अन्न आणि पोषण

बाळांसाठी सर्वोत्तम फळे आणि भाज्यांच्या १५ रसांची यादी

आईचे दूध हे प्रत्येक बाळासाठी आवश्यक असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आईच्या दुधामुळे लहान बाळाच्या शरीराचे पोषण होते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. पण एकदा बाळाने ६ महिन्यांचा टप्पा गाठला की, त्याच्या आहारात विविधता आणणे जरुरीचे असते.

बाळाच्या आहारात फळे आणि भाज्यांच्या रसाचा समावेश करणे योग्य आहे का?

होय, तुमच्या बाळाला भाजीपाला आणि फळांच्या रसातून पोषण मिळते म्हणून बाळाच्या आहारात त्यांचा समावेश करणे योग्य ठरते. तथापि, घन पदार्थांऐवजी फक्त ज्यूस देऊन चालणार नाही हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे कारण बाळाच्या वाढत्या शरीराला मोठ्या प्रमाणात प्रथिने, चरबी आणि कॅल्शियमची आवश्यकता असते.

कोणत्या वयात बाळाला फळे आणि भाजीपाला रस देणे सुरू करावे?

"लहान मुले कधी रस घेऊ शकतात?" पालकांना अनेकदा त्रास देणारा हा प्रश्न पडतो. सुरुवातीच्या सहा महिन्यात बाळाला रस देणे टाळणे चांगले कारण आईच्या दुधासाठी बाळाच्या छोट्याशा पोटात जागा असणे आवश्यक आहे. आईच्या दुधातून बाळाला पोषण मिळते तसेच अँटीबॉडीजचा सुद्धा पुरवठा होतो. बाळ सहा महिन्यांचे झाल्यानंतर बाळ घन पदार्थांसोबत ज्यूस घेऊ शकते.

बाळांना रस देताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

हवाबंद केलेल्या डब्यांमध्ये असलेल्या ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण खूप असते तसेच पोषणमूल्ये सुद्धा कमी असतात त्यामुळे ते टाळावेत.

लहान बाळांसाठी कोणती फळे आणि भाज्या सर्वोत्तम आहेत?

मुलांसाठी पौष्टिक रसांची यादी खाली दिलेली आहे

. उकडलेल्या सफरचंदाचा रस . कोवळा नारळ . द्राक्षाचा रस (कच्चा) . टरबूजाचा रस (कच्चा) . कलिंगडाचा रस (कच्चा) . उकडलेल्या गाजराचा रस . संत्र्याचा रस (कच्चा) . उकडलेल्या टोमॅटोचा रस . चिकूचा रस (कच्चा) १०. उकडलेल्या पेअरचा रस ११. उकडलेल्या पीचचा रस १२ पपईचा रस (उन्हाळ्यात टाळले पाहिजे) १३. केळ्याचा रस (कच्चा) १४. लीचीचा रस (कच्चा) १५. आंब्याचा रस (कच्चा)

नेहमी उकडलेल्या भाज्यांपासून सुरुवात करा. जेव्हा मुलाला नवीन अन्न आवडते, तेव्हा तुम्ही गाजर, सफरचंद आणि केळी इत्यादी मिश्रणाचा परिचय देऊ शकता. लहान मुलांसाठी संत्र्याचा आणि द्राक्षाचा रस चांगला असतो. हा रस व्हिटॅमिन सी समृद्ध असतो त्यामुळे लहान मुलांचा सर्दी पासून बचाव होतो.

लहान बाळांना तुम्ही घरगुती ज्यूस देऊ शकता का?

ह्यावर सुद्धा वाद आहेत असे तज्ञांचे काय म्हणणे आहे. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स सारख्या संस्था पाश्चरायझेशनच्या कमतरतेमुळे घरगुती ज्यूसची शिफारस करत नाहीत. तथापि, नॅशनल गाइडलाइन ऑन इन्फंट अँड यंग चाइल्ड फीडिंग (इंडिया) उकडलेले घरगुती अन्न आणि रस यांची शिफारस करते. पॅक केलेले पदार्थ खाण्याच्या सरावाच्या अभावामुळे हे असू शकते.

वाफवलेल्या (किंवा) उकडलेल्या फळांचा रस तुम्ही फळांच्या प्युरीसाठी वापरू शकता का?

भाज्या किंवा फळे उकडल्यामुळे काही पोषक तत्वे नष्ट होत असली तरी त्याचा वापर करण्यास मनाई करणारा कोणताही कठोर आणि जलद नियम नाही. खरं तर,तुम्ही हा रस उकळून आटवू शकता.

वाफवलेल्या/उकळत्या फळांच्या रसाच्या वापरामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.

1. रसायनमुक्त

तुमच्या मुलाने संरक्षक असलेल्या रसांचे सेवन करण्याची गरज नाही.

2. साठवणूक

हा रस दीर्घकाळ साठवला जाऊ शकतो.

3. पोषण

टोमॅटोच्या रसासारखे काही रस उकळल्यानंतर आणखी पौष्टिक बनतात.

4. बजेट

घरी केलेला रस बाजारात मिळणाऱ्या रसापेक्षा अधिक स्वस्त असतो.

5. पॅक केलेल्या ज्यूस पेक्षा सरस

फळे आणि भाज्या सर्वात जास्त पोषक असतात. बाजारात मिळणाऱ्या पॅक केलेल्या रसांच्या तुलनेत घरी केलेला भाज्यांचा आणि फळांचा रस जास्त पोषक असतो.

फळांच्या रसामुळे लहान बाळांमध्ये दातांची समस्या निर्माण होऊ शकते का?

होय. फळांचा रस जास्त प्रमाणात घेतल्याने लहान बाळांमध्ये दातांच्या समस्या उद्भवू शकतात. फळांमध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे असे होते. कदाचित पाण्यात घालून रस पिणे ही एक चांगली कल्पना आहे.

फळांच्या रसामुळे तुमच्या बाळाला इतर कोणतेही नुकसान होऊ शकते का?

फळे आणि भाज्यांच्या रसामुळे पोषण होते. एकदा तुमच्या बाळाने ६ महिन्यांचा टप्पा गाठला की, बाळाला वेगळ्या चवीची ओळख करून द्या. फळे आणि भाज्यांचे रस पौष्टिक असतात आणि बाळाला लहान वयातच आरोग्यदायी आहाराची आवड निर्माण करण्यास मदत करतात.

आणखी वाचा:

बाळांसाठी संत्री: फायदे आणि रेसिपी बाळांसाठी भोपळा – फायदे आणि पाककृती

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved