दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

तुमचे ७ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

बाळाचा, त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर विकास होतो. लहान असले तरी प्रत्येक बाळ मागच्या आठवड्यापेक्षा पुढच्या प्रत्येक आठवड्यात नवीन विकास किंवा वाढ दर्शवेल. या लेखात, आम्ही ७ आठवड्यांच्या बाळाच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यांविषयी चर्चा करू. जर आपल्या बाळाने ७-आठवड्यांचा टप्पा ओलांडला असेल आणि तुम्ही त्याच्याशी संबंधित विविध गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करीत असाल तर या लेखामध्ये आपल्या ७ आठवड्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी यासंबंधी आवश्यक माहिती आणि टिप्स दिलेल्या आहेत.

तुमच्या ७ आठवड्यांच्या बाळाचा विकास

जन्मानंतर पहिल्या काही आठवड्यांमध्ये बाळाची झपाट्याने वाढ होते आणि जेव्हा तुमचा लहान बाळ ७ आठवड्यांचा होतो तेव्हाच आपण त्याच्यात उल्लेखनीय बदल झालेले पहाल. तुमच्या बाळाचे दर आठवड्यात अंदाजे २०० ग्रॅम वजन वाढलेले असेल आणि अशा प्रकारे आपल्या ७ आठवड्यांच्या बाळाचे वजन २ ते ३ पौंड वाढलेले असेल. तथापि, जर बाळाचे वजन यापेक्षा कमी झालेले किंवा जास्त वजन वाढलेले असेल तर, काळजी करण्याचे कारण नाही कारण प्रत्येक बाळाची वाढ वेगळी असू शकते. आपल्या बाळासोबत बोलणे, गाणे म्हणणे आणि विनोद करणे इत्यादीसाठी ही वेळ चांगली आहे. जरी बाळाला काही समजत नसेल, तरीही त्याचा मेंदू आजूबाजूच्या गोष्टी समजण्यास सुरवात करेल. आपल्या लक्षात येईल की आपल्या बाळाचे डोळे देखील बदलत आहेत. तो डोळ्यांशी संपर्क साधण्यास सुरवात करेल - कदाचित वस्तूंचा मागोवा घेण्यासही सुरवात करेल.

सात आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

आपल्या ७ आठवड्यांच्या बाळाचे आपल्याला लक्षात येऊ शकतील असे काही सामान्य टप्पे येथे आहेतः
७ आठवड्यांच्या सर्व बाळांमध्ये हे टप्पे सामान्यत: दिसतात. आता विकासाचे टप्पे पार करण्याच्या इतर बाबींवर तपशीलवार नजर टाकूया.

दूध पाजणे

ह्या वयात तुमच्या बाळाने स्तनपान घेण्याचे चांगले कौशल्य प्राप्त केलेले असेल. त्याला आता दूध कसे शोषून घ्यावे याची अधिक जाणीव आहे आणि अधिक कार्यक्षमतेने ते गिळू देखील शकेल. कदाचित त्याने आपल्या गरजा भागविण्यासाठी आहार पध्दतीशी जुळवून घेतले असेल. एक स्तनपान देणारी आई म्हणून, तुमचे स्तन तुम्हाला हलके वाटतील कारण आपल्या बाळाच्या गरजा आणि मागणीनुसार आपल्या दुधाचा पुरवठा आता होऊ लागला आहे. तुमच्या बाळाची वेगाने वाढ होत आहे, त्यामुळे तुमच्या ७ आठवड्यांच्या बाळाचे पोषण वाढते किंवा तुमच्या बाळाला आता अधिक वारंवार फीड्सची आवश्यकता असू शकते. तुमच्या बाळाच्या वाढीव आवश्यकतेनुसार दूध पुरवठा करण्यासाठी दोन दिवस लागू शकतात, परंतु तसे होईल. आवश्यक असल्यास आपण दुग्धपान तज्ञाशी संपर्क साधू शकता. जर स्तनपान करणे शक्य नसेल आणि आपल्या बाळाला बाटली दिली गेली असेल तर, तुमच्या बाळाच्या वाढीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तुम्ही दुधाचे प्रमाण वाढवू शकता.

शौचाची वारंवारिता

जर आपले बाळ जास्त फीड घेत असेल तर याचा अर्थ असा नाही की त्याला वारंवार शौचास होईल. तो ३ ते ७ दिवसांत एकदा शौचास करेल किंवा दिवसातून १० वेळा सुद्धा शौचास करू शकतो आणि दोन्ही सामान्य आहेत. जास्त वेळा दूध प्यायल्यामुळे आपल्या बाळाला आरोग्याचा त्रास होत नाही याची खात्री करण्यासाठी तुम्ही शौचाच्या रंगावर बारीक लक्ष ठेवू शकता. कधीकधी, आहार नियमित नसल्यास बाळांना बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत, बाळाचे स्तनपानाचे रुटीन नियमित होण्यासाठी तुम्ही नियमित अंतराने आपल्या बाळाला दूध पाजू शकता. बाळाला भूक नसल्यास बाळ प्रथम प्रतिकार करू शकेल परंतु शेवटी, त्याने ते स्वीकारले पाहिजे आणि सवयीने अंगवळणी पडले पाहिजे. आपल्याला बाळाला पाजणे अद्याप कठिण जात असल्यास, त्वरित बालरोग तज्ञांचा सल्ला घ्या.

झोप

आपल्याला रात्री आठ तासांची सुंदर झोप मिळू शकेल की नाही याबद्दल आपण विचार करत असाल तर या टप्प्यावर हे स्वप्न थोडेसे दूर दिसते. तथापि, जर आपल्या बाळाला गेल्या २४ -तासांच्या चक्रात चांगला आहार मिळाला असेल तर, आपले ७ आठवड्यांचे बाळ रात्री सहा तासांपर्यंत झोपू शकते. चांगली बातमी अशी आहे की ७ आठवड्यापर्यंत बाळ किती वेळ झोपेल ह्याचा अंदाज तुम्हाला येऊ लागतो किंवा त्याच्या झोपेचे रुटीन तयार होऊ लागते. परंतु, दररोज रात्री आपले बाळ सलग ५ ते ६ तास झोपलेले असते. चांगली झोप येण्यासाठी तुम्ही झोपेच्या वेळेस अर्धा ते एक तास आधी बाळाला दूध देऊ शकता. झोपेच्या वेळेची तयारी करणे ही चांगली कल्पना आहे कारण झोपेची वेळ झालेली आहे हे तुमच्या बाळाला समजेल. जर रात्री आपले बाळाला जागे होत असेल तर, त्याच्या पाठीवर थोपटून आणि त्याला उचलून न घेता झोपवण्याचा प्रयत्न करा. जर तो निराश झाला नाही तर आपण त्याला खायला देऊ शकता.

वागणूक

यावेळेस आपले बाळ अभिव्यक्त होऊ शकते. बाळाने काढलेले वेगवेगळे आवाज ऐकण्यासाठी सज्ज व्हा. तुम्ही तुमच्या बाळाला बोलायला आणि अगदी गायलाही सांगू शकता, जरी त्याला त्यावरून जास्त अर्थ बोध होऊ शकला नसेल तरी तो ऐकण्याने त्याला नक्कीच मजा येईल आणि यामुळे त्याच्या लहान मेंदूत उत्तेजन मिळण्यास मदत होईल.
तुम्ही दररोज थोड्या वेळासाठी पुढील योजना आखण्याची शिफारस केली जाते. तुमच्या बाळाला टणक पृष्ठभागावर त्याच्या पोटावर झोपायला लावा आणि त्याला डोके वर उचलण्याचा प्रयत्न करू द्या. जरी त्याने पूर्वीपेक्षा जास्त काळासाठी डोके उचलले असले तरी, बाळाची मान अजूनही पुरेशी मजबूत नाही, म्हणून सावध रहा. तुमच्या देखरेखीखाली त्याला थोडावेळ पोटावर झोपू द्या.

बाळाचे रडणे

तुमच्या बाळाच्या रडण्यामध्येही महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात. जोरात उंच आवाजात रडणारे बाळ आता मोठमोठ्याने रडू लागेलेले आपल्या लक्षात येईल. वेगवेगळ्या कारणांसाठी रडणे विविध प्रकारचे असू शकते. भूक, थकवा, अस्वस्थता आणि डायपर बदलण्याची याचना करणारे रडणे भिन्न असू शकते. काही रडण्याच्या सत्रांना त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता नसते, तर काहीवेळा लगेच लक्ष देणे जरुरीचे असते. पालक म्हणून, आपल्या बाळाला काय पाहिजे आहे आणि आपल्या बाळाला कसे वाटते आहे हे आपल्याला चांगले माहिती असेल. तुम्हाला आतून काय वाटते त्यानुसार आवश्यक कृती करा आतापर्यंत, तुमचे बाळ ७ आठवड्यांचे झालेले असेल त्यामुळे तुम्ही काय अपेक्षा करू शकता ह्याची कल्पना तुम्हाला असणे आवश्यक आहे. तुमच्यासाठी हे थोडे अधिक सोयीस्कर होण्यासाठी तसेच आपल्या ७ आठवड्याच्या बाळाची वाढ आणि विकास कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी आपण काही टिप्स वापरू शकता.

७ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स

आपल्या ७ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेताना लक्षात घेतल्या पाहिजेत अशा काही टिप्स

७ आठवड्यांच्या बाळाची तपासणी

जेव्हा तुम्ही तुमच्या ७ आठवड्यांच्या बाळास नियमित तपासणीसाठी घेऊन जाता तेव्हा आपले डॉक्टर खालील गोष्टी करू शकतात. आपल्या ७ आठवड्यांच्या बाळासोबत तुम्ही कोणते क्रियाकलाप करू शकता ह्यावर एक नजर टाकू. हे क्रियाकलाप आपल्या बाळाची कौशल्ये वाढवण्यासाठी आणि तुमच्यातील बंध वाढविण्यात मदत करतात.

७ आठवड्यांच्या बाळासाठी खेळ आणि क्रियाकलाप

आपल्या ७ आठवड्यांच्या बाळाचे हात आणि डोळ्यांचे एक चांगले संयोजन आहे आणि त्याच्या भोवतालच्या आवाजाला देखील बाळ चांगला प्रतिसाद देते. त्याचे उत्तम मोटर कौशल्य, ऐकण्याची कौशल्ये, संज्ञानात्मक कौशल्ये आणि इतर विविध कौशल्ये विकसित करण्यात मदत करण्यासाठी आपण बाळाला विविध खेळ आणि क्रियाकलापांमध्ये गुंतवू शकता. या वयात आपण आपल्या बाळाला गुंतवू शकता असे काही खेळ आणि क्रियाकलाप खालीलप्रमाणे आहेतः ह्या अशा काही क्रिया आहेत ज्याद्वारे आपण आपल्या मुलाचे वय ७ आठवड्याचे झाल्यावर त्याला व्यस्त ठेवू शकता. आपले बाळ नाजूक असल्याने काही गोष्टींमुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. बाळाच्या नेहमीच्या तपासण्या चुकवू नका. परंतु, काही वेळा बाळाला बालरोगतज्ज्ञांकडे न्यावे का असाही विचार तुम्हाला पडेल. त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा

बालरोगतज्ञांशी केव्हा संपर्क साधाल?

प्रत्येक बाळ आपल्या गतीने वर सांगितलेले महत्त्वाचे टप्पे गाठू शकतो. तथापि, कधीकधी बाळाचे विकासाचे प्रश्न आणि आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात ज्यासाठी त्वरित वैद्यकीय मदत घेण्याची आवश्यकता असू शकते. येथे अशी काही लक्षणे आहेत जी आपल्या ७ आठवड्यांच्या बाळासाठी त्वरित वैद्यकीय मदत घेण्याची आवश्यकता दर्शवू शकतात: तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. आपल्या ७ आठवड्यांच्या बाळामध्ये झालेल्या लहान बदलांकडे बारीक लक्ष दिल्यास आपण त्याला आरोग्याच्या मोठ्या समस्यांपासून दूर ठेवू शकता. आपल्या बाळाच्या आयुष्यात प्रत्येक टप्पा महत्वाचा असतो. सावधगिरी बाळगा, वर दिलेल्या टिप्स काळजीपूर्वक पाळा आणि तुमच्या छोट्या गोड़ बाळाचा आनंद घ्या! स्रोत अणि सन्दर्भ: स्रोत १ मागील आठवडा: तुमचे ६ आठवड्यांचे बाळ - विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी पुढील आठवडा: तुमचे ८ आठवड्यांचे बाळ - विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved