दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

५२ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमचे बाळ आता अधिकृतपणे एक वर्षाचे झालेले आहे. तुमच्या लहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!. तुम्ही तुमच्या बाळाचे ह्या जगात स्वागत करून एक वर्ष झाले आहे आणि अवघ्या एका वर्षात बाळामध्ये बरेच बदल झालेले तुम्ही पाहिले आहेत. तुमच्या बाळाने विकासाचे बरेच टप्पे गाठले आहेत आणि त्याची दररोज वाढ होत आहे. तुमचे बाळ आता लहान आहे आणि बाळाचे आता स्वतःचे व्यक्तिमत्त्व आहे. जेवणाच्या बाबतीत बाळाला त्याच्या आवडी-निवडी असतील. तुम्ही त्याच्याशी बोलाल तेव्हा त्याला ते समजेल आणि लवकरच तो चालायला सुरुवात करेल. तुमचे बाळ अक्षरशः जे काही पाहते त्याकडे बोट दाखवून 'ते काय आहे?' असे विचारेल. तुमच्या बाळाच्या वयाच्या ५२ आठवड्यांत अनेक विकासात्मक बदल घडतील. ह्या लेखात त्या बदलांबद्दल जाणून घेऊयात!

तुमच्या ५२ आठवड्यांच्या बाळाचा विकास

ह्या काळात, तुमच्या बाळाच्या खाण्याच्या तसेच झोपण्याच्या सवयी बदलू शकतात. १२ ते १४ महिन्यांच्या दरम्यान बाळांना झोपेत स्वप्ने पडू लागतात. ही स्वप्ने कधी कधी तुमच्या बाळाला घाबरवतात आणि जागे करतात. अशा वेळी, तो पुन्हा झोपेपर्यंत त्याचे सांत्वन करावे. ह्या टप्प्यावर, तुमचे बाळ, आता एक लहान मूल आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा झपाट्याने विकास होत असेल. त्याची भाषा कौशल्ये जलद गतीने विकसित होत असतील आणि तो लवकरच त्याचे हावभाव समजू न शकणाऱ्या किंवा 'वाह' म्हणजे पाणी आहे हे माहित असणाऱ्या लोकांशी संवाद साधू शकेल. शारिरीकदृष्ट्या, जर तो धावताना अडखळत असेल, तर तो लवकरच धावेल, उड्या मारू लागेल आणि नाचू लागेल. त्याची स्वतःबद्दलची संकल्पना देखील अधिक मजबूत होईल, त्यामुळे त्याला अनोळखी लोकांशी संवाद साधणे किंवा इतर लहान मुलांसोबत खेळणे सोपे होईल. पण त्याला तुमचे प्रेम आणि पाठिंबा नेहमीच हवा असेल आणि ही त्याची अपेक्षा कायम राहील.

तुमच्या ५२ आठवड्यांच्या बाळाचे विकासात्मक टप्पे

खाली तुमच्या ५२ -आठवड्याच्या बाळाचे विकासाचे टप्पे आहेत. ह्या टप्प्यांकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे.

आणखी वाचा: तुमचे १२ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

बाळाचा आहार

आता तुमचे बाळ १२ महिन्यांचे झाले आहे. आता बाळ वेगवेगळे अन्नपदार्थ खात असेल परंतु तुम्ही त्याला भरवणे सुरु ठेवले पाहिजे. तुम्ही बाळाची बाटलीची सवय मोडली पाहिजे त्यासाठी त्याला रात्रीचे दूध किंवा पाणी देताना कप मधून देण्यास सुरुवात करा. ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाला विशिष्ट अन्नपदार्थांची आवड निर्माण होईल. त्यामुळे त्याला वेगवेगळे पदार्थ देण्यास सुरुवात करा. त्याच्या भुकेपेक्षा जास्त खाण्यासाठी त्याच्यावर दबाव आणू नका. त्याला जंक फूड पासून दूर ठेवा. तो पुरेसे खात नाही अशी तुम्हाला काळजी वाटू शकते परंतु काळजी करू नका. जोपर्यंत तो सामान्य दिसतो तोपर्यंत तो ठीक आहे. दूध सोडण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्याला गाईचे दूध देण्यास सुरुवात करा. दूध पाश्चराईज्ड केलेले असल्याची खात्री करा. वाढत्या वयाच्या मुलांना संपूर्ण दुधामध्ये असलेली अतिरिक्त चरबी आणि कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते.

बाळाची झोप

ह्या टप्प्यावर, तुमचे बाळ रात्रभर झोपू शकत नाही. रांगायला सुरुवात केल्याच्या एक महिना आधी आणि नंतर तीन महिने झोपेत व्यत्यय येणे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. संशोधनामध्ये असे सूचित होते की - तुमच्या बाळाला आयुष्याच्या पहिल्या वर्षभरात एकूण २३ आठवडे झोपेत व्यत्यय येईल यास इंग्रजीमध्ये फसी पीरियड्सअसे म्हणतात. मानसिक आणि शारीरिक विकास होत असल्यामुळे असे होते. तसेच बाळाचा सरासरी वाढीचा वेग वाढलेला असतो आणि बाळाला दात येत असतात. सरासरी, १२ महिन्यांच्या बाळांना त्याच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत आठ प्राथमिक दात असणे आवश्यक आहे. त्याच्या दुस-या वाढदिवसापर्यंत आणखी आठ दात येतील. म्हणजेच रात्रीच्या वेळी बाळाचे दात जास्त दुखू लागतील आणि तुमची व तुमच्या बाळाची झोप अधिक विस्कळीत होईल.

तुमच्या ५२ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्याविषयी काही टिप्स

तुम्ही तुमच्या ५२ आठवड्यांच्या बाळाची काळजी खालीलप्रकारे घेऊ शकता:

चाचण्या आणि लसीकरण

तुमचे बाळ आता एक वर्षाचे झालेले आहे. तुमच्या बाळाचा वाढदिवस तुम्ही साजरा करणार आहातच परंतु बाळाचा विकास कसा होत आहे हे पाहण्यासाठी तुम्ही त्याला बालरोगतज्ञांकडे देखील घेऊन जावे.

. चाचण्या

तुमचे डॉक्टर तुमच्या बाळाच्या वाढीचा मागोवा घेण्यासाठी त्याची उंची, वजन आणि डोक्याचा घेर मोजतील आणि त्याचा आहार, झोपेच्या सवयी आणि वर्तन ह्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारतील.

. लसीकरण

तुमच्या बाळाला त्याच्या वयाच्या ५२ व्या आठवड्यात, मागील वर्षात दिलेल्या लसीकरणाच्या बूस्टर्सची गरज भासेल. ह्यामध्ये हिपॅटायटीस ए, हिपॅटायटीस बी, एचआयबी, पोलिओ, इन्फ्लूएंझा आणि डीटॅप इत्यादी लशींचा समावेश होतो. त्याला एमएमआर आणि चिकनपॉक्स लसीच्या पहिल्या डोसची देखील आवश्यकता असेल.

खेळ आणि उपक्रम

खाली काही खेळ आणि क्रियाकलाप आहेत आणि ते तुम्ही तुमच्या लहान मुलासोबत खेळू शकता:

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

तुमच्या ५२-आठवड्याच्या बाळाच्या विकासात, तुम्हाला खालील गोष्टी लक्षात आल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या:

बाळाची काळजी घेणे सोपे नाही, परंतु तुम्ही तुमच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करा आणि थोडा आनंद सुद्धा घ्या. तुम्ही आणि तुमच्या पतीने गेल्या वर्षभरात चांगले व्यवस्थापन केले ह्याचा अभिमान बाळगा. तुमच्या बाळाने शिशुवस्थेत प्रवेश केला आह. आता तुम्ही आणखी व्यस्त होणार आहात, त्याच्याभोवती तुम्हाला धावावे लागणार आहे. परंतु आम्हाला माहित आहे की तुम्ही आणि तुमचे पती सगळे अगदी नीट पार पडणार आहात!

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved