आरोग्य

तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी नारळाच्या तेलाचे सर्वोत्तम १२ फायदे

    In this Article

बाळाच्या त्वचेसाठी जेव्हा उत्पादने खरेदीची वेळ येते तेव्हा तुम्हाला त्यात चूक होऊ नये असे वाटत असते. तसेच बाळे आणि लहान मुले यांना त्वचेचा त्रास लवकर होतो. त्यामुळे एक नैसर्गिक उत्पादन जे बाळाच्या त्वचेची काळजी घेते आणि तुमच्या मुलाची त्वचा मऊ आणि निरोगी ठेवते ते म्हणजे नारळाचे तेल. बाळाच्या त्वचेसाठी नारळाचे तेल कसे काम करते आणि तुम्हाला त्यापासून जास्तीत जास्त कसे फायदे मिळतील ते पाहुयात.

. बाळाच्या मालिशसाठी नारळाचे तेल

रडण्याऱ्या आणि त्रास देणाऱ्या बाळाला मालिश केल्याने बाळाला आराम मिळतो तसेच बाळ झोपी जाण्यास सुद्धा मदत होते. बाळाच्या मालिशसाठी नारळाचे तेल वापरल्याने फायदा होतो आणि नारळाच्या तेलामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म सुद्धा असतात. हे तेल त्वचेमध्ये सहज शोषले जाते. मात्र तुम्ही चांगल्या प्रतीचे नारळाचे तेल वापरत आहात ना ह्याची खात्री करा. टिप्स: तुम्ही शुद्ध नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑइल समप्रमाणात घेऊ शकता. तुम्ही लव्हेंडर तेलाचे काही थेम्ब सुद्धा ह्यामध्ये घालू शकता.

. एक्झिमा साठी नारळाचे तेल

एक्झिमा मध्ये त्वचा कोरडी पडून खाज सुटते. लहान बाळांमध्ये हे सर्रास आढळते, परंतु बाळ जसजसे मोठे होते तसे एक्झिमा नाहीसा होतो. एक्झिमासाठी नारळाचे तेल वापरल्यास कोरडेपणा कमी होतो आणि बाळाला आराम मिळतो. टिप्स: जर तुम्ही बाळाच्या एक्झिमावर उपाय शोधात असाल तर तुमच्या बाळाला अंघोळीच्या आधी आणि नंतर नारळाच्या तेलाने मसाज द्या. तसेच झोपण्याच्या आधी बाळाला मॉइश्चरायझर लावा. नारळाच्या तेलामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात आणि त्याच्या नियमित वापराने एक्झिमा कमी होतो.

. बाळाच्या केसांच्या वाढीसाठी नारळाचे तेल

बाळांच्या केसांसाठी नारळाचे तेल चांगले असते का? आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसते की नारळाचे तेल मिडीयम चेन फॅटी ऍसिड्सने सम्रुद्ध असते. ह्या प्रकारच्या फॅटी ऍसिड्स मध्ये अँटीबॅक्टेरिअल आणि अँटिमायक्रोबियल गुणधर्म असतात त्यामुळे डोक्याच्या त्वचेला चांगले पोषण मिळते तसेच केसांच्या मुळाशी असलेला तैलग्रंथींचा स्त्राव नष्ट करण्यास मदत करते. ह्यामध्ये C १२ ह्या मिडीयम चेन फॅटी ऍसिड्सचे प्रमाण जास्त असते आणि त्यास लॉरिक ऍसिड असे म्हणतात. ह्यामुळे केसांमधील प्रथिनांचा ऱ्हास कमी होण्यास मदत होते. टिप्स: बाळाच्या डोक्याच्या कोरड्या त्वचेसाठी हा परिणामकारक उपाय आहे. अंघोळीच्या आधी नारळाच्या तेलाने मसाज केल्यास त्वचा उजळते आणि केसांची वाढ चांगली होते.

. डायपर रॅश साठी नारळाचे तेल

डायपरची गुणवत्ता आणि त्यामध्ये शोषली जाणारी लघवी ह्यामुळे बऱ्याच बाळांना डायपर रॅशचा सामना करावा लागतो. नारळाच्या तेलाच्या अँटीफंगल गुणधर्मांमुळे डायपर रॅश होत नाही तसेच पसरत सुद्धा नाही. नारळाच्या तेलामुळे कँडिडा अल्बिकान्स परिणामाकरित्या बरा होतो. यीस्ट डायपर रॅश नारळाच्या तेलामुळे परिणामाकरित्या बरे होते, जे भिजलेला डायपर आणि परिणाम झालेली त्वचा ह्यामध्ये कुंपण म्हणून कार्य करते.
टिप्स: प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही बाळाचे डायपर बदलता तेव्हा डायपरच्या भागात तेल लावा. मांडीचा सांधा आणि त्वचेला हलकेच मसाज करा.

. त्वचेला मॉइश्चरायझर म्हणून नारळाचे तेल

नारळाचे तेल हे व्हिटॅमिन्स आणि आरोग्यपूर्ण चरबीने समृद्ध असते आणि ते त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. टिप्स: बाळाच्या कोरड्या त्वचेवर थोडेसे तेल घालून ते त्वचेमध्ये शोषले जाईपर्यंत मसाज करा. बाळाला अंघोळ घालेपर्यंत नारळाच्या तेलामुळे त्वचेला मॉइश्चरायझर मिळते. तथापि जर त्वचा सतत कोरडी पडत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.

. बाळाच्या त्वचेवरील पुरळांसाठी नारळाचे तेल

बाळाच्या त्वचेवर काहीवेळा छोटे लाल फोड किंवा पिंपल्स येतात ज्यांना सूज येऊन खाज सुटते. त्यांना स्पर्श केल्यास संसर्ग पसरतो. बाळाच्या पुरळांवर नारळाचे तेल हा अनुभवसिद्ध उपाय आहे. नारळाच्या तेलामधील लॉरिक ऍसिडमुळे पुरळ येण्यास कारणीभूत असलेले जिवाणू मारले जातात. आणि पुरळ नष्ट झाल्यानंतरचे डाग सुद्धा नाहीसे होतात.
टिप्स: बाळाला लावण्याआधी थोडे तेल घेऊन ते हातावर चोळून घ्या त्यामुळे ते थोडे कोमट होईल. नंतर तुम्ही ते धुवून टाकू शकता किंवा तसेच ठेवू शकता. वापरण्याआधी तुमच्या बाळाच्या बालरोगतज्ञांचा सल्ला मात्र जरूर घ्या.

. बाळाच्या अन्नपदार्थांमध्ये नारळाच्या तेलाचा वापर

जर तुम्ही आधी कधीही नारळाच्या तेलामध्ये अन्न शिजवलेले नसेल, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की नारळाचे तेल वापरणे सुरक्षित आहे का? घरी केलेल्या बाळाच्या अन्नपदार्थांमध्ये नारळाचे तेल घातल्याचे बरेच फायदे होतात. हे तेल चरबी आणि ऊर्जेचा चांगला स्रोत आहे आणि खाण्यासाठी ते सुरक्षित असल्याचे समजले जाते. जर तुम्हाला ते वापरण्याबाबत काही शंका असतील तर वापरण्याआधी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. टिप्स: नेहमीच्या तेलासारखेच अन्नपदार्थ शिजवण्यासाठी तुम्ही ह्या तेलाचा वापर करू शकता.

. बाळांमधील बद्धकोष्ठतेसाठी नारळाच्या तेलाचा वापर

नारळाच्या तेलामध्ये लॉरिक ऍसिड असते आणि त्यामुळे पचन सुलभ होते आणि बद्धकोष्ठतेपासून बाळाला आराम मिळतो. टिप्स: तुम्ही बाळाच्या नाश्त्यामध्ये एक टीस्पून नारळाचे तेल मिसळू शकता तसेच पचन चांगले व्हावे म्हणून पुरेसे द्रवपदार्थ बाळ घेते आहे किंवा नाही ह्याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे. बाळाचे गुदद्वार आणि बाह्यजननेंद्रियांमधील भागावर सुद्धा तेल लावून रात्रभर तसेच ठेवा.

. बाळाच्या डोक्यावरील कोरड्या त्वचेसाठी नारळाचे तेल

बऱ्याच नवजात बालकांमध्ये क्रेडल क्र्याप किंवा डोक्याच्या कोरड्या त्वचेची समस्या आढळते. गर्भधारणेच्या शेवटी संप्रेरकांमधील बदलांमुळे अशी स्थिती होते आणि डोक्याच्या त्वचेत कोंड्यासारखे पापुद्रे आढळतात. ह्यास इंग्रजीमध्ये सेबॉऱ्हिक डेरमाटीटीस किंवा सेबॉऱ्हिया असे म्हणतात. हे बरे करण्यासाठी नारळाचे तेल जादुई काम करते.
टिप्स: तुमचे टाळूला तेल लावून झाल्यावर ते २० मिनिटे तसेच राहिले पाहिजे. नंतर बाळासाठीचा मऊ कंगवा वापरून पापुद्रे विंचरून काढावेत. पापुद्रे निघून गेल्यावर तुम्ही कोमट पाण्याने बाळाला अंघोळ घालू शकता.

१०. दात येणाऱ्या बाळांसाठी नारळाचे तेल

दात येण्याचा टप्पा बाळासाठी त्रासदायक असतो. नारळाच्या तेलामध्ये विरोधी दाहक (अँटीइंफ्लामेंटोरी) गुणधर्म असतात आणि त्यामुळे ह्या काळातील दुखणे आणि अस्वस्थता कमी होते.
टिप्स: तुमच्या बोटांनी बाळाच्या हिरड्यांवर हळूहळू मसाज करा. तुम्ही दात येताना वापरल्या जाणाऱ्या खेळण्यांवर सुद्धा थोडे तेल लावू शकता त्यामुळे बाळाला आराम पडतो.

११. बाळांसाठी नारळाचे तेल

बाळासाठी चांगला बेबी वॉश म्हणजे त्वचा स्वच्छ करणारा नव्हे तर त्वचेमधील आर्द्रता सुद्धा समतोल राखणारा हवा. दुकानातील बेबी वॉश मध्ये ऍलर्जिक घटक असू शकतात आणि त्यामुळे नारळाचे तेल बाळासाठी बेबी वॉश म्हणून वापरले जाऊ शकते. टिप्स: नारळाचे तेल आणि एरंडेल तेल समप्रमाणात घ्या आणि तुमच्या बाळाच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर सगळीकडे लावा. मसाज करा आणि नेहमीच्या अंघोळीच्या पाण्याने बाळाला स्वच्छ अंघोळ घाला. तुम्ही नारळाचे तेल, सेंद्रिय साबण आणि पाणी घेऊन अंघोळीच्या वेळेला ते त्वचेवर लावू शकता.

१२. बाळाच्या कोरड्या पडलेल्या ओठांसाठी नारळाचे तेल

भेगा पडलेले आणि कोरडे ओठ बाळासाठी वेदनादायी ठरू शकतात आणि त्यामुळे बाळास स्तनपान घेणे अवघड होऊन जाते. जेव्हा बाळ वेदना कमी होण्यासाठी ओठावरून जीभ फिरवते तेव्हा समस्या आणखी वाढते. टिप्स: तुमचे बोट तेलामध्ये बुडवून ते बोट ओठांवर आणि आजूबाजूच्या भागावर फिरवा. तुम्हाला नारळाच्या तेलाचा बाळासाठी जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही रिफाईंड तेलाऐवजी शुद्ध तेल वापरले पाहिजे. अगदी सहज उपलब्ध असलेले नारळाचे तेलाचा फायदा बाळासाठी करून घेणे हे कुठल्याही आईसाठी सहज शक्य आहे. तुमच्या बाळाला त्रास देणाऱ्या अनेक गोष्टींपासून आराम मिळावा म्हणून हे बहुउपयोगी नारळाचे ते जवळ ठेवा. जर तुमच्या कुटुंबात नारळाच्या तेलाच्या ऍलर्जीचा इतिहास असेल तर तुमच्या बाळासाठी नारळाच्या तेलाचा वापर करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved