अन्न आणि पोषण

१० महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय

पहिल्यांदा बाळ घरी आले की सगळ्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येते. पण ह्या काळात बऱ्याच अनिश्चितता असतात. बाळाला तुम्ही भरवत असलेले अन्नपदार्थ तसेच तब्येतीच्या तक्रारी अशा बऱ्याच बाबतीत तुम्हाला मार्गदर्शन हवे असते. इथे आपण १० महिन्यांच्या बाळाला काय आणि कसे भरवावे ह्याविषयी चर्चा करणार आहोत.

१० महिन्यांच्या बाळांची पोषणमूल्यांची गरज

बाळाच्या वजनानुसार त्याला ह्या वयात किती कॅलरीज लागणार आहेत हे अवलंबून असते. साधारणतः तुमच्या बाळाला ९०-१२० / कि .ग्रॅ. इतक्या कॅलरीज लागू शकतात. तज्ञांच्या मते पुरुष बाळांना ७९३ कॅलरीज आणि स्त्री बाळांना ७१७ कॅलरीज लागतात. तुमच्या बाळाला तुम्हाला लागते तसे सर्व प्रकारचे पोषण लागते. तुम्ही पिरॅमिड तक्ता बघून त्याप्रमाणे फळे, भाज्या आणि धान्ये ह्यांचे किती प्रमाण आवश्यक आहे हे बघू शकता . ह्याव्यतिरिक्त तुमच्या बाळाला योग्य प्रमाणात कॅल्शिअम आणि लोह मिळत आहे ना हे सुद्धा पहिले पाहिजे. हे बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक आहे.

तुमचे बाळ एका दिवसात किती अन्न खाऊ शकते?

पोषणाच्या गरजेबरोबर, बाळाची भूक आणि गरज ह्यावर सुद्धा बाळ किती खाणार हे अवलंबून असते. परंतु साधारणपणे तुमच्या बाळाला खालील प्रमाणात अन्नाची गरज असते.

तुमच्या १० महिन्यांच्या बाळासाठी उत्तम अन्नपदार्थ

बाळाच्या वयाच्या ह्या टप्प्यावर तुम्ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बाळाला नेहमीच्या जेवणासोबत स्तनपान द्यायला हवे. स्तनपान देतानाच तुम्ही त्याऐवजी घन पदार्थ किंवा फिंगर फूड देऊ शकता. पण असा काही नियम नाही की तुम्ही पूर्णपणे स्तनपान थांबवलेच पाहिजे. हा निर्णय तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता. जर तुम्ही बाळाला घन पदार्थ देण्याचे ठरवले असेल तर खाली काही पदार्थ दिले आहेत ते तुमच्या बाळासाठी अगदी योग्य आहेत.

१० महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचा तक्ता / जेवणाची योजना

इथे भारतीय बाळासाठी एक तक्ता दिला आहे, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या १० महिन्यांच्या बाळाला जेवणात काय द्यायचे ह्याची योजना करू शकता. परंतु प्रत्येक वेळेला त्यांना नवीन अन्नपदार्थाची ओळख करून दिली पाहिजे. नवीन अन्नपदार्थ देण्याआधी तीन दिवस वाट पहा, म्हणजे बाळाला त्या पदार्थाची ऍलर्जी नाही ना ह्याची खात्री होईल. तसेच बाळाला चवीची सुद्धा ओळख होईल. तुम्ही काही बदल करून तुमच्या बाळासाठी योग्य असा आहार तक्ता बनवू शकता .
दिवस सकाळी उठल्यावर न्याहारी सकाळी दुपारचे जेवण दुपारी रात्रीचे जेवण रात्री झोपताना
सोमवार स्तनपान/ फॉर्मुला दूध किसलेले सफरचंद घालून सीरिअल कापलेली पपई भात आणि चिकन रस्सा स्तनपान/ फॉर्मुला दूध डोसा सांबार स्तनपान/ फॉर्मुला दूध
मंगळवार स्तनपान/ फॉर्मुला दूध केळं घातलेली ओट्स ची लापशी केळ्याचे तुकडे भाज्या घालून केलेला पुलाव आणि भाजलेले मासे स्तनपान/ फॉर्मुला दूध चिकन सूप आणि टोस्ट स्तनपान/ फॉर्मुला दूध
बुधवार स्तनपान/ फॉर्मुला दूध टोस्ट सोबत अंड्याचा बलक द्राक्षे व्हेजिटेबल पुलाव आणि दही स्तनपान/ फॉर्मुला दूध पोळी भाजी स्तनपान/ फॉर्मुला दूध
गुरुवार स्तनपान/ फॉर्मुला दूध दलिया खीर टोस्ट भाज्या घालून केलेली खिचडी आणि दही स्तनपान/ फॉर्मुला दूध पोळी भाजी स्तनपान/ फॉर्मुला दूध
शुक्रवार स्तनपान/ फॉर्मुला दूध पनीर भुर्जी सँडविच कलिंगडाचे तुकडे भात आणि भोपळ्याची पातळ भाजी स्तनपान/ फॉर्मुला दूध पोळी भाजी स्तनपान/ फॉर्मुला दूध
शनिवार स्तनपान/ फॉर्मुला दूध फ्रेंच टोस्ट उकडलेले गाजर भाज्या घालून केलेलं सांबार आणि पोळी स्तनपान/ फॉर्मुला दूध भात आणि उकडलेले मासे स्तनपान/ फॉर्मुला दूध
रविवार स्तनपान/ फॉर्मुला दूध नाचणीची लापशी उकडलेले सफरचंद इडली सांबार स्तनपान/ फॉर्मुला दूध पराठा आणि बटाट्याचा रस्सा स्तनपान/ फॉर्मुला दूध

बाळासाठी घरी तयार करू शकतो अशा पाककृती

खाली काही पाककृती आहेत ज्या तुम्ही तुमच्या १० महिन्यांच्या बाळाला पोषक अन्नाची ओळख करून देताना देऊ शकता

१. रवा उपमा

साहित्य कृती

२. साधी खिचडी

साहित्य कृती

३. अंडा भुर्जी

साहित्य कृती

४. चिकन आणि बटाटा सूप

साहित्य कृती

५. दलियाची खीर

साहित्य कृती

बाळाला भरवतानाच्या काही टिप्स

१० महिन्यांच्या बाळाला भरवताना आपल्या बाळाला कुठली चव आवडते हे आपल्याला प्रयोगातूनच कळेल. आणि त्यानुसार बाळाला आवडणाऱ्या पदार्थांचा आहारतक्ता आपण तयार करू शकतो. बाळाचे अन्नपदार्थ ठरवताना फूड पिरॅमिड लक्षात असू द्या. तुमच्या बालरोगतज्ञांशी संपर्क साधून तुम्ही बाळाला काय भरवू शकता किंवा काय नाही हे ठरवू शकता. आणखी वाचा: ९ महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved