येक स्त्री गरोदरपणात वेगळ्या अनुभवातून जात असते आणि दोन गर्भारपण कधीच एक सारखी नसतात. काही स्त्रियांना गर्भधारणेच्या ७ आठवड्यांपर्यंत कोणतीही लक्षणे नसतात. यानंतर, भूक वाढणे, मळमळ, वेदना इत्यादी लक्षणे जाणवू लागतात.
जेव्हा ओव्हुलेशननंतर ६ ते १२ दिवसानंतर गर्भाशयामध्ये फलित गर्भाचे रोपण होते तेव्हा बहुतेक स्त्रियांना त्या बदलांविषयी माहिती नसते. जरी आपल्याला प्रारंभिक अवस्थेत कोणतीही लक्षणे दिसत नसली तरीही आपल्या गर्भावस्थेच्या काही आठवड्यांमध्ये अचानक आपल्याला मळमळ किंवा मॉर्निंग सिकनेसचा अनुभव येऊ शकतो.
आपण आपल्या गरोदरपणाबद्दल अनिश्चित असल्यास काय करावे?
असे होऊ शकते की तुम्ही घरी गर्भधारणा चाचणी केली असेल तर कदाचित तुम्हाला चाचणीचा सकारात्मक परिणाम मिळाला असेल परंतु लक्षणे कुठलीच दिसत नाहीत.
गर्भधारण चाचणीमध्ये, गर्भधारणा निश्चित करण्यासाठी लघवीमधील एचसीजीची पातळी मोजतात. सुरुवातीच्या काळात एचसीजी संप्रेरकाची पातळी खूप कमी असते. म्हणूनच, जर आपण चाचणी घेतली असेल आणि आपल्या गर्भधारणेबद्दल अनिश्चित असाल तर, स्त्रीरोगतज्ञाला देऊन आणि गर्भधारणा निश्चित करण्यासाठी आपले रक्त आणि मूत्र तपासणी करून घेणे चांगले.
जर डॉक्टरांनी आपल्या गरोदरपणाची पुष्टी केली परंतु आपल्याला काही लक्षणे नसतील तर काय करावे?
जरी स्त्रीरोगतज्ज्ञांनी सकारात्मक निकालाला पुष्टी दिली असली तरीही तुम्हाला कोणतीही लक्षणे जाणवू शकत नाहीत. ह्याचा अर्थ असा की तुम्ही त्या भाग्यवंतांपैकी आहात ज्यांना गरोदरपणात कुठलीच लक्षणे नसतात. किंवा भूक वाढणे, थकवा येणे किंवा उर्जा पातळीत वाढ होणे ह्यासारखे थोडे बदल आपल्या लक्षात येत नाहीत.
लक्षणे नसली तरी सुद्धा बाळाच्या विकासाचा मागोवा घेण्यासाठी तुम्ही नियमित तपासणी सुरु ठेवा. जर आपल्याला असामान्य वेदना किंवा पेटके जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरकडे जा.
असे पीसीओएस असलेल्या महिलांना होते का?
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) एक हार्मोनल डिसऑर्डर आहे ज्यामुळे अंडाशयात सिस्ट्स तयार होतात. पीसीओएस असलेल्या बर्याच महिलांना गर्भवती होणे कठीण होते.
ज्यांना गरोदरपणाचा अनुभव येतो त्यांना किरकोळ किंवा कोणतीही लक्षणे नसतात त्यामुळे पीसीओएस हे लक्षणांविरहित गर्भारपणाचे सर्वात सामान्य कारण आहे. पीसीओएस असलेल्या गर्भवती स्त्रीला भूक न लागणे, वेदना कमी होणे अशी लक्षणे जाणवतात. पीसीओस नसलेल्या स्त्रीमध्ये ही लक्षणे तीव्र असतात.
म्हणूनच, तुम्हाला पीसीओएस असल्यास आणि कोणतीही लक्षणे जाणवत नसल्यास, त्यामुळे बाळामध्ये काहीही समस्या नसते. पीसीओएस असल्यास गर्भारपणाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे माहिती समजण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.
जर गर्भारपणाची लक्षणे नाहीशी झाली तर काय करावे?
तथापि, तुम्हाला जर आधी गर्भारपणाची लक्षणे जाणवत होती आणि ती जाणवणे अचानक थांबल्यास स्त्रीरोग तज्ञाचा सल्ला घेणे शहाणपणाचे आहे, कारण तसे न केल्यास गर्भपात होऊ शकतो.
गर्भपाताची काही चिन्हे खालीलप्रमाणे
- ओटीपोटात वेदना
- नियमित वेदनादायक आकुंचन
- रक्तस्त्राव
कधीकधी, आईला कळण्याआधीच गर्भपात होतो; म्हणूनच आपल्या गर्भारपणावर नेहमीच लक्ष ठेवणे महत्वाचे आहे.
टीपः काही स्त्रियांमध्ये गर्भधारणेस उशीर होतो. जरी गर्भधारणा चाचणीचा निकाल सकारात्मक असला तरी अशा परिस्थितीत गर्भ आणि गर्भजल पिशवी उशिरा विकसित होते. अशी परिस्थिती उद्भवल्यास, कृपया असामान्य किंवा ट्यूबल गर्भधारणा नाकारण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
यशस्वी गर्भधारणेची गुरुकिल्ली म्हणजे सर्व माहिती जवळ ठेवणे आणि आवश्यक काळजी घेणे. प्रत्येक स्त्री वेगळ्या अनुभवातून जात असते. तुम्ही कोणत्याही लक्षणांशिवाय गर्भारपणाच्या अनुभवत घेत असल्यास तुम्ही स्वत: ला एक भाग्यवान आई समजू शकता आणि आपल्या गर्भारपणाचा आनंद घेऊ शकता.