Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळांना नारळ पाणी देणे सुरक्षित आहे का

बाळांना नारळ पाणी देणे सुरक्षित आहे का

बाळांना नारळ पाणी देणे सुरक्षित आहे का

जर तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान देत असाल आणि बाळाला थोडे नारळ पाणी देण्याचा विचार करत असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात. ह्या लेखात, आम्ही बाळांना नारळ पाणी देण्याचे फायदे, स्तनपानासंबंधित सूचना आणि तुम्ही तुमच्या छोट्या बाळास नारळ पाणी केव्हा देण्यास सुरुवात करू शकता हे सांगणार आहोत.

नारळाचे पाणी मुलांसाठी चांगले आहे का?

नारळाच्या पाण्यात मोनोलाउरीन नावाचे कंपाऊंड असते, त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बाळाला रोगांविरूद्ध लढायला मदत होते. मुलांना सर्दी आणि फ्लू आणि संसर्गापासून संरक्षण मिळू शकते. बाळ आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी नारळ पाण्याची शिफारस केली जाते. नारळपाणी एक चांगले टॉनिक आहे जे आपल्या बाळाला उर्जा पुरवते आणि त्याला महत्त्वपूर्ण लॉरिक ऍसिड देखील पुरवते. बाळासाठी आईच्या दुधानंतरचे हे सर्वोत्कृष्ट अन्न आहे.

नारळाच्या पाण्यात उपलब्ध असलेली पोषणमूल्ये

पोषण सामग्रीसंदर्भात, नारळ पाण्यात काय असते ह्यावर एक नजर टाकूया

पोषक घटक १०० ग्रॅमसाठी पौष्टिक मूल्य
ऊर्जा १९ किलो कॅलरी
एकूण चरबी .२ ग्रॅम
सोडियम १०५ मिलीग्रॅम
कोलेस्टेरॉल ० मिग्रॅ
पोटॅशियम २५० मिलीग्रॅम
एकूण कर्बोदके . ७ ग्रॅम
प्रथिने .७ ग्रॅम
कॅल्शियम %
लोह %
मॅग्नेशियम %
व्हिटॅमिन सी %

नारळाच्या पाण्यात उपलब्ध असलेली पोषणमूल्ये

बाळांना नारळाचे पाणी कधी दिले जाऊ शकते?

खरेतर , पहिल्या सहा महिन्यांनंतर लहान मुलांना नारळाचे पाणी दिले जाऊ शकते. सहा महिन्यांपासून ते आठ महिन्यांच्या नवजात बाळांना दुधाव्यतिरिक्त नारळाचे पाणी दिले जाते. सामान्यतः घनपदार्थांची सुरुवात केल्यावर बाळे आणि अर्भके नारळपाणी पचवू शकतात. पचनास मदत करण्यासाठी, खोबऱ्याऐवजी आम्ही नारळ पाण्याची शिफारस करतो.

जर आपल्या बाळाला सर्दी आणि फ्लू झाला असेल तर तुम्ही नारळाचे पाणी देऊ शकता का?

होय! सर्दी आणि फ्लूवर उपचार करण्यासाठी नारळपाणी एक आश्चर्यकारक शक्तिवर्धक आहे. ह्यामध्ये ताप आणि पोटावरील उपचारांसाठी अगदी योग्य प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे आणि क्षार आहेत. सर्दी आणि फ्लूच्या विरूद्ध नैसर्गिक उपायांसाठी नारळपाणी हा आपला अंतिम पर्याय आहे.

बाळाला नारळ पाणी देण्याचा धोका

जेव्हा तुम्ही सहा महिन्यांपेक्षा कमी वय असलेल्या बाळाला नारळ पाणी देता तेव्हा ऍलर्जिक प्रतिक्रिया होण्याचा धोका असतो. नारळाचे पाणी फक्त सहा महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना द्यावे. नारळ पाण्यात साखर आणि सोडियमची मात्रा जास्त असल्याचे ज्ञात आहे, म्हणूनच आम्ही ते भातात मिसळून त्याची प्युरी करून बाळाला देण्याची शिफारस करतो.

बाळाला नारळ पाणी देण्याचा धोका

बाळांना नारळाच्या पाण्याचे होणारे फायदे

बाळांना नारळाच्या पाण्याचे बरेच फायदे आहेत. ते खालीलप्रमाणे :

  1. उन्हाळ्याच्या काळात नारळ पाणी हे एक विलक्षण रीहायड्रेशन एजंट आहे
  2. ताप, सर्दी आणि फ्लूवर ते नैसर्गिकरित्या उपचार करते
  3. पोटाच्या समस्येवर गुणकारी
  4. उलट्या, अपचन आणि अतिसार प्रतिबंधित करते
  5. बद्धकोष्ठता आणि पोटाचा अल्सर बरा करते
  6. पोटातील जंत दूर करते आणि अपचन आणि अतिसाराद्वारे द्रवपदार्थाच्या नुकसानास प्रतिबंध करते
  7. आईचे दूध आणि रीहायड्रेशन द्रव्यांव्यतिरिक्त नारळ पाणी हे एक पौष्टिकतेचे स्रोत आहे
  8. नारळ पाण्यात लॉरिक ऍसिड असते जे संक्रमण आणि रोगांविरूद्ध लढाई करते
  9. इलेक्ट्रोलाइट्स आणि तंतुमय पदार्थांचा एक समृद्ध स्रोत आहे
  10. शुद्धीकरण आणि उपचार ह्या गुणधर्मामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गावर उपचार करते आणि मूत्रपिंडातील खडे विरघळण्यास मदत होते
  11. हे एक पित्त ताप उपशामक आहे आणि त्यामुळे शरीरातील नॅचरल सॉल्ट्स भरून निघण्यास मदत होते
  12. आतड्यांमधील जंत दूर करते
  13. चयापचय नियंत्रित करते आणि वजन कमी करण्यास प्रोत्साहित करते
  14. नारळ पाण्यामध्ये सायटोकिन्स आहेत, ज्यामुळे मानवी पेशी आणि ऊतीचा ऱ्हास कमी होतो
  15. नारळपाणी एक छान टॉनिक आहे आणि त्यामध्ये अँटीबॅक्टेरिअल आणि अँटिमायक्रोबियल गुणधर्म असतात आणि ते आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे

बाळांना नारळाच्या पाण्याचे होणारे फायदे

बाळाला नारळ पाणी कसे द्यावे ह्यासंबंधित सूचना

आपल्या बाळाला नारळाचे पाणी देण्यापूर्वी हे मुद्दे ध्यानात घ्या

  1. नारळ पाणी ताजे दिले गेले नाही तर पौष्टिक हानी होते, म्हणूनच फक्त आपल्या बाळास ताजे नारळ पाणी देणे चांगले
  2. आपल्या बाळाला एकाच वेळी नारळ पाणी देण्याऐवजी थोडे थोडे द्या
  3. आपल्या बाळाला फळ किंवा शेंगदाण्याची ऍलर्जी असल्यास नारळाचे पाणी देणे टाळा
  4. तुम्ही सील बंद नारळपाणी २४ तासांपर्यंत सामान्य तापमानाला ५. ० दिवस रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता. झाकण उघडे ठेवू नका तसेच आपल्या बाळास थंड नारळ पाणी देऊ नका
  5. आपल्या छोट्या बाळाला नारळ पाणी देण्यापूर्वी नारळ पाण्यात मोठ्या आकाराचे तुकडे वेगळे करण्यासाठी ते गाळून घ्या. खोबऱ्याचे छोटे तुकडे बाळांना त्रासदायक होऊन धोका निर्माण होतो, त्यामुळे ते गाळून घेणे महत्वाचे आहे
  6. हिवाळ्यात किंवा बाळाचे वय सहा महिन्यांपेक्षा कमी असेल तर बाळाला नारळाचे पाणी देऊ नका
  7. नारळाच्या पाण्यात भात किंवा उकडलेल्या भाज्या मिसळून सर्व्ह करुन घ्या

सामान्य प्रश्न

. सामान्य तापमानाला नारळाचे पाणी किती काळ ठेवले जाऊ शकते?

सील केलेल्या डब्यात नारळ पाणी सामान्य तापमानाला ५ ते १० दिवस ठेवले जाऊ शकते. नारळ पाणी असलेल्या कंटेनरचे झाकण उघडे ठेवल्यास एंझाइम कार्यरत होतात त्यामुळे सामान्य तापमानात हवेच्या घट्ट कंटेनरमध्ये नारळ पाणी साठवले जाते.

. मी माझ्या बाळाला सध्या पाण्याऐवजी नारळपाणी पाजू शकते का?

नारळाच्या पाण्यात साखर आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, म्हणूनच आम्ही ते पाण्याऐवजी देण्याची शिफारस करत नाही. तथापि, आपण ते भात आणि उकडलेल्या भाज्यांमध्ये मिसळू शकता किंवा नियमित पिण्याच्या पाण्याने पातळ करुन सर्व्ह करू शकता.

. फॉर्म्युलामध्ये नारळाचे पाणी मिसळणे ठीक आहे का?

आम्ही शिफारस करतो की आपल्या बाळाच्या फॉर्म्युलामध्ये नारळपाणी घालण्यापूर्वी आपण आपल्या संबंधित बालरोग तज्ञाशी संपर्क साधा

. जर माझ्या बाळाने एका दिवसात भरपूर नारळ प्यायले तर काय करावे?

भरपूर नारळ पाणी पिण्यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट असंतुलन उद्भवू शकते, म्हणून आम्ही आपल्या बाळाला ते योग्य प्रमाणात सर्व्ह करावे अशी आम्ही शिफारस करतो.

. हिवाळ्याच्या हंगामात मी माझ्या बाळाला नारळ पाणी देऊ शकते का ?

नाही. कृपया हिवाळ्याच्या काळात आपल्या बाळाला नारळाचे पाणी देऊ नका, विशेषत: जर आपल्या मुलास सर्दी किंवा फ्लू झाला असेल तर नारळ पाणी देऊ नका.

हिवाळ्याच्या हंगामात मी माझ्या बाळाला नारळ पाणी देऊ शकते का ?

एक ते दोन चमचे लिंबाच्या रसात मिसळून मुलांना दिल्यास कॉलराचा उपचार करण्यासाठी नारळाच्या पाण्याचा उपयोग केला जाऊ शकतो, असा विश्वास आहे. शरीरात ऍसिडोसिस कमी करण्याव्यतिरिक्त, नारळ पाण्यामुळे उष्माघातापासून बचाव होतो आणि बाळांमध्ये इलेक्ट्रोलाइट संतुलनास प्रोत्साहन मिळते.

नियंत्रण ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि नारळाच्या पाण्यासाठी हे विशेषतः सत्य आहे. आपल्या लहान बाळास अधूनमधून नारळाच्या पाण्याचा उर्जेचा डोस द्या तसेच भाज्यांमध्ये मिसळून सुद्धा तुम्ही ते बाळाला देऊ शकता. आपल्या बाळाला पहिले दात आल्यावर सुद्धा नारळातील कोवळे खोबरे देऊ नका कारण त्यांच्यासाठी ते चावण्यासाठी आणि पचनास अवघड असते.

बाळाला नारळपाणी देण्यापूर्वी बालरोगतज्ञांशी सल्लामसलत करा कारण काही बाळांना त्याची ऍलर्जी येऊ शकते.

आणखी वाचा:

बाळाला साखर आणि मीठ देणे का टाळावे?
बाळाला खजूर देणे: पोषणमूल्य, फायदे आणि खबरदारी

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article