नवजात बाळ सगळ्याच गोष्टी पहिल्यांदा करत असते. तुम्हाला आठवत असेल की तुमच्या बाळाने पहिल्यांदा बसण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्यांदा त्याने स्वतःचे संपूर्ण जेवण संपवले होते. पहिल्यांदा बाळ स्वतःचे स्वतः उभे राहून चालू लागले होते. परंतु, जसजसा तुमच्या बाळाचा पहिला वाढदिवस जवळ येतो, तसतसे तुम्हाला बाळाच्या वाढीच्या कुठल्या लक्षणांवर लक्ष ठेवावे ह्याची उत्सुकता असेल. तुम्ही तुमच्या बाळाच्या आयुष्यातील ह्या मौल्यवान क्षणांपैकी एकही क्षण गमावू नये.
व्हिडिओ: ११ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे
https://youtu.be/lZJMNHZYDFg
११ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे
गाठलेले विकासात्मक टप्पे |
वेगाने होणारे विकासात्मक टप्पे |
बाळ तुमच्या हाताचा आधार घेऊन घरभर फिरेल. |
कदाचित तुमचा हात सोडून स्वतंत्रपणे चालू सुद्धा लागेल. काही वेळा बाळ फर्निचरवर चढण्याचा प्रयत्न करत असल्याचे तुम्हाला आढळेल. |
ब्लॉक खेळणी एकत्र ठेवण्यासाठी तो त्याच्या बोटांचा वापर करेल. |
बाळाची बोटांचा वापर करण्याची क्षमता सुधारेल. चमच्याने खाण्यासारखी अवघड कामे तो करू लागेल. |
फळे, मांस आणि दुग्धजन्य पदार्थ यासारख्या घन पदार्थांकडे तो वळेल. |
बाळाला चव आणि आवडीनिवडी कळू लागतील. म्हणजेच आता त्याला दिलेले अन्नपदार्थ तो खाणार नाही. |
तो होय आणि नाही यांसारखे काही शब्द बोलण्यास सक्षम असेल. |
बोलण्यात प्रभुत्व मिळवू लागेल आणि कालांतराने तुमच्या प्रश्नांची देऊ लागेल |
स्रोत: https://www.webmd.com/parenting/baby/baby-development-11-month-old#1
11 महिन्यांच्या वयापर्यंत बाळाने कोणते टप्पे गाठले पाहिजेत?
बाळाच्या विकासाचे तीन मुख्य विभागांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते: शारीरिक विकास (मोटर कौशल्ये), संज्ञानात्मक विकास तसेच सामाजिक व भावनिक विकास होय. ह्या वयात लहान मुले झपाट्याने वाढतात आणि आणखी वेगाने शिकतात. ह्या मुलांनी आता अधिक स्वतंत्र होण्याचा निर्धार केला आहे आणि ते आणखी बरेच प्रयोग करू लागतील, कारण ते आता एका विशिष्ट मर्यादेपर्यंत स्वतःहून फिरू शकतील.
1 . शारीरिक आणि मोटर कौशल्ये
येथे आपण 11 महिन्यांच्या मुलाची शारीरिक आणि मोटर कौशल्ये कशी विकसित होतात ते पाहू.
- तुमचे बाळ वस्तूंपर्यंत पोहोचण्यासाठी आपली स्थिती बदलण्यास शिकू लागते.
- तुमचे बाळ सुरुवातीला डळमळीत वाटू शकते, परंतु आता ते कोणत्याही आधाराशिवाय उभे राहण्यास शिकू लागेल.
- “क्रूझिंग” हा शब्द आधार घेऊन चालायला शिकणाऱ्या बाळाचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो.
- या वयातील बाळांना सर्व पायऱ्या चढता येणार नाहीत, परंतु पुरेसा वेळ दिल्यास बाळ काही पायऱ्या चढू शकेल.
- या टप्प्यावर, तुमच्या बाळाची मोटर कौशल्ये आणि स्नायूंची क्षमता चांगली विकसित झाली आहे आणि आता त्याची वस्तूंवर चांगली पकड आहे.
2. संज्ञानात्मक विकास
तुमच्या 11 महिन्यांच्या बाळाचा खालीलप्रमाणे विकास होणे अपेक्षित आहे
- या वयात, बाळे ज्या लोकांशी नियमित संवाद साधतात त्या लोकांची आणि वस्तूंची नावे शिकायला सुरुवात करतात.
- या टप्प्यावर लहान बाळे त्यांची स्थानिक कौशल्ये विकसित करत असतात. ह्याच टप्प्यावर लहान बाळे वस्तूंचे आकार पाहण्यास शिकतात आणि नंतर त्यांना हाताळण्यास सुद्धा शिकतात.
- आपल्या लहान बाळाला त्याचा कप कसा वापरायचा हे समजू लागते. बाळ कप उचलून तोंडाला लावू लागते. बाळाला कंगवा दिसल्यास तो उचलून डोक्याला लावू लागतो. बाळ सर्व गोष्टी शिकू लागते.
- तुमचे बाळ आता काही गोष्टींबद्दल आपली नापसंती व्यक्त करण्यास सक्षम असेल. उदाहरणार्थ, जर तो जेवणाचा आनंद घेत नसेल तर तो “नाही” म्हणण्यासाठी मान हलवून दाखवेल.
3. सामाजिक आणि भावनिक विकास
तुमच्या मुलामध्ये त्याच्या सामाजिक आणि भावनिक विकासाशी संबंधित असलेले टप्पे येथे आहेत.
- तुमच्या बाळाला आता फक्त आई कोण आहे आणि दादा कोण आहे हे माहित आहे आणि परिस्थितीनुसार त्याला कोणाची गरज आहे हे देखील कळेल.
- जरबाळाभोवती खूप लोक असतील तर अनेकदा बाळ त्यांच्याकडे पाहून हसेल. ओळखीच्या लोकांकडे पाहून हसेल आणि त्यांच्याकडे जाईल. अनोळखी लोकांकडे पाहून बाळ घाबरेल आणि त्यांच्याकडे जाणार नाही.
- तुमचे बाळ आता विविध प्रकारच्या भावना दर्शवू लागेल. एखादी परिस्थिती त्याला आवडत नसेल किंवा बाळाच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट केल्यास त्या कृतीचा परिणाम त्याला आवडणार नाही आणि त्याला राग येईल. अश्या प्रकारच्या कृतीचे उदाहरण द्यायचे झाले तर बाळाला झोपवण्यासाठी त्याची खेळणी काढून घेणेइत्यादी.
- या वयातील मुले सहसा स्वतःचे स्वतः एखाद्या खेळात गुंततात.दुसऱ्या मुलांसोबत खेळत नाहीत.
4. संभाषण कौशल्य
या वयात तुमच्या बाळाचा विकास होत असलेली काही संवाद कौशल्ये खाली दिलेली आहेत -
- तुमचे बाळ त्याच्या कृतीतून त्याच्या इच्छा दाखवण्यास शिकेल.
- या वयात, मुले संवाद साधू शकतील.
- तुमचे बाळ आता अनेक कृतींचे अनुसरण करू शकते. तसेच तुमच्या आणि तुमच्या पतीच्या काही अभिव्यक्ती आणि शब्दांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न देखील करू शकते.
- तुमचे बाळ आता "कृपया मला तो ब्लॉक देऊ शकाल का?" यासारखे साधे विनंतीवजा संवाद साधू शकतील.
5. आहाराचे टप्पे
तुमचे बाळ ह्या वयात खालील विकासाचे टप्पे गाठेल
- तुमचे बाळ स्वतः त्याच्या बोटांनी खाण्यास सुरुवात करेल आणि चमच्याने खाण्याचा सुद्धा प्रयोग करेल.
- आता, त्याच्या चवीचीभावना विकसित होण्यास सुरवात होईल.
