अन्न आणि पोषण

८ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय

तुमचा ८ महिन्याचं बाळ म्हणजे अगदी वाढीच्या सुंदर टप्प्यावर असते. नुकत्याच लुकलुकणाऱ्या एक दोन दातांचं हे बाळ लवकरच पाऊल टाकायला लागणार असतं. ८ महिन्यांच्या वयाच्या बाळाला आता मऊ अन्न गिळण्याची कला अवगत झालेली असते. आणि घन पदार्थ खाण्यास सुद्धा सुरुवात झालेली असते. जे पोषक अन्न बाळाला नीट चावता येईल ते अन्न ८ महिन्यांच्या बाळाची पोषणाची गरज भागवण्यास पुरेसे असते.

८ महिन्यांच्या बाळासाठी उत्तम अन्नपदार्थ

कर्बोदके, प्रथिने, व्हिटॅमिन्स, आणि खनिजे ह्या सगळ्यांचा समावेश असलेला आहार म्हणजे ८ महिन्यांच्या बाळासाठी योग्य आहार असतो. असे अनेक नैसर्गिक अन्नपदार्थ आहेत ज्यामध्ये वरील सर्व पोषणमूल्यांचा योग्य समावेश असतो. साधारणतः ८ महिन्यांच्या बाळामध्ये खालील एक किंवा दोन पोषणमूल्यांचा समावेश असतो.

१. फळे

फळे व्हिटॅमिन्स, खनिजे आणि इतर पोषणमूल्यांचा उत्तम स्रोत आहे. नेहमीच्या फळांव्यतिरिक्त जसे की केळं, पपई, चिकू वगैरे. तुम्ही किवी, स्ट्रॉबेरी, डाळिंब अशा फळांचा सुद्धा समावेश करू शकता. फळं चौकोनाच्या आकारात कापून दिल्यास ते बाळासाठी उत्तम फिंगर फूड होईल.

२. भाज्या

८ व्या महिन्यात तुमच्या बाळाने कुस्करलेला बटाटा गिळण्यापासून ते उकडलेल्या भाज्यांचे तुकडे चावून खाण्याइतपत प्रवास केलेला असतो. वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश बाळाच्या आहारात केला जाऊ शकतो. कधी खिचडीत घालून किंवा कधी त्या नुसत्या उकडून दिल्या जाऊ शकतात. फ्लॉवर, ब्रोकोली, मटार , भोपळा ह्या भाज्यांचा हळूहळू आहारात समावेश करू शकता.

३. मासे

मासे म्हणजे एक पोषक अन्न आहे, आणि ८ महिन्यांच्या बाळाला तुम्ही ते देऊ शकता. बाळाच्या मेंदू च्या विकासासाठी ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स असलेले मासे जसे की टुना, साल्मोन, रोहू तुम्ही बाळाला देऊ शकता. माशाचे सूप किंवा प्युरी करून तुम्ही बाळाला देऊ शकता.

४. टोफू/ पनीर

टोफू किंवा पनीर हे सोया दूध किंवा गायीच्या दुधापासून बनवलेलं असते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात आणि ह्या वाढीच्या वयाच्या बाळांसाठी ते चांगले असते. ज्या बाळांना लॅक्टोस इंटॉलरन्स मुळे पनीर ची ऍलर्जी असते अशा बाळांना त्याऐवजी टोफू देऊ शकता.

५. चिकन

चिकन हे बाळासाठी एक पोषक आहार आहे. साधारणपणे ७ महिने आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या बाळांना तुम्ही सूप किंवा प्युरी च्या स्वरूपात चिकन देऊ शकता. चिकन शिजवलेलं पाणी सुद्धा बाळांसाठी खूप पोषक असते.

६. चीझ

पाश्चरायझेशन केलेल्या दुधापासून बनवलेले चीझ वाढत्या बाळांसाठी कॅल्शिअम चा एक उत्तम स्रोत आहे. प्रक्रिया केलेले चीझ जे बाजारात मिळते ते बाळासाठी एक उत्तम स्नॅक आहे.

७. अंडे

अंडे हे एक परिपूर्ण अन्न आहे ज्यामध्ये चांगली चरबी आणि आरोग्यपूर्ण प्रथिने असतात. नाश्त्याच्या वेळेला बाळाला उकडलेले अंड्याचे एका घासात मावतील असे छोटे छोटे तुकडे करून देऊ शकता. काही बाळांना अंड्याची ऍलर्जी असते आणि त्यामुळे तुम्ही त्याबद्दलच्या लक्षणांवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे.

८. दही

गायीच्या दुधापासून बनवलेले घट्ट दही विशेषतः उन्हाळ्यात बाळाला देऊ शकता. बाजारात सध्या फळांचा स्वाद असलेलं दही मिळते, जे तुम्ही नाश्त्याच्या वेळेला बाळाला देऊ शकता. दह्यामुळे पोटाला चांगले जिवाणू मिळतात तसेच ते व्हिटॅमिन्स आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहे.

वयाच्या ह्या टप्प्यावर बाळाने किती खाल्ले पाहिजे?

८ महिन्यांची बाळे सामान्यतः व्यवस्थित खातात पण हालचाल वाढल्यामुळे खाण्यापासून थोडे विचलीत होतात. काही बाळे नुकतीच रांगायला शिकलेली असतात आणि मग आजूबाजूच्या गोष्टी बघता बघता रांगात असतानाच त्यांना खायला आवडते. ८ महिन्याचे बाळ सामान्यपणे दिवसातून ३ वेळा घन पदार्थ, २ वेळा स्नॅक्स आणि कमीत कमी दोन वेळा स्तनपान किंवा फॉर्मुला दूध घेतात.

अन्नाचे वेळापत्रक

इथे ८ महिन्याच्या बाळाच्या अन्नाचे वेळापत्रक देत आहोत

८ महिन्यांच्या बाळासाठी आहारतक्ता

इथे एक तक्ता दिला आहे जो तुम्ही तुमच्या ८ महिन्यांच्या बाळाच्या आहाराविषयी मार्गदर्शक म्हणून वापरू शकता
वार सकाळी उठल्यावर नाश्ता सकाळचे मधल्या वेळचे खाणे दुपारचे जेवण दुपारची झोप संध्याकाळचे खाणे रात्रीचे जेवण रात्री झोपण्यापूर्वी
सोमवार नाश्ता किंवा फॉर्मुला दूध तांदळाची खीर गाजर प्युरी वरण भात चीझ तांदळाची लापशी झोपण्यापूर्वी स्तनपान किंवा फॉर्मुला दूध
मंगळवार खिचडी उकडलेले अंडे पोळी भाजी दही डोसा किंवा पोळी भाजी
बुधवार चिकन प्युरी सफरचंद प्युरी दही भात मसूर डाळीचे सूप धान्याची लापशी
गुरुवार दलिया खिचडी केळं डाळ इडली उकडलेले सफरचंद पोळी भाजी
शुक्रवार मासे प्युरी भाज्यांचे सूप खिचडी उकडलेल्या भाज्या दही भात

८ महिन्यांच्या बाळासाठी पदार्थांच्या कृती

नेहमीच्या प्युरी व्यतिरिक्त तुम्ही खालील काही पदार्थ करून बघू शकता त्यामुळे बाळाच्या तोंडाला चव येईल. ८ महिन्यांच्या बाळासाठी इथे काही मजेदार भारतीय घरी करता येण्याजोग्या पाककृती आहेत.

१. ब्रोकोली सूप कृती

साहित्य कृती

२. माशाची प्युरी

साहित्य कृती

३. नाचणीची सफरचंद घालून केलेली लापशी

साहित्य कृती

४. रव्याचा उपमा कृती

साहित्य कृती

५. गाजराचे काप कृती

साहित्य कृती

बाळाला भरवतानाच्या काही टिप्स

८ महिन्याच्या वयात बाळाची हालचाल वाढते आणि त्यामुळे बाळाला खूप ऊर्जा लागते. त्यामुळे त्यांच्या वाढलेल्या शारीरिक आणि मानसिक क्रियांसाठी आरोग्यपूर्ण आहार महत्वाचा आहे. त्यामुळे बाळाच्या आहाराचा तक्ता आधीच तयार करून ठेवल्यास तसेच ताज्या भाज्या आणि फळे यांचा त्यात समावेश केल्यास आपण त्याना चांगले पोषण देऊ शकतो. आणखी वाचा: ७ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय ९ महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved