मुले नेहमीच पालकांचे अनुकरण करत असतात. पालक मुलांसाठी एक संदर्भ बिन्दू असतात. जेव्हा मुले कुठल्याही त्रासातून जात असतात तेव्हा, पालकांकडे मार्गदर्शनासाठी धाव घेतात. मुले त्यांच्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून पालकांच्या सवयी घेतात. जेव्हा मुले मोठी होतात तेव्हा ते पालकांचे वागणे आणि कृती यांचे अनुकरण करतात. पालक हे मुलांसाठी “रोल मॉडेल” असतात. पालकांचे शहाणपण आणि सवयी, मुलांकडे आपोआप येतात. त्यामुळे मुलांना चांगल्या आणि वाईट सवयी यातील फरक समजून दिला पाहिजे आणि चांगल्या सवयी निवडायला शिकवले पाहिजे.
मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या निरोगी सवयी
मुलांना योग्य शिष्टाचार शिकवताना आणि निरोगी सवयी लावताना दमछाक होऊ शकते. पण तुम्ही संयम बाळगून त्यांना योग्य मार्ग दाखवला पाहिजे.
खाली वर्णित केलेले मुद्दे मुलांसाठीच्या निरोगी सवयी मानल्या जाऊ शकतात.
१. निरोगी आहार
पूर्वसूचना : वेगवेगळ्या रंगाचे पदार्थ बनवा.
मुलांचा जंकफूड मागण्याकडे कल असतो जसे की बिस्किट्स, चॉकलेट्स, गोड़ पदार्थ, चिप्स. तुम्हाला हे पदार्थ घरी बनवता आले पाहिजेत. तुम्ही त्यांना विश्वास द्यायला हवा की निरोगी आहार सुद्धा तितकाच चविष्ट असू शकतो. तुम्ही त्यांना पास्ता, पिझ्झा, केक, बिस्किटे, नूडल्स घरी बनवून देऊ शकता. त्यामुळे वेगवेगळ्या रंगांचे पदार्थ खाल्ले जातील. तुम्हाला तुमच्या मुलांना निरोगी आहाराची सवय लावायची असेल तर रंगीबेरंगी मार्गाचा अवलंब करा. इंद्रधनुष्यातील प्रत्येक रंगाचा एक पदार्थाचा एक दिवस असा नियम करा. ह्याचा अर्थ वेगवेगळ्या रंगाचे पदार्थ जेवणात खाणे. ह्याचे आरोग्याला फायदे आहेतच, पण मुलांनासुद्धा हे पदार्थ खायला मजा येते. पालकांनी मुलांना नियमित, पोषक आणि संतुलित आहाराची सवय लावली पाहिजे.
२. शारीरिक हालचाल
पूर्वसूचना : मुलांना एकाजागी बसून राहण्यास प्रोत्साहित करू नका. सतत हालचाल करायला सांगा.
तुमच्या मुलांना आरामात सोफ्यावर बसून T .V . बघायला परवानगी देणे, ही पालक म्हणून तुमची सर्वात मोठी चूक आहे. मुलांना बैठ्या जीवनशैलीला बळी पडू देऊ नका. त्यांना बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहित करा. चालण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी किंवा खेळायला त्यांना बाहेर पाठवा. कौटुंबिक योजना करा, त्यात मजा करा आणि आपल्या मुलांना सामील करा. तुमच्या मुलांना शिकवा की ” कोच पोटॅटो ” बनल्याने त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतील.
निष्क्रिय जीवनशैलीचे काही आरोग्यविषयक धोके खालीलप्रमाणे :
- लठ्ठपणा
- निद्रानाश
- लक्ष विचलीत होणे
- भावनिक आणि सामाजिक प्रश्न
३. अन्न आणि पोषण लेबल्स वर लक्ष केंद्रित करा
पूर्वसूचना : तुमच्या मुलांना अन्न आणि पोषण लेबल्स वाचून समजून घ्यायला प्रोत्साहित करा.
एका विशिष्ट वयात, म्हणजे मुले जेव्हा किशोरवयीन होतात तेव्हा त्यांना कपड्यांच्या लेबल मध्ये रस निर्माण होतो. मुलांना शिकवा की वाढत्या वयात अन्न पदार्थांवरील लेबल वाचणे किंवा विचारात घेणे जास्त महत्वाचे आहे. जेव्हा मुलांना सवय होते तेव्हा त्यांना आहाराच्या पौष्टिक मूल्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करा.
त्यांना त्यांचे आवडते, पॅक केलेले अन्नपदार्थ दाखवा आणि पोषण लेबल वरील महत्वाची माहिती दाखवा. त्यांना ते लेबल्स वाचायची सवय लावा, त्याचे विश्लेषण करायला सांगा, आणि त्या अन्नाची योग्यता ठरवू द्या. त्यांना त्या पदार्थांमधील काही महत्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला द्या, जसे की संतृप्त आणि असंतृप्त चरबी, साखर, कार्बोहायड्रेट्स वगैरे. आपले सजग प्रयत्न स्वस्थ सवयी विकसित करण्यास मदत करतील, आणि मुले त्या सवयी आयुष्यभरासाठी अवलंबतील.
४. एकत्र कौटुंबिक भोजनाचा आनंद घ्या
पूर्वसूचना: रात्रीचे जेवण एकत्र करण्याला प्राधान्य द्या.
आजच्या धकाधकीच्या जीवनात कुटुंबासोबत आणि वडिलधाऱ्यांसोबत चांगला वेळ घालवण्यास फुरसत मिळत नाही. व्यस्त कार्यकाळा मुळे आपण मुलांसोबत बसू शकत नाही आणि त्यांच्या कथा आणि वैयक्तिक समस्या ऐकू शकत नाही. त्यामुळे कुटुंबासोबत रात्रीचे जेवण करण्यास प्राधान्य द्या. त्यावेळी तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू शकता आणि आपल्या मताची एकमेकांबरोबर देवाणघेवाण करू शकता. ह्याचा आपल्या मुलांवर दीर्घकाळ प्रभाव पडतो.
एकत्र जेवण केल्याचे इतर फायदे खालीलप्रमाणे :
- मुले सहजगत्या कुटुंबात सामावली जातात.
- मुलांना निरोगी आहाराची सवय लागते आणि मोठ्यांसोबत जंक फूड टाळले जाते.
- कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांसोबतचे स्नेहबंध मजबूत होतात.
५. निरोगी सजलीकरण
पूर्वसूचना : पाणी प्या, सोडा नको.
पालकांचे अनुकरण करून लहान मुलांनी शीतपेये पिणे, ही प्रथा हल्ली खूप सामान्य झाली आहे.
आपल्याला आपल्या मुलांना पाणी पिण्याचे महत्त्व पटवून देऊन आणि सोडा टाळणे कसे आवश्यक आहे, याबाबत चे मार्गदर्शन करणे जरुरीचे आहे. फक्त मुलांना सांगा की पाणी हे आरोग्यदायी असून कित्येक रोगांपासून सुटका करण्यास मदत करते, उलटपक्षी शीतपेये आरोग्यास घातक असून, त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यातील कॅलरीज मुळे वजन वाढते.
पाणी हे एक महत्त्वपूर्ण संसाधन आहे हे त्यांना शिकवा आणि योग्य प्रमाणात सजलीकरण राखण्यासाठी भरपूर पाणी प्रमाणात घ्या असेही सांगा. जेव्हा आपल्या मुलांना त्यांच्या शरीरासाठी पाणी किती महत्त्वपूर्ण आहे हे समजते, तेव्हा ते शीतपेयांऐवजी पाणी निवडण्याचे निश्चित करतात.
६. पसारा आवरणे
पूर्वसूचना : तुमच्या वाढत्या वयातील मुलांना नीटनेटके वातावरण द्या.
मुलांना अगदी सुरुवातीच्या काळापासून स्वच्छता ही शिकवलीच पाहिजे. जेव्हा त्यांना वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या बघायची सवय लागेल, तेव्हा मुलं सुद्धा त्याचे अनुकरण करतील. जेव्हा मुले थोडी मोठी होतील तेव्हा तुम्ही त्यांना मदत करू शकता, पसारा आवरण्यासाठी त्यांना वेळ द्या आणि वस्तू योग्य जागी ठेवण्यास सांगा. हे नियमितपणे केल्याने, मुलं स्वतःहून त्यांच्या वस्तू जागेवर ठेवण्याचा प्रयत्न करतील.
७. पैशांच्या बाबतीत जबाबदार रहा
पूर्वसूचना : त्यांना अंदाजपत्रक ठरवून द्या.
जेव्हा तुमचे मूल, पैसे खर्च करून वस्तू विकत घेण्यास जबाबदार होते तेव्हा त्यांना तुमच्या कष्टार्जित पैशांच्या मुल्यांबद्दल शिक्षित करू शकता. तुम्ही मुलांना बचतीची सवय लावू शकता. कधीतरी पॉकेट मनी देऊ शकता किंवा पिग्गी बँक सुद्धा ठेऊ शकता.
त्यांना एक अंदाजपत्रक द्या आणि त्यांचे खर्च व्यवस्थापित करण्यासाठी आणि पैसे वाचवण्यासाठी प्रोत्साहित करा. अशा प्रकारे, आपले मूल पैशांचे मूल्य शिकतील आणि बचत सुरू करतील.
८. वाटून घेण्यातच खरं प्रेम आहे.
पूर्वसूचना : घरात शेअरिंग प्रोत्साहित करा.
मुलांनी विशिष्ट वस्तूंचे मूल्य जाणून घेतले पाहिजे, आणि आभार मानण्यास शिकले पाहिजे आणि जे मित्र मैत्रिणी त्या वस्तू विकत घेऊ शकत नाहीत त्यांच्यासोबत वाटून घेण्यासाठी पुरेसं नम्र असायला हवे. तसेच त्यांना काही अमूर्त गोष्टी जसे की भावना, विचार शेअर करायला शिकवले पाहिजे. मूल प्रथम आपल्या पालकांसोबत आणि मग आजी आजोबा, भावंडं, चुलत भावंडं, विस्तारित कुटुंब आणि नंतर इतर लोकांसह सामायिक करणे शिकतील. शेअर करण्याचा हा दृष्टिकोन त्याला किंवा तिला एक चांगला व्यक्ती बनवेल.
९. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखा.
पूर्वसूचना : कचरा गोळा करण्यासाठी पिशवी सोबत घ्या, कचरा घरी आणा आणि आपल्या कचरा पेटीमध्ये टाका.
आपल्या मुलांना सभ्य आणि जबाबदार नागरिक बनवा. आणि त्यांना समजावून सांगा की सार्वजनिक ठिकाणे घाण करण्यासाठी नसतात, त्यामुळे कचरा जवळच्या कचराकुंडीत टाकला पाहिजे. ही सोपी सवय विकसित करण्यात त्यांना मदत करा आणि त्यांना त्याचे सर्व ठिकाणी अनुकरण करण्यास सांगा, कारण यामुळे त्यांना एक चांगला नागरिक बनण्यास मदत होईल. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार नाही अशी सवय करा, तुमची मुले नक्कीच तुमचे अनुकरण करतील. जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर असाल तेव्हा गोष्टी टाकण्यासाठी कचराकुंडी शोधा. बाहेर पडताना सोबत एक पिशवी ठेवा आणि आपला सगळा कचरा त्यात गोळा करा, उदा: रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, पेपर नॅपकीन वगैरे. हॉटेलच्या टेबलवर कचरा तसाच राहू देण्यापेक्षा तो घरी आणून कचरापेटीत टाका. रस्त्याच्या कडेला, तसेच कारच्या खिडकीतून कुठेही फेकू नका.
१०. सभ्य बना
पूर्वसूचना : तुमच्या मुलांनी लोकांशी वागताना जसे वागायला हवे, तसे प्रथम तुम्ही लोकांशी वागताना विनम्रतेने आणि आदराने वागा.
विनम्रता ह्या गुणाचे सर्वांकडून नेहमीच कौतुक होते. मुलांना लोकांचा आदर करण्यास शिकवा, मोठ्यांचा आणि लहानांचा सुद्धा. त्यांना समजावून सांगा की जरी त्यांना असे कोणीतरी भेटले जे त्यांना फार आवडले नाही तरी, त्यांनी विनम्र असावे आणि सभ्य पद्धतीने बाजूला व्हावे. त्यांनी प्रत्येकासोबत शांत आणि सभ्य राहिले पाहिजे. हे गुण त्यांच्यासोबत आयुष्यभर राहतील आणि त्यांच्याकडे आदराने पहिले जाईल. तुमच्या मुलांशी तुम्ही आदराने वागण्यास सुरुवात करा. तुम्हाला लवकरच लक्षात येईल की त्यांनाही आपोपाप सवय लागलेली असेल. नोकरांशी सुद्धा नम्रपणे वागा. मुले बघतात आणि तसेच वागतात.
११. निःपक्षपाती रहा
पूर्वसूचना : वेगवेगळ्या संस्कृतीच्या मैत्रीला प्रोत्साहन द्या.
मुले जन्मतःच निष्पाप आणि निःपक्षपाती असतात. भेद हा सामाजिकतेचा भाग आहे.
पालक म्हणून, आपल्याला केवळ आपल्या मुलांना भेदभावाच्या प्रवृत्तीपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. त्यांना निःपक्षपाती राहण्यास शिकवा आणि गरीब असो वा श्रीमंत, शत्रू असो वा मित्र सगळ्यांशी सारखे कसे वागावे ह्याचे मार्गदर्शन करा. तुम्ही त्यांना कुठल्याही जाती धर्मांच्या मुलांशी मैत्री करण्यास प्रोत्साहित करा.
१२. पक्षी व प्राण्यांना इजा करू नका
पूर्वसूचना : मुलांना T .V . वर वृत्तचित्र आणि प्राण्यांचे कार्यक्रम दाखवा.
साधारणतः प्राणी आणि पक्षी पाहून मुलांना आनंद होतो. काही मुले आकर्षित होतात, काही घाबरतात, काही बचावात्मक असतात तर काही शांत राहतात. त्यांना धडे दिले पाहिजेत की प्राणी आणि पक्षी हे जिवंत प्राणी आहेत जे त्यांच्या स्वत: च्या मार्गांनी संवाद साधतात आणि मैत्रीपूर्ण बनू शकतात. आपल्या मुलांना अपायकारक असलेल्या आणि नसलेल्या प्राण्यांमध्ये फरक करणे शिकायला हवे. त्यांना हानिकारक प्राण्यांपासून दूर राहण्यास तसेच पाळीव प्राण्यांसोबत दयाळू आणि मैत्रीपूर्ण राहण्यास सांगा. मुलांना वृत्तचित्र आणि प्राण्यांचे कार्यक्रम दाखवून ह्याबाबत चे धडे तुम्ही त्यांना देऊ शकता.
१३. नियमित व्यायाम करा
पूर्वसूचना : आपल्या मुलांचे नाव काही खेळांमध्ये नोंदवा.
स्वत: साठी आणि आपल्या कुटुंबासाठी नियमित व्यायाम करण्यासाठी काही वेळ घालवा, जसे की चालणे, जॉगिंग करणे, पोहणे, व्यायाम करणे, किंवा योगासने इत्यादी. व्यायामाचा काळ संपूर्ण कुटुंबासाठी दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरेल. व्यायामाचा समावेश मुलांच्या दैनंदिनीत लवकर केल्यास ते मुलांना सक्रिय, तंदुरुस्त आणि लवचिक ठेवेल. हे आपल्या मुलांसाठी निरोगी जीवनशैली ठरविण्यात मदत करेल. व्यायाम करताना उत्साह वाढावा म्हणून संगीत लावा. सर्वात उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या मुलाचे नाव कुठल्या तरी खेळात नोंदवा. त्यामुळे तुमची मुले आयुष्याचे मौल्यवान धडे शिकतील .
१४. कोणाचीही टीका/धिक्कार करू नका
पूर्वसूचना : सदैव रचनात्मकपणे चुका आणि दोष दाखवा.
टीकेमुळे तरुण मुले घडू तरी शकतात किंवा कायमची कोलमडू शकतात. तरुण वयात प्रत्येक जण टीका सकारात्मकतेने घेण्याइतका धूर्त नसतो. म्हणून पालकांनी मुलांवर जवळून लक्ष ठेवले पाहिजे, आणि त्यांना योग्य संवादाचे धडे दिले पाहिजेत. टीकेमुळे लोक दुखावले जाऊ शकतात, त्यामुळे इतरांबद्दल मुलांनी वाईट बोलू नये. ज्याला आपण ओळखत नाही त्याच्यावर केवळ मजेसाठी अनावश्यक टीका करणे किंवा धमकावणे हे चूक आहे आणि स्वीकार्य नाही. आपल्या मुलासमोर कौटुंबिक सदस्यांशी कधीही वाईट बोलू नका.
१५. प्रामाणिक राहा
पूर्वसूचना : मुलांशी कधीही खोटे बोलू नका. सतत प्रामाणिक रहाण्याचा प्रयत्न करा.
प्रामाणिकपणा हा महत्वाचा गुण आहे आणि मुलांनी लहानपणापासून तो आचरणात आणला पाहिजे. तुम्ही मुलांचे पालक आहात, त्यामुळे तुम्ही मुलांचे रोल मॉडेल आहात. तुमच्या प्रत्येक सकारात्मक अथवा नकारात्मक शब्दाचा किंवा कृतीचा त्यांच्यावर मोठा परिणाम होत असतो. प्रत्येकवेळी प्रामाणिक राहा, खास करून मुलांच्या उपस्थितीत मुलांना सर्व परिस्थितीत सत्य बोलण्यास प्रवृत्त करा.
१६. धैर्य आणि दृढनिश्चय
पूर्वसूचना : त्यांना बागकाम, किंवा स्वयंपाक करण्यास प्रोत्साहित करा.
धैर्य हा एक सद्गुण आहे. कारण ज्यांच्याकडे धैर्य आहे त्यांच्याकडे शांतता असते, आणि सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकजण शांतता शोधत आहे .
आपल्या मुलांमध्ये लवकर धैर्य बाळगण्याचे गुण विकसित करा, जेणेकरून ते राहतील.
त्यांना शांत आणि आरामात राहायला सांगा. मुलांना प्रतीक्षा करण्यासाठी किंवा काही गोष्टी त्यांच्या स्वत: च्या वेगाने घडणार आहेत हे शिकवा. त्यांना विश्वास द्या की धैर्याची किंमत मिळतेच, आणि कुठलीही बिकट परिस्थिती सहजगत्या हाताळली जाऊ शकते. त्यांना स्वयंपाक, बागकाम इत्यादी कामे करण्यास प्रोत्साहित करा, जिथे परिणाम तात्काळ नसतात आणि धैर्याची आवशक्यता असते.
१७. कृतज्ञता बाळगा
पूर्वसूचना : मुलांना दिवसातून दोन वेळा प्रार्थना करण्याची सवय लावा.
आपल्या मुलांमध्ये नम्रपणा रुजवा आणि त्यांना छोट्या, मोठ्या गोष्टींसाठी आभार मानायला शिकवा.
सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपण्यापूर्वी त्यांना प्रार्थनेची सवय लावा. तुम्ही स्वतः हे पाळा. मुले तुमच्याकडून आपोआप शिकतील.
१८. हात धुवा
पूर्वसूचना : मुलांना जंतूंविषयी आणि अस्वच्छ हातामुळे होणाऱ्या रोगांविषयी माहिती द्या.
जेवणाच्या आधी आणि नंतर हात धुण्याचा शिष्टाचार मुलांना बालवाडीपासून शिकवला जातो. त्यांना हे माहित असू द्या की हात धुण्याने फ्लू सर्दी आणि इतर संसर्ग होण्यापासून रोखले जाऊ शकतात. आपल्याला त्यांना खालील मूलभूत नियम शिकवण्याची आवश्यकता आहे.
- मातीत खेळून झाल्यावर आणि जेवण्याच्या आधी आणि नंतर हात स्वच्छ धुवा.
- हात कोरडे करण्यासाठी स्वच्छ टॉवेल किंवा टिशू वापरा.
- जंतुनाशक साबणाचा वापर करा.
१९. दिवसातून २ वेळा ब्रश करा
पूर्वसूचना : हे एकत्र करा, तुम्ही मुलांसोबत ब्रश करा.
तोंडाची स्वच्छता सर्वात महत्वाची असून, लहानपणापासून त्याची चांगली काळजी घेतली पाहिजे. लवकर लावलेली ही सवय दीर्घकाळापर्यंत राहते. बऱ्याचदा मुलांना दात घासण्याचा कंटाळा येतो पण हे गोष्ट सहज घेता कामा नये. एक बक्षीस म्हणून आपण कधीकधी त्यांना आवडत्या मिठाई ची ट्रीट देऊ शकता. ब्रशिंगच्या योग्य पद्धतींबद्दल त्यांना शिक्षित करा .
- दिवसातून २ वेळा ब्रश करा.
- जेवण झाल्यावर गुळण्या करा, त्यामुळे खराब श्वास आणि दात किडण्यापासून बचाव होतो.
- योग्य वेळी दात फ्लॉस करा.
- टंग क्लिनर वापरून जीभ स्वच्छ ठेवा.
- तुमचा टूथब्रश कुणासोबतही सामायिक करू नका.
२०. कान स्वच्छ ठेवा
पूर्वसूचना : अंघोळीनंतर अंग पुसतानाच कान पुसून घ्या.
कान आपल्या शरीराचा महत्वाचा अवयव आहे. कानाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यावर अस्वस्थता जाणवू शकते आणि संसर्ग सुद्धा होऊ शकतो. अगदी बाळ असतानापासून कानाची नियमित स्वच्छता करण्याची काळजी घेतली पाहिजे. दररोज कानाचा बाहेरील भाग पाण्याने स्वच्छ धुवून, टॉवेल ने कोरडा केला पाहिजे. जेंव्हा मुले थोडी मोठी होतात तुम्ही त्यांना स्वतःचे स्वतः कान स्वच्छ करण्यास शिकवू शकता.
२१. दररोज अंघोळ
पूर्वसूचना : उन्हाळ्यात दिवसातून २ वेळा अंघोळ करा.
अंघोळ ही मूलभूत गरज आहे, आणि सर्व वयोगटातील लोकांसाठी याची शिफारस केली जाते. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या पहिली गोष्ट म्हणजे अंघोळ करणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या मुलांना गरम उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये २ वेळा अंघोळ करण्यास सांगू शकता. तसेच बाहेरून खेळून आल्यावर मुलांनी अंघोळ करावी. अंघोळीमुळे त्वचा तजेलदार होऊन, उत्साह वाढतो. तसेच रात्री झोप चांगली लागते.
२२. केसांची स्वच्छता राखा
पूर्वसूचना : मुलांना केस विंचरण्याचा योग्य मार्ग शिकवा.
मुलांनी केस स्वच्छ ठेवले पाहिजेत. बाहेर खेळण्यामुळे किंवा प्रवासामुळे, टाळू आणि केस घाण होतात. मुलांनी त्यांचे केस वेळोवेळी धुतले पाहिजेत. किमान २-३ दिवसातून एकदा. त्यामुळे ते उवा, कोंडा आणि केसगळती ह्या समस्यांपासून दूर राहतील. केस धुण्याच्या आधी तेल लावण्याची सवय करा. आणि केस विंचरताना असा कंगवा वापरा ज्यामुळे स्काल्पला स्पर्श होईल. त्यामुळे स्काल्पलाचे रक्ताभिसरण वाढते आणि ते केस वाढीला उत्तेजन देते.
२३. नखे छोटी ठेवा
पूर्वसूचना : वाढलेल्या नखांमुळे जंतूंचा कसा शरीरात प्रवेश होतो ते मुलांना समजावून सांगा.
बाळे नेहमी तोंडात बोटे घालतात, त्यामुळे नखे स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. तसेच वाढीच्या वयातील मुलांना शिकवा की नखे नेहमी छोटी आणि स्वच्छ ठेवली पाहिजेत. त्यांना स्पष्ट करा की अस्वच्छ नखांमुळे तोंडातून किंवा खाजवल्याने जंतूंचा शरीरात प्रवेश होतो, आणि तुम्ही आजारी पडू शकता.
मुले शाळेत जाण्याइतकी मोठी झाली की तुम्ही त्यांना चांगल्या सवयी आणि चांगल्या आरोग्याची किंमत समजावून सांगू शकता.
वर नमूद केलेल्या आरोग्यविषयक सवयींव्यतिरिक्त, शाळेत जाणाऱ्या मुलांना आवश्यक असणाऱ्या सवयी खालीलप्रमाणे
२४. ” कृपया “, “आभारी आहे ” आणि ” माफ करा “
पूर्वसूचना : तुम्ही मुलांसोबत किंवा मुलांसमोर असताना वरील शब्दांचा वापर जास्तीत जास्त वेळा करा.
तुम्ही तुमच्या मुलांना हे तीन जादुई शब्द शिकवले पाहिजेत . “कृपया”, ” आभारी आहे ” आणि ” माफ करा “, त्यामुळे त्यांना त्यांचे प्रश्न सहजपणे हाताळता येतील . ह्या सुवर्ण शब्दांचा वापर केल्याने समाजात वावरताना आदर मिळतो आणि प्रशंसेस पात्र होतो. तुमची मुले सभ्य आणि उदार ह्रदयाचा लोकांच्या सहवासात येतील. तुमच्या मुलांच्या सोबत ह्या शब्दांचा जास्तीत जास्त वापर करा, आणि लवकरच मुले सुद्धा ह्या शुभेच्छांचा वापर करू लागतील.
२५. दुसऱ्यांना मदत करणे
पूर्वसूचना : दररोज एका व्यक्तीला मदत करण्यास आपल्या मुलांना प्रोत्साहित करा.
मुलांना वाढवताना त्यांच्यामध्ये दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती जोपासा. त्यांना नम्रता आणि औदार्याचा मार्ग दाखवा जेव्हा आणि जिथे शक्य आहे तिथे, त्यांना दुसऱ्यांना मदतीचा हात देण्यास प्रोत्साहित करा. तुम्ही सुद्धा मुले सोबत असताना मित्र किंवा अनोळखी लोकांना मदत करा, पण त्याच वेळी मुलांना अनोळखी लोकांच्या बाबतीत काळजी घेण्यास सांगा.
२६. स्वच्छ आणि सकारात्मक मानसिकता
पूर्वसूचना : आशावाद निर्माण करा.
लहान मुले खूप संवेदनशील असतात आणि जेव्हा त्यांच्या मनाप्रमाणे होत नाही तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होतात . त्यामुळे मुले नक्की कशातून जात आहेत आणि काय विचार करीत आहेत हे समजण्यासाठी तसेच मुलांचा नकारात्मक स्वसंवाद टाळण्यासाठी तुमचा सहभाग आणि मुलांशी संवाद अतिशय महत्वाचा आहे. खोटी स्तुती टाळा, त्याऐवजी त्यांना त्यांच्या यशाची आणि प्रयत्नांची वेळेवर पावती निश्चित द्या. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या क्षमतांची आणि एकमेवाद्वितीय अशा गुणांची खात्री देऊन स्वप्रशंसा विकसित करण्यास मदत करू शकता. त्यांची विचारसरणी तार्किक आणि व्यावहारिक अशी विकसित करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून विचारसरणी सकारात्मक होईल आणि त्यानुसार त्यांच्या आयुष्यात आव्हानात्मक परिस्थितींचा सामना ते करू शकतील
२७. मित्रमैत्रिणीसोबत वेळ घालवा
पूर्वसूचना : आठवड्याच्या शेवटी खेळाच्या तारखा निश्चित करा .
असं म्हणतात की शाळेतली मैत्री खूप काळ टिकते, आणि आयुष्यभरासाठी सुद्धा राहते. ह्याचे कारण असे आहे की लहान मुलांचे मन निष्पाप असते आणि ते कुठल्या स्वार्थी हेतूने मैत्री करत नाहीत. तरुण वयात तुमच्या मुलांचा सामाजिक विकास होण्यात मित्रांचा सहभाग महत्वाचा आहे. मुले मौल्यवान जीवन कौशल्ये शिकतात जसे की संवाद, सामाजिककरण, सहकार, समस्या सोडवणे आणि एकत्र कार्य करणे. किशोरवयात किंवा प्रौढत्वादरम्यान, चांगले मित्र असणे हे मुलांच्या समर्थन प्रणालीचा एक भाग असतो. तुमच्या मुलांना मित्र करण्यास आणि त्यांच्या सोबत आरामात वेळ घालवण्यास प्रोत्साहित करा.
२८. न्याहारी टाळू नका
पूर्वसूचना : मुलांच्या दिवसाची सुरुवात पोषक आणि आरोग्यपूर्ण आहाराने होत आहे ह्याची खात्री करा.
न्याहारी सर्व वयोगटासाठी अतिशय महत्वाची आहे. हे विशेषतः मुलांसाठी आणि शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी अनिवार्य आहे कारण त्यामुळे मेंदूला चालना मिळते. चयापचय आणि शरीरातील कार्ये यांचा आरंभ होतो आणि संपूर्ण दिवसभर ऊर्जा मिळते .
आपण आपल्या मुलांना नाश्त्यात तंतुमय धान्य (High fibre cereals) देऊ शकता कारण ते मधुमेहाचा आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. न्याहारी ची सवय असणे त्यांना त्यांच्या प्रौढावस्थेत फायदेशीर ठरेल . न्याहारी टाळल्याने होणाऱ्या हानिकारक परिणामांबद्दल त्यांना कळू द्या आणि सकाळी न्याहारी न घेतल्याने लठ्ठ होण्याची शक्यता वाढते हे सुद्धा सांगा.
२९. जेवताना पाळावयाचे शिष्टाचार
पूर्वसूचना : स्वावलंबनाला प्रोत्साहन द्या.
एका विशिष्ट वयानंतर मुले स्वतःचे स्वतः जेवण्याचा आग्रह धरतात. जरी त्यांना चमचे आणि काटेचमचे पकडायला आवडतात तरी ते नीट पकडू शकत नाहीत आणि त्याऐवजी गोंधळ घालतात . त्यांना योग्य पद्धतीने स्वतःचे स्वतः खाण्यासाठी शिकवण्याची गरज आहे. आपण त्यांना मोठे समजू शकता आणि योग्य प्रकारे जेवण घेण्याचा शिष्टाचार दर्शवू शकता.
३०. नियमित शारीरिक क्रियाकल्प (Physical Activity)
पूर्वसूचना : दररोज शारीरिक क्रियाकलाप करण्यासाठी ४० मिनिटे द्या.
मुलांना त्यांना मनोरंजक वाटणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये गुंतवून शारीरिकरित्या सक्रिय ठेवले पाहिजे जसे की खेळ खेळणे, संगीत, वाद्य वाजवणे जलतरण किंवा जिम्नॅस्टिक इत्यादी. ह्या सवयीमुळे त्यांचा सर्वांगीण विकास होईल. मुले निरोगी आणि जागरूक राहतील. ते सशक्त होण्यास शिकतील आणि प्रौढावस्थेत सुद्धा ते हे क्रियाकल्प करतील. जर आपल्या मुलांनी व्यायामशाळेत किंवा जिम क्लासला जाण्याबद्दल उत्सुकता बाळगली नाही तर त्यांना नवीन गोष्टी करण्यास प्रोत्साहित करा आणि त्यांना इतर क्रियाकल्पांशी ओळख करून द्या. कधीतरी त्यांना निश्चितच आव्हानात्मक, आनंददायक आणि मजेदार असं काहीतरी सापडेल.
३१. दररोज वाचन करा
पूर्वसूचना : दररोज झोपण्याआधी वाचण्याची सवय लावा.
आपल्या मुलांमध्ये वाचण्यासाठी आवड जोपासण्यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे वाचन. आपल्या मुलांच्या खेळाच्या वेळी आणि निजण्याच्या वेळी वाचन नित्यक्रमाचा भाग बनवा. अशी पुस्तके निवडा जी वाचताना मुलांना मजा येईल . ही दररोजची सवय ठेवा. त्यामुळे मुलांची स्वप्रशंसा वाढण्यास मदत होईल, तसेच वाचनकौशल्य वाढीस लागेल ,त्यांची कल्पनाशक्ती विकसित होईल, शब्दसंग्रह आणि सर्जनशीलता तयार होण्यास मदत होईल. ह्यामुळे त्यांचं पालकांशी नातं आणि संप्रेषण (communication) सुधारण्यास मदत होईल.
३२. वेळेची किंमत
पूर्वसूचना : वक्तशीरपणाला प्रोत्साहन द्या.
आपल्याला सर्वप्रचलित इंग्रजी म्हण ” Time is Money” माहित आहे, तसेच आपल्याला वेळ आणि पैसा, ह्या दोघांच्या मूल्याची जाणीव आहे. मुलांना वेळेचा योग्य सदुपयोग करण्यास शिकवा, वेळेवर तयार होण्यास शिकवा. दररोजच्या वेळापत्रकाचे पालन आणि वक्तशीरपणाचे महत्व सांगा.
शाळेत वेळेवर जाण्याचे महत्व त्यांना समजवा, कारण वक्तशीर नसल्यामुळे त्यांना शाळेत शिक्षा होऊ शकते.
एक कुटुंब म्हणून आपण अनेक कार्ये किंवा समारंभांना उपस्थित राहू शकता. प्रत्येक प्रसंगी आपण पूर्वी किंवा वेळेवर पोहचता याची खात्री करुन घ्या त्यामुळे मुलांमध्ये पण ती सवय रुजेल.
३३. वेळेवर झोप
पूर्वसूचना : झोपण्याचे एक नियमित वेळापत्रक करा.
नवजात मुलांसाठी तसेच वाढत्या मुलांसाठी झोप सर्वात महत्वाचा भाग आहे. आपल्या मुलांच्या बालपणापासून मुलांमध्ये लवकर उठून लवकर झोपण्याची सवय रुजवणे महत्वाचे आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना दररोज सक्रिय आणि उत्साही असण्याची गरज असते, ज्यासाठी त्यांना पुरेशी झोप आवश्यक असते. झोपेमुळे दिवसभरात गमावलेली ऊर्जा पुनःसंचयीत होण्यास मदत होते. लवकर झोपणे आपल्या मुलांना पुरेशी विश्रांती मिळवून देण्यास मदत करते, यामुळे मुले ताजीतवानी होऊन आणि पुढील दिवशी सक्रिय होतात.
- मुलांना लवकर झोपवा आणि झोपताना त्यांच्यासोबत झोपा.
- मुलांजवळ झोपल्याने त्यांना सुरक्षित वाटेल आणि त्यांना चांगली झोप लागेल.
- दररोज झोपण्याची वेळ एकच ठेवा, त्यामुळे त्यांच्या झोपण्याच्या वेळेचा नमुना तयार होईल आणि ते स्वतःचे स्वतः झोपायला शिकतील.
- आपल्या मुलांना एकाच वेळी जरुरीपेक्षा जास्त वेळ झोपू देणे टाळा. गरज भासल्यास मुले दुपारच्या वेळी वामकुक्षी घेऊ शकतात.
३४. पराभव स्वीकारा
पूर्वसूचना : मुलांना अपयशामध्ये आधार द्या.
मुले अपयश मिळाल्यामुळें निराश होतात. त्यामुळे पालक म्हणून तुमची मुलांना आधार देण्याची जबाबदारी आहे. आणि त्यांना अपयशाचा सकारात्मकरित्या सामना करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. तसेच पुढच्या वेळी नक्कीच चांगले कराल असा विश्वास दिला पाहिजे. त्यांना आयुष्यातील चढ उतार माहित करून देऊन, अपयश हे कायम राहात नाही, हे समजून सांगितले पाहिजे. आपण जे प्रयत्न आणि प्रगती केली ते सुद्धा महत्वाचे आहे.
३५. खूप कष्ट करा
पूर्वसूचना : तुमच्या मुलांना हे समजावून सांगा की आयुष्यात शॉर्ट कट्स नाहीत.
कठोर परिश्रमांचे महत्व मुलांना समजावून सांगा. त्यांना कुठल्याही कामात जसे की वाचन, लिखाण किंवा कुठल्याही विधायक कामात त्यांचे सर्वोत्तम देण्याची सवय लावा. त्यांनी हे शिकायला हवे की केवळ चांगले नशीब हे यशास कारणीभूत नसून त्यासाठी दृढ संकल्प आणि कठोर परिश्रम आवश्यक आहे. आपण आपल्या जीवनात कमाई करण्यासाठी किती कठोर परिश्रम करत आहात याचे स्पष्टीकरण आपल्या मुलांना देऊ शकता.
३६. धूम्रपान, मद्यपान, अंमली पदार्थांचे सेवन टाळा
पूर्वसूचना : तुम्ही स्वतः या सवयी सोडा, तुमची मुले तुमचे अनुकरण करतील.
धूम्रपान, मद्यपान, तसेच अमली पदार्थांचे सेवन करण्याच्या सवयी तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर आणि तुम्हाला कसे वाढवले गेले आहे ह्यावर अवलंबून असते. आपण आपल्या मुलांच्या जीवनात पूर्णपणे गुंतलेले असल्याची खात्री करुन घ्या, त्यांची कमतरता जाणून घ्या आणि प्रत्येक स्तरावर त्यांना समर्थन द्या, दुर्लक्ष आणि संप्रेषणाची कमतरता ह्यामुळे मुले बाह्य प्रभावांना बळी पडतात. तुम्ही तुमच्या मुलांना ह्या वाईट सवयीबद्दल शिकवले पाहिजे तसेच त्यांच्यापासून दूर राहण्यास सांगितले पाहिजे.
तसेच, मित्रांच्या प्रभावाखाली न येण्याविषयी मुलांना चेतावनी द्या. पालक म्हणून, आपण स्वतः प्रथम मद्यपान आणि धूम्रपान न करता मदत करू शकता. आपण आपल्या मुलांना शिस्त शिकवू शकता, परंतु आपल्या मुलाने ते लागू केले आहे किंवा नाही हे आपण पालक म्हणून किती चांगले आहात यावर अवलंबून असते. त्यांना योग्य मार्ग दाखवा आणि सकारात्मकता आणि प्रशंसेसह त्यास टिकून राहण्यास प्रोत्साहित करा.