- तो प्युरी केलेल्या किंवा मॅश केलेला घन पदार्थांचा अधिक वैविध्यपूर्ण आहार खाण्यास सुरुवात करू शकतो.
- काही नवीन अन्नपदार्थ दिल्यास बाळ ते खाण्यास नकार देईल. ते अंगवळणी पडण्यापूर्वी त्यांना किमान आठ ते बारा वेळा नवीन अन्नपदार्थ देण्याचा प्रयत्न करा.
केव्हा काळजी करावी?
तुमच्या बाळाच्या विकासादरम्यान खालील काही गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचे आहे -
- या वयात, बाळ उभे राहिले पाहिजे आणि किमान त्याने पहिले पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे, जर तुमच्या बाळाने अजून रांगायला सुरुवात केलेली नसेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेट देऊ शकता.
- लहान मुले सर्व काही लवकर शिकतात आणि जर तुम्ही या वयात त्यांना मदत केली तर बाळ उभे राहू शकेल. तथापि, जर तुमच्या लक्षात आले की बाळाचे पाय सैल पडले आहेत आणि थरथर कापत आहेत आणि बाळ स्वतःचे स्वतः उभे राहू शकत नसेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- या वयाची मुले बडबड करू लागतात आणि तुम्ही जे बोलता त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. जर तुमचे बाळ एकही शब्द उच्चारत नसेल तर तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागेल.
- जर तुम्ही तुमच्या बाळाला बंद दारातून हाक मारली तर तुमचे बाळ लगेच तुमच्या आवाजाच्या दिशेने बघेल.जरी तो तुम्हाला पाहू शकत नसला, तरी तुम्ही तिथे आहात हे त्याला माहीत असल्याने तो बघतच राहील. यासाठी बाळाच्या सर्व संवेदनांनी सुसंगतपणे कार्य करणे आवश्यक आहे. जर तुमचे बाळ गोंधळलेले दिसत असेल, तर त्याचे संवेदनाक्षम कार्य खराब असू शकते, आणि ते चांगले लक्षण नाही.
तुमच्या बाळाला हे टप्पे गाठण्यात मदत करण्याचे मार्ग
काही सोप्या चरणांसह तुमच्या 11 महिन्यांच्या बाळाला विकासाचे टप्पे गाठण्यास मदत करा:
- त्याच्याशी अशा प्रकारे खेळा की ज्यामुळे तो सराव करू शकेल आणि त्याची नवीन कौशल्ये विकसित करू शकेल. समाजीकरण करण्यासाठी त्याला उद्यानात घेऊन जा.
- तुमच्या बाळाला स्वतःचे केस विचारण्याची परवानगी द्या किंवा त्याला स्वतःचे स्वतः खायची परवानगी देऊन स्वतंत्र करण्यास मदत करा.
- रंगीबेरंगी चित्रे असलेली साधी गोष्टीची पुस्तके बाळाला वाचून दाखवा. तुमचे बाळ तुम्ही त्याच्या पुस्तकांमध्ये दाखवलेल्या ओळखीच्या चित्राचे नाव सांगण्याचा प्रयत्न करू शकते. स्मरणशक्ती आणि भाषण विकसित करण्यास त्यामुळे मदत होते.
- तुमचा लहान बाळ आता शब्द आणि कृतीची सांगड घालू शकते. आणि तुमच्या संभाषणातून बाळाचे बोबडे बोलणे कमी करणे महत्त्वाचे आहे. ह्यामुळे तुमच्या बाळाचा मूलभूत शब्दसंग्रह सुधारण्यास आणि वाढण्यास मदत होईल.
नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक बाळ हे त्याच्या सोयीनुसार विविध टप्पे गाठेल. जोपर्यंत तुम्हाला काळजी करण्याजोगी कुठलीही लक्षणे आढळत नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या नियमित भेटींसाठी जाणे आवश्यक आहे. तुमच्या रोजच्या साध्या क्रियाकलापांमधून बाळाला मदत करा.
आणखी वाचा:
१० महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे
तुमच्या १२ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास