अन्न आणि पोषण

७ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय

जेव्हा तुमचे बाळ ७ महिन्यांचे होते, बाळाची शारीरिक प्रगती झपाट्याने होते जसे की, बाळ बसू लागते, बाळाला दात येऊ लागतात. ह्या वाढीच्या काळात बाळाला योग्य पोषण मिळणे खूप महत्वाचे आहे. ह्या काळामध्ये बाळाला लागणारे पोषण आईच्या किंवा फॉर्मुला दुधातून आणि घनपदार्थातून मिळते. इथे ७ महिन्यांच्या बाळासाठी पोषक आहाराचे काही उत्तम पर्याय आहेत, ज्यांचा समावेश तुम्ही तुमच्या बाळाच्या आहारात करू शकता.

७ महिन्याच्या बाळासाठी उत्तम अन्नपदार्थ

तुमच्या ६ महिन्यांच्या बाळाला घनपदार्थांची ओळख करून दिल्यावर तुम्ही विविध पर्याय निवडू शकता आणि पुढच्या महिन्यात बाळाच्या आहारात त्याचा समावेश करू शकता. ७ महिन्यांच्या बाळासाठी खाली काही मजेदार पर्याय दिले आहेत.

१. फळांची प्युरी

फळे व्हिटॅमिन, खनिजे आणि फायबरचा एक चांगला स्त्रोत आहेत. सफरचंद, चिकू, पपई, केळी, टरबूज, एवोकॅडो इ. फळे स्नॅक्स किंवा जेवणासाठी उत्तम पर्याय आहेत.

२. भाज्या

भाज्यांमध्ये आवश्यक असलेले बहु-जीवनसत्व आणि खनिजे असतात. भाज्या वाफवून आणि उकडून त्याची प्युरी बनवून जेवण म्हणून दिले जाऊ शकते. भाज्यांचे उकडलेले तुकडे देखील उत्कृष्ट स्नॅक म्हणून दिले जाऊ शकतात.

३. लापशी

धान्यापासून बनवलेली लापशी लहान मुलांसाठी पोषक आणि पूरक अन्न आहे. तांदूळ, गहू, ओट्स, जव, बाजरी इ. सारख्या धान्याची पावडर करून त्याची लापशी केली जाऊ शकते.

४. मांस

मटण आणि चिकन हे उच्च प्रथिने आणि कर्बोदके असलेले पदार्थ आहेत. त्याची प्युरी करून तुम्ही बाळाला देऊ शकता.

५. अंडे

चरबी आणि प्रथिनांचा अंडे हा उत्तम स्रोत आहे. अंडे उकडून त्याचे छोटे छोटे तुकडे करून तुम्ही बाळाला देऊ शकता.

६. चीझ

पाश्चरायझेशन केलेल्या दुधापासून तयार केलेले चीझ बाजारात उपलब्ध आहे. चीझ मध्ये चरबी, प्रथिने आणि व्हिटॅमिन्स जास्त प्रमाणात असतात.

७. खिचडी

तांदूळ, गहू आणि डाळ ह्यांची थोडे मसाले आणि मीठ घालून केलेली खिचडी छोट्या बाळांसाठी खूप पोषक असते. मोठ्यांसाठीच्या ह्या अन्नाची बाळाला ओळख सुद्धा होते.

एका दिवसाचे अन्नाचे प्रमाण

साधारणपणे, सात महिन्यांची बाळे ३ वेळा घन पदार्थ आणि २ वेळा स्नॅक्स घेतात. स्तनपान सकाळी आणि रात्री, तसेच मध्ये काही तरी बाळाला खायला देणे हा दिनक्रम असतो. एका वेळेला बाळ साधारणपणे १/४ कप प्युरी किंवा लापशी खाते. बाळाच्या मागणीनुसार तुम्ही हे प्रमाण वाढवू शकता. बाळ सरासरी ८००-९०० मिली स्तनपान किंवा फॉर्मुला दूध पिते.

७ महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थ तक्ता/ जेवणाचा तक्ता

खाली दिलेले वेळापत्रक तुम्हाला बाळासाठीचे अन्नपदार्थ बनवण्यासाठी तसेच त्याबद्दलची योजना करण्यासाठी मदत करेल. तसेच बाळाच्या सर्व पोषणाची गरज भागवेल अशा पदार्थांचा समावेश बाळाच्या आहारात करण्यास मदत करेल. इथे ७ महिन्यांच्या बाळाचे अन्नविषयक वेळापत्रक दिले आहे, त्याप्रमाणे तुम्ही तुमचा तक्ता बनवू शकता.
दिवस सकाळी उठल्यावर नाश्ता सकाळी दुपारचे जेवण संध्याकाळचा नाश्ता संध्याकाळी रात्रीचे जेवण
सोमवार सफरचंद घालून केलेली नाचणीची लापशी तूप भात फळांच्या स्वादाचे दही धान्याची लापशी
मंगळवार स्तनपान किंवा फॉर्मुला दूध पेअर प्युरी स्तनपान किंवा फॉर्मुला दूध दलिया डाळीचे पाणी स्तनपान किंवा फॉर्मुला दूध दही भात
बुधवार खिचडी दही भात उकडलेल्या भाज्या तांदळाची खीर
गुरुवार गव्हाच्या पिठाचे पॅनकेक्स फिश प्युरी गाजराची बदाम घालून केलेली खीर नाचणीची लापशी
शुक्रवार इडली खिचडी केळं मुगाच्या डाळीची खिचडी
स्त्रोत:

७ महिन्यांच्या बाळासाठीच्या पदार्थांच्या कृती

बऱ्याच बाळांना ७ महिन्यांच्या वयात एक किंवा दोन दात येतात, जरी दात पूर्णपणे बाहेर आलेले नसतील तरी बाळांच्या हिरड्या मजबूत असतात, त्यामुळे ही बाळे फिंगर फूड बराच वेळ चावत बसतात. ७ महिन्यांच्या बाळासाठी घरी करता येण्याजोग्या काही पाककृती दिल्या आहेत.

१. गव्हाच्या पिठाचा पॅनकेक

साहित्य
कृती

२. नाचणी आणि सफरचंदाची लापशी

साहित्य
कृती

३. धान्याची लापशी

साहित्य कृती

४. मुगाच्या डाळीची खिचडी

साहित्य
कृती

५. पेअर प्युरी

साहित्य
कृती

बाळाला कसे भरवावे ह्याबद्दल काही टिप्स

आपल्या ७ महिन्यांच्या बाळाला कसे भरवावे ह्याबद्दल इथे काही महत्वाच्या टिप्स आहेत. ७ महिन्याच्या बाळाला त्यांच्या वाढत्या शरीरासाठी आरोग्यपूर्ण आणि पोषक आहाराची गरज असते. त्यांच्यासाठी सुद्धा हा एक मोठा बदल असतो कारण घन पदार्थांची खाण्यास नुकतीच सुरुवात झालेली असते आणि त्यांच्या स्वादकलिका (Taste Buds) विकसित होण्यास नुकतीच सुरुवात झालेली असते. त्यांना जास्तीत जास्त फळे आणि भाज्यांची ओळख करून दिल्यास त्यांना पुढील आयुष्यात जेवणाच्या चांगल्या सवयी लागतील. आणखी वाचा: ८ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved