Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसूतीनंतर घ्यायची काळजी प्रसूतीनंतरचे लैंगिक संबंध – किती वेळ वाट पहावी?

प्रसूतीनंतरचे लैंगिक संबंध – किती वेळ वाट पहावी?

प्रसूतीनंतरचे लैंगिक संबंध – किती वेळ वाट पहावी?

गर्भारपण हा आयुष्यातील असा एक टप्पा असतो जेव्हा शरीरात खूप बदल होत असतात. बाळाच्या जन्मानंतर शरीर पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ लागतो. गर्भधारणेनंतर शरीर पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी आईने स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्या क्रिया करण्यासाठी शरीरावर ताण येतो किंवा खूप ऊर्जा लागते अशा क्रिया डॉक्टरांशी संपर्क साधून चर्चा केल्यानंतरच कराव्यात. आणि अशीच एक क्रिया म्हणजे गर्भधारणा आणि प्रसूतीनंतरचे शारीरिक संबंध होय.

प्रसूतीनंतर शारीरिक संबंध ठेवणे केव्हा सुरक्षित असते?

प्रसूतीनंतर शारीरिक संबंध ठेवणे केव्हा सुरक्षित असते?

हे समजून घेतले पाहिजे की प्रसूतीनंतर शरीर नाजूक झालेले असते आणि त्यामुळे शरीराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. प्रसूतीनंतर किमान दोन आठवडे शारीरिक संबंध ठेवणे सुरक्षित नसते कारण ह्या कालावधीत लघवीचा संसर्ग किंवा रक्तस्त्राव होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे प्रसूतीनंतर संभोग करण्याआधी किमान चार आठवडे वाट पाहणे आवश्यक आहे. जर तुम्हाला सिझेरिअन प्रसूतीनंतर किंवा अन्य शस्त्रक्रियेमुळे टाके पडले असतील तर हा कालावधी सहा महिन्यांपर्यंत वाढू शकतो.

तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून शारीरिक संबंध ठेवणे केव्हा सुरक्षित आहे हे जाणून घ्या.

बाळ झाल्यानंतर तुम्हाला शारीरिक संबंध केव्हा ठेवावेसे वाटतात?

गर्भधारणा आणि प्रसूतीच्या ताणातून पूर्ववत होण्यासाठी तुमच्या शरीराला चार ते सहा आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे ह्या कालावधीत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा न होणे हे खूप नॉर्मल आहे. तसेच प्रसूतीनंतर बाळाला स्तनपान देणे आणि बाळाच्या तब्येतीची काळजी घेणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे शारीरिक संबंधाचा प्राधान्यक्रम मागे पडतो.

तसेच प्रसूतीनंतर इस्ट्रोजेन पातळीमध्ये घट झाल्यामुळे योनीमार्गाचे नैसर्गिक वंगण कमी होते आणि जोपर्यंत तुम्ही बाळाला स्तनपान करीत आहात तोपर्यंत योनीमार्गाचा कोरडेपणा तसाच राहतो.

शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा अशी लगेच जागृत होणार नाही. बरीच जोडपी प्रसूतीनंतर २ महिन्यांनी शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात करतात.

बाळाच्या जन्मानंतर तुम्हाला शारीरिक संबंध का ठेवावेसे वाटत नाहीत?

त्यामागे बरीच कारणे असू शकतात. ह्याची सुरुवात करताना तुम्हाला खूप ताण आलेला असू शकतो तसेच शारीरिक संबंधाचा विचार करण्यासाठी ऊर्जा सुद्धा कमी पडलेली असू शकते.

पहिले काही आठवडे बाळाला सांभाळण्याची जबाबदारी असल्याने संभोग करण्यासाठी वेळ सुद्धा नसतो. प्रसूतीनंतर आकर्षक दिसत नसल्याची भावना आणि बदलेल्या शरीरामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्यामुळे तुम्हाला शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होत नाही.

प्रसूतीनंतरच्या औदासीन्यामुळे तुम्हाला शारीरिक संबंधांपासून दूर राहावेसे वाटेल.

जर तुमच्या पतीला शारीरिक संबंध ठेवावेसे वाटले तर काय कराल?

बाळाच्या जन्मानंतर तुमच्या पतीला शारीरिक संबंध ठेवावेसे वाटणे हे नॉर्मल आहे, तुमच्याविषयी वाटणारे प्रेम दाखवण्याचा त्यांचा तो मार्ग असू शकतो. तथापि, तुम्ही तुमच्या परिस्थितीचा ताबा घेऊन तुमच्या पतीशी प्रसूतीनंतरच्या परिणामांविषयी बोलणे खूप महत्वाचे आहे. तुमचे शरीरी शारीरिक संबंध ठेवण्यास अजून कसे तयार नाही हे तुम्ही त्यांना सांगितले पाहिजे.

दोघांमध्ये खुला संवाद तसेच एकमेकाना समजावून सांगणे हे अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे तुमच्या नात्यातील प्रेम अबाधित राहील.

तुमची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा वाढावी म्हणून काय कराल?

सर्वप्रथम, शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात करण्याआधी तुमच्या शरीराला वेळ द्या. जी जोडपी प्रसूतीनंतर शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात करतात त्यांनी एकमेकांच्या सहमतीने असे केले पाहिजे.

जेव्हा तुम्ही दोघे कमीतकमी थकलेले असाल आणि एकमेकांना गुंतवून ठेवण्याची उर्जा तुमच्यामध्ये असेल असा दिवस शोधा. शारीरिक संबंधांची पहिली काही सत्रे सौम्य असावीत आणि तुम्ही संभोगाच्या अशा शारीरिक स्थिती निवडल्या पाहिजेत जिथे लिंगप्रवेशाचे नियंत्रण आणि वेग स्त्रीकडे असेल.

पोषक आहार, भरपूर द्रव पदार्थ जोडीला पुरेसा आराम आणि हलके व्यायाम केल्यास लवकर पूर्ववत होण्यास मदत होईल.

प्रसूतीनंतर शारीरिक संबंधांबाबतच्या टिप्स

प्रसूतीनंतर खाली काही टिप्स दिल्या आहेत त्यामुळे तुमची संभोगाची इच्छा वाढू शकेल.

  • शारीरिक संबंधांना पुन्हा कधी सुरुवात करायची ह्या बाबत तुमच्या पतीशी बोला
  • सौम्यपणे सुरुवात करा. तुम्हाला जितके आरामदायी ते करता येईल तितके करा त्यामुळे सेक्स करताना दुखेल का ही भीती दूर होईल.
  • भरपूर पोषक आहार घ्या आणि द्रवपदार्थ घ्या तसेच हलके व्यायामप्रकार करा त्यामुळे तुमच्या शरीराचा आकार पूर्ववत होण्यास मदत होईल.
  • तुमच्या पालकांना बाळाला थोडा वेळ सांभाळायला सांगा त्यामुळे तुम्हाला पतीसोबत थोडा वेळ घालवता येईल.
  • बाळाच्या झोपण्याच्या वेळी तुमच्या शारीरिक संबंधांची वेळ ठेवा. त्यामुळे तुम्हाला अडथळा येणार नाही.
  • प्रणयक्रीडेमुळे तुम्ही जागृत होण्यास मदत होईल. योनिमार्गाच्या कोरडेपणाचा अडथळा येऊ नये म्हणून वंगण वापरा.
  • शारीरिक संबंध ठेवण्याआधी तुमच्या योनिमार्गावर बोटे फिरवून पहा. त्यामुळे कुठे दुखते आहे ह्याचा आधीच अंदाज घेता येईल.
  • सुरुवातील पूर्ण लिंगप्रवेश करू नका. अशा स्थिती निवडा की ज्यामध्ये कमी लिंगप्रवेश होईल.
  • प्रसूतीनंतर पहिल्यांदाच शारीरिक संबंध ठेवत असाल तर ती क्रिया कशी होणार आहे ह्या बाबत तुमच्या पतीशी आधी बोला. तुम्हाला कसे स्पर्श आवडतील हे त्यांच्याशी बोला.
  • तुमच्या डॉक्टरांशी किंवा ज्या मैत्रिणी अशा परिस्थितीतून गेल्या आहेत त्यांच्याशी बोलून पहा. ते तुम्हाला चांगला सल्ला देऊ शकतील.

संततिनियमाबाबत काय?

प्रसूतीनंतर असुरक्षित संभोग केल्यास गर्भधारणा होण्याची खूप जास्त शक्यता आहे. संभोग करताना प्रत्येक वेळेला कॉन्डोमचा वापर करण्यास विसरू नका.

संततिनियमनाच्या गोळ्या सुद्धा उपलब्ध असतात ज्यामुळे तुम्हाला गर्भधारणेचा धोका राहत नाही आणि तुमची संप्रेरकांची पातळी तसेच स्तनपानाचे चक्र सुद्धा अबाधित राहते. परंतु संततिनियमनाचा हा मार्ग अवलंबण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तसेच त्याचे काय परिणाम होतात हे सुद्धा माहिती करून घेणे आवशयक आहे.

तुम्ही मध्यम ते दीर्घकाळासाठीच्या संततिनियमनाच्या साधनांचा सुद्धा विचार करू शकता जसे की अंतर्गर्भीय साधने.

संतती नियमनाची वेगवेगळी साधने उपलब्ध आहेत. तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून तुम्हाला योग्य आणि कमी धोका असलेले साधन निवडा.

असे प्रश्न ज्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे

. तुमच्या पतीला शारीरिक संबंध ठेवावेसे वाटतील परंतु तुम्हाला नाही

पुरेसा काळ गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला शारीरिक संबंध ठेवावेसे वाटत नाहीत परंतु तुमचे पती त्याबाबत उत्सुक असतील आणि वाट पहात असतील.

हा उपाय करून पहा:

तुमच्या पतीशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबतच्या आव्हानांविषयी बोला. त्यांना सांगा कि लवकरच तुम्ही त्यासाठी तयार व्हाल. तुम्ही मिठी मारणे, चुंबन घेणे किंवा बाळाशी एकत्र खेळणे असे करून रोमान्स जिवंत ठेऊ शकता.

. तुमच्यासाठी सहा आठवडे वाट पाहणे अवघड होत असेल आणि तुम्हाला लगेच शारीरिक संबंध ठेवावेसे वाटत असतील तर

काही वेळा, प्रसूतीनंतर शारीरिक संबंध ठेवण्याची भूक तुम्हाला तुम्हाला चार ते सहा आठवडे वाट बघू देणार नाही विशेषकरून तुम्ही गर्भधारणेदरम्यान शारीरिक संबंध ठेवले नसतील तर ह्याची शक्यता खूप जास्त आहे.

हा उपाय करून पहा:

तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून प्रसूतीनंतर शारीरिक संबंध ठेवणे केव्हा सुरक्षित आहे हे तपासून पहा. प्रसूती नंतरचा रक्तस्त्राव थांबला असेल तर काही हरकत नाही.

. स्तन संवेदनशील झाल्यामुळे दुखत आहेत आणि त्यातून द्रव गळत आहे

स्तनपान सुरु असताना स्तनांना सूज येते आणि ते जड होतात आणि त्यामुळे ऑरगॅसम मिळण्यासाठी त्यांची मदत होत नाही. किंबहुना बाळाला दिवसभर स्तनपान करावे असे तुम्हाला वाटेल.

हा उपाय करून पहा:

शारीरिक संबंध ठेवण्याआधी बाळाला स्तनपान केल्यास त्यातून द्रव गाळण्याचा प्रश्न सुटेल. जर तुम्हाला आरामदायक वाटत असेल तर तुम्ही शारीरिक संबंधांच्या वेळेला नर्सिग ब्रा किंवा टॅंक टॉप घालू शकता.

. शारीरिक संबंध ठेवणे वेदनादायी असेल का?

बाळाच्या जन्मामुळे आलेली सूज आणि संप्रेरकांमधील बदलांमुळे योनीमार्गाचा कोरडेपणा आणि स्तनपान ह्यामुळे प्रसूतीनंतरचा संभोग वेदनादायी होऊ शकतो.

हा उपाय करून पहा:

शरीराची झालेली झीज भरून निघण्यासाठी वेळ द्या, विशेषकरून सिझेरिअन प्रसूती झाली असेल तर. योनीमार्गाचा कोरडेपणा जाण्यासाठी वंगण हाताशी असणे चांगले.

. तुमच्या बदललेल्या शरीराची तुम्हाला लाज वाटू शकते

प्रसूतीच्या आधीची शरीरयष्टी पूर्ववत होण्यास वेळ लागणार आहे आणि स्ट्रेच मार्क्स मुळे तुम्हाला लाज वाटेल आणि शारीरिक संबंध ठेवण्यास तुम्हाला संकोच वाटेल.

हा उपाय करून पहा:

तुमच्या शरीरातील असंख्य बदलांचा परिणाम म्हणजे तुमचे गोड बाळ. गर्भारपणाची प्रक्रिया ही नैसर्गिक आहे आणि काही काळात तुमचे शरीर पूर्ववत होणार आहे. तुमच्या पतीला तुमच्याविषयी गर्व वाटणार आहे. तुमच्या शरीराची लाज किंवा संकोच वाटण्याचे काहीच कारण नाही.

शरीराकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे तसेच प्रसूतीनंतर तुम्हाला आणि बाळास योग्य पोषण मिळाले पाहिजे. बऱ्याच जोडप्यांच्या आयुष्यात शारीरिक संबंध ठेवण्यास वेगवेगळ्या कारणांमुळे प्राधान्य दिले जात नाही. तथापि. एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि हळूहळू गोष्टी सुरळीत होताच जवळ आले पाहिजे.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article