Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना योजना आणि तयारी जुळ्या बाळांची गर्भधारणा होण्यासाठी काय करावे?

जुळ्या बाळांची गर्भधारणा होण्यासाठी काय करावे?

जुळ्या बाळांची गर्भधारणा होण्यासाठी काय करावे?

बाळाला जन्म देणे हा स्त्रीसाठी अगदी आनंददायी अनुभव आहे. जुळी बाळे झाल्यास हा आनंद द्विगुणित होतो. बऱ्याच वेळा जुळी बाळे होणे अनियोजित असले तरी ते फक्त नशिबावर अवलंबून नसते. विशिष्ट औषधी वनस्पतींचे सेवन आणि योग्य लैंगिक स्थिती ह्यासारख्या गोष्टी केल्यास तुम्हाला जुळी बाळे होण्याची शक्यता वाढते.

जुळ्या बाळांची गर्भधारणा कशी होते?

जुळ्या बाळांची गर्भधारणा कशी होते?

शुक्राणूंनी दोन अंड्यांचे फलन केल्यावर जुळी बाळे होतात. त्याला द्वियुग्मज जुळे म्हणतात. हे जुळे सामान्यत: भिन्न लिंगी असतात. ते समान वार (प्लेसेंटा) किंवा जनुके देखील सामायिक करीत नाहीत.

एकयुग्मज म्हणजेच समान जुळे वार (प्लेसेंटा) आणि जनुके सामायिक करतात. मोनोझायगोटीक ट्विन्स म्हणून हे ओळखले जातात , काही अपवाद वगळता जुळ्या मुलांचे लिंग सहसा समान असते. शुक्राणू एका अंड्याचे फलन करते जे नंतर गर्भाशयात विभाजित होते.

जुळे होण्याची शक्यता वाढवणारे घटक

अभ्यासानुसार असे दिसून येते की ज्या कुटुंबात जुळी मुले असतात त्यांना जुळी मुले होण्याची शक्यता जास्त असते. त्याशिवाय अन्य घटक म्हणजेः

. एकाधिक गर्भधारणा

खूप वेळा गरोदर राहिल्यास विभाजन किंवा दुहेरी गर्भधारणेची शक्यता वाढते. पहिल्या वेळेनंतर, गर्भधारणा खूप सोपी असते आणि म्हणूनच जुळे होण्याची शक्यता वाढते

. आपल्या शरीराचा प्रकार

अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की कमी उंचीच्या आणि सडपातळ महिलांच्या तुलनेत उंच आणि वजनदार स्त्रियांना जुळी बाळे होण्याची अधिक शक्यता असते. कमी चरबीयुक्त आहार घेणार्‍या स्त्रियांना जुळी बाळे होण्याची शक्यता असते.

. आनुवंशिकता

आधी सांगितल्याप्रमाणे, जुळी मुले होण्यामागे आनुवंशिकतेचा खूप मोठा वाटा आहे. आईच्या कुटुंबाकडे जुळ्या मुलांची अनुवंशिकता असल्यास शक्यता दुप्पट होते. तुमच्या पतीच्या कुटुंबात जुळी मुले असल्यास तुम्हाला जुळी मुले होण्याची शक्यता वाढत नाही. हायपरोव्हुलेशन ही एक आनुवंशिक स्थिती असू शकते आणि जर ती खरी असेल तर आपल्या जोडीदाराच्या जुळी मुले होण्याच्या कौटुंबिक इतिहासाचा आपल्यावर तितका परिणाम होणार नाही.

. तुमचे वय

३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया फॉलिकलउत्तेजक हार्मोन्स तयार करतात ज्यामुळे जुळे होण्याची शक्यता वाढते. हि संप्रेरकांची पातळी ओव्हुलेशन दरम्यान स्त्रीबीजे मोठ्या प्रमाणात सोडण्यास मदत करतात, ज्यायोगे एकापेक्षा जास्त बाळे होण्याची शक्यता वाढते.

. वांशिकता

आपला वंश देखील महत्वाची भूमिका बजावते. आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील जुळ्यांचे प्रमाण दर १००० मध्ये आठपेक्षा कमी आहे. युरोपियन किंवा आफ्रिकन वंशाच्या स्त्रियामध्ये जुळे बाळ होण्याची शक्यता जास्त चांगली आहे.

. उंची

असे मानले जाते की उंच स्त्रियांमध्ये (अंदाजे ५.”) सरासरी उंचीच्या (अंदाजे ५. “) स्त्रियांच्या तुलनेत जुळे होण्याची शक्यता जास्त असते.

. प्रजनन उपचार

आयव्हीएफसारख्या काही प्रजनन उपचारामुळे जुळे होण्याची शक्यता खूपच वाढू शकते. कारण काही प्रजनन औषधे ओव्हुलेशनच्या वेळी अंडाशयाला एकापेक्षा जास्त अंडी सोडण्यास उत्तेजित करतात

प्रजनन उपचार

नैसर्गिकरित्या जुळ्यांची गर्भधारणा होण्याचे मार्ग

जुळ्या मुलांची गर्भधारणा होण्याची शक्यता कशी वाढवायची असा आपण विचार करीत असल्यास, हे नैसर्गिक मार्ग वापरून पहा

. पुढची गर्भधारणा लांबवणे

अनेक गर्भधारणांमुळे जुळे होण्याची शक्यता वाढू शकते, परंतु दोन गर्भधारणेदरम्यान ब्रेक न घेतल्यास जुळे होण्याची शक्यता कमी होते.

. स्तनपान देताना गर्भधारणेसाठी करण्याचा प्रयत्न करा

प्रोलॅक्टिन हा एक असा घटक आहे जो आपण स्तनपान देताना आपले शरीर तयार करत असते. हा घटक गर्भधारणेची आणि जुळी मुले होण्याची शक्यता वाढवण्यासाठी ओळखला जातो

. दुग्धजन्य पदार्थांचा वापर वाढवा

गायीच्या दुधापासून बनविलेले दुध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये बरेच ग्रोथ हार्मोन्स आढळतात, म्हणून जर तुम्हाला जुळी मुले हवी असतील तर त्याचा वापर करावा.

४ तुमच्या पतीला जस्त समृद्ध अन्नपदार्थ घेण्यास सांगा

जस्तयुक्त खाद्यपदार्थ शुक्राणूंच्या उत्पादनास गती देत ​​असल्याने आपल्या पतीने त्याचे जास्त प्रमाणात सेवन केले पाहिजे. त्यामुळे जुळ्यांची गर्भधारणा होण्यास मदत होते.

. प्रथिनांनी समृद्ध पदार्थ खा

जुळे होण्याची पुष्कळ शक्यता हायपरोव्ह्यूलेशनवर अवलंबून असल्याने प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थ त्यास प्रोत्साहित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. संपूर्ण धान्य, टोफू, सोया आइसोफ्लेव्होन आणि विशेषत: याम (कंद) आपल्या अंडाशयाला उच्चउत्तेजित करण्यास मदत करतात, ज्यामुळे जुळे होण्याची शक्यता वाढते.

. फॉलिक ऍसिड पूरक आहार घ्या

वादविवाद असले तरी जुळे होण्यासाठी प्रयत्न करताना ह्या पद्धतीने काही चांगले परिणाम दर्शविले आहेत. मज्जातंतूंचे दोष टाळण्यासाठी परिचित म्हणून हा पूरक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.

. सेक्स पोझिशन्स

वर नमूद केलेल्या पद्धती व्यतिरिक्त, असे मानले जाते की विशिष्ट सेक्स पोझिशन्समुळे जुळे होण्याची शक्यता वाढते. अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.

जुळे होण्यासाठी प्रजनन उपचार

जर आपण नैसर्गिक पद्धतींपेक्षा प्रजनन उपचारांची निवड केली तर जुळे होण्याची शक्यता वाढेल. काही उपचार पुढीलप्रमाणे

. आययूआय (इंट्रायूटेरिन इन्सेमिनेशन)

ही पद्धत गर्भधारणेची शक्यता वाढविण्यासाठी वापरली जाते. ह्यामध्ये प्रजनन औषधांचा वापर सुद्धा केला जातो. सोप्या भाषेत, शुक्राणूंना थेट गर्भाशयामध्ये सोडले जाते ज्यामुळे नैसर्गिक पद्धतीपेक्षा जास्त स्त्रीबीजांसोबत त्यांचे फलन होते.

. आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन)

ह्या उपचारातील एक गंमत म्हणजे गर्भाशयात ठेवलेल्या भ्रुणांची संख्या सर्व फरक होतो. एकाधिक भ्रूण रोपण केल्यामुळे एकापेक्षा जास्त भ्रूण टिकण्याची शक्यता वाढते. खरं तर, या पद्धतीचा वापर केलेल्या स्त्रियांमध्ये जुळे झालेले आढळले आहे.

आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन)

जुळ्या बाळांची गर्भधारणा होण्यासाठी पूरक औषधे

कधीकधी, चांगल्या निकालांसाठी दोन पद्धती एकत्र करणे चांगले. वर नमूद केल्याप्रमाणे, जुळी बाळे होण्याची शक्यता वाढविण्यासाठी आय.यु.आय उपचार आणि औषधे यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ह्या औषधांचा किंवा पूरक आहारांमागील मूळ उद्देश संप्रेरके नियमित करणे आणि निरोगी पुनरुत्पादक प्रणालीला देणे हा आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे अधिक स्त्रीबीजे सोडली जातात जी शुक्राणूंसोबत फलित होतात.

खाली पूरक औषधे सूचीबद्ध केलेली आहेत जी ह्या प्रक्रियेस चालना देण्यास मदत करतात.

औषधे

. परगोनल

ह्याचा उपयोग वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी आणि आयव्हीएफ दरम्यान इतर हार्मोनल औषधांच्या सोबत पूरक म्हणून केला जातो

. क्लोमिड

हे प्रजनन औषध ओव्हुलेशन सुलभ करते

. हुमेगन

हे औषध फॉलीकलउत्तेजक संप्रेरक सोडते जे ओव्हुलेशनला मदत करते

पूरक औषधे

. प्रोजेस्टेरॉन

ह्यास गर्भधारणेचा संप्रेरक म्हणून देखील ओळखले जाते आणि गर्भधारणा टिकवून ठेवण्यास ते महत्त्वपूर्ण आहे.

. फॉलिक ऍसिड पूरक औषधे

हे जन्मजात व्यंगांना दूर करण्यात मदत करते, विशेषत: पाठीचा कणा आणि मज्जासंस्थेशी संबंधित.

. गोनाडोट्रोपिन

हे संप्रेरक लैंगिक संप्रेरकांच्या निर्मितीस जबाबदार आहेत ज्यामुळे ओव्हुलेशन देखील उत्तेजित होते.

जुळी मुले होण्यासाठी प्रजनन औषधी वनस्पती

येथे काही उपयुक्त प्रजनन औषधी वनस्पती आहेत ज्यामुळे तुमची जुळ्या बाळांची गर्भधारणा होण्याची शक्यता वाढू शकते.

. लिकोरिस रूट

ही एक गोंडस लहानशी औषधी वनस्पती गर्भधारणेसाठी मदत करणारा एक चँपियन म्हणून ओळखली जाते. मासिक पाळीचे नियमन करून ओव्हुलेशनच्या प्रक्रियेस मदत करते, तसेच संप्रेरक पातळीचे नियमन देखील करते, ज्यामुळे गर्भाधान सुधारते.

. माका रूट

माका रूट मुळे शरीरात निरोगी पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेस मदत होते. खरं तर, या औषधी वनस्पती स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही प्रजनन क्षमता वाढवतात आणि त्याद्वारे जुळे बाळ होण्याची शक्यता वाढते.

. तीळ तेल

हे केवळ संप्रेरकांची पातळी नियमित करण्यात मदत करत नाही तर स्त्रियांची प्रजननक्षमता वाढवते. मासिक पाळीचे नियमन करण्यास देखील मदत करते, त्याद्वारे ओव्हुलेशनला मदत होते आणि गर्भधारणा सुलभ होते.

. इव्हनिंग प्राइमरोझ तेल

प्रीमरोस तेलाच्या इतर फायद्यांव्यतिरिक्त, संकल्पनेच्या दृष्टीकोनातून बरेच सकारात्मक परिणाम पाहिले गेले आहेत.

. स्वीट कसावा

पूरक औषधांसोबत घेतल्याने ओव्यूलेशन वाढण्यास मदत होते.

. चास्त ट्री बेरी

हे डबलओव्हुलेशनला प्रोत्साहित करण्यात मदत करते, तसेच त्यामुळे सिस्ट होत नाहीत आणि म्हणूनच जुळ्या मुलांची गर्भधारणा होण्याच्या प्रक्रियेस मदत होते.

. ब्लॅक कोहोष

हा आणखी एक नैसर्गिक पदार्थ आहे ज्यामुळे प्रजननक्षमता वाढते आणि जुळ्यांची गर्भधारणा राहते.

जुळे होण्याचे धोके काय आहेत?

जुळ्या गर्भधारणेची जोखीम खालीलप्रमाणे

  • जन्मतः कमी वजन
  • अकाली प्रसूती
  • पोटात बाळाचा मृत्यू होणे
  • सेरेब्रल पाल्सी आणि ऑटिझमसारख्या जन्मजात अपंगत्व
  • गरोदरपणात मधुमेह
  • प्रीक्लेम्पसिया
  • सीसेक्शनची आवश्यकता

सामान्य प्रश्न

सामान्य प्रश्न

. जुळी बाळे होणे किती सामान्य आहे?

भारतात जुळी बाळे होणे तितकेसे सामान्य नाही. परंतु प्रजनन उपचारांमुळे जुळी बाळे होण्याच्या घटना वाढत असताना, त्यांची संख्या निरंतर वाढत आहे.

. माझ्या कुटुंबात जुळी मुले आहेत. त्यामुळे मला जुळे होण्याची शक्यता वाढते का?

आनुवंशिकीशास्त्र महत्वाची भूमिका बजावते आणि आपल्या कुटुंबात एखादे जुळे असल्यास जुळ्या बाळांची गर्भधारणा होण्याची तुमची शक्यता जास्त आहे. तथापि, अनुवांशिकता देखील हमी देत ​​नाही.

. जुळी बाळे असण्याचे तथ्य व दंतकथा काय आहेत?

आपण जुळे होण्यासाठी प्रयत्न करीत असाल किंवा केवळ संभाव्यतेचा शोध लावत असलात तरी आपल्याकडे कित्येक तथ्य आणि कल्पित गोष्टी आढळतील. त्यापैकी काही खाली सूचीबद्ध आहेत:

  • अ‍ॅरोमाथेरपी, एक्यूपंक्चर, फ्लॉवर एसेन्स नॅचरोपॅथी किंवा अगदी कायरोप्रॅक्टिक प्रक्रियेसारख्या उपचारांमुळे जुळे होण्याची शक्यता वाढत नाही.
  • जुळी बाळे होण्यामध्ये अनुवंशिकता महत्वाची भूमिका बजावते, परंतु ते एक पिढी सोडून पुढच्या पिढीत होते हे मिथक आहे.
  • प्रथिने आणि दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने ओव्हुलेशनला गती मिळते, परंतु त्यामुळे जुळी मुले होतातच असे नाही.
  • वय आणि वजन यामुळे खूप फरक पडू शकतो, परंतु जेव्हा जुळी मुले होण्याची वेळ येते तेव्हा फक्त हा निर्णायक घटक असू शकत नाही .

जुळ्या बाळांची गर्भधारणा खूपच आव्हानात्मक असते, परंतु जर तुम्हाला मनापासून जुळे हवे असेल तर आपण वर नमूद केलेल्या पद्धतींचा नक्कीच विचार करू शकता.

आणखी वाचा:

तुम्हाला गर्भधारणा होण्यास मदत होईल असे १५ सर्वोत्तम घरगुती उपाय
गर्भधारणापूर्व तपासण्या आणि चाचण्या: एक मार्गदर्शिका

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article