अन्न आणि पोषण

बाळांसाठी धान्य (बाजरी) – प्रकार, आरोग्यविषयक फायदे आणि पाककृती

जर तुम्ही बाळाचे किंवा लहान मुलाचे पालक असाल, तर बाळाच्या विकासातील आहाराचे महत्व तुमच्या डॉक्टरांनी किंवा पोषणतज्ञांनी तुम्हाला सांगितले असेल. आम्ही सुद्धा त्याबाबतीत सहमत आहोत. तुम्ही तुमच्या बाळाला जो आहार देता त्याचा बाळाच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो आणि बाळाला चांगल्या आहाराच्या सवयी लागतात. म्हणूनच लहान मुलांना सुरुवातीपासूनच पौष्टिक पदार्थ देणे महत्वाचे आहे. लहान मुले आणि प्रौढांच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी धान्ये (बाजरी) हा एक पोषक घटक आहे. तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात धान्ये कधी आणि कशी समाविष्ट करू शकता हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा!

धान्य म्हणजे काय?

धान्य हे एक ग्लूटेन-मुक्त आणि तंतुमय पदार्थानी समृद्ध अन्न आहे. ते पौष्टिक आहे आणि पचनास अगदी सोपे असते. ते उपलब्ध असलेल्या सर्वात कमी एलर्जीक पदार्थांपैकी एक मानले जाते. धान्याचा आकार जवासारखा असतो आणि त्यांमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे पचन सहज आणि सोपे होते. धान्याला सुपरफूड देखील मानले जाते कारण त्यामध्ये व्हिटॅमिन बी, प्रोटीन, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते.

भारतात कोणत्या प्रकारची धान्ये उपलब्ध आहेत?

धान्यापासून तुम्ही असंख्य डिशेश बनवू शकता त्यामुळे त्यास अष्टपैलू मानले जाते. तुम्ही धान्यापासून इडली ते बाळासाठी सीरिअल असे काहीही बनवू शकता कारण धान्याचे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. खालील प्रकार भारतात सहज उपलब्ध आहेत.

. फॉक्सटेल मिलेट

ह्यास हिंदीमध्ये काकुम किंवा कांगनीन असे म्हणतात.फॉक्सटेल मिलेट सामान्यतः भारतात आढळते. रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी मिलेटचा हा प्रकार सर्वोत्तम आहे.

. पर्ल मिलेट

भारतात सर्वात जास्त आढळणारे हे धान्य आहे आणि ते बाजरी म्हणून ओळखले जाते. बाजरी टाईप २ मधुमेहाचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध करण्यास मदत करते. बाजरीमध्ये मॅग्नेशिअम देखील भरपूर प्रमाणात असते.

. फिंगर मिलेट

रागी म्हणून ओळखले जाणारे, हे धान्य दक्षिण भारतामध्ये, विशेषतः कर्नाटकामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. पचनक्षमता आणि पोषणमूल्यांमुळे लहान मुलांसाठी फिंगर मिलेटचा वापर करणे सामान्य आहे.

. कोडो मिलेट

पॉलीफेनॉल ह्या अँटिऑक्सिडंटने हे धान्य समृद्ध असते. तसेच ह्यामध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. चरबीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने ह्या धान्याचा उपयोग मधुमेह व्यवस्थापित करण्यासाठी केला जातो. हे धान्य कोड्रा किंवा वरगु म्हणून ओळखले जाते.

. लिटिल मिलेट

पोटाचे आजार आणि मधुमेहाशी लढण्यास मदत करण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या ह्या धान्यामध्ये लोह, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. हे धान्य कुटकी किंवा समई म्हणून देखील ओळखली जाते.

. बार्नयार्ड मिलेट

सामान्यतः ह्यास झांगोरा किंवा कुथीरावली असे म्हटले जाते, या प्रकारच्या मिलेट मध्ये फायबर, फॉस्फरस आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात.

. सोरघम मिलेट

सामान्यतः ह्यास ज्वारी म्हणतात, हे धान्य भारतामध्ये सहज उपलब्ध होणारे आणि लोकप्रिय आहे. ही ज्वारी असंतृप्त चरबी, प्रथिने, कॅल्शियम आणि फॉस्फरस आणि पोटॅशियम सारख्या खनिजांनी समृद्ध आहे. ह्यामध्ये सूक्ष्म पोषक आणि अँटीऑक्सिडंट्स देखील जास्त असतात.

वर नमूद केलेल्या धान्यांचा पोषण तक्ता खालीलप्रमाणे:

धान्य/ पोषक घटक प्रथिने (ग्रॅम) चरबी (ग्रॅम) तंतुमय पदार्थ (ग्रॅम) खनिजे (ग्रॅम) लोह (मिलिग्रॅम) कॅल्शियम (मिलिग्रॅम) किलो कॅलरीज
पर्ल मिलेट १०. . . . १६. ३८ ३७८
फिंगर मिलेट . . . . . ३४४ ३३६
फॉक्सटेल मिलेट १२. . . ३१ ४७३
कोडो मिलेट . . . . २७ ३०९
लिटिल मिलेट . . . . . १७ २०७
बार्नयार्ड मिलेट ११. . १०. . १५. ११ ३४२
सोरघम मिलेट १०. . . . २५ ३२९
प्रोसो मिलेट १२. . . . . १४ ३५६
तांदूळ . . . . . १० ३६२
गहू ११. . . . ४१ ३४८

धान्ये लहान मुलांसाठी सुरक्षित आहे का?

योग्य प्रकारे तयार केल्यावर लहान मुलांसाठी धान्ये अत्यंत सुरक्षित असतात. धान्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर असतात. धान्ये पचविणे देखील सोपे आहे आणि सामान्यतः धान्ये ग्लूटेन-मुक्त असतात. तुमच्या मुलाला त्यामुळे ऍलर्जी होणे हे अत्यंत दुर्मिळ आहे.

तुमचे बाळ धान्य खाण्यास कधी सुरुवात करू शकते?

तुमचे बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर मिलेट खाण्यास सुरुवात करू शकते. परंतु कुठल्याही नवीन घटकाचा बाळाच्या आहारात समावेश करताना थोड्या प्रमाणात करा, सुरुवातीला एक चमचाभर द्या आणि नंतर प्रमाण वाढवा.

बाळांसाठी कोणते धान्य चांगले आहे?

बहुतेक सगळी धान्य लहान मुलांसाठी उत्तम असतात, तथापि, तुम्ही तुमच्या मुलाला पर्ल मिलेट, फॉक्सटेल मिलेट किंवा सोरघम मिलेट देण्याची शिफारस केली जाते कारण ते शिजवण्यास आणि पचनास अगदी सोपे असतात. आपल्या मुलाला विशेषतः कोणते धान्य दिले जाऊ शकते याबद्दल अधिक अचूक माहितीसाठी तुम्ही पोषणतज्ञ आणि डॉक्टरांशी बोला.

लहान मुलांसाठी धान्याचे आरोग्यविषयक फायदे

मिलेट्समध्ये भरपूर प्रमाणात पोषणमूल्ये असतात आणि त्यामुळे त्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. येथे यापैकी काही दिलेले आहेत.

. पचनास मदत करतात

पचनास मदत करणारी सर्वात महत्वाची पोषक तत्त्वे म्हणजे तंतुमय पदार्थ आहेत कारण बहुतेक धान्यांमध्ये भरपूर तंतुमय पदार्थ असतात. धान्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोटातील कीटकांचा सामना करण्यास आणि प्रतिबंध करण्यास मदत करणारे गुणधर्म देखील आहेत.

. हाडे मजबूत करण्यास मदत करतात

धान्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे खनिज म्हणजे कॅल्शियम. कॅल्शिअम धान्ये बाळामध्ये मजबूत निरोगी हाडे विकसित करण्यात मोठी भूमिका बजावतात.

. स्नायू पुनर्प्राप्तीसाठी मदत करतात

तुमच्या बाळाची जसजशी वाढ होते तसे, त्यांचे स्नायू वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात. त्यामुळे स्नायूंना थकवा येऊ शकतो. स्नायूंच्या पुनर्प्राप्तीसाठी प्रथिने महत्त्वाची असतात आणि धान्ये हा प्रथिनांचा एक मोठा स्त्रोत आहे आणि बाळांसाठी तो प्रथिनांचा आरोग्यदायी स्रोत आहे.

. पचनास मदत करतात

स्निग्ध पदार्थांचे विघटन आणि पचनास मदत करणारे आणि उतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले खनिज म्हणजे फॉस्फरस होय. सर्व प्रकारच्या धान्यांमध्ये फॉस्फरस भरपूर असते.

. अशक्तपणा कमी करतात

धान्यांमध्ये भरपूर लोह असते, ते आपल्या मुलांना अशक्त होण्यापासून रोखण्यास मदत करतात .

. वजन व्यवस्थापनात मदत करतात

वेगवेगळी धान्ये निरोगी कार्बोहायड्रेट्सचे समृद्ध स्त्रोत आहेत, त्यामुळे तुमचे बाळ जास्त काळ तृप्त राहते कारण शरीराला ह्या कार्बोहायड्रेट्सचा विघटन होण्यास जास्त वेळ लागतो. धान्ये वजन व्यवस्थापनात देखील मदत करतात.

बेबी फूड म्हणून धान्ये कशी निवडावी आणि साठवावीत?

सेंद्रिय धान्यांची निवड करा. धान्ये स्वच्छ करून त्यांची साठवणूक करा, आपल्या मुलाला शिळे अन्न देऊ नका. धान्ये उन्हात ठेऊ नयेत आणि स्वच्छ आणि थंड वातावरणात धान्ये साठवावीत. धान्ये फ्रिज मध्ये ठेवू नका.

आपल्या बाळासाठी धान्यांच्या पाककृती

धान्यांच्या पाककृती तयार करणे अत्यंत सोपे आहे. म्हणूनच आपल्या बाळासाठी धान्य शिजवणे अत्यंत सोपे आहे, येथे काही पाककृती आहेत:

. लापशी

लापशी आपल्या बाळासाठी एक सोपी आणि पौष्टिक डिश आहे

लागणारे साहित्य:

कृती:

. मिलेट सीरिअल

ही करण्यासाठी आणखी एक सोपी पाककृती आहे, कृती खालीलप्रमाणे

लागणारे साहित्य

कृती:

. मिलेट स्ट्यू

आपल्या मुलासाठी स्टू अत्यंत पोषक आहे, मिलेट स्ट्यूसाठी इथे खरोखर छान रेसिपी दिलेली आहे

लागणारे साहित्य

कृती:

. मिलेट सॅलेड

आपल्या मुलासाठी हे सॅलेड एक उत्तम लंच आहे, येथे एक सोपी पण चवदार सॅलेड रेसिपी दिलेली आहे

साहित्य

कृती:

आपल्या मुलाच्या जेवणामध्ये पोषक घटकांचा समावेश करणे अत्यंत महत्वाचे आहे. धान्ये सुपरफूड आहेत परंतु मुलांसाठी तो संपूर्ण आहार असू शकत नाही. आपल्या मुलाच्या पोषणविषयक गरजा आणि त्यांच्या आहारात धान्याचा समावेश कसा करावा हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, कृपया आपल्या आहारतज्ञांचा सल्ला घ्या.

आणखी वाचा:

बाळांसाठी मखाना: फायदे आणि पाककृती बाळांसाठी टोमॅटो – आरोग्यविषयक फायदे आणि सूप रेसिपी

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved