बाळ

बाळाला रात्री कसे झोपवावे?

बाळांचे झोपण्याचे रुटीन असे असते की रात्री अगदी विचित्र वेळेला त्यांना जाग येते. जर तुम्ही नुकत्याच आई झालेल्या असाल तर तुम्हाला झोप मिळणार नाही. बाळ काही महिन्यांचे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या बाळाच्या झोपेचा पॅटर्न लक्षात येईल आणि तुम्ही बाळाला रात्री जास्त वेळ झोपण्यास मदत करू शकाल आणि तुमची झोप न मिळण्यापासून सुटका होईल.

तुमचे बाळ रात्रीचे का झोपत नाही?

बाळाने रात्री न झोपण्याची खूप कारणे आहे. रात्रीचे बाळ उठण्याची सामान्यपणे आढळणारी कारणे खालीलप्रमाणे

बाळाने रात्री न झोपणे हे सामान्य आहे का?

बाळ दिवसातून रोज १६ तास झोपेल परंतु ही झोप सलग नसेल आणि त्या झोपेचे काही वेळापत्रक सुद्धा नसेल. तुमच्या बाळाला दिवसा पुरेशी झोप मिळत असेल तर बाळाचे रात्रीचे झोपेचे वेळापत्रक त्रासदायक असेल. म्हणून, बाळाने रात्रीचे न झोपणे खूप त्रासदायक असेल. तसेच बाळाला रात्रीच्या वेळी सुद्धा स्तनपानाची गरज असते त्यामुळे सुद्धा झोपेच्या अनियमित वेळा होतात.

रात्री बाळ उठल्यावर खूप वेळ जागे रहाते का?

बाळ रात्रभर केव्हा झोपते जेणेकरून आम्हाला पुरेशी झोप मिळेल, हे जाणून घेण्याची बऱ्याच पालकांना उत्सुकता असते. बऱ्याच बाळांचा झोपेचा एक पॅटर्न ठरलेला असतो आणि तो बाळाच्या वयाच्या चौथ्या महिन्यात लक्षात येतो. तथापि, काही बाळे सहा महिन्यांची झाल्यानंतर रात्रभर झोपू लागतात. तर काही बाळांना ह्यापेक्षा जास्त दिवस लागतात. तुमचे बाळ जेव्हा ४ ते ६ महिन्यांचे होईल तेव्हा रात्रीचे जास्त तास झोपू लागेल.

बाळाला गाढ झोप लागावी म्हणून काही परिणामकारक पद्धती

इथे काही पद्धती दिल्या आहेत ज्यामुळे तुमच्या बाळाला रात्री झोपण्यास मदत होईल.

. फेरबर पद्धती

ही एक अतिशय प्रसिद्ध पद्धती आहे. रिचर्ड फेरबर, डिरेक्टर ऑफ सेंटर फॉर पेडियाट्रिक स्लिप डिसऑर्डर अँड चिल्ड्रन्स हॉस्पिटल ह्यांच्या नंतर ह्या पद्धतीला फेरबर पद्धत असे नाव पडले. ह्या पद्धतीमध्ये बाळाला स्वतःचे स्वतः झोपण्यास शिकवले जाते. ह्या मागची संकल्पना अशी की बाळे काही घटना किंवा क्रिया ह्यांचा संबंध झोपेशी लावतात आणि रात्री उठल्यानंतर सुद्धा झोपण्यासाठी तोच मार्ग अवलंबतात. तुम्ही बाळाला झोपण्यासाठी स्तनपान देण्याची किंवा झुलवण्याची सवय लावली तर बाळ झोपण्यासाठी त्या गोष्टींची वाट बघेल. ह्या पद्धती मध्ये बाळाला स्वतःचे स्वतः झोपायला शिकवण्यावर भर दिला जातो. फायदे तोटे

. ठराविक वेळेनंतर उठवणे

ह्या पद्धतीमध्ये तुमच्या बाळाच्या झोपेच्या सवयी बदलल्या जातात, कारण तुम्ही ठराविक वेळेनंतर बाळाला मध्ये मध्ये उठवतात, फायदे तोटे

. अंगाई गीते

ह्या पद्धतीमध्ये बाळाचा जो नैसर्गीक झोपेचा पॅटर्न असतो त्यानुसार बाळाला झोपवले जाते. बाळाला उगाचच थकवण्याचा उद्देश नसतो तसेच जेव्हा बाळाला झोप येईल तेव्हा झोपू दिले जाते. ह्या पद्धतीमध्ये बाळाला रात्रभर झोप लागावी म्हणून खाली टिप्स दिल्या आहेत.
फायदे तोटे

. कुटुंबाचा बिछाना

बऱ्याच देशांमध्ये एकत्र झोपणे हे खूप कॉमन आहे. तसेच ह्यास संलग्न किंवा जोडलेले पालकत्व असे म्हणतात. ह्या पद्धतीमध्ये बाळ रात्रीचे त्याच्या पालकांसोबत झोपते. फायदे
तोटे

तुमचे बाळ रात्री झोपावे म्हणून १० टिप्स

बाळाला रात्रभर चांगली झोप लागणे म्हणजे तुमची पण चांगली झोप होणे होय. इथे काही टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे तूच बाळ रात्रभर चांगले झोपेल.

. एक रुटीन ठरवा

बाळ काहीही करत असले तरी बाळाला एका विशिष्ट वेळेला झोपला. झोपेचा पॅटर्न ठरवा, आणि तो नियमितपणे पाळा, बाळाला कालांतराने त्याची सवय होईल.

. तुमच्या बाळाला सक्रिय आणि गुंतवून ठेवा

तुमच्या बाळाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक क्रियांमध्ये, विशेषकरून संध्याकाळी गुंतवून ठेवा. त्यामुळे बाळ रात्री झोपेल.

. झोपेची जागा

तुमच्या बाळाचे बेडरूम आणि क्रिब एकच ठेवा. बाळाची रोजची झोपण्याची जागा एकच असुद्या. बाळाचे लक्ष वेधून घेतील अश्या गोष्टी किंवा खेळणी दूर ठेवा आणि प्रकाश आणि आवाज रोज सारखाच राहील असे पहा.

. तुमच्या बाळाला रात्री मध्येच उचलून घेऊ नका

रात्री मध्येच जर बाळाला जाग आली तर बाळाला उचलून लगेच बाळाशी खेळायला सुरुवात करू नका, किंबहुना बाळाला हळूच थोपटून पुन्हा झोपवा.

. झोपण्याआधी बाळाचे आवडते खेळ अथवा क्रियाकलाप खेळा

दररोज झोपण्याआधी बाळाची आवडती गाणी म्हणणे, त्यांना मसाज करणे इत्यादी केल्याने त्यांना शांत होण्यास मदत होते तसेच त्यांना झोप सुद्धा चांगली लागते.

. झोपण्याआधीचे खाणे पोटभर असले पाहिजे

बरीच बाळे स्तनपानासाठी मध्यरात्री उठतात. बाळ झोपण्याआधी तुम्ही बाळाचे पोट भरले आहे ह्याची खात्री करा त्यामुळे बाळ स्तनपानासाठी रात्री मध्येच उठणार नाही.

. झोपण्याआधी अंघोळ

झोपण्याआधी कोमट पाण्याने अंघोळ घातल्यास बाळाला अराम पडेल आणि झोप चांगली लागेल. बाळाचे लक्ष दुसरीकडे वेधले जाऊ नये म्हणून बाथटब मध्ये खेळणी ठेऊ नका. अंघोळीनंतर लगेच बाळाला झोपवा म्हणजे बाळ अंघोळ आणि झोप ह्यांचा संबंध लावू शकेल.

. व्यत्यय निर्माण करतील अशा गोष्टी बंद करा

बाळाचे रुटीन लागेपर्यंत बाळाच्या झोपेत व्यत्यय आणतील अशा गोष्टी घरातल्या व्यक्तींनी टाळल्या पाहिजेत.

. आरामदायक गोष्टींकडे लक्ष द्या

बाळासाठी झोपताना आरामदायक कपडे आणि बिछाना घालणे बाळासाठी आवश्यक आहे. बाळाला कपड्यांमध्ये खूप गरम किंवा गार वाटणार नाही ह्याची खात्री करा. सुती कपड्यांचा वापर करा आणि झोपेच्या वेळेचे कपडे वेगळे ठेवा.

१०. खेळणी

मऊ, छोटी खेळणी झोपताना बाळाला दिल्यास बाळ त्याचा संबंध झोपेशी लावू शकेल आणि त्यामुळे बाळाला शांत आणि सुरक्षित वाटेल जर बाळाच्या रात्री उठण्याने तुमच्या रुटीनमध्ये काही फरक पडत नसेल तर तुम्ही बाळाला रात्री झोपण्याची सवय हळूहळू लावू शकता. तथापि जर तुमची झोप अपूर्ण होत असेल तर तुम्ही वर दिलेल्या पद्धती करून बघू शकता, त्यामुळे बाळाला शांत झोप लागण्यास मदत होईल.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved