Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसूतीनंतर घ्यायची काळजी बाळंतपणानंतर डिंकाचे लाडू खाणे – फायदे आणि पाककृती

बाळंतपणानंतर डिंकाचे लाडू खाणे – फायदे आणि पाककृती

बाळंतपणानंतर डिंकाचे लाडू खाणे – फायदे आणि पाककृती

भारतामध्ये बाळंतपणात डिंकाचे लाडू खाणे खूप सामान्य आहे. नव्यानेच आई झालेल्या स्त्रियांना प्रसूतीनंतर डिंकाचे लाडू खाण्यास सांगितले जाते. बाळाला जन्म दिल्यांनतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी ह्या लाडवांमधून आईला आवश्यक ती पोषण तत्वे मिळतात. आईच्या शरीरासाठी बाळाचा जन्मानंतरचा टप्पा जन्मपूर्व अवस्थेइतकाच आव्हानात्मक असतो. तिच्या शरीराची आवश्यक ती काळजी घेणे जरुरीचे असते आणि प्रसूतीनंतरच्या आहारात डिंकाच्या लाडूचा समावेश केल्यास बाळाची आई लवकर पूर्ववत होऊ शकते.

डिंकाच्या लाडूचे पोषणविषयक फायदे

नव्यानेच आई झालेल्या स्त्रीला डिंकाचे लाडू खायला सांगितले जातात कारण ते पौष्टिक असतात. हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणे चांगले असते. नवीन आई झालेल्या स्त्रिया, वृद्ध आणि लहान मुलांसाठी डिंकाचे लाडू खाण्याची शिफारस केली जाते. लहान मुलांच्या डब्यासाठी डिंकाचे लाडू म्हणजे झटपट आणि पौष्टिक पर्याय आहे. डिंकाचे लाडू चवीसाठी चांगले आहेतच परंतु लहान मुलांना दिवसभर लागणारी ऊर्जा सुद्धा ह्या लाडूतून मिळत असते.

डिंकाच्या लाडूमध्ये लोह, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, प्रथिने, साखर, फायबर, सॅच्युरेटेड फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, सोडियम, चरबी इत्यादींसारखे विविध पोषक घटक चांगल्या प्रमाणात असतात. हे सर्व घटक आईला आवश्यक ऊर्जा प्रदान करतात आणि बाळाला जन्म दिल्यानंतर बरे होण्यासाठी ह्या घटकांची मदत होते. स्तनपानाद्वारे देखील बाळाला पोषणद्रव्ये मिळतात. त्यामुळे डिंकाच्या लाडू सारख्या पौष्टिक स्नॅक्सचा काही भाग जन्मानंतरच्या आहारात समाविष्ट करावा.

आज बाजारात सर्व काही मिळते, हो अगदी डिंकाचे लाडू देखील! अगदी जवळच्या मिठाईच्या दुकानात देखील डिंकाचे लाडू असतील. पण, दुकानातील हे लाडू कोणत्या परिस्थितीत बनवले जातात याबद्दल तुम्ही जास्त काही सांगू शकत नाही, म्हणूनच घरी तयार केलेले डिंकाचे लाडू खाणे चांगले. तुम्ही डिंकाचे लाडू ह्यापूर्वी कधीही केलेले नसतील तर अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा!

डिंकाच्या लाडूची रेसिपी

बाळाच्या जन्मानंतर स्त्रीने निश्चितपणे डिंकाचे लाडू खावेत कारण ते शरीराला आवश्यक पोषण आणि ऊर्जा प्रदान करतात. हे लाडू करायला काही अवघड नाहीत. डिंकाच्या लाडूची रेसिपी खाली दिली आहे.

डिंकाच्या लाडूची रेसिपी

साहित्य:

  • डिंक – 125 ग्रॅम
  • भाजलेले गव्हाचे पीठ – 1000 ग्रॅम
  • वेलची – 25 ग्रॅम
  • बडीशेप – 25 ग्रॅम
  • अळीव – 50 ग्रॅम
  • खसखस – 25 ग्रॅम
  • बदाम – 125 ग्रॅम
  • काजू – 125 ग्रॅम
  • तूप – 500 ग्रॅम
  • किसलेला गूळ – 500 ग्रॅम
  • किसलेले कोरडे खोबरे – 500 ग्रॅम

पद्धत:

  • किसलेले खोबरे व्यवस्थित भाजून घेऊन सुरुवात करा. खोबरे तांबूस होईपर्यंत भाजून घ्या. त्याचप्रमाणे बदाम, काजू, वेलची, खसखस, खजूर, बडीशेप, अळीव बिया भाजून घ्या.
  • हे सर्व घटक व्यवस्थित भाजून झाल्यावर ग्राइंडरमध्ये एकत्र करून बारीक करा. जर तुम्हाला थोडे जाडसर आवडत असेल तर तसे राहू द्या.
  • एका मोठ्या भांड्यात थोडे तूप गरम करावे.
  • तूप पुरेसे गरम झाले की त्यात थोडा डिंक घाला. डिंक फुलू लागल्यावर थोडा थोडा घालत रहा.जर तुम्ही एकदम सगळा डिंक घातलात तर तो नीट न शिजण्याची शक्यता असते. डिंकाच्या प्रमाणात तूप घाला. गरम तुपात थोडा डिंक घातला की काही सेकंद शिजू द्या. हे सर्व मिश्रण योग्य रीतीने नीट शिजण्यासाठी आणि जळू नये म्हणून सतत ढवळत राहा. डिंक नीट शिजल्यावर दुसऱ्या भांड्यात काढून घ्या. राहिलेल्या डिंकावर अशीच प्रक्रिया करा.
  • डिंक तळून झाल्यावर त्याच भांड्यात अजून थोडं तूप गरम करून गुळ घ्या. गूळ पूर्णपणे वितळू द्या आणि नंतर ढवळून घ्या.
  • बुडबुडे यायला लागले की गॅस बंद करा. डिंकामध्ये हा पातळ झालेला गूळ घाला आणि चमच्याने चांगले मिसळा. ग्राइंडरमधील बारीक केलेले घटक आता त्यात घाला.
  • वितळलेला गूळ थंड होण्यास जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे एकसंध पीठ मिळेपर्यंत तुम्ही ते तुमच्या स्वत:च्या हातांनी चांगले मिक्स करू शकता.
  • त्यानंतर, तुपाचे दोन थेंब तळहातावर घ्या आणि तळवे एकमेकांना चोळा. मिश्रणाचे छोटे छोटे भाग घेऊन लाडू वळून घ्या. हे लाडू तुम्ही खोलीच्या तापमानाला हवाबंद बॉक्समध्ये ठेवू शकता.

तुमच्यासाठी पुरेसे लाडू तयार झाल्यानंतर, त्यांचा तुमच्या दैनंदिन आहारात समावेश करा. दिवसातून सुमारे १ ते २ लाडू खाल्ल्याने तुम्हाला बाळंतपणानंतर आवश्यक ऊर्जा मिळते. प्रसूतीनंतर डिंकाचे लाडू खाण्याचे काही प्रमुख आरोग्यविषयक फायदे जाणून घेण्यासाठी खाली वाचा.

गरोदरपणानंतर डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे

प्रसूतीदरम्यान तुमचे शरीर तीव्र आघातातून जाते. बाळंतपणानंतर, स्त्रीकडे असलेले ऊर्जा स्रोत आणि तिला बरे होण्यासाठी आणि बाळाची काळजी घेण्यासाठी लागणारी ऊर्जा ह्यामध्ये खूप फरक आहे. अशा वेळी डिंकाचे लाडू खाल्ल्याने तिला लवकर बरे होण्यास मदत होऊ शकते.

  • जर हिवाळ्यात बाळाचा जन्म झाला असेल तर शरीराला स्वतःला उबदार ठेवण्यासाठी आणि बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा खर्च करावी लागते. डिंकाचे लाडू खाल्ल्याने आईला आवश्यक असलेल्या अतिरिक्त कॅलरीज मिळू शकतात.
  • हृदयाच्या ठोक्यांचे नियमन करणे देखील आवश्यक आहे कारण शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये योग्य रक्त परिसंचरण होणे आवश्यक आहे. डिंकाच्या लाडूची अश्या वेळी मदत होऊ शकते.
  • बाळाच्या जन्मानंतर स्त्रीसाठी प्रथिनांची गरज वाढते कारण स्तनपानावर लक्ष केंद्रित केले जाते. डिंकाच्या लाडूमध्ये प्रथिने आणि निरोगी चरबीचे प्रमाण चांगले असते. डिंकाच्या लाडूचे अगदी सहजपणे सेवन केले जाऊ शकते.
  • प्रदीर्घ गर्भधारणा आणि तणावपूर्ण प्रसूतीनंतर, आईचे शरीर तिची शारीरिक शक्ती पहिल्यासारखी होण्यासाठी आणि बरे होण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. डिंकाच्या लाडूमध्ये वापरल्या जाणार्‍या घटकांमध्ये अनुकूलक गुणधर्म असतात आणि ते शरीराला दुरुस्त करण्यासाठी मदत करीत असतात.

गरोदरपणानंतर डिंकाचे लाडू खाण्याचे फायदे

  • बाळाच्या जन्मानंतर आईची प्रतिकारशक्ती सर्वात कमी असते, त्यामुळे तिला आजारी पडण्याची आणि खोकला, सर्दी, अतिसार किंवा अल्सरचा त्रास होण्याची शक्यता असते. डिंकाचे लाडू खाल्ल्याने प्रतिकारशक्ती पूर्ववत होण्यास मदत होते आणि अशा परिस्थितींवर प्रभावीपणे उपचार करण्यास मदत करतात.
  • बाळाच्या जन्मानंतर जेव्हा मासिक पाळी पुन्हा सुरू होते, तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात तीव्र पेटके येऊन रक्त प्रवाह खूप जास्त होत असतो. बाळाची काळजी घेणे खूप त्रासदायक ठरू शकते. डिंकाचे लाडू रक्तप्रवाह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
  • प्रसूतीनंतर जर तुमच्या त्वचेची चमक आणि कोमलता कमी झाली असेल, तर लाडूमधील घटक त्वचेला ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात आणि तुम्हाला हवी असलेली चमक परत आणू शकतात.
  • नुकत्याच आई झालेल्या स्त्रीला मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे किंवा बाळाच्या जन्मानंतर मूत्रमार्गाशी संबंधित इतर समस्यांचा त्रास होऊ शकतो. लघवीच्या असंयमावर उपचार करण्यासाठी आयुर्वेदात डिंकाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. डिंकाचे लाडू खाल्ल्यानेही हाच परिणाम होऊ शकतो.
  • बद्धकोष्ठतेची समस्या क्वचितच गरोदरपणापर्यंत मर्यादित राहते. अनेक स्त्रियांना बाळंतपणानंतरही याचा अनुभव येत राहतो. सुरुवातीच्या टप्प्यात नव्यानेच आई झालेल्या स्त्रियांना त्रास होऊ शकतो. डिंकामध्ये काही रेचक गुणधर्म आहेत आणि त्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. अशा परिस्थितीत डिंकाचे लाडू खाण्याची शिफारस केली जाते.

भारतीय परंपरेनुसार अनेक कुटुंबांमध्ये बाळंतपणानंतर डिंकाचे लाडू खायला देतात. नव्याने आई झालेल्या स्त्रियांना डिंकाच्या लाडूचा नक्कीच फायदा होतो. लाडूंचे सेवन मध्यम प्रमाणात ठेवावे. कोणतेही दुष्परि
णाम टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे
.

आणखी वाचा:

प्रसूतीनंतर खावेत असे भारतीय अन्नपदार्थ
प्रसूतीनंतरचा आहार – प्रसूतीनंतर कुठले अन्नपदार्थ खाल्ले पाहिजेत आणि कुठले टाळावेत?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article