अन्न आणि पोषण

तुमच्या बाळाला डाळिंब कसे द्याल?

जेव्हा तुमचे बाळ सहा महिन्याचे होते, तेव्हा तुम्ही त्याला घन आहाराची ओळख करून देऊ शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता अशा पदार्थांची यादी तयार करता तेव्हा त्यामध्ये डाळिंबाचा समावेश करा. डाळिंब हे अर्ध-उष्णकटिबंधीय सुपरफ्रूट आहे ह्या फळाचे मूळ पर्शियन आहे. हे फळ त्याच्या अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांकरिता ओळखले जाते. मुलांसाठी हे एक अतिशय जादुई असे फळ आहे. हे फळ विविध प्रकारचे आरोग्य विषयक फायदे देते. ते तुमच्या बाळासाठी अनुकूल कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी वाचा.

तुम्ही तुमच्या बाळाला डाळिंब देऊ शकता का ?

होय, तुम्ही तुमच्या बाळाला सहा महिन्यांनंतर बिया असलेली फळे देऊ शकता परंतु केवळ ज्यूसच्या स्वरूपात तुम्ही ती देऊ शकता. एकदा बाळ थोडे मोठा झाल्यावर बिया काढून बाळाला फळ देऊ शकता. पोषक आणि औषधी गुणधर्मयुक्त, डाळिंब हे व्हिटॅमिन ए आणि ई, पोटॅशियम, लोह, फायबर, फोलिक ऍसिड आणि खनिजांचा एक डोस म्हणून एक आदर्श आहार आहे. पोषण मूल्यांचा समतोल राखण्यासाठी तुमच्या बाळाच्या आहारात नियमितपणे ह्या फळाचा समावेश करण्यास विसरू नका.

डाळिंबाच्या पौष्टिक मूल्यांविषयी

लाल रंगाच्या बिया असलेल्या डाळिंबाचे साल गुळगुळीत आणि मऊ असते. व्हिटॅमिन सी, ए आणि ई ने भरलेल्या ह्या फळामध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे फ्री रॅडिकल्स दूर राहतात. फळांमध्ये आवश्यक प्रमाणात पोटॅशियम, फायबर, लोह, फॉलिक ऍसिड, खनिजे आणि पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स देखील असतात. फळांद्वारे मिळणारे असंख्य आरोग्यविषयक फायदे आपल्या बाळासाठी ते सुपरफूड बनवतात. बाळ फळांचा गर (पल्प) खाऊ लागेपर्यंत बाळाला फळांचा रस देत रहा. तद्वतच, लहान मुलांनी वयाच्या नऊ महिन्यांनंतरफळांचा गर खायला तयार असले पाहिजे. खाली डाळिंबाचे पौष्टिक मूल्य सूचीबद्ध केलेले आहे:
पौष्टिक घटक मूल्य प्रति 100 ग्रॅम पौष्टिक घटक मूल्य प्रति 100 ग्रॅम
पाणी 7.93 ग्रॅम ऊर्जा 83kcal
प्रथिने 1.67 ग्रॅम एकूण लिपिड 1.17 ग्रॅम
कार्बोहायड्रेट 18.70 ग्रॅम फायबर 4 ग्रॅम
साखर 13.67 ग्रॅम कॅल्शियम 10 मिलीग्राम
लोह 0.30 मिलीग्राम मॅग्नेशियम 12 मिलीग्राम
फॉस्फरस 36 मिलीग्राम पोटॅशियम 236 मिलीग्राम
सोडियम 3 मिलीग्राम झिंक 0.35 मिलीग्राम
व्हिटॅमिन सी 10.2 मिलीग्राम थायमिन 0.067 मिलीग्राम
रिबॉफ्लेविन 0.053 मिलीग्राम नियासिन 0.293 मिलीग्राम
व्हिटॅमिन बी -6 0.075 मिलीग्राम फोलेट 38 यूजी
व्हिटॅमिन ई 0.60 मिलीग्राम व्हिटॅमिन के 16.4 यूजी

बाळांना डाळींबाचे होणारे आरोग्यविषयक फायदे

बाळांना डाळिंबाचे भरपूर आरोग्यविषयक फायदे आहेत ज्याची आपल्या मुलास मदत होईल. त्यापैकी काही इथे दिलेले आहेत. . रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते आपल्या बाळाला सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता आहे का? व्हिटॅमिन सी समृद्ध, डाळिंब आपल्या मुलास रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात आणि संक्रमणास प्रतिकार करण्यास मदत करते. नियमित सेवन केल्याने सामान्य सर्दी आणि खोकला दूर राहण्यास मदत होते. . जिवाणूंच्या संसर्गाशी लढा देण्यास मदत होते डाळिंबामध्ये बायोकेमिकल एन्झाईम्स असतात जे जिवाणूंच्या संसर्गाचा नाश करून दाह कमी करण्यास मदत करतात. . पचनास मदत करते डाळिंबामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते. आपल्या आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. . आतड्यांमधील जंत दूर करते आतड्यांमधील जंत किंवा परजीवी एकतर लहान किंवा मोठ्या आतड्यात राहतात आणि पोषक आहारावर वाढत राहतात. या किड्यांना ठार मारण्यासाठी डाळिंबाचा रस एक उत्तम औषध आहे. . ताप कमी करते डाळिंबाचा रस केवळ ताप नियंत्रित ठेवत नाही तर शरीराला पोषकद्रव्ये पुरवतो.

बाळाला डाळींब देताना घ्यायची खबरदारी

डाळिंबाचा रस किंवा गर बाळाला देण्यापूर्वी घ्यायची खबरदारी

बाळांसाठी डाळिंबाचा रस बनविण्याच्या मार्गदर्शक सूचना

बाळांसाठी डाळिंबाचा रस बनवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बिया काढून घ्या आणि लगदा मिक्सर किंवा ब्लेंडरमध्ये फिरवून घ्या. रस गाळा आणि एका भांड्यात गोळा करा. साखर घालू नका. सकाळी उशिरा, दुपारी किंवा संध्याकाळी आपल्या बाळाला कमी प्रमाणात फळ द्या. बाळाला नवीन फळ किंवा भाजी देण्यासाठी पुरेसा वेळ घ्या. बाळाला त्या चवीची सवय होतेय ना किंवा त्याची ऍलर्जी तर होत नाही ना हे तपासून पहा. डाळिंब हे सर्व आवश्यक पोषक आणि खनिज पदार्थ असलेले फळ आहे आणि बाळांच्या आहारात समावेश करण्यासाठी ते एक पोषक फळ आहे. तुम्ही कधीतरी ह्या फळाचा समावेश बाळाच्या आहारात करू शकता त्यामुळे बाळाच्या आहारात विविधता येऊन त्याचा अन्नाचा प्राधान्यक्रम होईल. आणखी वाचा: बाळाला खजूर देणे: पोषणमूल्य, फायदे आणि खबरदारी बाळांसाठी जायफळ – फायदे आणि कसे वापरावे?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved