आरोग्य

बाळाला दात येतानाची ९ लक्षणे

लहान बाळे हसताना खूप गोड दिसतात आणि जेव्हा त्यांच्या तोंडात एखादा छोटासा दात लुकलुकू लागतो तेव्हा ती आणखीनच गोंडस दिसू लागतात. जेव्हा बाळाचा पहिला दात हिरड्यांच्या बाहेर येऊ लागतो तेव्हा या प्रक्रियेला दात येणे असे म्हणतात. परंतु, ही प्रक्रिया बाळासाठी खूप वेदनादायी असते. एकदा तुम्हाला बाळाला दात येण्याची लक्षणे लक्षात आली की पुढची परिस्थती हाताळणे तुम्हाला सोपे जाईल.

व्हिडिओ: बाळाला दात येण्याची ९ सामान्य लक्षणे

https://youtu.be/AnkI5lGVqCU

लहान बाळांना दात येण्याची चिन्हे आणि लक्षणे

लहान बाळांना दात येतानाची चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेत

. चावणे

हिरड्यांमधून दात निघू लागल्यावर, हिरड्यांच्या पृष्ठभागावर दाब येतो आणि त्यामुळे हिरड्यांना त्रास होऊ लागतो. तो त्रास कमी करण्यासाठी बाळे स्वतःची खेळणी किंवा बोटे चावण्यास सुरुवात करू लागतात.

. भूक मंदावणे

दात येण्याची प्रक्रिया वेदनादायक असते आणि त्यामुळे बाळ अस्वस्थ होऊ शकते. तुम्ही फक्त बाळाच्या वेदना कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकता. ह्याचा परिणाम बाळाच्या खाण्यापिण्यावर होऊ शकतो.

. तोंडातून येणाऱ्या लाळेचे प्रमाण वाढणे

बाळाला दात येत असल्याच्या लक्षणांपैकी हे एक लक्षण आहे. ह्या कालावधीत जास्त लाळ येणे सुरू होते. त्यामुळे तुमच्या बाळाला अतिसार होऊ शकतो. त्यामुळे बाळाला डायपर रॅश होऊन बाळ आणखीनच अस्वस्थ होते. डायपर नियमितपणे स्वच्छ करा आणि जर तुम्हाला बाळाच्या शौचामध्ये पू (pus) आढळला तर तुमच्या डॉक्टरांना कळवा.

. तोंडावर पुरळ येणे

लाळ येण्याचा आणखी एक परिणाम म्हणजे तोंडाभोवतीचा भाग सतत ओला राहतो. त्यामुळे त्या भागातील मऊ त्वचेला त्रास होऊ लागतो, आणि त्या भागात पुरळ उठते. हे पुरळ तोंडाभोवती, हनुवटीवर आणि अगदी मानेच्या किंवा छातीच्या भागात असू शकते. लाळ पडते तो भाग भरपूर पुसण्याने पुरळ वाढू शकते आणि तो भाग कोरडा ठेवण्यासाठी मऊ बेबी वाईप्स वापरणे महत्वाचे आहे.

. दिसतील त्या वस्तू तोंडात घालून चोखणे

हिरड्यांवर जाणवणारा दबाव कमी करण्यासाठी तुमचे बाळ अनेक युक्त्या करून पाहू शकते. वस्तू चावण्याबरोबरच, बहुतेक बाळांची दिसतील त्या वस्तू चोखण्याची प्रवृत्ती वाढलेली दिसून येते. त्यामुळे बाळ तोंडात घालत असलेल्या वस्तू स्वच्छ असल्याची खात्री करा.

. कान ओढणे

कान, नाक आणि घसा हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत. जेव्हा दात येणे सुरू होते, तेव्हा बाळांना हिरड्यांमध्ये जाणवणारी वेदना कधीकधी कानापर्यंत जाणवू शकते. काही वेळा, कान ओढल्याने वेदना तात्पुरती कमी होऊ शकते आणि बाळाला त्याची सवय होऊ शकते. त्यामुळे बाळ सतत कान ओढण्याचा प्रयत्न करते.

. झोपेची कमतरता

हिरड्यांवरील दबाव आणि तोंडातील वेदनांमुळे बाळाला नीट झोपता येत नाही. दिवसाची आणि रात्रीची झोप नीट होत नाही आणि बाळ सतत अस्वस्थ आणि दुःखी राहते.

. चिडचिड आणि अस्वस्थता

बाळ वेदना कमी करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करते. वेदना का होत आहेत हे त्याला समजत नाही. तेव्हा तो विक्षिप्त होऊ लागतो आणि काहीही कारण नसताना रडतो. लहानसहान गोष्टींमुळे बाळांना चिडचिड होऊ लागते. काही बाळे खेळणीही फेकून देऊ शकतात. बाळाला मिठीत घ्या आणि त्याला प्रेम वाटू द्या जेणेकरून तो शांत होईल.

. दात येत असताना बाळाला ताप येणे

जेव्हा बाळाला दात येण्याच्या लक्षणांचा विचार केला जातो, तेव्हा काहीवेळा बाळाला ताप येतो आणि ते पालकांच्या लगेच लक्षात येते. हा ताप नेहमी येणाऱ्या तापसारखा खूप जास्त नसतो फक्त शरीर थोडेसे उबदार असते. बाळाच्या शरीराचे तापमान सुरक्षित मर्यादेत असल्याची खात्री करण्यासाठी थर्मामीटर वापरा. जर तापमान १००.४ अंशांपेक्षा जास्त असेल किंवा ताप दीर्घकाळ राहिल्यास, त्याचे कारण इतर आजार किंवा संसर्ग असू शकते. तुम्ही लगेच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधणे चांगले.

३ महिन्यात बाळाच्या दात येण्याच्या विविध लक्षणांमुळे तुम्हाला पुढे काय होणार आहे ह्याची कल्पना येईल. तुमच्या बाळाला आपल्याला दात येत आहे हे कळू लागेल आणि त्याला हातात येणारी वस्तू चावून बघावीशी वाटेल तसेच तो नवीन गोष्टी करून बघेल. ह्या टप्प्यावर बाळाला वेदना होतील आणि बाळ थोडे चिडचिडे होईल. थोडीशी सावधगिरी बाळगून बाळाला व्यस्त ठेवल्यास बाळाचे लक्ष दुसरीकडे वेधले जाईल आणि दात येण्याचा हा विकासाचा टप्पा लवकर पार पडेल.

आणखी वाचा:

बाळांना दात येतानाची लक्षणे आणि घरगुती उपाय अतिसार (जुलाब होणे) हे दात येण्याचे लक्षण आहे का?

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved