बाळ

बाळाच्या डोळ्यांसाठी काजळ सुरक्षित आहे का?

बाळाच्या डोळ्यात काजळ घालणे हा पारंपारिक भारतीय विधी आहे, त्यामुळे बाळ वाईट नजरेपासून दूर राहते आणि सूर्यप्रकाशाच्या तीव्र किरणांपासून बाळाला संरक्षण मिळते. काहीजणांचा असा विश्वास आहे की काजळ घातल्याने बाळाच्या डोळ्याचा आकार वाढतो, त्याचे डोळे रोगांपासून दूर राहतात आणि दृष्टी सुधारते. कधीकधी फक्त घरातील मोठे लोक सांगतात म्हणून बाळाला काजळ लावले जाते. परंतु बऱ्याच मातांच्या मनात हा प्रश्न असतो की काजळ बाळाच्या डोळ्यांसाठी सुरक्षित आहे कि नाही?

काजळ बाळाच्या डोळ्यांसाठी चांगली असते का?

जरी अनेक भारतीय कुटुंबाद्वारे नवजात बाळाला काजळ लावणे चांगले असे मानले जात असले तरी सत्य हे आहे की ही अत्यंत हानिकारक प्रथा आहे.

बाळाला काजळ लावणे का टाळावे ह्याची कारणे

नवजात बाळाच्या डोळ्यात काजळ घालण्यामागची भारतीय कुटुंबांची सामान्य श्रद्धा

बाळाच्या डोळ्यांसाठी काजळाला पर्याय काय आहे?

बाजारात मिळणारे काजळ वापरणे सुरक्षित आहे का?

ह्याचे उत्तर आहे 'नाही' - स्टोअर मधून विकत आणलेले काजळ वापरणे सुरक्षित नाही. आधी स्पष्ट केल्याप्रमाणे, बहुतेक व्यावसायिक काजळ उत्पादनांमध्ये शिसे जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे मुलांमध्ये अशक्तपणा, बुद्ध्यांक कमी होणे इत्यादी समस्या होतात. स्टोअरमधून विकत घेतलेल्या काजळातील घटकांमुळे बाळाच्या डोळ्यांना खाज सुटणे आणि डोळ्यातून पाणी येणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

बाळांसाठी घरी काजळ तयार करणे

बाळाला काजळाच्या दुष्परिणामांपासून वाचवायचे असेल आणि पारंपारिक श्रद्धा सुद्धा पाळायच्या असतील तर बाळांसाठी घरी तयार केलेले काजळ वापरणे हा एक योग्य मार्ग आहे. घरी काजळ बनविणे खूप सोपे आहे आणि त्यासाठी कोणत्याही फॅन्सी घटकांची आवश्यकता नाही. आपण घरी काजळ कसे बनवू शकता ते येथे दिलेले आहे.
आपल्याला काय पाहिजे
टीप: प्लेट आणि वाट्या वापरण्यापूर्वी त्यांचे निर्जंतुकीकरण केले आहे याची खात्री करा. कृती

काजळ बाळाच्या डोळ्यांना लावण्याशी संबंधित सामान्य समज आणि सत्यता

जरी काजळ वापराचे बरेचसे दुष्परिणाम असले तरीही लोक बाळाला काजळ लावतात. या प्रथेशी संबंधित काही मिथके आणि तथ्ये खाली दिलेली आहेत. नाही, असे होत नाही. बाळाच्या चेहर्‍याची वैशिष्ट्ये फक्त आणि फक्त गुणसूत्रांद्वारे निर्धारित केली जातात. म्हणून काजळ लावल्याने बाळाच्या डोळ्याच्या सभोवतालचे स्नायू ताणले जाऊन डोळे मोठे होणार नाहीत. या कल्पित गोष्टीस समर्थन देणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. दिवसाकाठी बाळे १८-१८ तास झोपतात, त्यापेक्षा जास्त वेळ बाळाला झोपवण्यात काही अर्थ आहे का? नाही. घरगुती काजळ कदाचित बाजारात मिळणाऱ्या काजळापेक्षा अधिक सुरक्षित असेल परंतु तरीही त्यात कार्बन आहे जो बाळाच्या डोळ्यांसाठी असुरक्षित आहे. तसेच, काजळ लावताना तुमच्या बोटामुळे बाळाच्या डोळ्याला संसर्ग होऊ शकतो. हा निव्वळ पारंपारिक विश्वास आहे आणि त्याचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही. नाही. जर हे खरे असते तर डॉक्टरांनी बाळाला काजळ लावण्यास सांगितले असते. काजळ बाळाच्या डोळ्याच्या स्वरूपात कुठलाही परिणाम करत नाही तुम्ही कुठलाही निर्णय घेतलात तरीसुद्धा बाळाची काळजी घेताना स्वच्छता पाळणे महत्वाचे आहे हे लक्षात ठेवा. तुमच्या बाळाचे डोळे नैसर्गिकरित्या सुंदर आहेत आणि काजळ लावल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते. जेव्हा आपल्या छोट्या बाळाच्या डोळ्याला धोका असेल तेव्हा जोखीम घेण्यापेक्षा त्याचा वापर टाळणे चांगले. आणखी वाचा: बाळाने तोंडात हात घालण्याची कारणे आणि उपाय आपल्या बाळाचे नाक कसे स्वच्छ करावे?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved