बाळ

बाळाच्या बाटल्या निर्जंतुक करणे: पद्धती आणि सुरक्षेसाठी महत्वाच्या टिप्स

गरोदरपण आणि प्रसूतीचा अनुभव हा एक असा अनुभव आहे की जो सर्वोच्च आनंदासोबत वेदना आणि तणाव सुद्धा घेऊन येतो. आतापर्यंत नऊ महिने पोटात सुरक्षित वाढवलेल्या बाळाची जबाबदारी प्रसूतीनंतर अचानक तुमच्यावर येते. ह्या बाहेरच्या जगात प्रवेश झाल्याबरोबर बाळाची बऱ्याच गोष्टींबाबत असुरक्षितता वाढते. तुमच्या बाळाची प्रतिकारप्रणाली हळूहळू विकसित होत असते आणि म्हणूनच जिवाणू आणि इतर हानिकारक गोष्टीचा बाळाच्या शरीरात प्रवेश होऊ नये म्हणून बाळाचे संरक्षण करणे जरुरी असते.

बाळाच्या बाटल्या निर्जंतुकीकरणाची कारणे

या जगात प्रवेश केल्यापासून लहान मुले बाह्य वातावरणास असुरक्षित असतात. बाटल्या निर्जंतुक करण्याची का आवश्यकता आहे ह्याची कारणे खाली दिली आहेत. बाहेरील गोष्टी शरीरात सर्वप्रथम तोंडातून जातात त्यामुळे बाळाच्या तोंडात जाणाऱ्या गोष्टीची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. निर्जंतुकीकरण केल्याने ह्या सूक्ष्मजंतूंना मारण्यास मदत होते आणि बाटली संपूर्णपणे स्वच्छ होते.

बाळाच्या बाटल्या किती वेळा निर्जंतुकीकरण कराव्यात?

प्रत्येकजण निर्जंतुकीकरण महत्वाचे आहे ह्यावर सहमत आहे, परंतु हे किती वेळा करावे ह्यावर तज्ञांचे मत भिन्न आहे. ह्या विषयवार तज्ञांची मते दोन भिन्न प्रकारात विभागली आहेत.

बाळाच्या बाटल्यांचे निर्जंतुकीकरण कसे करावे?

निर्जंतुकीकरण म्हणजे बाटल्या, झाकण, टिट्स, पॅसिफायर्स इत्यादींच्या पृष्ठभागास चिकटून राहणाऱ्या सूक्ष्मजंतूंची हत्या करण्याची प्रक्रिया होय. बाटल्यांचे निर्जंतुकीकरण वेगवेगळ्या पद्धतीने केले जाऊ शकते जसे की उकळणे, वाफवणे किंवा बाटल्या मायक्रोवेव्हमध्ये ठेवणे. वरील सर्व पद्धती तितक्याच प्रभावी आहेत त्यामुळे आपण वैयक्तिक प्राधान्य आणि उपलब्धतेच्या आधारावर निर्जंतुकीकरणाची आपली पद्धत निवडू शकता.

बाळाच्या बाटल्या निर्जंतुक करण्याच्या पद्धती

बाळाच्या बाटल्या निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही पद्धती

. उकळणे:

बाळाच्या बाटल्या निर्जंतुक करण्यासाठी उकळत्या पाण्याचा वापर करणे ही पद्धत जगभरात वापरली जाणारी सर्वात सामान्य पद्धत आहे. ही सर्वात सोपी पद्धत देखील आहे आणि असे केल्याने तुम्ही बाटलीमध्ये आईचे दूध आणि अगदी फॉर्मुला सुद्धा ठेवू शकता. परंतु, तुम्ही सर्वात प्रथम बाटली स्वच्छ करावी. उकळवून बाटलीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालील गोष्टी करा:

. रासायनिक निर्जंतुकीकरण:

खासकरुन बाळाची आहार उपकरणे निर्जंतुक करण्यासाठी निर्जंतुकीकरण रसायने बाजारात उपलब्ध आहेत ती तुम्ही खरेदी करू शकता. निर्जंतुकीकरण द्रावण तयार करण्यासाठी ही रसायने विशिष्ट प्रमाणात पाण्यात मिसळली जातात. रासायनिक निर्जंतुकीकरणासाठी खोलीच्या तापमानाचे पाणी वापरते जाते आणि म्हणून ते बाटल्यांच्या निपल्स साठी अधिक सुरक्षित असते. दीर्घकाळापर्यंत उच्च तापमानाचे पाणी वापरल्यास विघटन होऊ शकते. रासायनिक निर्जंतुकीकरण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहेः

. वाफेने (स्टीम) निर्जंतुकीकरण:

अनेक उत्पादक बाळाच्या आहाराच्या उपकरणासाठी स्टीम स्टिरिलिझरची विक्री करतात. उकळत्या पाण्याप्रमाणेच, ही प्रक्रिया हानिकारक सूक्ष्मजंतू नष्ट करण्यासाठी उष्णतेचा वापर करते. शहरी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पालकांसाठी आणि जे गॅस स्टोव्ह वापरत नाहीत त्यांच्यासाठी हा पर्याय योग्य आहे. स्टीम निर्जंतुकीकरण प्लग इन केले जाऊ शकते आणि ते विजेवर चालू शकते! आपण स्टीम निर्जंतुकीकरण खाली दिल्याप्रमाणे वापरावे.

. मायक्रोवेव्ह:

आपल्या बाळाची आहार उपकरणे निर्जंतुकीकरण करण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरल्यास ते स्टीम निर्जंतुकीकरणाच्या समान तत्त्वावर कार्य करते. तथापि, मायक्रोवेव्हच्या आतील भाग अत्यंत स्वच्छ असले पाहिजे, आणि हे घरगुती अन्न गरम करण्यासाठी नियमितपणे वापरत असलेल्या मायक्रोवेव्ह च्या बाबतीत जवळजवळ अशक्य आहे. मायक्रोवेव्हमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी या सूचनांचे अनुसरण करा:

आपल्या बाळाची बाटली निर्जंतुकीकरण करण्यासाठी काय करावे?

बाळाच्या बाटल्या निर्जंतुकीकरण करणे हे काही कठीण काम नाही. जवळजवळ, कोणीही हे करू शकते. परंतु, ते करण्यापूर्वी काही मुद्दे लक्षात ठेवायला हवेत.

सुरक्षा टिप्स

बाटल्या निर्जंतुक करताना या सुरक्षितता सूचनांची नोंद घ्या:

बाळाच्या बाटल्यांचे निर्जंतुकीकरण कधी थांबवावे?

बाळाची आहार उपकरणे दर आठवड्याला निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. जर तुमचा पाणीपुरवठा दूषित झाला असेल तर दोन किंवा तीन दिवसांत एकदा निर्जंतुकीकरण केले जाऊ शकते. आपले मूल १२ महिन्यांचे होईपर्यंत निर्जंतुकीकरण नियमितपणे करणे आवश्यक आहे. त्यानंतर, तुमच्या बाळाचे आरोग्य आणि वातावरणानुसार निर्जंतुकीकरण शिथिल किंवा पूर्णपणे बंद केले जाऊ शकते. आपल्या बाळाच्या दुधाच्या बाटल्या आणि उपकरणे निर्जंतुक करणे आवश्यक आहे. नवीनच आई बाबा झालेल्या पालकांना रात्रीची शांत झोप मिळणे अवघड होते. तुमच्यापैकी काहींनी हे ऐकले असेल तर काही जण ते अनुभवत असतील! योग्य वेळापत्रक, सुयोग्य संसाधने आणि पद्धतशीर दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही हे करू शकता! आणखी वाचा: बाळाच्या मालिशसाठी विविध तेलं
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved