अन्न आणि पोषण

बाळांसाठी अद्रक – आरोग्यविषयक फायदे आणि सुरक्षिततेचे उपाय

बाळांसाठी तसेच प्रौढांसाठी आजीबाईच्या बटव्यातील सर्वात प्रसिद्ध औषध म्हणजे अद्रक. तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात आल्याचा समावेश कसा करू शकता असा विचार करत असल्यास तुम्ही योग्य ठिकाणी आहात. आपल्या बाळाला आले देताना आल्याचे फायदे आणि कोणती खबरदारी घ्यावी हे समजून घेण्यासाठी हा लेख वाचा.

बाळांना अद्रक देणे सुरक्षित आहे का?

अद्रक बाळांसाठी सुरक्षित आहे असा विश्वास आहे. तरीही, जास्त प्रमाणात घेतल्यास, त्याचा आरोग्यास अनेकदा त्रास होऊ शकतो. एकदा बाळाने ९ महिन्यांचा टप्पा पार केला आणि घनपदार्थ खाणे सुरू केले की आपण अदरक कमी प्रमाणात देऊ शकता.

अद्रकाचे पौष्टिक मूल्य

फक्त १०० ग्रॅम आल्यामध्ये, खालील प्रमाणात पौष्टिक घटक आढळतात.
घटक संख्या
व्हिटॅमिन बी- .२४ मिलीग्रॅम
रिबॉफ्लेविन .२३ मिलीग्रॅम
व्हिटॅमिन सी ४५ मिलीग्रॅम
सोडियम ४१ मिलीग्रॅम
फॉस्फोरस ९९ मिलीग्रॅम
लोह .१५ मिलीग्रॅम
फायबर ५ मिलीग्रॅम
लिपिड्स .११ मिलीग्रॅम
ऊर्जा ७५ किलोकॅलोरी
फोलेट १५ एमसीजी
नियासिन .५ मिलीग्रॅम
थायमिन .१५ मिलीग्रॅम
जस्त .४ मिलीग्रॅम
पोटॅशिअम ५५५ मिलीग्रॅम
मॅग्नेशियम २५ मिलीग्रॅम
कॅल्शियम ४४ मिलीग्रॅम
कार्बोहायड्रेट १७.२५ ग्रॅम
प्रथिने .५ ग्रॅम
पाणी ८० ग्रॅम
याव्यतिरिक्त, आल्यामध्ये कर्क्युमिन, कॅफेन, टर्पेनेस, लिमोनिन आणि इतर बरीच बायोकेमिकल संयुगे देखील असतात

बाळासाठी आल्याचे आरोग्यविषयक फायदे

बाळांमध्ये खोकला दूर करण्यासाठी आल्याचा वापर बऱ्याचदा केला जात असला तरी त्याचे इतरही फायदे आहेत

. गॅस कमी करते

वायूची किंवा गॅसची समस्या बाळांना त्रासदायक आणि अस्वस्थ करणारी असू शकते. पूर्वीपासूनच पोटाच्या समस्येवर उपचार करण्यासाठी आल्याचा वापर प्रामुख्याने पोटात वायू झाल्यावर केला जातो. बाळाला आले दिल्यास वायूचे प्रमाण कमी करण्यास मदत होऊ शकते.

. यकृत मजबूत बनवते

मानवी यकृत शरीरातील सर्वात मजबूत अवयवांपैकी एक आहे कारण ते जवळजवळ काहीही पचवू शकते. तथापि, जेव्हा बाळाचे यकृत अद्याप विकसित होत असते, तेव्हा अन्न विषबाधा होऊन त्वरित गुंतागुंत होऊ शकते. आल्याचा अर्क बाळाला दिल्यास यकृताची सहनशीलता वाढते.

. रोग प्रतिकारशक्ती वाढवते

ऋतू बदलल्यास, मुले फ्लू, सर्दी आणि खोकला यासारख्या हंगामी आजारांमुळे बळी पडतात. आल्यामुळे त्यांचा सामना करण्यास मदत होते. सर्व श्वसन समस्यांपैकी, पालक ब्रॉन्कायटीस सर्वात जास्त घाबरतात. यामध्ये, श्लेष्माला सूज येते, श्वासोच्छवासामध्ये अडचण येते. कोरडी आले पावडर, मिरपूड, लवंग पावडर आणि मध यांचे मिश्रण दिवसातून तीन वेळा बाळाला द्या त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

. डांग्या खोकल्यापासून मुक्त होतो

डांग्या खोकला हा संसर्गजन्य आहे आणि दीर्घकाळ खोकल्यामुळे फुफ्फुसांमध्ये विघटन होऊ शकते. आपल्या बाळाची श्वसन प्रणाली नाजूक आहे आणि तिला उत्तेजन देण्यासाठी काहीतरी आवश्यक आहे. आल्याचा रस आणि मध यांचे मिश्रण, अल्प प्रमाणात दिल्यास आपल्या शिशुला खोकल्यापासून बरे होण्यास मदत होते.

. प्रवास करताना होणारी मळमळ कमी करते

कार किंवा विमान प्रवास करताना बाळाला मोशन सिकनेस होऊ शकतो. जर तुमच्या बाळाला मळमळ आणि मोशन सिकनेसचा सामना करावा लागला असेल तर, थोड्या प्रमाणात आले दिल्यास उलट्या आणि ऍसिड रिफ्लक्स कमी होण्यास मदत होते.

. पोटदुखी दूर करते

आतड्यांसंबंधी वायू, पोटशूळ, किंवा पोटाच्या इतर समस्या, आल्याचा एक छोटा डोस निश्चित बरे करू शकतो. पोटाची समस्या बरी करण्यासाठी थोड्याश्या लिंबाच्या रसामध्ये आल्याचा रस मिसळा. दररोज दोन डोस घेतल्यास ह्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात.

. पचनास मदत होते

आल्यामध्ये बाळाच्या पाचन समस्यांशी प्रभावीपणे लढा देण्याची क्षमता असते. अपचन, सूज येणे आणि बद्धकोष्ठता या सर्व गोष्टी आपल्या बाळाच्या अन्नपदार्थात आल्याचा वापर करून रोखता येऊ शकतात.

तुमच्या बाळाच्या आहारात आल्याचा समावेश कसा कराल?

येथे काही पाककृती आहेत ज्यामध्ये आल्याचा समावेश आहे

. आले चहा

आल्याचे काही तुकडे घ्या आणि पाणी असलेल्या पॅनमध्ये घाला. पाणी उकळू द्या नंतर मंद आचेवर काही मिनिटे उकळी येऊ द्या. गॅस बंद करा आणि द्रव गाळा. दिवसातून दोनदा द्या.

. आले दूध

जर आपल्या मुलाने गाईचे दूध पिण्यास सुरुवात केली असेल तर तुम्ही त्यात कोरडे आले पावडर घालू शकता. मुलांना होणारा सर्दी आणि खोकला ह्यावर हा एक उत्तम उपाय आहे

.आल्याची वाफ

आल्याचे काही तुकडे पाण्यात उकळा. एकदा वाफ येण्यास सुरुवात झाल्यावर आपल्या मुलास वाफ घेण्यास सांगा. ही पद्धत बाजारात उपलब्ध असलेल्या वेपोर रबपेक्षा अधिक सुरक्षित मानली जाते.

. आले कँडी

जर तुमच्या मुलाचे वय दोन वर्षांपेक्षा मोठे असेल तर फ्लू आणि प्रवासात होणारी मळमळ ह्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तो आल्याच्या कँडीचा रस घेऊ शकतो.

तुमच्या बाळाला अद्रक देताना घ्यावयाची सुरक्षिततेची काळजी

आपल्या मुलाच्या अन्नात आले वापरण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात ठेवा: आपल्या बाळाला आल्याचे सर्व वैद्यकीय लाभ मिळतील परंतु बाळाला अदरक आहार देण्यापूर्वी आपल्या बालरोगतज्ञांची परवानगी घेण्याची आम्ही शिफारस करतो. आणखी वाचा: बाळासाठी गाजराच्या प्युरीची पाककृती – प्युरी कशी कराल? बाळासाठी भाज्यांच्या सर्वोत्तम ५ प्युरी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved