In this Article
श्रीकृष्णाचे जीवन आणि श्रीकृष्णाच्या कथा इतक्या मनमोहक आहेत की, वर्षानुवर्षे लोक त्या वाचून, ऐकून आनंदित होतात. ह्या कथा श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रत्येक पैलूची आठवण करून देतात. दरवर्षी जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी, श्रीकृष्णाच्या शिकवणींचे पालन करण्यासाठी साजरी केली जाते. कंसाचा अंत करण्यासाठी आणि लोकांना गीता कथन करण्यासाठी श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला होता.
श्रीकृष्ण जन्म बुधवार दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी प्रत्येक घरात अगदी उत्साहाने साजरा केला जाईल. काही विधी आणि प्रथा आहेत आणि त्या देशभरात पाळल्या जातात. ह्या दिवशी अनेक कृष्ण भक्त पापापासून मुक्तता मिळण्यासाठी उपवास करतात. भक्तिगीते, श्लोक आणि मंत्र ह्यामुळे मन शुद्ध विचारांनी आणि भावनांनी भरून जाते. काही लोक झाडांवर झोपाळा बांधतात कारण श्रीकृष्णाला त्यांच्या बालपणात, झोपाळा खूप आवडायचा. कृष्ण भक्त दुधापासून बनवलेली मिठाई देखील तयार करतात आणि कृष्णाला अर्पण करतात कारण श्रीकृष्णाला गोड खूप आवडायचे. कृष्णाने गोपींसोबत सादर केलेल्या नाटकाचे पारंपारिकपणे चित्रण करण्यासाठी लोक रास लीला देखील सादर करतात.
जन्माष्टमी कधी आणि का साजरी केली जाते?
भगवान श्रीविष्णूचा आठवा अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीकृष्णाची जयंती जन्माष्टमी म्हणून साजरी केली जाते. हा सण नेहमी अष्टमीला किंवा ‘कृष्ण पक्ष‘ च्या आठव्या दिवशी येतो. हा सण सद्भावनेचा संदेश पसरवतो तसेच हा सण म्हणजे एकता आणि विश्वासाचे प्रतीक आहे. श्रीकृष्णाकडे प्रत्येकजण एक नायक, मित्र, शिक्षक आणि संरक्षक म्हणून पाहतो.
भारतात कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी केली जाते?
भारतामध्ये हा शुभ दिवस उत्साह आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. कृष्णाने महाभारत काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि भगवत गीतेमध्ये चांगले कर्म आणि भक्तीचा सिद्धांत प्रसारित केला. जन्माष्टमीच्या उत्सवाशी संबंधित काही विधी म्हणजे बाळ कृष्णाचा पाळणा हलवणे, भक्तीगीते गाणे नृत्य, पूजा, आरती इत्यादी होत. तसेच रास लीला, दही हंडी फोडून सुद्धा जन्माष्टमी साजरी केली जाते.
पूर्व भारतात
जन्माष्टमी उत्सव हा अत्यंत लाभदायक आणि भक्तिमय अनुभव आहे. ओरिसा आणि पश्चिम बंगाल ह्या राज्यांमध्ये श्रीकृष्णाची पूजा करून तो साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी नंद उत्सव साजरा केला जातो. भगवत गीतेतील श्लोकांचे पठण करण्यासाठी प्रवचनाचे आयोजन केले जाते.
उत्तर भारतात
देशाच्या वेगवेगळ्या भागात लोक वेगवेगळ्या प्रकारे जन्माष्टमी साजरी करतात. लोक या दिवशी उपवास करतात. जन्माष्टमीसाठी घरे आणि मंदिरांमध्ये सजावट केली जाते. संध्याकाळी भजन गायले जाते आणि सर्वत्र धार्मिक उत्साह दिसून येतो. वृंदावन, गोकुळ आणि मथुरा ह्या सारख्या शहरांमध्ये जन्माष्टमीचा उत्सव सर्वोत्तम असतो. पारंपारिक सण आणि विस्तृत व्यवस्था पाहण्यासाठी लोक या ठिकाणी गर्दी करतात. सर्व विधी म्हणजे ह्या उत्सवाचे वैशिष्ट्य आहेत. जम्मूमध्ये लोक या दिवशी पतंग उडवण्यात सहभागी होतात.
दक्षिण भारतात
केरळमध्ये जन्माष्टमीचा सण अष्टमी रोहिणी म्हणून साजरा केला जातो. मध्यरात्री प्रकट होणाऱ्या रोहिणी ताऱ्यावर लक्ष केंद्रित केले जाते, कारण श्रीकृष्णाचा जन्मही मध्यरात्री झाला होता. हा सण आनंद आणि आवेशाने भरलेला असतो. भगवत गीतेतील श्लोकांचे पठण केले जाते. लहान मुले भगवान श्रीकृष्णाची वेशभूषा करतात. श्रीकृष्णाला मिठाई आणि फळे अर्पण केली जातात. प्रसाद सर्वांना वाटला जातो.
पश्चिम भारतात
भारताच्या पश्चिम भागात जन्माष्टमी मोठ्या थाटामाटात आणि वैभवाने साजरी केली जाते. लोक या प्रसंगाला एक भव्य कार्यक्रम मानतात. श्रीकृष्णांनी स्थापन केलेले द्वारका, गुजरातच्या भूमीवर बांधले गेले. महिला या दिवशी पत्ते खेळतात आणि ही एक जुनी परंपरा मानली जाते. या उत्सवात मनोरंजनासाठी भरपूर संधी असल्या, तरीही या प्रसंगाचे पावित्र्य टिकून आहे.
जन्माष्टमी उपवासाच्या पाककृती
लोक जन्माष्टमीचा उपवास करतात आणि मध्यरात्रीनंतर उपवास सोडतात. ते फक्त पाणी, दूध आणि फळे घेतात. तब्बल छप्पन वस्तू देवाला अर्पण केल्या जातात ज्याला छप्पन भोग म्हणतात.
१. साबुदाणा खिचडी
शेंगदाणे आणि बटाटे घालून केलेली साबुदाण्याची खिचडी
साहित्य
- साबुदाणा – १ कप
- बटाटे – २ मध्यम
- रॉक सॉल्ट – आवश्यकतेनुसार
- तूप किंवा तेल – ३ टेबलस्पून
- लिंबाचा रस (पर्यायी) – १/२ टीस्पून
- साखर – १/२ टीस्पून
- किसलेला ओला नारळ – १/४ कप
- हिरवी मिरची – (चिरलेली) १
- कढीपत्ता– ८–१०
- शेंगदाणे (भाजलेले) – १/२ कप
पद्धत
- साबुदाणा नीट धुवून झाल्यावर रात्रभर भिजत ठेवा. पाणी काढून टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो एका भांड्यात ठेवा. उकडलेले बटाटे सोलून चिरून घ्या. शेंगदाणे भाजल्यानंतर कूट करून घ्या. साबुदाण्यात हा दाण्याचा कूट घाला.
- कढईत तेल किंवा तूप गरम करा. कढीपत्ता, जिरे आणि मिरच्या घाला. उकडून चिरलेले बटाटे घाला. साबुदाणा घालून ४ ते ६ मिनिटे परता. त्यानंतर लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर घाला. वरून किसलेला नारळ घाला. खिचडी गरम गरम सर्व्ह करा.
२. भोपळ्याची भाजी
एक स्वादिष्ट आणि तयार करण्यासाठी सोपी पाककृती
साहित्य
- भोपळा – १ लहान
- मेथी दाणे – १/४ टीस्पून
- जिरे – १ टीस्पून
- सुक्या लाल मिरच्या – १ किंवा २
- रॉक सॉल्ट – आवश्यकतेनुसार
- कोथिंबीर – चिरून
- सुक्या आंब्याची पूड – १ टीस्पून
- हळद पावडर – १/२ टीस्पून
- लाल तिखट – १/२ टीस्पून
पद्धत
भोपळा धुवून, सोलून आणि चिरून घ्या. कढई मध्ये तेल गरम करा. मेथी, जिरे, आणि सुक्या लाल मिरच्या घालून काही सेकंद तळून घ्या. चिरलेला भोपळा आणि सर्व कोरडे मसाले घाला. आवश्यकतेनुसार साखर घाला. मीठ आणि पाणी घाला. भोपळा मऊ शिजल्यावर आंब्याची पूड आणि गरम मसाला घाला. कोथिंबीरीने सजवा.
३. जीरा आलू
उपवासासाठी ही एक साधी आणि चवदार डिश आहे.
साहित्य
- बटाटे – मध्यम ३ ते ४
- मीठ – आवश्यकतेनुसार
- लिंबाचा रस – १/४ टीस्पून
- जिरे – १.५ टीस्पून
- तूप किंवा तेल – दीड चमचा
- पुरेसे पाणी
पद्धत
उकडलेले बटाटे सोलून चिरून घ्या. कढईत तेल किंवा तूप गरम करा. हिरवी मिरची आणि जिरे घालून एक मिनिट परता. बटाटे आणि मीठ घाला. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही कोथिंबीर घालू शकता. शेवटी, ज्योत बंद करा. लिंबाचा रस आणि सुक्या आंब्याची पूड घाला. राजगिरा पुरी किंवा पराठ्याबरोबर सर्व्ह करा.
४. अरबी मसाला
अरबी (तारो रूट) ने बनवलेली हलकी उत्तर भारतीय करी आणि ती तुम्ही उपवासाला खाऊ शकता.
साहित्य
- अरबी किंवा तारो रूट –१० –१२
- सजवण्यासाठी पुदिना आणि कोथिंबीर
- लाल तिखट –१/२ चमचा
- हळद पावडर –१/२ चमचा
- ओवा – १/२ चमचा
- गरम मसाला पावडर – १/२ चमचा
- तेल – २ चमचे
पद्धत
अरबी धुवून प्रेशर कुकर मध्ये शिजवा. सोलून घ्या आणि थंड झाल्यावर तुकडे करा. सर्व साहित्य एकत्र करून त्याची गुळगुळीत पेस्ट करा. गरम तेलात ओवा घाला. टोमॅटो पेस्ट घालून परतून घ्या. पाणी, रॉक सॉल्ट आणि उकडलेले अरबी घाला. पुदिना आणि कोथिंबीरने सजवा आणि गरम सर्व्ह करा.
५. उपवासाची कढी
धार्मिक उपवासाच्या दिवसांसाठी ही एक झटपट होणारी आणि सोपी पाककृती आहे
साहित्य
- दही–ताजे पूर्ण चरबीयुक्त दही–१ कप
- राजगिरा (राजगिरा) पीठ – ३ टेबलस्पून
- शेंगदाण्याचे तेल – २ चमचे
- आले हिरवी मिरची पेस्ट – १ चमचा
- साखर – आवश्यकतेनुसार
- पाणी – १/२ चमचा
- रॉक मीठ – आवश्यकतेनुसार
पद्धत
- १ कप दही चांगले फेटून घ्या. त्यामध्ये ३ चमचे राजगिरा पीठ घाला. मिक्स करून पाणी घाला. गुठळ्या होऊ नये म्हणून ते नीट ढवळून घ्या.
- कढईत तूप किंवा शेंगदाण्याचे तेल गरम करा. त्यात जिरे आणि आले मिरची पेस्ट घाला. दही मिश्रण घाला. कढई मंद आचेवर ठेऊन मिश्रण घट्ट होऊ द्या. चिरलेली कोथिंबीर घालून सजवा आणि पुलाव, साधा भात, पुरी किंवा पराठ्या बरोबर सर्व्ह करा.
सर्वात शक्तिशाली मानवी अवतारांपैकी एक, भगवान श्रीकृष्णाने आपल्याला बर्याच गोष्टी शिकवल्या. श्रीकृष्णाचा जन्म पृथ्वीवरील वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी आणि ऐक्य आणि बंधुत्वाचा संदेश पसरवण्यासाठी झाला. केवळ भारतातच नव्हे तर जगातील इतर अनेक देशांमध्ये जन्माष्टमी साजरी केली जाते. ह्या उत्साहवर्धक सणाच्या निमित्ताने लोक एकत्र येतात.
आणखी वाचा: मुलांसोबत कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी ५ कल्पना