अन्न आणि पोषण

९ महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय

पालकत्वाच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आपल्याकडे माहितीचे खूप पर्याय असतात तसेच बरेच जणांकडून वेगवेगळे सल्ले सुद्धा मिळत असतात. रात्रीची जागरणे, वारंवार बाळाची नॅपी बदलणे, बाळाला पोषक आहार भरवणे ह्या सगळ्याचे दडपण येऊ शकते त्यामुळे हे दिवस सोपे नसतात. इथे काही पर्याय, टिप्स आणि पाककृती आहेत, ज्यामुळे तुम्ही आणि तुमचं बाळ आनंदी राहू शकाल.

९ महिने वयाच्या बाळाने किती अन्न खाल्ले पाहिजे?

सुरुवातीला तुम्ही जे पदार्थ बाळाला भरवाल, बाळ ते सर्व पदार्थ खाणार नाही परंतु नवीन पदार्थ आणि स्वाद ह्यामुळे बाळाला वेगवेगळ्या चवीची ओळख होईल. नव्याने पालक झालेल्या बऱ्याच जणांना सुरुवातीच्या काळात  बाळाला काय आणि किती खायला द्यावे ह्याचा ताण येतो. पण हे लक्षात घेतले पाहिजे की असा काही नियम नाही त्यामुळे उगाचच बाळाला काय खायला द्यावे, ह्याचा ताण न घेता अन्न पोषक आणि नैसर्गिक असले पाहिजे हे मात्र जरूर ध्यानात ठेवले पाहिजे. ह्या वयाची बाळे साधारणपणे १/२ टेबलस्पून ते एक संपूर्ण चमचाभर अन्नपदार्थ खातात. तुमच्या बाळासाठी हा नवीन अनुभव असल्याने, बाळ ते अन्न थोडंसं चाटून बघेल आणि चव न आवडल्यास  थुंकून टाकेल. एक लक्षात असुद्या की बाळाचे पोट हे हाताच्या मुठीएवढे असते, आणि ते भरायला खूप अन्नाची गरज नसते. तसेच त्यांच्या स्वादकलिका (Test Buds) अजून विकसित होत असल्याने त्यांना तुम्ही देत असलेले सगळेच अन्नपदार्थ आवडतीलच असे नाही. काही बाळांना भाज्या आवडतील, तर काही बाळे अन्नपदार्थांचा पोत सुद्धा लक्षात घेतील. काहींना प्युरी आवडेल, काहींना कुस्करलेले अन्नपदार्थ आवडतील तर काहींना छोटे छोटे घास आवडतील. त्यामुळे आपल्या बाळाला काय आवडते हे तुम्ही प्रयोगातून जाणून घेऊ शकाल. बाळाला स्तनपानातून आणि फॉर्मुला दुधातून आवश्यक पोषणमूल्ये मिळतात हे विसरू नका. तुम्ही बाळाला दुधाबरोबरच दिवसातून तीन वेळा घनपदार्थ देत आहात ह्याची खात्री करा.

९ महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम अन्नपदार्थ

बाळास नवीन अन्नपदार्थांची ओळख करून दिल्यास बाळ ते खाण्यास नकार देऊ शकते. त्यामुळे अन्नपदार्थांची ओळख करून देताना उत्तम आणि चविष्ट अन्नपदार्थ देणे जरुरीचे आहे. तुम्ही तुमच्या ९ महिन्यांच्या बाळाला खालील पदार्थ देण्यास सुरुवात करू शकता.

१. फळे

ब्लूबेरीज, कॅनबेरीज, खजूर, अंजीर तसेच लिंबूवर्गीय फळे ह्यांचे १/४ तुकडे करून तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता. बाळाला देण्याआधी ते संपूर्णतः शिजवलेले आहेत ह्याची खात्री करा आणि त्याची प्युरी करून किंवा कुस्करून तुमच्या बाळाला द्या.

२. भाज्या

ब्रोकोली, बटाटे, वांगी, फ्लॉवर, बटाटे, कांदे, मुळा हे सगळे शिजवून आणि कुस्करून बाळाला द्या.

३. मांस आणि अंडी

अंडी, चिकन, मासे स्वच्छ करून, शिजवून बाळाला देऊ शकता. कच्चे मांस आणि अंडी बाळाला देऊ नका.

४. पाणी आणि ज्यूस

तुमच्या बाळाची पंचनसंस्था ही विकसित होत असते, त्यामुळे बाळाला भरपूर पाणी द्या. प्रक्रिया केलेल्या ज्यूस पेक्षा घरीच नैसर्गिकरित्या (साखर न घालता) ज्यूस तयार करा.

५. चीझ आणि इतर दुग्धजन्य पदार्थ

थोडंसं क्रिम चीझ, कॉटेज चीझ किंवा पनीर, दही, तूप आणि लोणी तुमच्या बाळाला देऊ शकता.

६.सिरिअल

धान्य, मऊ पास्ता, तांदूळ आणि ओटमील हे बाळाला देण्यासाठी काही चविष्ट पर्याय आहेत.

७. धान्य

टोस्ट, पोळीचे छोटे तुकडे, चपाती, ब्रेड इत्यादी पदार्थ बाळास द्या.

८. शेंगा

मसूर आणि बीन्स चे सूप तुम्ही बाळाला देऊ शकता.

९. मसाले

जसजशी तुमच्या बाळाची चव विकसित होईल, तसे लवंग, कोथिंबीर, मोहरी, कढीपत्ता, दालचिनी, हळद, लसूण आणि विलायची हे पदार्थ त्यांच्या अन्नपदार्थात घाला.

९ महिन्यांच्या बाळासाठी आहार तक्ता / जेवणाची योजना

बाळाचे अन्न मऊ आहे आणि ते बाळाच्या घशात अडकणार नाही ह्याची खात्री करा. तसेच तुम्ही बाळाला जेवणाच्या वेळी आणि नाश्त्याला काय देऊ शकता ह्याचे इथे सविस्तर वेळापत्रक दिले आहे.
दिवस न्याहारी * सकाळचा नाश्ता* दुपारचे जेवण * संध्याकाळचा नाश्ता * रात्रीचे जेवण *
सोमवार गरम डोसा व्हेज सूप पोंगल सफरचंदाचे काप घरी तयार केलेलं सेरेलॅक
मंगळवार रव्याची खीर उकडलेले अंडे गाजराची खिचडी द्राक्षे साधी खिचडी
बुधवार मऊ इडली मॅश केलेले पेअर रोटी/ फुलक्याचे तुकडे आणि पनीर पपई बदाम घालून केलेली गव्हाची खीर
गुरुवार ओट्स पॅनकेक ब्रेडस्टीक्स तूप भात चिकू मॅश नाचणीची लापशी
शुक्रवार राईस सीरिअल पंपकीन रवा स्टिक्स वेगवेगळ्या चवीचा भात गाजराचे तुकडे सफरचंद आणि ओट्स ची खीर
शनिवार गव्हाची खीर दही भाज्या घालून खिचडी फ्रोझन केळं चिकन सूप
रविवार कुस्करलेल्या केळ्याचा पॅनकेक ब्लूबेरी/ चेरी टोमॅटो खिचडी / भाज्या घालून केलेला भात रताळ्याचे तुकडे ब्राउन राईस सीरिअल
*स्त्रोत: https://www.mylittlemoppet.com/diet-chart-for-9-month-babies-2/ *बाळाला अगदी थोडे थोडे अन्न द्या आणि बाळाला कुठली चव आवडते किंवा किती भूक आहे त्यानुसार प्रमाण वाढवा. बाळाला अन्न संपवण्यास जबरदस्ती करू नका.

टाळावयाचे अन्नपदार्थ

बाळाला स्वच्छ आणि ताजे अन्न देणे हे अतिशय महत्वाचे आहे. दक्ष रहा नि अन्नाचा पोत ओळखा जो आपल्या बाळाला त्याच्या आहारात समाविष्ट झालेला आवडेल. आता तुमचे बाळ आनंदाने तुमच्या कुटुंबासोबत जेवेल, इथे काही पदार्थ आहेत जे तुम्ही टाळले पाहिजेत.

१. मध

मधामध्ये काही जिवाणू आहेत ज्यामुळे बाळाला गंभीर आजार होऊ शकतो, त्यामुळे बाळाच्या पोटाला इजा होऊन "Infant Botulism" नावाचा गंभीर आजार होऊ शकतो. तसेच बाळाच्या नवीन येणाऱ्या दातांना सुद्धा त्याने इजा पोहचू शकते.

२. मासे

शार्क, स्वार्डफिश किंवा मर्लिन मध्ये पाऱ्याचे खूप जास्त प्रमाण असते, त्यामुळे बाळाच्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो. तसेच अन्नाविषबाधा होऊ नये म्हणून शेलफिश टाळा.

३. सुकामेवा

बाळ ५ वर्षांचे होईपर्यंत त्याला सुकामेवा देऊ नका, कारण तो घशात अडकण्याची शक्यता असते.

४. साखर

बाळाच्या दातांसाठी गोड पदार्थ चांगले नाहीत. ह्यामध्ये आईस्क्रीम, बिस्किट्स आणि गोड पदार्थांचा समावेश आहे.

५. मीठ

बाळाच्या अन्नामध्ये मीठ घालू नका कारण बाळाची मूत्रपिंडे नाजूक असल्याने मीठ घातलेल्या अन्नपदार्थांमुळे त्यांच्यावर ताण येण्याची शक्यता असते. त्यामुळे मीठ असलेले पदार्थ जसे की नमकीन, चिप्स वगैरे टाळा. बाळांनी १ ग्रॅम च्या पेक्षा कमी मीठ खाल्ले पाहिजे.

६. आंबट आणि आम्लयुक्त फळे

काही अर्भकांना ह्या आंबट फळांमुळे ऍसिडिटी होऊ शकते. तथापी थोडे लिंबू, प्युरी मध्ये पिळून देऊ शकता.

७. शेंगदाणे आणि बिया

ह्या अन्नपदार्थांमुळे बाळांना ऍलर्जी होऊ शकते. साधारणपणे एक वर्षांवरील बाळाला तुम्ही हे देऊ शकता.

८. संपूर्ण दूध

दुधामुळे पोट बिघडू शकते, स्तनपानासोबत ते कधीही देऊ नका. तसेच त्यामुळे लोह शोषण रक्तामध्ये नीट होत नाही आणि बाळाच्या वाढीसाठी हे चांगले नाही.

तुम्ही बाळाला फिंगर फूड आणि स्नॅक्स देऊ शकता का?

९ महिन्यांचे बाळ, फिंगर फूड आणि स्नॅक्स घेण्याजोगे असते, त्यांना ह्या वयात अंगठा आणि तर्जनी च्या साहाय्याने छोट्या वस्तू उचलण्याचे कौशल्य आत्मसात होते. जर तुमचे बाळ छोट्या छोट्या गोष्टी अंगठा आणि तर्जनी च्या साहाय्याने कुठल्याही मदतीशिवाय उचलत असेल आणि अन्नाचे छोटे तुकडे चावून खाऊ शकत असेल तर तुमच्या ९ महिन्यांच्या बाळाला फिंगर फूड ची ओळख करून देण्याची गरज आहे. ते पुढीलपैकी काहीही असू शकते, जसे की शिजवलेले गाजर, सफरचंद, पेअर, काकडी, पनीर वगैरे, जे बाळ दातांनी चावून खाऊ शकते. तुम्ही ह्याचे छोटे छोटे तुकडे करून बाळाच्या हातात खाण्यासाठी देऊ शकता. फिंगर फूड देताना काळजी घ्या आणि तुमच्या बाळाला कधीही एकटे सोडू नका. जर बाळ वरील गोष्टी बोटात धरू शकत नसेल तर फिंगर फूड देण्यास १ ते २ महिने वाट पहा. जेवणाच्यामध्ये तुम्ही एक किंवा दोन नाश्त्याचा समावेश करू शकता. थोड्या थोड्या अंतराने थोडे अन्न दिल्यास बाळाला हा बदल भविष्यात सुकर होईल. स्तनपानावर ह्याचा परिणाम होणार नाही ह्याची खात्री करा.

९ महिन्यांच्या बाळासाठी घरी तयार करता येतील अशा पाककृती

इथे काही पाककृती दिल्या आहेत ज्या तुम्हाला तुमच्या बाळासाठी घरी करता येऊ शकतील.

१. भोपळा आणि थाईम प्युरी

ही अगदी साधी पाककृती असून ह्यामध्ये भरपूर बीटा कॅरोटीन, पोटॅशियम आणि लोह असते. साहित्य कृती भोपळा कापून त्याचे साल काढून टाका. सगळ्या बिया काढून टाका आणि मिक्सर मध्ये फिरवून घ्या. पाणी घालून तुम्हाला हवे तसे घट्ट किंवा पातळ करून घ्या. थाईम घालून पुन्हा मिक्सर मध्ये फिरवून घ्या. जेव्हा प्युरी तयार होईल तेव्हा कुकर मध्ये घालून १०-१५ मिनिटे शिजवून घ्या. ( १-२ शिट्ट्या)

२. क्विनोवा आणि कुस्करलेलं केळं

ह्यामध्ये भरपूर पोषणमूल्ये असतात आणि दुपारच्या जेवणासाठी हा अगदी छान पर्याय आहे. साहित्य कृती एका भांड्यात केळं कुस्करून घ्या. दुसऱ्या एका भांड्यात क्विनोआ पाणी घालून शिजवून घ्या. शिजवून घ्या. (१० -१२ मिनिटे ) ह्यामध्ये तेल घालू नका. शिजवलेलं क्विनोवा केळ्यामध्ये घाला, दही घालून चांगले मिक्स करा. चवीपुरती दालचिनी पूड घालून सर्व्ह करा.

३. भाज्या घालून केलेली साधी खिचडी

ही एक भारतीय पाककृती आहे. बाळाला जेव्हा घन पदार्थांची ओळख करून दिली जाते तेव्हा हे पाककृती विचारात घेतली जाते. साहित्य कृती डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. आणि पाण्यात ३० मिनिटे भिजत घाला. प्रेशर कुकर मध्ये थोडे तूप गरम करून घ्या. आता जिऱ्याची फोडणी द्या. नंतर डाळ तांदूळ आणि भाज्या घाला. हे मिश्रण चांगले परतून घ्या, थोडे मीठ घाला. पाणी घालून मिश्रण चांगले शिजू द्या. कुकर मध्ये ३-४ शिट्ट्या होऊ द्या. चमच्याने खिचडी थोडी मॅश करून घ्या. वरून थोडे तूप घालून बाळाला भरवा.

४. कणकेचा हलवा

कणकेचा हलवा किंवा लापशी. ही पाककृती ९ महिन्यांच्या बाळासाठी आहे. साहित्य कृती

५. भाज्यांचे तुकडे

९ महिन्यांच्या बाळासाठी फिंगर फूड म्हणून हे अगदी योग्य आहे. हे बाळाला सकाळी किंवा संध्याकाळी नाश्त्यासाठी दिले जाऊ शकते. साहित्य कृती कुठल्याही भाज्यांचे मोठे तुकडे करा जे बाळाला बोटांमध्ये पकडता येतील. प्रेशर कुकर मध्ये ५-७ मिनिटे उकडून घ्या आणि गरम सर्व्ह करा.

बाळाला भरवतानाच्या काही टिप्स

वेळ किती पटकन पुढे सरकतो, लवकरच तुमचे ९ महिन्यांचे बाळ चालायला आणि पळायला लागेल. त्यामुळे बाळाला आरोग्यपूर्ण जेवणाच्या सवयी कशा लागतील हे पहा आणि त्यांचा हा बालपणाचा पाया पक्का करा. आणखी वाचा: ८ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय १० महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved