Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण आरोग्य बाळांमधल्या बद्धकोष्ठतेला कारणीभूत असलेले आणि त्यापासून सुटका करणारे २० अन्नपदार्थ

बाळांमधल्या बद्धकोष्ठतेला कारणीभूत असलेले आणि त्यापासून सुटका करणारे २० अन्नपदार्थ

बाळांमधल्या बद्धकोष्ठतेला कारणीभूत असलेले आणि त्यापासून सुटका करणारे २० अन्नपदार्थ

तुमच्या बाळाला शौचास करणे कठीण होते का? तसेच खूप वायू बाहेर पडतो का? मल बाहेर पडताना बाळाला अस्वस्थता जाणवते का? जर ह्याचे उत्तर हो असे असेल तर बाळ बद्धकोष्ठताग्रस्त असू शकेल. बाळाची होत असलेली गैरसोय बघून पालक म्हणून तुमची झोप उडणे खूप स्वाभाविक आहे. असंख्य घरगुती उपचार केल्यानंतरसुद्धा, आपल्या ह्या समस्येचे निराकरण झाले नाही तर आपल्या मुलाचा आहार तपासून पाहण्याची वेळ आली आहे. जे अन्न बाळ खाते त्याचा थेट परिणाम बाळाच्या मलविसर्जनावर होतो. काही अन्न घटकांमुळे बाळांमध्ये मलावरोध होतो. हे मुख्यत्वेकरून जेव्हा बाळ घनपदार्थ खाण्यास सुरुवात करते तेव्हा होते.

वेगवेगळे अन्नघटक, ज्यामुळे लहान मुलांमध्ये मलावरोध होतो आणि त्यापासून सुटका होते हे जाणून घेण्यासाठी, तसेच आपल्या बाळास शौचास नीट झाली आहे हे सुनिश्चित करण्यासाठी, पुढे वाचा.

अर्भकांमध्ये बद्धकोष्ठतेला कारणीभूत असलेले अन्नपदार्थ

जर तुमच्या बाळाने नुकतीच घनपदार्थ खाण्यास सुरुवात केली असेल आणि  तुम्हाला असं लक्षात आलं असेल की बाळाला मलविसर्जनास त्रास होत आहे किंवा शी खूप कोरडी आणि घट्ट होत आहे, तर हे बद्धकोष्ठतेचं लक्षण आहे. बाळांमधील बद्धकोष्ठतेची खूप कारणे आहेत पण प्रामुख्याने बाळाच्या घन आणि द्रव आहारावर ते अवलंबून आहे. जर आपण आपल्या बाळाच्या आहाराची तपासणी करत असाल तर या खाद्यपदार्थांची यादी लक्षात ठेवा ज्यामुळे बाळांमध्ये बद्धकोष्ठता होऊ शकते.

१. दुधामधील प्रथिने

दुधामधील प्रथिनांमुळे बाळांमध्ये बद्धकोष्ठता होऊ शकते. आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर दुधामुळे असे होऊ शकते. फॉर्मुला दूध सुरु केल्यानंतर पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. काही वेळेला आईच्या दुधातील प्रथिनांमुळे बाळाला ऍलर्जी होते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.

२. हवाबंद डब्यातील अन्नपदार्थ

बाळांना वाढीच्या पहिल्या काही वर्षात डब्यातील अन्न दिले जाते, त्यामधील बरेचसे घटक पचायला जड जातात आणि त्यामुळे बद्धकोष्ठता होते. फॉर्मुला दुधात सुद्धा जटील प्रथिने असतात ज्यामुळे बाळाला घट्ट शी होते.

हवाबंद-डब्यातील-अन्नपदार्थ

३. भात

भात आणि लापशी हे दोन प्रमुख घनपदार्थ आहेत जे बऱ्याच माता आपल्या बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना निवडतात. काही बाळांना भात पचायला जड जातो आणि त्यांना बद्धकोष्ठता जाणवते.

४. गाजर

कच्चे गाजर किंवा गाजराचा ज्यूस हा बाळांसाठी चांगला असतो. पण तुम्ही जर उकडलेले गाजर बाळास दिलेत तर बाळास बद्धकोष्ठता होऊ शकते. ह्या वाफवलेल्या गाजरामुळे शी घट्ट होते व बाळाला मलनिःसरणास त्रास होतो.

५. कच्चे केळं

जिथे मोठ्या प्रमाणात केळ्याचे उत्पादन होते तिथे बाळाला शिजवलेल्या केळ्याची भाजी किंवा उन्हात वाळवलेल्या कच्च्या केळ्याच्या पावडरीची लापशी दिली जाते. जरी पिकलेले केळं बाळासाठी चांगले असले तरी कच्च्या केळ्यामुळे बाळाच्या पोटाला त्रास होऊ शकतो आणि बाळास बद्धकोष्ठता जाणवते.

६. सफरचंद

शौचास घट्ट होण्यासाठी सफरचंद प्रसिद्ध आहे. किंबहुना जुलाबावर ते घरगुती उपाय म्हणून वापरले जाते. बाळांसाठी खूप प्रसिद्ध असलेले जेवण म्हणजे उकडलेले सफरचंद, ज्यामुळे बाळांना बद्धकोष्ठता होते. बाळांना ऍपल-सॉस देणे टाळले पाहिजे, कारण त्यात पेक्टिन नावाचे प्रथिन असते आणि त्यामुळे शौचास घट्ट होते.

सफरचंद

७. चीझ

चीझ बऱ्याच आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा एक चांगला स्त्रोत आहे आणि हे बाळांसाठी खूप चांगले आहे. साधारणतः हे बाळांना नाश्त्याच्या वेळी दिले जाते. पण चीझ मध्ये तंतू खूप कमी प्रमाणात असल्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.

८. पांढरा ब्रेड

पांढरा ब्रेड हा बहू-उद्देशिय पिठांपासून बनवला जातो. वेगवेगळ्या धान्यांवर प्रक्रिया करून तो बनवला जातो. त्यामुळे ब्रेड मध्ये स्त्रोतांपेक्षा कमी तंतू असतात. तंतूमय पदार्थ पचनक्रिया सुधारण्यास कारणीभूत आहेत हे सर्वज्ञात आहे, व्हाईट ब्रेड मध्ये तंतू खूप कमी असल्याने बाळांना बद्धकोष्ठता होते. तसेच हा एक प्राथमिक पदार्थ आहे ज्यामुळे लहान मुलांमध्ये कब्ज होते.

९. कंद

कंदामध्ये खूप जास्त प्रमाणात पिष्ट असते, आणि ते बाळांना वाढण्यासाठी आणि कार्यासाठी ऊर्जा देते. तथापि, रताळे सोडून इतर कंदमुळांमध्ये कमी तंतू असतात आणि त्यामुळे बाळांना मलविसर्जन अवघड जाते.

१०. दही

दह्यामध्ये चांगले जीवाणू असतात आणि ते पचनक्रिया सुलभ करतात. पण अन्नघटकांना घट्ट करण्याचे काम सुद्धा दही करते. काही वेळा त्यामुळे मुलांमध्ये बद्धकोष्ठता होते.

बद्धकोष्ठतेपासून आराम देण्यास मदत करणारे अन्नपदार्थ

आता तुम्हाला माहित झाले आहे की कुठल्या पदार्थांमुळे बद्धकोष्ठता होते. आपण आपल्या मुलाच्या आहारात त्या अन्नपदार्थांना समाविष्ट करणे टाळू शकता. पण जर तुमचे बाळ बद्धकोष्ठताग्रस्त असेल तर तुम्ही काय कराल?

म्हणून, कब्जाने ग्रस्त असलेल्या मुलांसाठी या उच्च तंतुमय पदार्थांवर लक्ष द्या.

नवजात शिशुंसाठी हे अन्न केवळ त्यांना या अवस्थेपासून मुक्त करणार नाहीत तर भविष्यात देखील बद्धकोष्ठतेला आळा बसेल.

१. काळे मनुके

काळे मनुके हे तंतूंनी समृद्ध असून, जीवनसत्वांचा एक चांगला स्त्रोत आहे. बद्धकोष्ठतेवर काळे मनुके आश्चर्यकारक कार्य करते. हे रात्रभर भिजवून सकाळी उठल्या उठल्या बाळाला देऊ शकता. किंवा बद्धकोष्ठतेपासून आराम मिळावा म्हणून काळ्या मनुक्याचा रसही देऊ शकता. दोन्ही पद्धतीने बाळाला शौचास सुलभ होते.

२.फरस बी

फरस बी मध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे तंतू असून ते पचनास मदत करतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये मलनिःसारण सोपे होते.

३.हिरवा वाटाणा

हिवाळ्यात उपलब्ध ताजे हिरवे वाटण्यामध्ये जास्त प्रमाणात तंतू असतात. उकडलेले मटार स्नॅकसाठी तुम्ही देऊ शकता. अर्भकांमध्ये मलनिःसारणाची प्रक्रिया सोपी जावी म्हणून उकडलेल्या हिरव्या वाट्याण्याची प्युरी दिली जाऊ शकते.

हिरवा-वाटाणा

४.ऍप्रिकॉट

हे अजून एक मौसमी फळ आहे जे कब्जाचा इलाज करण्यासाठी वापरले जाते. हे कच्या स्वरूपात दिले जाऊ शकते किंवा रस दिला जातो. सुके ऍप्रिकॉट सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत, जे रात्रभर भिजवून सकाळी बाळाला देऊ शकता.

५. ओटमील

ओटमील, लहान मुलांसाठी एक सामान्य आणि प्रामुख्याने प्राधान्य असलेला आहार, आणि वारंवार बद्धकोष्ठता होणाऱ्या मुलांसाठी हा उत्कृष्ट आहार आहे. ओटमील आवश्यक असलेले तंतू पुरवते आणि मल घट्ट होण्यापासून बचाव करते .

६.पेअर

पेअर हे अजून एक फळ आहे जे तंतू आणि जीवनसत्व सी ने समृद्ध आहे. तंतू आणि जीवनसत्व सी, हे योग्य पचन आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्ती अश्या दोन्ही गोष्टींसाठी फायदेशीर आहेत. कब्ज ठीक करण्यासाठी बाळांना ताज्या पेअरचा काही थेंब रस देखील दिला जाऊ शकतो.

पेअर

७. ब्रोकोली

हे बाळांसाठी पौष्टिक अन्न असून प्रथिने आणि तंतूंनी समृद्ध आहे.ब्रोकोलीचे छोटे तुकडे उकडून बाळांना देऊ शकता, त्यामुळे मलविसर्जन प्रक्रिया सुलभ होईल.

८.रताळे

इतर कंदांपेक्षा भिन्न असलेले रताळे, हे बद्धकोष्ठता गायब करणारे कंद आहे. हे कब्जापासून मुक्तता मिळवण्यास मदत करते. तसेच वाढत्या बाळांसाठी आवश्यक असणारे बरेच पोषक घटक व कर्बोदके पुरवते.

९.बेरी :

बेरींमध्ये खूप अँटिऑक्सिडंट्स असतात आणि बाळांसाठी व लहान मुलांसाठी हे एक चांगले अन्न आहे कब्जापासून बेरींमुळे आराम मिळतो.

१०.संपूर्ण धान्य ब्रेड

संपूर्ण धान्य ब्रेड हा पांढऱ्या ब्रेड सारखा नसून, त्यामध्ये जास्त प्रमाणात तंतू असतात, ज्यामुळे बद्धकोष्ठतेला प्रतिबंध होतो. आपल्या बाळाच्या आहारामध्ये या सर्व उच्च तंतुमय खाद्यपदार्थांचा समावेश करण्याव्यतिरिक्त, आपण त्यांची उत्सर्जित प्रक्रिया व्यवस्थित राखण्यासाठी त्यांना भरपूर प्रमाणात पाणी द्यावे. जर तुमचे बाळ स्तनपान करीत असेल तर दुधातून बाळाला पुरेसं पाणी मिळते, त्यामुळे वरून अजून पाणी पाजण्याची गरज भासत नाही .

बऱ्याचदा जेव्हा मुलाला बद्धकोष्ठता होते, तेव्हा पालक भरपूर तणावातून जातात. त्याच्या आहारातील थोडेसे बदल आणि नियमित शारीरिक क्रिया कब्ज आणि इतर पोट-संबंधित समस्यांना बरे करू शकते.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article