अन्न आणि पोषण

बाळांसाठी हळद: फायदे आणि दुष्परिणाम

जेव्हा बाळाची वाढ होत असते, तेव्हा त्याला कुठले अन्नपदार्थ दिले पाहिजेत ह्या महत्वाच्या बाबीचा पालकांनी विचार केला पाहिजे. तुम्ही तुमच्या बाळाला खायला घालू शकता, अश्या विविध खाद्यपदार्थांची माहिती असणे केव्हाही चांगले असते. हे खाद्यपदार्थ तुम्ही बाळाला केव्हा खायला घालू शकता हे देखील जाणून घेणे आवश्यक असते.

भारतीय मसाल्यांमध्ये हळद, जंतुनाशक, दाहक-विरोधी आणि औषधी गुणधर्मांमुळे जास्त प्रसिद्ध आहे. एक पालक म्हणून, तुम्ही जितक्या लवकर बाळाच्या आहारात हळद घातलेल्या पदार्थांचा समावेश कराल, तितक्या लवकर त्याला हळदीचे फायदे मिळतील. तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात हळदीचा केव्हा आणि कसा समावेश करू शकता हे जाणून घेतले पाहिजे. तसेच बाळासाठी हळदीचे काही दुष्परिणाम तर नाहीत ना हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. सर्वात आधी, हळद म्हणजे काय तसेच भारतीय पाककृती आणि भारतीय संस्कृतीत हळदीचे महत्त्व ह्याबद्दल थोडेसे जाणून घेऊयात.

हळदीचे मूळ हळदीच्या रोपापासून येते, हे हळदीचे मूळ मशीनमध्ये सुकवले जाते किंवा त्याचे निर्जलीकरण करून चूर्ण केले जाते. शतकानुशतके भारतात विविध कारणांसाठी मसाला आणि औषध म्हणूनही हळदीचा वापर केला जात आहे. मसाल्याचा हा पदार्थ बहुतेक हिंदू धार्मिक कार्यातही महत्त्वाचा घटक असतो . हळदीमध्ये सुमारे तीनशे नैसर्गिक घटक असतात. ह्या घटकांमध्ये बीटा-कॅरोटीन, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फ्लेव्होनॉइड्स, फायबर, लोह, नियासिन, पोटॅशियम, जस्त आणि इतर अनेक उच्च पौष्टिक घटकांचा समावेश होतो.

हळद लहान मुलांसाठी सुरक्षित आहे का?

लहान मुले नऊ महिन्यांची झाल्यावर त्यांना हळद दिली जाऊ शकते. बाळाला हळदीची ओळख करून देताना त्याचे प्रमाण अगदी कमी ठेवले पाहिजे. (अन्नात फक्त एक लहान चिमूटभर घातली पाहिजे) जास्त हळदीमुळे पोटाचा त्रास होऊ शकतो.

तुमच्या बाळाच्या आहारात हळदीचा समावेश कधी कराल?

तुम्ही तुमच्या बाळाला हळद कधी आणि कशी देऊ शकता हे जाणून घेणे महत्वाचे आहे. कृपया लक्षात ठेवा की नवजात बालकांना हळद कोणत्याही स्वरूपात खाऊ घालणे सुरक्षित नाही. हळद असलेले घनपदार्थ तुम्ही बाळाला देऊ शकता. तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात तो ६ महिन्यांचा झाल्यावर हळदीचा समावेश करू शकता, परंतु बाळ ९ महिन्यांचे झाल्यानंतरच त्याच्या आहारात हळदीचा समावेश करणे चांगले समजले जाते.

तुमचे बाळ लहान असल्यापासूनच त्याच्या आहारात नैसर्गिक घटकांचा समावेश करणे चांगले आहे, कारण बाळासाठी ते खूप उपयोगी आहे. म्हणूनच, तुमच्या बाळाच्या आहारात योग्य वेळी हळदीचा समावेश करणे चांगले असते.

बाळ हळदीचे सेवन करण्यास तयार आहे की नाही याची खात्री करण्यासाठी तुम्ही बालरोगतज्ञांकडून बाळाची तपासणी देखील करून घेऊ शकता. जेव्हा तुम्ही बाळाच्या आहारात हळदीचा समावेश करता तेव्हा बाळाला कुठलीही ऍलर्जिक प्रतिक्रिया येत नाही ना ह्याची खात्री करण्यासाठी त्याच्यावर बारीक लक्ष ठेवा.

हळदीच्या जंतुनाशक आणि दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे हळदीचे सेवन केले जाते. पण, हा जादुई मसाला कुठे आणि कधी मदत करतो? चला पाहूया हळदीचे फायदे.

हळदीचे फायदे

हळद हा नैसर्गिक घटकांपैकी एक आहे. हळदीचा वापर बाहेरून करता येतो तसेच आहारात देखील हळदीचा समावेश करता येतो. हळदीचे बहुतेक उपयोग आणि फायदे हे मसाल्यातील मुख्य सक्रिय घटक कर्क्युमिन मुळे आहेत. ह्या घटकामुळे हळद एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट बनते तसेच हळदीचे दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहेत.

हळदीचे अनेक फायदे खाली दिलेले आहेत: -

. पचनास मदत होते

पित्त तयार करण्यासाठी आणि पचन प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी तुमच्या बाळाच्या आहारात हळदीचा समावेश केला जाऊ शकतो. सूज कमी होण्यास सुद्धा हळदीची मदत होते.

. आतड्यांचे रोग प्रतिबंधित करते

नुकत्याच झालेल्या संशोधनात हळदीतील कर्क्युमिन हा घटक आढळून आला आहे. क्रोहन डिसीज , अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि आतड्यांचे इतर दाहक रोग प्रतिबंधित करते

. नैसर्गिक वेदनाशामक

हळदीतील कर्क्यूमिन जळजळ कमी करण्यासाठी ओळखले जाते, आणि ते अधिवृक्क ग्रंथीला अधिक कॉर्टिसोन तयार करण्यास मदत करते आणि ते एक नैसर्गिक वेदनाशामक आहे.

. कोलेस्टेरॉलची पातळी संतुलित करते

संशोधनात असे म्हटले आहे की हळदीतील पिवळे रंगद्रव्य, ज्याला क्युरक्यूमिनॉइड्स देखील म्हणतात ते एलडीएल म्हणजेच आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. क्युरक्यूमिनॉइड्स खराब कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडेशन देखील थांबवतात आणि त्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होते.

. त्वचा सुधारते

हळदीतील कर्क्यूमिनमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात आणि ते जखमा बऱ्या करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. हळद आणि दुधाची पेस्ट बाळाच्या त्वचेवर लावल्यास बाळाची त्वचा मुलायम आणि चमकदार होऊ शकते. एक्झिमा आणि त्वचेच्या इतर समस्यांवरही हे मिश्रण म्हणजे उत्तम घरगुती उपाय आहे.

. मॉर्निंग सिकनेससाठी मदत होते

हळदीचे अल्प प्रमाणात सेवन केल्यास मॉर्निंग सिकनेससाठी मदत होते. हळदीला एक मसालेदार आणि तीक्ष्ण चव आहे आणि म्हणूनच हळदीचे सेवन केल्यास मळमळ कमी होण्यास मदत होते.

. शरीरातील रसायनांशी लढा देते

कर्क्युमिनमध्ये मुक्त रॅडिकल्स आणि हानिकारक रसायने ह्यांचा प्रभाव कमी करण्याची क्षमता आहे. ही मुक्त रॅडिकल्स शरीराच्या निरोगी पेशी आणि पेशींच्या भित्तिकांवर हल्ला करतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

आता तुम्हाला हळदीचे सेवन करण्याचे फायदे माहित आहेत. खालील मार्गानी तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात हळदीचा समावेश करू शकता.

तुमच्या बाळाच्या आहारात हळदीचा समावेश करण्याचे मार्ग

तुमच्या बाळाला हळद खाऊ घालण्याचे काही मार्ग येथे दिलेले आहेत. कृपया लक्षात ठेवा की तुमच्या बाळाला आधीपासून घन पदार्थांची ओळख करून देणे आवश्यक आहे. तुम्हाला ऍलर्जीची कोणतीही चिन्हे दिसल्यास, हळदीचा वापर बंद करा आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घ्या.

तुमच्या बाळाला कोणतीही ऍलर्जी प्रतिक्रिया निर्माण होणार नाही ह्याची खात्री करण्यासाठी सर्व पदार्थांचे दुष्परिणाम जाणून घेणे तुमच्यासाठी केव्हाही चांगले असते. हळद हा आपल्या परंपरेतील सर्वात प्रसिद्ध मसाल्यांपैकी एक आहे. हळदीमुळे बरेच रोग बरे होतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या लहान बाळाच्या आहारात हळदीचा समावेश कराल परंतु तुमच्या बाळाचे शरीर ह्या मसाल्याच्या पदार्थासाठी तयार नाही हे तु नंतर मच्या लक्षात येईल. हळदीच्या दुष्परिणामांची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. त्याची खात्री करण्यासाठी त्वरित वैद्यकीय मदत घ्या.

हळदीचे दुष्परिणाम

ठराविक वयानंतर तुमच्या लहान बाळाच्या आहारात हळदीचा समावेश करावा. परंतु मसाल्याच्या पदार्थांचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. त्यापैकी काही दुष्परिणाम येथे दिलेले आहेत.

लहान बाळे तसेच मोठ्या माणसांसाठी हळदीचे अनेक फायदे आहेत. तुमच्या आहारात मसाल्याच्या पदार्थांचा वापर केल्यास पौष्टिक मूल्य वाढू शकते. परंतु, बाळाच्या आहारात हळदीचा समावेश करताना बाळाला हळद सहन होणार आहे हे तपासून पहिले पाहिजे. म्हणून, जेव्हा तुम्ही बाळाला ह्या मसाल्याच्या पदार्थाची ओळख करून देता, तेव्हा तुम्ही बाळाच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच तुमच्या बाळासाठी केलेल्या एखाद्या अन्नपदार्थामध्ये थोडीशी हळद घालून पहा. कोणत्याही समस्यांशिवाय बाळाच्या अन्नपदार्थांमध्ये हळदीचा वापर करू शकतो का हे तपासून पहा. आणखी वाचा:

बाळांसाठी संत्री: फायदे आणि रेसिपी बाळाला साखर आणि मीठ देणे का टाळावे?

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved