दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

५० आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमच्या बाळाचा पहिला वाढदिवस आता जवळ आला आहे. तुमच्या बाळाने आतापर्यंत चालायला सुरुवात केलेली असेल किंवा नसेल परंतु बाळ एक वर्षाचा झाल्यावर निश्चितपणे तो शिशुवस्थेत पोहोचेल. तुमचे बाळ आता बोलू लागले आहे, जेवणाच्या वेळी योग्य अन्नपदार्थ खाऊ लागेलेले आहे, त्याच्या आवडत्या संगीताचा आणि पुस्तकांचा आनंद घेऊ लागलेले आहे आणि त्याचे व्यक्तिमत्व आता विकसित होत आहे! सरासरी १२ महिन्यांच्या बाळाचे वजन ९ किलो असते आणि आणि त्याची लांबी जवळपास ७६ सेमी असते. तुमच्या बाळाचा जन्म झाला तेव्हा त्याचे वजन किती होते याच्याशी त्याच्या आत्ताच्या वजनाची तुलना करा, आणि तुम्हाला बाळाची किती वाढ झाली आहे ते कळेल! पण, एवढेच नाही. ह्या विषयावर अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

५० आठवड्यांच्या बाळाचा विकास

ह्या टप्प्यावर बाळाच्या विकासाचे वर्णन म्हणजे चार पावले पुढे आणि एखादे पाऊल मागे असे करता येईल. काही आठवड्यांपूर्वी तुम्ही त्याला लोकांना निरोप देताना टाटा करताना पाहिले असेल,आणि तेव्हापासून त्याने पुन्हा तसे केलेले तुम्ही पहिले नसेल. परंतु, काळजी करण्याचे कारण नाही. त्याची सर्व ऊर्जा भावनिक समायोजनाकडे निर्देशित केली जात आहे असा त्याचा अर्थ होत. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर जाता, किंवा त्याची दिनचर्या अचानक बदलते तेव्हा असे होऊ शकते. टाटा करण्यासारख्या साध्या कौशल्यांसाठी त्याने वापरलेली ऊर्जा आता पूर्णपणे नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी वापरली जाते. जेव्हा तुमचे बाळ तुम्हाला चकित करण्यासाठी नवीन कौशल्य शिकत असेल तेव्हा असे होऊ शकते.

जरी तुमचे बाळ नवीन शब्द बोलत नसले तरीसुद्धा तुमच्या बाळाचा शब्दसंग्रह सुद्धा ह्या टप्प्यावर वाढेल. त्याचा मेंदू सतत नवीन गोष्टींचे निरीक्षण करत असतो आणि नवीन माहिती आत्मसात करत असतो, त्यामुळे त्याच्याशी बरोबर शब्द वापरून, पूर्ण वाक्यात बोलत राहा आणि प्रोत्साहन देत राहा. तुम्ही "आई तुझ्यासोबत बाहेर येणार आहे" ऐवजी "मी तुझ्यासोबत बाहेर येणार आहे" ह्यासारखी सर्वनाम वापरणे तुम्ही सुरू करू शकता.

५० आठवड्यांच्या बाळाचे विकासात्मक टप्पे

तुम्हाला तुमच्या बाळामध्ये वाढीचे पुढील टप्पे दिसू शकतात.

आणखी वाचा: तुमचे १२ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

बाळाचा आहार

तुमचे स्तनपान करणारे बाळ एक वर्षाचे झाल्यानंतरही स्तनपान करत राहू शकते. जर बाळाला स्तनपानाची इचछा असेल तर तुम्ही त्याला पुढाकार घेऊ देणे सुरू ठेवू शकता. काही दिवस, कदाचित विषाणू संसर्ग किंवा सर्दीमुळे, तो वारंवार स्तनपान करू शकतो, इतर वेळेला तो स्तनपान घेण्याबाबत विचलित होऊ शकतो आणि रात्री वारंवार स्तनपान घेऊ शकतो. तुमचा दूध पुरवठा त्यानुसार समायोजित होईल. तुमची इच्छा असेल तोपर्यंत तुम्ही स्तनपान चालू ठेवू शकता. तुमचे बाळ ५० आठवड्यांचे झाल्यावर, तुमचे स्तन कसे प्रतिक्रिया देतात आणि तुमच्या बाळाची आईच्या दुधाची गरज ह्यानुसार दूध पंप करायचे की नाही हा निर्णय तुम्ही घेऊ शकता. काही माता आपल्या बाळाला गाईचे दूध देऊ लागतात आणि काही स्त्रिया अंगावरचे दूध देणे सुरू ठेवतात. जर तुम्ही दूध पंप करून साठवले तर तुम्ही दूर असताना सुद्धा तुमचे बाळ कपमधून दुधाचा आनंद घेऊ शकेल. तुम्ही ही प्रक्रिया सहजपणे चालू ठेवू शकता.

बाळाची झोप

तुमचे बाळ एक वर्षांचे झाले असेल आणि तरीही तुमच्या शेजारी झोपत असेल तर आता त्याला क्रिब मध्ये किंवा वेगळ्या खोलीत झोपवावे का असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. काही कुटुंबे कॉट किंवा क्रिब ठेवून नर्सरी तयार करतात. तुम्ही तुमच्या बाळाला तिथे झोपवू शकता परंतु जर दुधासाठी बाळ रात्रीचे उठत असेल तर त्याला तुमच्या बाजूला ठेवणे तुम्हाला सोपे जाईल. तुमच्यासाठी जी पद्धत योग्य आहे ती तुम्ही करत राहू शकता आणि बेडरुममधून हॉलमध्ये आणि नंतर हळूहळू वेगळ्या रूम मध्ये तुम्ही बाळाची कॉट ठेवू शकता. तुमच्या बाळाला एका वेगळ्या खोलीत कॉटवर हलवल्यानंतर काही दिवस तुम्ही जमिनीवर गादी टाकू शकता आणि बाळाला सवय होईपर्यंत त्याच्या शेजारी झोपू शकता. नवीन खोलीत समान प्रकाश, आवाज आणि वातावरण असल्यास तुमच्या बाळाला अधिक आराम वाटू शकतो.

५० आठवड्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ह्याविषयी काही टिप्स

तुम्ही तुमच्या ५० आठवड्यांच्या बाळाची काळजी घेऊ शकता असे काही उपाय खाली दिलेले आहेत.

चाचण्या आणि लसीकरण

तुमचे बाळ एक वर्षाचे होत असल्याने डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाण्याची ही वेळ आहे.

. चाचण्या

तुमचे डॉक्टर तुमच्या बाळाची मोजमापे घेतील आणि बाळ त्याच्या वयानुसार विकासाचे टप्पे गाठत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्याची शारीरिक तपासणी करतील. तो बोलतोय की नाही, इशारा करतोय का, चालतोय का हे सुद्धा डॉक्टर बघतील.तुमचे बाळ किती शब्द बोलू शकते असे तुमचे डॉक्टर विचारू शकतात म्हणून ते शब्द मोजा आणि एक ढोबळ संख्या लक्षात ठेवा.

. लसीकरण

ह्या टप्प्यावर घेतल्या जाणाऱ्या बहुतेक लशी ह्या तुमच्या बाळाला पूर्वी मिळालेल्या लसीकरणासाठी बूस्टर असतात. ह्यामध्ये हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस ए, पोलिओ, हिब, डीटीएपी तसेच एमएमआर आणि चिकनपॉक्ससाठी प्रथम डोस ह्या लसी समाविष्ट आहेत.

खेळ आणि उपक्रम

खाली काही खेळ आणि क्रियाकलाप आहेत हे खेळ तुम्ही तुमच्या लहान बाळासोबत खेळू शकता:

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

खालील गोष्टी आढळल्यास आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा:

ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन अचानक कमी होत असल्यास, ताण घेऊ नका. लहान मुलांसाठी वयाच्या एक वर्षापर्यंत वजनापेक्षा जास्त उंची वाढणे सामान्य आहे.

तुमच्या ५० आठवड्यांच्या बाळाचा अपेक्षेप्रमाणे विकास होत आहे का किंवा तुम्हाला काही वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे का हे जाणून घेण्यास ही मार्गदर्शक तत्वे मदत करतील. लक्षात ठेवा, प्रत्येक बाळाची विकासाची गती वेगळी असते. म्हणूनच, जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या वाढीमध्ये थोडासा विलंब दिसला, तरीही ते ठीक आहे. गंभीर विकासात्मक समस्यांसाठी मात्र तुम्ही त्वरित वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved