दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

तुमचे ४४ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

अभिनंदन, तुमचे बाळ आता ४४ आठवड्यांचे झाले आहे! काळ किती वेगाने पुढे सरकतो, नाही का? ४४ व्या आठवड्यात, आपली आवडती खेळणी मागण्यासाठी तुमचे बाळ आता वेगवेगळे शब्द बोलू लागलेले असेल. तो दादाकिंवा मम्माअसेहीम्हणू लागतो. ह्या वयात तुमचे बाळ आता स्वतंत्रपणे उभे राहू लागेल आणि चालू लागेल. आता बाळ आत्मविश्वासाने फर्निचरच्या बाजूने फिरेल, रांगेल आणि बसेल. त्याच्या पहिल्या वाढदिवसाला आता फक्त आठ आठवडे बाकी आहेत!

४४ आठवड्यांच्या बाळाचा विकास

बाळ ४४ आठवड्यांचे होईपर्यंत, बाळाचा शब्दसंग्रह विकसित होईल. तो आता जास्त वेळ बडबड करू लागेल. त्याच्या आवडत्या व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी आवाज करू लागेल. तुमच्या बाळाशी बोलत राहा आणि वाचत राहा जेणेकरुन त्याच्या भाषेचा पाया पक्का होईल. तुमच्या ४४-आठवड्याच्या बाळाशी योग्य संभाषण करणे तुम्हाला मूर्खपणाचे वाटत असले तरी आमच्यावर विश्वास ठेवा. तो तुमचे बोलणे ऐकत असेल आणि माहिती त्याच्या मेंदूत साठवून ठेवेल! जर तुम्ही तुमच्या बाळाला बाटलीने दूध पाजत असाल, तर त्याचे बाटलीतून दूध पिणे बंद करण्याची हीच वेळ आहे. तुम्ही त्याला २४ महिन्यांपर्यंत स्तनपान करू शकता,परंतु बाटलीतून दूध देणे मात्र तुम्ही बाळ १२ महिन्यांचे होईपर्यंतच करू शकता, त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाच्या आहाराचे वेळापत्रक आणि वर्तनाच्या आधारे त्याची बाटली सोडवण्याचे प्रयत्न करू शकता. खरंच, बाटलीचे दूध सोडवण्यासाठी आणि आहारामध्ये घन पदार्थ वाढवण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. बाळाला ३ वेळा जेवण आणि २ वेळा स्नॅक देताना घरगुती अन्न द्या.

आणखी वाचा: तुमच्या १० महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

४४-आठवड्याच्या बाळाचे विकासात्मक टप्पे

४४-आठवड्याच्या बाळाचे विकासाचे टप्पे खाली दिलेले आहेत त्यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता

आणखी वाचा: १० महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

बाळाला आहार देणे

तुमचे ४४-आठवड्याचे बाळ आता बाटली सोडून कपचा वापर करू लागेल आणि फॉर्म्युला दूध सोडून गाईचे दूध पिण्यास सुरुवात करेल. तुमच्या बाळाला सकाळी, मध्यरात्री, दुपारी, मध्यान्हीला, रात्री आणि मध्यरात्री जेव्हा जाग येईल तेव्हा तो फॉर्मुला दूध घेऊ शकतो. तुम्ही बाळाला कपमधून फॉर्मुला देऊ शकता. तुमचे बाळ बाटलीच्या तुलनेत कपतून कमी दूध पिऊ शकते, पण ते ठीक आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये दुधाचे प्रमाण कमी करण्याचे तुमचे ध्येय आहे.

जेवणाच्या वेळी, तुम्ही बाळाला कपमधून पाणी देऊ शकता. जर त्याला मध्यरात्री दूध पिण्याची सवय असेल, तर त्याचे दूध सोडणे कठीण होईल, परंतु तुम्ही त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी आरामदायी वस्तू त्याला देऊन त्याच्या झोपेच्या दिनचर्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू शकता, हळूहळू तुमच्या बाळाला बाटलीशिवाय झोप लागण्याची सवय होईल. १ वर्षापर्यंत, तुमच्या बाळाने दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांच्या दररोज ४-६ सर्व्हिंगसह घन पदार्थ खाणे आवश्यक आहे. तुमचे बाळ १२ महिन्यांचे झाल्यावर फॉर्म्युला ऐवजी फुल क्रीम दूध द्या. कमी चरबीयुक्त दुधामध्ये (आणि उत्पादने) जास्त साखर असते आणि त्यामुळे ते टाळले पाहिजे

