बाळ

बाळांमधील स्लिप ऍप्निया: कारणे, निदान आणि उपचार

नवजात बाळाच्या आरोग्याच्या बाबतीत पालकांनी सावधगिरी बाळगणे जरुरीचे आहे. बाळाच्या जन्मानंतरचे पहिले काही महिने महत्वाचे असतात आणि त्यामुळे पालकांनी त्यांच्या बाळाच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे जरुरीचे आहे. बाळाच्या जन्मानंतर, वाढीचे महत्वाचे टप्पे बाळ पार करत असते. त्यामुळे त्यांच्या वाढीमध्ये अडथळा येणार नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. स्लीप ऍप्निया ह्या गंभीर विकाराबद्दल जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी बाळावर काळजीपूर्वक लक्ष ठेवणे आणि त्या आजाराची माहिती असणे जरुरी आहे.

स्लीप ऍप्निया म्हणजे काय?

स्लीप ऍप्निया ह्या विकारामध्ये बाळ झोपेत असताना श्वासोच्छवासात अडथळा येतो. ही एक संभाव्य हानीकारक स्थिती आहे. योग्य वेळी उपचार न केल्यास गंभीर गुंतागुंत होऊ शकते. लहान मुलांमध्ये, स्लीप ऍप्नियामुळे हृदयाची गती मंदावते आणि वाढ नीट होत नाही. श्वासोच्छवासामध्ये व्यत्यय येत असेल तर त्या स्थितीला हायपोप्निया म्हणतात तर श्वासोच्छवास संपूर्ण थांबल्यास त्यास ऍप्निया म्हणतात. स्लीप ऍप्नियाचे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते:

. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍप्निया

घशाच्या मागच्या बाजूला असलेल्या मऊ उतींमुळे श्वासनलिकेचा वरचा भाग बंद होतो. ह्या स्थितीस ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍप्निया असे म्हणतात.

. सेंट्रल स्लीप ऍप्निया

हृदय किंवा मेंदूच्या समस्येमुळे सेंट्रल स्लिप ऍप्निया होऊ शकतो. शरीराच्या ह्या समस्येमध्ये शरीर श्वास घेण्याचे प्रयत्न थांबवते. मेंदूमध्ये कोणताही अडथळा नसतो, परंतु श्वास घेण्यासाठी स्नायूंना संदेश पाठवण्यास मेंदू अपयशी ठरतो.

. मिक्स स्लिप ऍप्निया

नावाप्रमाणेच, हे सेंट्रल आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह ऍप्नियाचे संयोजन आहे. ऍप्नियाचा हा प्रकार सामान्यतः लहान, अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये आढळतो.

स्लीप ऍप्नियाची कारणे काय आहेत?

स्लीप ऍप्निया अनेक कारणांमुळे असू शकतो. स्लीप ऍप्निया ची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:

लहान मुलांमध्ये, स्लीप ऍप्नियाची इतर काही कारणे असू शकतात.

कोणत्या बाळांना स्लीप ऍप्निया होण्याचा धोका असतो?

कोणत्याही बाळाला ऍप्निया होऊ शकतो. परंतु अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये ही स्थिती सामान्यपणे आढळते. जितका जास्त लवकर बाळाचा जन्म होतो तितका ऍप्नियाचा धोका जास्त असतो. गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बाळांमध्ये आढळणाऱ्या ह्या स्थितीला ऍप्निया ऑफ प्रीमॅच्युरिटी असे म्हणतात. ३७ आठवडे किंवा त्यानंतर जन्मलेल्या बाळांमध्ये ही स्थिती आढळल्यास त्या स्थितीस ऍप्निया ऑफ इन्फनसी असे म्हणतात. अहवालानुसार, १ किलोग्रॅमपेक्षा कमी वजन असलेल्या सुमारे ८४ टक्के बाळांना श्वसनक्रिया बंद पडण्याचा धोका असतो. जन्माच्या वेळी वजन सुमारे २.५ किलोग्रॅम असल्यास त्या बाळांमध्ये हा धोका २५ टक्क्यांपर्यंत कमी होतो.

डाऊन्स सिंड्रोम आणि जन्मजात आरोग्याच्या समस्यांमुळे देखील श्वासनलिकेच्या वरच्या भागावर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे स्लीप ऍप्निया होऊ शकतो. डाउन सिंड्रोम असलेल्या बहुतेक मुलांना देखील स्लीप ऍप्नियाचा त्रास होतो.

गुंतागुंत

विशेषतः अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये स्लीप ऍप्निया ही आरोग्याची एक गंभीर स्थिती आहे. क्वचित प्रसंगी, ते प्राणघातक असू शकते. ह्या स्थितीमध्ये, बाळाचा श्वासोच्छवास थांबतो, रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि कार्बन डायऑक्साइडची पातळी वाढते. त्यामुळे हृदयाची गती कमी होऊन बाळ बेशुद्ध पडू शकते.

लहान मुलांमध्ये आढळणारी स्लीप ऍप्नियाची लक्षणे

ऍप्नियाची कोणती लक्षणे दिसत आहेत का हे पाहण्यासाठी पालकांनी जागरूक असणे आवश्यक आहे. अकाली किंवा कमी वजनाच्या बाळांच्या बाबतीत त्यांना जास्त काळजी घ्यावी लागते. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनच्या मते, १५ सेकंदांपर्यंत श्वासोच्छवासात व्यत्यय येणे सामान्य आहे आणि त्याला 'पिरियॉडिक ब्रिदिंग' असे म्हणतात. पिरियॉडिक ब्रिदिंग हे ऍप्नियाचे लक्षण नाही. तथापि, श्वासोच्छवासाच्या विरामांच्या वेळेत वाढ होणे हे एक चिंताजनक लक्षण आहे.

मुलांमध्ये आढळणारी स्लीप ऍप्नियाची लक्षणे इथे दिलेली आहेत. ही लक्षणे आढळल्यास पालकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे:

निदान कसे केले जाते?

स्लिप ऍप्नियाचा संशय आल्यावर, बाळाला तज्ञाकडे नेणे आवश्यक आहे. बालरोग फुफ्फुसतंज्ञांकडे जाण्यापूर्वी बाळाचे डॉक्टर काही चाचण्या करतील. रक्तातील ऑक्सिजन पातळी मोजणे, हृदय गती आणि श्वासोच्छवास तपासणे ह्या त्यापैकी काही चाचण्या आहेत.

ऍप्नियाचे निदान करण्यासाठी आणखी एक चाचणी घेतली जाते ती म्हणजे पॉलीसोमनोग्राम. ह्या चाचणीसाठी झोपेत असताना बाळाचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक असते आणि ते तंत्रज्ञांकडून स्लीप लॅबमध्ये केले जाते. हे निरीक्षण मेंदूच्या लहरी, हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासाची पद्धत टिपण्यासाठी केले जाते. ह्या निरीक्षणांद्वारे श्वासोच्छवासाच्या समस्येचे स्वरूप उघड होते. ही एक वेदनारहित प्रक्रिया आहे.

उपचार

ऍप्नियाच्या तीव्रतेनुसार, डॉक्टर बाळासाठी औषधे लिहून देतील. टॉन्सिल्स आणि ऍडिनॉइड्सची पातळी वाढलेली असल्यास, घसा किंवा ईएनटी तज्ञाचा सल्ला घ्यावा लागतो. ऑब्स्ट्रक्टिव्ह ऍप्निया साठी काही वेळा कंटिन्यूअस पॉसिटीव्ह एअरवे प्रेशर मशीन वापरले जाते. बाळांच्या श्वासोच्छवासावर परिणाम करणाऱ्या विविध समस्यांसाठी कार्डिओ-रेस्पीरेटरी मॉनिटरिंगची आवश्यकता असते. अशा बाळांसाठी बेबी स्लीप ऍप्निया मॉनिटरचा वापर केला जाऊ शकतो.

बहुतेक बाळांची वाढ होत असताना त्यांचा स्लीप ऍप्नियाचा त्रास कमी होत जातो, परंतु अकाली जन्मलेल्या बाळांचा श्वासोच्छवासाचा त्रास जास्त काळ टिकू शकतो.

टीप: स्लीप ऍप्निया असलेल्या बाळांच्या पालकांनी सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन) कसे करावे हे शिकले पाहिजे. आपत्कालीन परिस्थितीसाठी तुम्ही तयार राहण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी याबद्दल चर्चा करा.

डॉक्टरांना फोन कधी करावा?

अकाली जन्म झालेल्या आणि कमी वजनाची समस्या असलेल्या बाळांच्या बाबतीत, पालकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. श्वासोच्छवासात १५ सेकंदांपेक्षा जास्त वेळ व्यत्यय येत असेल आणि बाळाने हळूवारपणे श्वास घेण्यास प्रतिसाद दिला नाही, तर ताबडतोब डॉक्टरांना बोलवा.

स्लीप ऍप्निया ही गंभीर स्थिती असली तरी, योग्य वेळी योग्य पावले उचलल्यास ही स्थिती असलेल्या नवजात बाळावर उपचार करण्यास मदत होऊ शकते. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी. काळजीपूर्वक निरीक्षण करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन चर्चा करणे गरजेचे आहे.

आणखी वाचा:

बाळांसाठी झोपताना उशी वापरावी का? तुमच्या बाळाला किती झोप आवश्यक असते? (नवजात बाळ पासून १२ महिन्यांच्या बाळापर्यंत)

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved