नव्याने आई झालेल्या स्त्रीवर बरीच जबाबदारी असते आणि नुकतेच जन्मलेले बाळ आईची सगळी ऊर्जा आणि वेळ घेते. परंतु अतिरिक्त चिंता न करता स्त्री ह्या जबाबदाऱ्या पार पाडू शकते. भारतात कालांतराने बाळ आणि आईच्या पोषणाविषयी जागरूकता वाढली आहे. स्तनपानास पाठिंब्यासाठी पूर्वीपेक्षा आता अधिक आरामदायक वातावरण आहे.
जेव्हा तुम्ही आई होता, तेव्हा तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मदतीची गरज असते. तुम्ही बाळाला स्तनपान देऊ शकता किंवा फॉर्मुला देण्याचा पर्याय निवडू शकता परंतु कुठलाही ताण न घेता तुम्ही हे करू शकता. खाली दिलेले हे ५ उपक्रम तुमच्यासाठी आणि बाळासाठी हा काळ सुलभ होण्यास मदत करू शकतात.
स्तनपान देणाऱ्या मातांना भारतात कशी मदत दिली जाते?
१. सार्वजनिक ठिकाणी स्तनपानासाठी खोल्या
तामिळनाडूने चेन्नई मोफस्सिल बस टर्मिनस (सीएमबीटी) सारख्या सार्वजनिक ठिकाणी ३०० पेक्षा अधिक स्तनपान कक्षांचे उद्घाटन झाले. या वातानुकूलित खोल्या एकाच वेळी आठ माता वापरु शकतात. एवढेच काय, स्तनपान देणाऱ्या मातांना काही मदत लागली तर सरकारने नर्सची सुद्धा नेमणूक तिथे केलेली आहे. प्रवासादरम्यान स्तनपान देण्याऱ्या मातांसाठी खरोखर हा एक सुटकेचा निःश्वास आहे.
२. “वर्किंग अँड नर्सिंग”
बिहारचे पाटणा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (पीएमसीएच), भारतात स्तनपानाविषयी जागरूकतेसाठी पावले उचलत आहे. कर्मचार्यांना नोकरीवर स्तनपान करणे खूप कठीण असल्याने रुग्णालयाने यासाठी एक विशेष खोली तयार केली आहे. इतकेच नव्हे तर सहा महिन्यांच्या प्रसूती रजा नियम लागू करण्याबाबतही रुग्णालय कार्यरत आहे.
३. महिला आणि मुलांसाठी डिजिटल मास एज्युकेशन
बहुतेक वेळा, कुपोषण आणि आजारपणामागील शिक्षणाचा अभाव हे दोष आढळतात. यावर्षी जूनमध्ये महिला आणि बालविकास मंत्रालयाने स्तनपान आणि संतुलित आहाराचे महत्त्व याबद्दल जनजागृती करण्यासाठी “आयएपी हेल्थफोन” कार्यक्रम सुरू केला. ते म्हणतात त्याप्रमाणे, शिक्षण ही सर्वोत्तम क्रांती आहे!
४. स्तनपान देणाऱ्या मतांसाठी दूरधवनीवरून मदत
सर्व मातांना वैद्यकीय सुविधा किंवा विशिष्ट सहाय्य मिळण्याची सुविधा नाही. हे ओळखून तामिळनाडू सरकार ग्रामीण भागात स्त्रियांना स्तनपान देण्यास आणि शिक्षित करण्यासाठी ठोस पुढाकार घेत आहे. फोन हेल्प लाईनद्वारे महिला नर्सिंग, पोषण आहार घेण्याबाबत सल्ला घेऊ शकतात आणि त्यांच्या मुलांच्या आरोग्यासही पाठिंबा मिळवू शकतात.
५. मातृत्व रजा लाभांची अंमलबजावणी
भारत सरकारने मातृत्व लाभ कायदा, १९६१ लागू करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे जे गर्भवती कर्मचार्यांना पगारासह तीन महिन्यांच्या रजेची हमी देते. हे खरोखरच एक स्वागतार्ह पाऊल आहे ज्यामुळे त्यांच्या करिअरबद्दल नव्याने आई झालेल्या स्त्रिया थोड्या निश्चित राहतील. काहीही झाले तरी बाळाला खायला घालण्यापासून ते पालकत्वाच्या नवीन जबाबदाऱ्या हाताळण्यापर्यंत त्यांच्याकडे खूप कामे असतात.
सुदृढ व आनंदी भावी पिढी घडवण्याचे भारताचे लक्ष्य आहे. स्तनपान देणारी आई आणि बाळ दोघेही निरोगी आणि सुरक्षित राहण्यासाठी हे उपक्रम भारतात राबवले जातात. तुम्ही बाळाला स्तनपान की फॉर्मुला देण्याचा पर्याय निवडला आहे ह्यापेक्षा त्याबाबतचे शिक्षण आणि सहाय्य सर्वात महत्वाचे आहे.
आणखी वाचा:
अंगावरील दुधाचा पुरवठा वाढवण्यासाठी ३१ सर्वोत्तम पदार्थ
स्तनपानाविषयी नेहमी विचारल्या जाणाऱ्या २० प्रश्नांची उत्तरे