आणखी वाचा: १० महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय

बाळाची झोप

झोपेच्या वेळी तुम्ही तुमच्या बाळाला बाटलीने दूध पाजत नसाल, तर त्याला बरे वाटण्यासाठी एखादी वस्तू द्या. जर तुम्ही तुमच्या बाळाला झोपायला मदत करण्यासाठी पॅसिफायर दिले आणि मध्यरात्री ते त्याच्या तोंडातून बाहेर पडले तर ते पुन्हा तोंडात घालणे हे एक आव्हान असेल. परंतु चांगली गोष्ट अशी आहे कि तुमचे बाळ ८ महिन्यांचे झाल्यावर ते स्वतःहून शिकेल. त्याच्या हातात पॅसिफायर परत ठेवून आणि त्याचा हात त्याच्या तोंडाकडे नेऊन पॅसिफायर तोंडात कसे घालायचे हे तुम्ही त्याला दाखवू शकता. असे वारंवार करा, आणि तो ते स्वतः करायला शिकेल. ह्या वयात तुमचे बाळ जास्त वेळा बोलत असेल आणि वेगवेगळे आवाज काढत असेल त्यामुळे फक्त झोपताना पॅसिफायरचा वापर करा कारण इतर वेळी पॅसिफायरमुळे त्याच्या तोंडात अडथळा येईल आणि त्याला नवीन शब्द वापरण्यापासून प्रतिबंधित करेल. तसेच, तुमचे बाळ दोन वर्षांचे झाल्यावर पॅसिफायर वापरणे बंद करा कारण त्यामुळे बाळाच्या दातांना त्रास होऊ शकतो.

४४-आठवड्याच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ह्यासाठी टिप्स

खाली काही उपाय दिलेले आहेत ज्यादारे तुम्ही तुमच्या ४४ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेऊ शकता:

चाचण्या आणि लसीकरण

सहसा, तुमच्या बाळाचे डॉक्टर या टप्प्यावर तुमच्या बाळाची कोणतीही वैद्यकीय तपासणी करत नाहीत. परंतु, काही चाचण्या केल्या जाऊ शकतात.

. चाचण्या

तुमच्या बाळाचे डॉक्टर तुमच्या बाळाची रक्त तपासणी करू शकतात, जर त्याला अॅनिमिया किंवा इतर विकारांची लक्षणे दिसली तर त्याचे हिमोग्लोबिन/शिसे/लोह पातळी तपासण्यासाठी ह्या चाचण्या केल्या जातात.

. लसीकरण

६ ते १८ महिन्यांच्या दरम्यान, तुमच्या बाळाला आयपीव्ही (पोलिओ) लसीचा तिसरा डोस आणि हिपॅटायटीस बी लसीच्या अंतिम डोसची आवश्यकता असेल.

खेळ आणि उपक्रम

तुम्ही ४४ आठवड्यांच्या तुमच्या बाळासोबत खालील खेळ आणि क्रियाकलाप खेळू शकता. हे खेळ आणि उपक्रम त्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देतील.

. लपवा आणि शोधा

हा खेळ तुमच्या बाळाला विभक्त होण्याची चिंता दूर करण्यास मदत करेल कारण तो तुम्हाला पाहू शकत नसतानाही तुम्ही जवळ आहात हे त्याला समजेल. परंतु, आपल्या बाळाला जास्त काळ एकटे सोडू नका.

. चेंडू खेळा

तुमच्या बाळाच्या बाजूला बसा आणि बाळासोबत चेंडू खेळा. तुम्ही त्याला चेंडू परत तुमच्याकडे टाकण्यास शिकवू शकता, अशा प्रकारे तो खेळाचा आनंद घेईल आणि त्याची मोटर कौशल्ये देखील विकसित होतील.

. पॉइंट गेम

तुमच्या बाळाला चित्राच्या पुस्तकातील गोष्टी दाखवून बाळाला नाव सांगण्यास सांगा. तुमच्या बाळाला त्रास होत असल्यास तुम्ही त्यांची नावे शिकवू शकता.

. पॅटी केक गेम

तुमच्या बाळाला पॅटी केक खेळातील हाताच्या हालचाली आणि हावभाव शिकवा. हा खेळ त्याच्या हातांचे समन्वय कौशल्य विकसित करण्यात मदत करेल.

. धावा आणि पाठलाग करा

तुमच्या बाळाच्या मागे धावून त्याला पकडण्याचा प्रयत्न करा किंवा त्याला तुम्हाला पकडण्यास सांगा. असे केल्याने त्याचे मोटर कौशल्य सुधारेल. परंतु, खूप वेगाने धावू नका!

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

आपण खालील परिस्थितींमध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्यावा:

लहान मुलांचे डोके प्रौढांपेक्षा जास्त जाड असते, त्यामुळे तुमचे ४४-आठवड्याचे बाळ पडल्यास आणि डोक्याला लागले तर खूप काळजी करण्याची गरज नाही. बाळाला मिठी मारून किंवा स्तनपान देऊन बाळ शांत होऊ शकते!

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved