In this Article
- व्हिडिओ: सिझेरियन डिलिव्हरी नंतर कसे झोपावे (उत्तम झोपण्याची स्थिती)
- सी-सेक्शननंतर चांगली झोप का महत्त्वाची आहे?
- तुमच्या सिझेरियन डिलिव्हरीनंतर तुम्हाला किती झोपेची गरज असते?
- सी-सेक्शन नंतर झोपणे कठीण का आहे?
- सिझेरियन नंतर झोपण्याच्या स्थितीचा झोपेच्या गुणवत्तेवर कसा परिणाम होतो?
- सी-सेक्शन डिलिव्हरीनंतर झोपण्याच्या सर्वोत्तम स्थिती कोणत्या आहेत?
- तुम्ही बरे होत असताना झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी टिप्स
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न
गर्भारपण आणि बाळाचा जन्म हा एक सुंदर अनुभव आहे. जरी हे सगळे सुंदर असले, तरी सुद्धा ह्या प्रक्रियेदरम्यान आईच्या शरीरात बरेच बदल झालेले असतात. जेव्हा आई पहिल्यांदा आपल्या बाळाला हातात घेते तेव्हा त्या सर्व त्रासाचे चीज झाले असे तिला वाटते. आई आणि बाळासाठी प्रसूतीची प्रक्रिया कमी जोखमीची बनवण्यासाठी वैद्यकीय विज्ञान विकसित झाले. प्रसूतीमधील एक उत्क्रांती प्रक्रिया म्हणजे सी-सेक्शन प्रसूती.
सी-सेक्शनच्या प्रसूतीनंतरचे दिवस आणि रात्री कोणतीही आई कधीही विसरू शकत नाही. पालकत्व हा एक अद्भुत अनुभव असला तरी, बाळंतपणानंतरचे सुरुवातीचे काही आठवडे कठीण असतात. सी-सेक्शन प्रसूतीनंतरचा पुनर्प्राप्ती कालावधी वेदनादायक असतो आणि त्यासाठी तुमच्यामध्ये संयम आणि धैर्य असणे आवश्यक असते. पण लक्षात ठेवा, हा एक तात्पुरता टप्पा आहे आणि शेवटी तुम्ही त्यातून प्रवास कराल. ह्या लेखामध्ये, आपण सी-सेक्शन नंतरच्या झोपण्याच्या स्थितीबद्दल चर्चा करू.
व्हिडिओ: सिझेरियन डिलिव्हरी नंतर कसे झोपावे (उत्तम झोपण्याची स्थिती)
सी-सेक्शननंतर चांगली झोप का महत्त्वाची आहे?
सी-सेक्शन ही एक अत्यंत अवघड प्रक्रिया आहे. आणि आई ह्यातून जाते. शरीर बरे होण्यास वेळ लागतो. परंतु बाळाची देखील काळजी घेणे देखील आवश्यक असते. पुरेशी झोप घेणे महत्वाचे असते जेणेकरून तुम्ही तुमच्या नवजात मुलाची आणि स्वतःची काळजी घेऊ शकता. ह्यामुळे तुम्हाला अधिक जागरूक राहण्यासाठी आणि हातातील कामांवर अधिक चांगल्या पद्धतीने लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत होईल. तुम्ही झोपेत असताना, तुमचे शरीर बरे करण्यासाठी ऊर्जा वापरली जाईल. त्यामुळे सी-सेक्शननंतर झोप खूप महत्वाची आहे.
तुमच्या सिझेरियन डिलिव्हरीनंतर तुम्हाला किती झोपेची गरज असते?
तुम्हाला किती प्रमाणात झोप आवश्यक आहे याबद्दल काही शंका असू शकतात. तुमच्या बाळाला तुमच्या वेळेची गरज असल्याने तुम्ही जास्त झोप घेऊ शकत नाही आणि तुमच्या शरीराला बरे होण्यासाठी तुम्ही नक्कीच खूप कमी सुद्धा झोपू शकत नाही. तुम्हाला किती झोपेची गरज आहे याविषयी येथे स्पष्टता दिलेली आहे.
1. झोपेचे तास
आदर्श परिस्थितीत तुम्ही दररोज रात्री 7-9 तासांची झोप घेतली पाहिजे. परंतु, आपल्याकडे आता एक नवजात बाळ देखील आहे. आणि त्याची काळजी घेणे तुम्हाला आवश्यक आहे. परंतु, दररोज किमान ६ तास झोप मिळत असल्याची खात्री तुम्ही केली पाहिजे. झोप कमी झाल्यामुळे नैराश्य आणि खराब संज्ञानात्मक कार्यासारख्या इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
2. डुलकी
नवीन पालक बनणे कठीण असू शकते. जर तुमचे बाळ तुम्हाला रात्री जागे ठेवत असेल आणि तुम्ही 7-9 तासांची झोप घेऊ शकत नसाल तर तुम्ही दिवसभरात प्रत्येकी १५-२० मिनिटे छोटीशी डुलकी घेऊ शकता. ह्यामुळे उपचार प्रक्रियेस मदत होईल आणि तुमचे मन ताजे राहील.
सी-सेक्शन नंतर झोपणे कठीण का आहे?
कधीकधी, गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर, हॉर्मोनच्या वाढलेल्या पातळीमुळे तसेच पोटाचा आकार वाढल्यामुळे स्त्रीची श्वसनप्रक्रिया सुरळीतपणे कार्य करू शकत नाही. ही स्थिती ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया (ओएसए) म्हणून ओळखली जाते आणि बऱ्याच स्त्रियांमध्ये दिसून येते. अयोग्य श्वासोच्छवासामुळे नीट झोप लागत नाही. सी-सेक्शन प्रसूतीनंतर स्त्रियांना निद्रानाश, थकवा आणि नैराश्याचा त्रास होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे वेदना. परंतु, योग्य काळजी घेऊन सावधानता बाळगल्यास तुम्ही लवकर बऱ्या व्हाल.
सिझेरियन नंतर झोपण्याच्या स्थितीचा झोपेच्या गुणवत्तेवर कसा परिणाम होतो?
वेदनाशामक औषधांमुळे तुम्हाला झोप येण्यास मदत होते, परंतु झोपेची स्थिती उत्तम असल्यास श्वासोच्छ्वास चांगला होऊन चांगली झोप लागण्यास मदत होईल. झोपेची सर्वात आरामदायक स्थिती निवडल्याने तुमच्या ओटीपोटाच्या स्नायूंवरील ताण कमी होईल. तसेच, तुमच्या जखमेवरील दबाव कमी होईल.
सी-सेक्शन डिलिव्हरीनंतर झोपण्याच्या सर्वोत्तम स्थिती कोणत्या आहेत?
प्रत्येकासाठी उपयुक्त अशी झोपण्याची कोणतीही स्थिती नाही. एका आईसाठी झोपेची जी स्थिती चांगली असते ती दुसर्या आईसाठी चांगली असेलच असे नाही. जोपर्यंत तुम्हाला तुमच्यासाठी योग्य अशी झोपेची स्थिती सापडत नाही तोपर्यंत तुम्हाला ट्रायल अँड एरर करावे लागेल. सी-सेक्शन प्रसूतीनंतर झोपण्याची सर्वोत्तम स्थिती तुम्ही निवडू शकता. आपण सी-सेक्शन नंतर झोपण्यासाठी सर्वोत्तम स्थिती, सी-सेक्शन नंतर टाळाव्यात अशा झोपण्याच्या स्थिती आणि सी-सेक्शन नंतर रिकव्हरी स्लीपिंग पोझिशन यावर देखील लेखाच्या पुढील भागात चर्चा करू.
1. पाठीवर झोपणे
बऱ्याच स्त्रिया शस्त्रक्रियेनंतर सर्वात आरामदायक स्थिती म्हणून पाठीवर झोपतात. या स्थितीत, तुमच्या सी सेक्शनच्या जखमेवर कोणताही दाब पडत नाही. तुम्ही तुमच्या गुडघ्याखाली उशी देखील ठेवू शकता. फक्त तोटा असा आहे की तुम्ही उठून बसताना किंवा अंथरुणातून उठताना तुमच्या पोटावर ताण येऊ शकतो. काही आठवड्यांनंतर, खूप दुखत नसल्यास तुम्ही कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. उच्च रक्तदाब असलेल्या स्त्रियांना पाठीवर न झोपण्याचा सल्ला दिला जातो.
2. एका कुशीवर
प्रसूतीनंतर लगेच तुमच्या कुशीवर झोपणे तुम्हाला आरामदायक वाटेल. डाव्या बाजूला झोपल्याने योग्य रक्तप्रवाह आणि पचन होण्यास (ज्याची तुम्हाला खूप गरज आहे) मदत होते. पोट आणि नितंबांना आधार देण्यासाठी तुम्ही उशीचा वापरू शकता. सी-सेक्शन प्रसूतीनंतर कुशीवर झोपण्याचा एक फायदा असा आहे की तुम्ही स्वत:ला तुमच्या कोपरावर दाब देऊन अंथरुणातून उठून बसू शकता टीप – स्वतःला वर ढकलताना श्वास सोडा.
3. कंबरेपासून डोक्यापर्यंतचा भाग उंचावर ठेवणे
सिझेरियन प्रसूती झालेल्या मैत्रिणी तुम्हाला नक्कीच उशीचा उपयोग तुम्हाला सांगतील. फक्त डोके नाही तर तुमचा कंबरेकडील भाग वर उचलण्यासाठी तुम्ही उशांचा वापर करा. ह्या स्थितीमुळे ओएसएने ग्रस्त असलेल्या अनेकांना श्वासोच्छ्वास घेता येतो आणि सहज झोप लागू शकते.
4. रेकलायनार
बऱ्याच स्त्रियांसाठी, कोणत्याही स्थितीत आराम मिळवणे खरोखर कठीण होते. परंतु बऱ्याच स्त्रिया आरामासाठी रेकलायनार किंवा आराम खुर्चीत झोपतात. अर्थात, त्यामुळे पलंगावर झोपल्यासारखे वाटत नाही, परंतु त्यामुळे उठणे सोपे होते. तुम्ही सहजतेने स्तनपानही करू शकता.
तुम्ही बरे होत असताना झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी टिप्स
नव्याने आई झालेल्या स्त्रियांसाठी, अगदी कमी कालावधीसाठी चांगली झोप घेणे महत्वाचे आहे. चांगल्या दर्जाची झोप तुम्हाला जलद पुनर्प्राप्त करण्यात मदत करत असल्याने, लक्षात ठेवण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत:
- तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा आणि चांगली झोप येण्यासाठी तुमची औषधे बंद करू नका.
- व्यायाम करणे, पायऱ्या चढणे किंवा बाळापेक्षा जास्त वजन उचलणे टाळा. आरोग्यात गुंतागुंत निर्माण होऊन झोप चांगली न लागण्याची स्थिती उद्भवू शकते. आपण आपल्या शरीराला बरे होण्यासाठी वेळ दिल्यास, वेदना शेवटी कमी होतील आणि आपल्याला चांगली झोपण्यास मदत होईल.
- योग्य प्रमाणात हालचाल आणि व्यायाम केल्याने रक्ताभिसरण चांगले होते आणि उपचार प्रक्रिया जलद होऊ शकतात. एकदा तुम्हाला बरे वाटले की, तुम्ही तुमच्या घरामध्ये आणि आजूबाजूला फिरण्यास सुरुवात करू शकता. त्यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप घेण्यास मदत होईल.
- योग्य आहार घेणे खूप महत्वाचे आहे. बेरी आणि ब्रोकोली यांसारख्या व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असलेल्या दाहक-विरोधी पदार्थांचा आहारात समावेश करावा. तुम्ही नट्स आणि बिया देखील खाऊ शकता.
- .नव्याने आई झालेल्या स्त्रियांना बद्धकोष्ठता होणे असामान्य नाही. आम्ही तुम्हाला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतो आणि तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थ समाविष्ट करा. भरपूर पाणी प्या आणि आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करा. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना स्टूल सॉफ्टनर वापरण्याविषयी सुद्धा विचारू शकता. पोट खराब असेल तर अस्वस्थता येते आणि झोप नीट लागत नाही.
- पहिल्या काही आठवड्यात अंथरुणावरून वारंवार उठणे टाळा. जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही बाळाला तुमच्याकडे आणून देण्यास सांगू शकता.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
सी-सेक्शन केल्यानंतर झोप कशी घ्यावी याबद्दल आपल्याला बरेच प्रश्न पडतात. येथे आम्ही त्यापैकी काही उत्तरे दिली आहेत.
1. मी झोपत असताना माझ्या पोटावर झोपल्यास ते ठीक आहे का?
चुकून पोटावर झोपल्यास ठीक आहे परंतु ठरवून मुद्दाम पोटावर झोपू नका. कारण ऑपरेशनच्या जागी वेदना होत असतील आणि जखम बरी होत असेल. कालांतराने वेदना हळूहळू कमी होत असताना, तुम्हाला आरामदायक वाटत असेल तर तुम्ही तुमच्या पोटावर झोपू शकता.
2. सी-सेक्शन नंतर बेडमधून उठणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. काही टिप्स?
तुमच्या झोपेच्या स्थितीतून उठताना, कुशीवर वळा आणि कोपरांच्या मदतीने स्वतःला वर ढकला. तुम्ही कुटुंबातील सदस्यालाही यामध्ये मदत करण्यास सांगू शकता. सर्वात आधी, आरामदायक स्थितीमध्ये बसा आणि नंतर तुमचे पाय बेडच्या खाली घ्या. आपले पाय जमिनीवर ठेवा आणि उभे राहण्यापूर्वी एक मिनिट विश्रांती घ्या. ही पद्धत सकाळी अंथरुणातून बाहेर पडणे सोपे करेल.
3. मी सी-सेक्शन नंतर उशी वापरू शकते का?
होय, तुम्ही सी-सेक्शन नंतर उशी वापरू शकता कारण उशी तुमच्या शरीराला आधार देण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करू शकते. श्वास घेणे सोपे जाण्यासाठी तुम्ही कंबरेपासून डोक्यापर्यंतचा भाग उशांचा वापर करून उंच करू शकता. आपण स्तनपान करताना आपल्या हातांना आधार देण्यासाठी उशा देखील वापरू शकता.
सी-सेक्शन नंतर चांगल्या झोपेसाठी हे काही सर्वात आरामदायी उपाय आहेत. तुमचे भावनिक आरोग्य हे तुमचे पहिले प्राधान्य आहे. निरोगी आणि सकारात्मक मन असल्यास शरीर बरे होण्यासाठी त्याची मदत होते. आत्ताच्या स्थितीमध्ये तुम्ही आनंदी असण्याची तुमच्या बाळाला सर्वात जास्त गरज आहे.
आणखी वाचा:
सिझेरियन प्रसूती नंतरची पाठदुखी: कारणे आणि उपचार
सी-सेक्शन प्रसूतीनंतर पोटाचा घेर कमी करण्यासाठी व्यायाम आणि टिप्स