दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

तुमचे २० आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

२० व्या आठवड्यात बाळांमध्ये वाढीची आणि विकासाची खूप लक्षणे दिसतात. तुमच्या लहान बाळाच्या वर्तणुकीमध्ये तुम्हाला देखील खूप बदल दिसतील आणि त्यांचे निरीक्षण करणे खूप आनंददायी असते ह्यात काहीच शंका नाही. परंतु बाळाची वाढ आणि विकास ह्याविषयी आधीच जागरूकता असल्यास तुम्हाला विशिष्ट गोष्टी चांगल्या व्यवस्थापित करण्यास मदत होईल. जर तुमच्या बाळाचे वय २० आठवडे असेल आणि तुम्हाला ह्या वयात त्याच्या या वयातील वाढीविषयी माहिती नसेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. इथे आपण बाळाच्या विकासात्मक बदलांबद्दल चर्चा करणार आहोत.

२० आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमच्या छोट्या बाळाने २० आठवड्यांचा टप्पा गाठला असेल तर तुम्हाला बर्‍याच गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. तुमच्या बाळाची वाढ आणि विकास पाहून तुम्हाला त्याबद्दल चांगल्या प्रकारे माहिती नसल्यास आश्चर्य वाटू शकते. या काळात, कित्येक बाळांचे वजन ५.६ ते ६ किलोग्रॅम दरम्यान असते. जर तुम्ही तुमच्या बाळाचे वजन कमी किंवा जास्त असण्याची चिंता करत असाल तर आपण बालरोगतज्ञाला भेट देऊ शकता जो आपल्या बाळासाठी योग्य तो उपाय शोधण्यात आपली मदत करू शकेल. ह्या मुद्द्यावर आपल्या लहान बाळाच्या आयुष्याच्या या टप्प्यात आपल्या बाळाला कसे विकसित करता येईल हे ओळखण्यास मदत करण्यासाठी येथे हा लेख एक मार्गदर्शक आहे चला तर मग २० आठवड्यांच्या बाळाची वाद आणि विकासावर नजर टाकूयात!

२० आठवड्यांच्या बाळाचे वाढीचे आणि विकासाचे टप्पे

२० आठवड्यांच्या बाळाचे वाढीचे टप्पे खालीलप्रमाणे

दूध देणे

या आठवड्यात तुमच्या बाळाच्या खाण्याच्या सवयी मोठ्या प्रमाणात बदलतील. घन पदार्थ त्याच्या आवडीचे बनतील. तुम्ही जेवत असताना कदाचित तो कदाचित तुमच्या प्लेटमधून काही पदार्थ घेईल. तुम्ही एक गोष्ट करू शकता आणि ती म्हणजे तो चावू शकेल अशा चांगल्या पदार्थाची त्याला ओळख करुन द्या. तथापि, ते बाळाच्या घशात अडकून बाळ गुदमरणार तर नाही ना ह्याची काळजी तुम्ही घेणे आवश्यक आहे.

बाळाची झोप

आपले बाळ आता वळणे आणि किंचित फिरणे सुरू करेल. त्याच्या झोपेच्या वेळापत्रकातही काही बदल घडत आहेत हे आपल्या लक्षात येईल. बाळ झोपलेले असताना त्याच्या हालचालींवर लक्ष तुम्ही ठेवू शकता. तुमचे बाळ अस्वस्थ स्थितीत झोपू शकते आणि तुमहाला त्याला योग्य प्रकारे झोपायला मदत करावी लागेल. जेव्हा बाळे अचानक झोपेचे वेळापत्रक बदलतात तेव्हा त्यांना झोपेचा त्रास जाणवू शकतो. जरी ही एक सामान्य समस्या असली, तरीही पालकांना विशिष्ट झोपेची वेळ पाळण्यास त्रास होऊ शकतो.

खेळ आणि क्रियाकलाप

२० व्या आठवड्यापर्यंत, तुमचे बाळ अधिक सक्रिय होईल आणि म्हणूनच, आपल्या बाळाच्या विकासास मदत करणारे खेळ खेळणे आणि भिन्न क्रियाकलाप करणे महत्वाचे आहे. या दिवसांमध्ये, आपला छोटा बाळ खरोखर किती सर्जनशील आणि खेळकर आहे हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल. तुम्ही तुमचा लहान मुलाला देऊ शकता त्यापैकी काही गोष्टी म्हणजे कागद, मोठे ब्लॉक आणि खूप लहान नसलेली खेळणी. तुमच्या लहान बाळाने ह्या वस्तू सहजपणे धरुन ठेवल्या आहेत हे सुनिश्चित करा, परंतु त्या बाळाने गिळून बाळाला गुदमरल्यासारखे होईल इतक्या त्या लहान असू नयेत. बाळ खेळत असताना तुम्ही किंवा घरातील मोठी माणसे बाळाच्या आसपास आहात ह्याची खात्री करा. बाळासोबत खेळण्यासाठी किंवा बाळाला धोकादायक परिस्थितीपासून दूर ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे.

चाचण्या आणि लसीकरण

तुम्ही तुमच्या बाळाच्या लसींबाबत अपडेटेड रहावे अशी शिफारस केली जाते. तसेच, आपण त्याच्या सर्व नियमित तपासण्या आणि चाचण्या घेत असल्याचे सुनिश्चित करा. २० व्या आठवड्यापर्यंत बहुतेक निर्धारित लसी बाळाला दिल्या जातात. परंतु, बालरोगतज्ञांकडे काही प्रलंबित असल्यास तपासणी करणे नेहमीच चांगले. भेटीदरम्यान, आपल्या बाळाचा अपेक्षेप्रमाणे विकास होत आहे की नाही याची आपण पुष्टी देखील करू शकता. म्हणूनच, आपल्या बाळाला त्रास होत आहे असे आपल्याला वाटत असल्यास बालरोगतज्ञांचा सल्ला घेणे चांगले आहे.

बालरोग तज्ञांचा सल्ला कधी घ्यावा

जेव्हा तुमचे बाळ लहान असेल तेव्हा नियमित तपासणी आणि लसीकरणांशिवाय डॉक्टरकडे जाण्याची शक्यता बर्‍याच वेळा असते. जरी बाळ निरोगी असेल तरीही आपण बाळांना होणाऱ्या जखमा टाळू शकत नाही. प्रौढांच्या तुलनेत सर्व मुले लवकर आजारी पडतात कारण त्यांचे शरीर अद्याप विकसित होत आहे. आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे त्यापैकी काही म्हणजे ऍलर्जिक प्रतिक्रिया. आपल्या कुटुंबातील कोणालाही ऍलर्जी नसलेल्या गोष्टीची आपल्या बाळास ऍलर्जी असू शकते. तुम्हाला खालीलपैकी कोणतीही चिन्हे दिसली तर आपण ताबडतोब आपल्या बाळास बालरोगतज्ञाकडे नेणे आवश्यक आहे.

आपल्या २० आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

जेव्हा तुमच्या बाळाच्या आयुष्याचा हा टप्पा सुरु होतो तेव्हा बर्‍याच गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या असतात. आपल्या २० आठवड्यांच्या बाळाची आपण कशी काळजी घेऊ शकता हे येथे आहे. जेव्हा तुमचे बाळ २० आठवड्यांचे होईल तेव्हा बाळामध्ये नवीन विकास झालेला तुमच्या लक्षात येईल. ही अशी वेळ आहे जेव्हा तुमचे बाळ हळू हळू विकसित होते आहे आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेते आहे. २० आठवड्यांपूर्वी तुम्ही ह्या जगात बाळाला आणले होते आणि आता तुम्ही त्याला हसताना, खेळताना, रडताना आणि तुम्हाला रागवताना पहात आहात. हा आठवडा तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी एक मोठा मैलाचा दगड आहे. तुम्ही तुमच्या बाळाचे संरक्षण करीत असल्याचे सुनिश्चित करा, परंतु त्याच वेळी त्याला खेळू द्या आणि मजा करू द्या. त्याच्या कार्यात सामील होण्याचा प्रयत्न करा आणि एकत्र आपला वेळ साजरा करा. मागील आठवडा: तुमचे १९ आठवड्यांचे बाळ - विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी पुढील आठवडा: तुमचे २१ आठवड्याचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजीविषयक
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved