दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

1 वर्षाच्या बाळाचे विकासाचे टप्पे

हा कालावधी म्हणजे बाल्यावस्थेचा शेवट आणि लहानपणाची सुरुवात आहे. तुमच्या बाळाने गेल्या वर्षभरात नवजात बाळ ते एक लहान मूल असा झपाट्याने विकासात्मक प्रवास केला आहे.

व्हिडिओ: 1 वर्षाच्या बाळाचे टप्पे

https://youtu.be/V5qXWopE_xw

12 महिन्यांच्या बाळाच्या वाढीचा तक्ता

गाठलेले विकासात्मक टप्पे वेगाने होणारे विकासात्मक टप्पे
आधार घेऊन उभे राहता येते आधाराशिवाय उभे राहू शकते
एकटे काही पावले टाकू शकतात लांब अंतर एकटे चालू शकतात
साधे शब्द बोलू शकतात साधी वाक्ये बोलू शकतात
कृतीचे अनुकरण करू शकतात कृती लक्षात ठेऊन स्वतःची स्वतः करू शकतात
साध्या सूचनांना प्रतिसाद देऊ शकतात अवघड सूचना समजू शकतात.
आवाजाची नक्कल करू शकतात आवाज आणि त्याचा स्रोत लक्षात ठेवू शकतात
वस्तूचे शेवटचे ज्ञात ठिकाण लक्षात ठेवू शकतात वस्तू त्यांच्या योग्य ठिकाणी ठेवू शकतात
वस्तू पकडण्यासाठी हातांचा वापर करू शकतात
वस्तू पकडण्यास आणि उचलण्यास सक्षम असतात
तर्जनीचा वापर करू शकतात सर्व बोटांवर अधिक नियंत्रण आहे
हात आणि डोळ्यांचा समन्वय चांगला असतो
हात/डोळे /पाय यांचा समन्वय विकसित केला आहे

1 वर्षाचे होईपर्यंत बाळाने गाठले पाहिजेत असे विकासाचे टप्पे

तुमच्या बाळाने अखेर एक वर्षाचा टप्पा गाठला आहे! तो आता स्वतःचे स्वतः फिरू शकतो, स्वतःचे स्वतः खाऊ शकतो. ओळखीच्या गोष्टी आणि लोकांकडे निर्देश करू शकतो आणि मूलभूत सूचना देखील समजू शकतो. तुमचे बाळ दिवसा कमी झोपण्यास सुरुवात करेल, रात्री कमी वेळ झोपेल . या वयातील बहुतेक मुलांना दुपारच्या वेळी झोपेची गरज भासते, परंतु त्यांना यापुढे सकाळी झोपण्याची गरज भासणार नाही. त्यांच्या आहाराचे प्रमाण देखील बदलते. आधी मुख्यतः दूध आणि मऊ अन्न खाणारे बाळ आता घन पदार्थ खाऊ लागते. परंतु हे घनपदार्थ बाळाला खाण्यासाठी सहज सोपे असले पाहिजेत, जसे की टरबूज (बिया नसलेले), आंबा, केळी आणि पपई इत्यादी. अशा प्रकारे, आपण पौष्टिक नाश्त्यासाठी फळांचा एक वाडगा घेऊ शकता. ही फळे बाळे खाऊ शकतील. इतर क्षेत्रात सुद्धा बाळाचा विकास होण्यास सुरुवात होईल. त्याची चर्चा आपण खालीलप्रमाणे करूयात.

1. संज्ञानात्मक विकास

संज्ञानात्मक विकासाच्या अंतर्गत तुमच्या बाळाचे विचार आणि मेंदूचे एकूण कार्य समाविष्ट असते. तुमच्या बाळाने एका वर्षाच्या आत केलेला संज्ञानात्मक विकास खाली दिलेला आहे.

2. शारीरिक विकास

तुमच्या बाळाची शारीरिकदृष्ट्या वाढ होते आहे आणि ज्या वस्तू हाताळण्यासाठी कौशल्य अपेक्षित आहे अश्या वस्तू बाळ आता हाताळू शकते. खाली दिलेल्या बाळाच्या शारीरिक विकासाच्या लक्षणांवर लक्ष ठेवा.

3. भाषा आणि संप्रेषण कौशल्ये

तुमच्या बाळाला आता संवाद कसा साधायचा हे शिकण्यात खूप रस असेल. ह्या वयात बाळ खूप प्रगती करेल. तुमचे बाळ करू शकेल अश्या काही गोष्टी खाली दिलेल्या आहेत -

4. सामाजिक आणि भावनिक विकासाचे टप्पे

तुमच्या बाळाचा स्वभाव आणि त्याच्या भावना व्यक्त करण्याची क्षमता आता विकसित होऊ लागेल. ह्या लक्ष देण्यासारख्या काही गोष्टी आहेत:

केव्हा काळजी करावी?

प्रत्येक मुलाचे विकासाचे टप्पे गाठण्याचे वेळापत्रक वेगवेगळे असते. त्यामुळे प्रत्येक मुलाला विकासासाठी कोणतीही जबरदस्ती करू नका. परंतु काही लक्षणे अशी असतात की ज्याद्वारे बाळाच्या विकासाविषयी  प्रश्न निर्माण होऊ शकतो. तुम्हाला खालीलपैकी काही लक्षणे आढळल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

आपल्या मुलाला टप्पे गाठण्यासाठी मदत करण्याचे मार्ग

विकासाचे टप्पे गाठण्यासाठी बाळाला जबरदस्ती करणे योग्य नाही. तुमच्या मुलाचा जलद आणि सुलभ विकास होण्यासाठी तुम्ही दररोज काही गोष्टी करू शकता. येथे काही उपाय  आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या बाळाला 1 वर्षांचे टप्पे गाठण्यात मदत करू शकता: आतापासून, तुमचे बाळ सतत इकडे तिकडे फिरत राहणार आहे, त्याच्या सभोवतालच्या जगाचा शोध घेत आहे आणि शिकत आहे. तो हातातील वस्तू टाकून प्रयोग करण्यास सुरवात करेल आणि कदाचित तुमचे ऐकण्यास नकार देईल. ह्याचे कारण म्हणजे त्याचा जिज्ञासू स्वभाव होय. तुम्हाला तुमच्या बाळाला काही क्रियाकलाप करू नकोस असे सांगावेसे वाटत असेल तर तुम्ही एकटे नाही. हे तुमच्या मुलासाठी शोध घेण्याचे आणि शिकण्याचे वय आहे. काही धोका नसेल तर मुलांना वेगवेगळे क्रियाकलाप शोधू द्या. त्याऐवजी, ते एक्सप्लोर करत असताना जवळ रहा. ते करू शकतील आणि करू शकणार नाहीत अशा गोष्टी त्यांना हळूवारपणे शिकवा आणि संयम ठेवा. आणखी वाचा: तुमच्या ११ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास १३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved