अन्न आणि पोषण

बाळांसाठी संत्री: फायदे आणि रेसिपी

जसजसे तुमचे बाळ मोठे होऊ लागते, तसतसे त्याच्या खाण्यापिण्याच्या गरजा बदलतात., जेव्हा बाळाला वेगवेगळ्या चवीचे पदार्थ देण्यास सुरुवात होते तेव्हा तुमच्या लहान बाळासोबत तुमचा सुद्धा एक नवीन प्रवास सुरु होतो. तुमच्या बाळाला घन पदार्थांचा परिचय करून देताना फळे हा एक उत्तम पर्याय आहे कारण फळे नैसर्गिक आणि पौष्टिक असतात. परंतु, फळांमध्ये ऍसिड आणि तेले असू शकतात. आणि ती बाळाला पचायला जड जाऊ शकतात. तसेच ह्या फळांच्या काही वेळा प्रतिकूल प्रतिक्रिया सुद्धा येऊ शकतात.

अशाच एका फळाबद्दल आपण या लेखात बोलणार आहोत - आणि ते म्हणजे संत्री. तुम्ही तुमच्या लहान बाळाला संत्र्याचा परिचय केव्हा आणि कसा करून देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

लहान मुले संत्री कधी खाऊ शकतात?

मूल एक वर्षाचे झाल्यानंतरच संत्री कोणत्याही स्वरूपात दिली जाऊ शकतात. ६ महिन्यांच्या बाळाला संत्र्याचा रस देऊ नये कारण त्याचे संवेदनशील पोट फळातील आम्लयुक्त पदार्थ सहन करू शकत नाही. संत्र्यामध्ये प्रामुख्याने लिंबूवर्गीय ऍसिड असते, त्यामुळे लहान मुलांच्या अंगावर पुरळ उठू शकते. म्हणून, जेव्हा तुमचे बाळ एक वर्षाचे होईल तेव्हा त्याला संत्री देणे चांगले.

लहान मुलांसाठी संत्र्यांचे आश्चर्यकारक आरोग्य फायदे

लहान मुलांना संत्री खायला देण्याचे काही फायदे येथे आहेत.

. चांगले पौष्टिक मूल्य

संत्र्यामध्ये विविध खनिजे आणि जीवनसत्त्वे तसेच भरपूर पोषणमूल्ये असतात. बाळे आणि मुलांच्या विकासाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये हे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे असते. काही बाळांना त्यांच्या शारीरिक विकासात समस्या असतात. त्यांना संत्र्याचा रस दिल्याने पोषणासाठी ते चांगले असते.

. पचनास मदत

जवळजवळ सर्व छोट्या बाळांना आणि मुलांना अपचनाचा सामना करावा लागतो. ह्याचे कारण म्हणजे त्यांची पचन संस्था अजूनही विकसित होत असते. संत्र्यातील घटक पचन प्रक्रियेला चालना देत असल्याने संत्री दिल्याने पचनास मदत होते.

. बद्धकोष्ठता कमी होते

विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात तुमच्या बाळाच्या आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता असते. पचन चांगले होण्यासाठी तंतुमय पदार्थ आवश्यक असतात. आपल्या लहान बाळाला फळे खायला दिल्यास बाळाला त्याची मदत होऊ शकते. बाळाला बद्धकोष्ठतेसाठी संत्र्याचा रस देणे चांगले असते कारण संत्र्यामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण भरपूर असते.

. मजबूत हाडे

संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आणि क्षार असल्याने, कॅल्शियम आणि फॉस्फेट सारखे घटक संत्र्यामधून मिळतात. संत्र्यांच्या नियमित सेवनाने, मुडदूस सारखे विकार टाळण्यास मदत होते. मुडदूस ह्या विकारामुळे हाडे कमकुवत होतात आणि सांधे मऊ होतात.

. खोकला आणि सर्दी होण्याची शक्यता कमी

जेव्हा तुमचे बाळ आजारी पडते तेव्हा बहुतेकवेळा सर्दी आणि खोकला हेच त्यामागील कारण असते. पारा कमी झाल्यावर सर्दी आणि खोकल्याशी लढण्यासाठी संत्र्यांमधून पुरेशी पोषक तत्वे मिळतात.

. गालगुंडावर उपाय

लहान मुलांमध्ये आढळणारा गालगुंड किंवा पॅरोटायटीस हा एक विषाणूजन्य रोग आहे आणि तो अत्यंत संसर्गजन्य आहे. गालगुंडांवर उपचार करण्याचा एक लोकप्रिय मार्ग म्हणजे गालगुंड झालेल्या मुलांना इतर अनेक फळांच्या रसासोबत संत्र्याचा रस देणे हा होय.

. सर्वोत्तम द्रव आहार

जर तुमचे मूल जेवताना अन्न नीट चावून खात नसेल तर पचनास कठीण जाते. अशा परिस्थितीत, तुमचे मूल काही दिवस कच्च्या फळांचा रस म्हणजेच प्रामुख्याने संत्र्याचा रस घेऊ शकते. आतड्याची हालचाल पूर्ववत झाल्यावर, मूल फळांचा आहार चालू ठेवू शकते आणि नंतर हळूहळू नेहमीचा आहार घेऊ शकते.

. टायफॉइड मधून बरे होण्यासाठी मदत होते

विषमज्वरामुळे एखाद्या व्यक्तीची पचनशक्ती खराब होते तसेच पोटदुखी, खोकला, डोकेदुखी, ताप इत्यादी समस्या सुद्धा उद्भवतात. पोटाची फक्त रस आणि द्रवपदार्थ पचवण्याची क्षमता असल्याने, संत्र्याचा रस या दोन्हीसाठी मदत करू शकतो. टायफॉइडने ग्रस्त असलेल्या आपल्या मुलाला देण्यासाठी संत्री हा एक उत्तम पर्याय आहे.

संत्र्यामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे संत्र्याचे आरोग्यविषयक फायदे आहेत. त्यांच्यावर एक नजर टाकूया.

संत्र्याचे पौष्टिक मूल्य

मध्यम आकाराच्या संत्र्यामध्ये हे समाविष्ट आहे:

त्यात तांबे, जस्त आणि मॅंगनीज देखील कमी प्रमाणात असतात

आता तुम्ही तुमच्या लहान मुलाला संत्र्याची ओळख कशी देऊ शकता किंवा खायला देऊ शकता यावर एक नजर टाकूया.

बाळांना संत्री कशी द्यावीत?

तुमच्या मुलाला संत्रे देण्यापूर्वी त्याचे साल काढून तुकडे करून द्या. छोटे छोटे तुकडे करा जेणेकरून ते बाळाच्या घशात अडकून बाळ गुदमरणार नाही.

प्रथम त्याला गोड संत्री देण्याचा प्रयत्न करा, कारण त्याला नेहमीच्या संत्र्याची तीव्र आंबट चव आवडणार नाही. संत्रे मऊ पडलेले नाही ना आणि त्यावर कुठलेही डाग नाहीत ना ह्याची खात्री करून घ्या.

बाजारात मिळणारे संत्र्याचे ज्यूस किंवा पल्प बाळाला देऊ नका. चव टिकवण्यासाठी त्यात अनेक संरक्षक घटक आणि साखर असते. बाजारातून स्वच्छ आणि ताजी संत्री खरेदी करा आणि स्वतःचे स्वतः घरीच ज्यूस बनवा.

तुम्ही संत्र्यासोबत मिक्स करू शकता असे अन्नपदार्थ:

तुम्ही संत्र्यासोबत मिक्स करू शकता असे अन्नपदार्थ खालीलप्रमाणे

तुमच्या बाळाला संत्री देताना घ्यावयाची काळजी

आपल्या लहान मुलाला संत्री देण्यापूर्वी तुम्ही खालील गोष्टी करू शकता

. साल, तंतुमय पदार्थ आणि बिया नसल्याची खात्री करा

ह्या फळांना एक विचित्र चव असते जर तुमच्या बाळाला ह्या फळाची चव आवडली नाही तर बाळ सगळे फळ टाकून देईल. बाळाला संत्रे देताना बिया, साल आणि तंतुमय पदार्थ काढून टाका.

. बाळाला हे फळ चघळण्यास त्रास होतो आहे का? लगदा करून द्या!

साले, तंतू आणि बिया काढून टाकल्यानंतरही तुमच्या बाळाला संत्र्याचे छोटे तुकडे खाण्यास त्रास होत असेल, तर तुम्ही बाळाला ही फळे मॅश करून देऊ शकता. फळांची प्युरी करून बाळाला द्या. असे केल्यास बाळाला ते खायला आणि त्याची चव घ्यायला सोपे पडेल.

. बाळाला आंबट संत्री देऊ नका

थोडे प्रयत्न करून बाळासाठी गोड संत्री आणण्याचा प्रयत्न करा. फळांसोबत येणारा आंबटपणा हाताळण्यासाठी तुमच्या बाळाच्या चव काळ्या तयार नसतील. संत्र्याची चव गोड असेल तर बाळाला ते फळ आणखी आवडेल.

. नेहमी ताजी फळे द्या

तुमच्या बाळाने नेहमी ताजी, पिकलेली फळे खावीत. कडक संत्रे चांगले समजले जाते. जर संत्रे दाबले गेले असेल किंवा मऊ पडले असेल तर ते खाणे टाळा.

लहान मुलांसाठी संत्र्याच्या सोप्या रेसिपी

लहान मुलांसाठी संत्र्याचा रस कसा बनवायचा याचा विचार करत असाल, तर साधा ज्यूस करण्याव्यतिरिक्त काही रोमांचक पाककृती येथे दिलेल्या आहेत

. फ्रोजन ऑरेंज क्रॅनबेरी

लागणारे साहित्य:

कृती:

  1. जाड सुसंगतता येईपर्यंत हे सर्व एकत्र करा
  2. ते तुमच्या बाळाला द्या

. रसाळ संत्रे आणि गाजर

लागणारे साहित्य:

कृती:

  1. एका भांड्यात वाफवलेले गाजर घेऊन ते चांगले मॅश करा
  2. संत्र्याचा रस घालून चांगले मिक्स करावे. सुसंगतता समायोजित करण्यासाठी तुम्ही थोडे पाणी घालू शकता

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

. मी बाळांना संत्र्याचा रस देऊ शकते का?

एकदा तुमचे बाळ घन पदार्थांचे सेवन करत असेल आणि एक वर्षाचे झाले की तुम्ही त्याला संत्र्याचा रस देऊ शकता. तुमच्या लहान मुलाला आम्लयुक्त फळांची ऍलर्जी नाही ना याची खात्री करा

. मँडरीन संत्रे लहान मुलांसाठी सुरक्षित आहे का?

मँडरीन संत्रे कमीतकमी एक वर्षाच्या मुलांसाठी वापरण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत. बाळाला त्याची ऍलर्जिक प्रतिक्रिया येते का ह्यावर लक्ष ठेवणे चांगले

. मी बाळांना ऑरेंज स्क्वॅश देऊ शकते का?

संत्रा स्क्वॅशमध्ये गोडीसाठी खूप साखर घातलेली असते. त्यामध्ये पोषण खूप कमी असते आणि ते तुमच्या बाळाच्या दातांना हानी पोहोचवू शकते. म्हणून, बाळाला ते देणे टाळणे चांगले

. लिंबूवर्गीय फळांसाठी सर्वोत्तम पर्याय कोणते आहेत?

व्हिटॅमिन सीची चांगली पातळी राखण्यासाठी, खरबूज, पपई, बटाटे आणि पालक हे पर्याय शोधले जाऊ शकतात, यापैकी कशाचीही चव आंबट नाही. त्यामुळे कोणतीही ऍलर्जीक प्रतिक्रिया निर्माण होण्याची शक्यता कमी असते.

. मी घरी बनवलेल्या बाळासाठीच्या अन्नपदार्थांच्या संरक्षणासाठी लिंबूवर्गीय ऍसिड वापरू शकते का?

लहान मुलांसाठी लिंबूवर्गीय फळे आठ महिन्यांनंतर खाण्यास योग्य असतात. म्हणून, लिंबाच्या रसाचे दोन थेंब संरक्षक म्हणून चांगले असतात, कारण ते शेवटी घातले जातात.

संत्र्यासारखी फळे भरपूर पोषण देतात आणि विविध प्रकारचे अन्न पदार्थ तयार करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकतात. ह्या फळांचे सेवन करण्यासाठी तुमच्या बाळाचे वय त्यासाठी योग्य आहे ना ह्याची खात्री करा आणि संत्र्याचे जास्तीत जास्त फायदे मिळवा.

आणखी वाचा:

बाळांसाठी ब्लूबेरी – फायदे, धोके आणि पाककृती बाळांसाठी चिकू: आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved