बाळ

तुम्ही तुमच्या बाळाला ग्राईप वॉटर द्यावे का?

कोणतेही कारण नसताना बाळे रडू लागतात. ह्यामागे बऱ्याचदा पोटशूळ हे कारण असते. पोटशूळ म्हणजे काय याची कोणतीही स्पष्ट व्याख्या नाही, परंतु जेव्हा लहान बाळे जास्त वेळ रडत असतात तेव्हा हे कारण असते. पोटशूळ सामान्यत: तीन आठवडे ते तीन महिने वयोगटातील बाळांमध्ये आढळतो. पोटातील वायूमुळे पोटशूळ होतो असे मानले जाते. अनेक पालक ह्या परिस्थितीवर उपाय म्हणून ग्राईप वॉटरचा पर्याय निवडतात.

ग्राईप वॉटर म्हणजे काय?

ग्राइप वॉटर हे पोटशूळ, अपचन, उचकी आणि दातदुखीमुळे होणारी अस्वस्थता शांत करण्यासाठीचे द्रावण आहे. ह्या द्रवाचे विविध प्रकार उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये विविध औषधी वनस्पतींचे मिश्रण असते.

ग्राईप वॉटर साहित्य

बडीशेप, आले, कॅमोमाइल, लिकोरिस, दालचिनी आणि लिंबू मलम हे काही घटक आहेत आणि ते मुख्यत्वेकरून ग्राईप वॉटरमध्ये आढळतात. मुळात पाणी, अल्कोहोल, बडीशेप तेल, साखर आणि सोडियम बायकार्बोनेट हे ग्राईप वॉटर बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक होते. ग्लिसरीन हा देखील काही ब्रँडमध्ये वापरला जाणारा घटक आहे. पालक आणि डॉक्टरांच्या आक्षेपानंतर ग्राईप वॉटरमध्ये अल्कोहोलचा वापर बंद करण्यात आला आहे. काही ब्रँड कृत्रिम स्वीटनर्स वापरण्यासाठी देखील ओळखले जातात आणि ते बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. मिंट ऑइल हा आणखी एक घटक आहे आणि तो काही भारतीय ब्रँडच्या ग्राईप वॉटरमध्ये आढळू शकतो. हे ऑरेंज किंवा स्ट्रॉबेरी सारख्या वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहे.

ग्राईप वॉटर लहान बाळांसाठी सुरक्षित आहे का?

लहान मुलांसाठी ग्राईप वॉटर असुरक्षित आहे ह्याचा कोणताही पुरावा नाही. ग्राईप वॉटर प्रभावी आहे की नाही ह्यावर मते भिन्न आहेत आहेत कारण काहींना ते त्यांच्या बाळांसाठी उपयुक्त वाटते तर काहींना नाही. सुरक्षिततेच्या बाबतीत, लहान मुलांसाठी अल्कोहोल, कृत्रिम स्वीटनर्स किंवा सोडियम बायकार्बोनेट असलेल्या ग्राईप वॉटरच्या ब्रँडची शिफारस केलेली नाही.

ग्राईप वॉटरच्या काही पारंपारिक घटकांचा आणि त्यांचा बाळावर कसा परिणाम होतो ते येथे दिलेले आहे:

सध्याचे ग्राईप वॉटर अल्कोहोल-मुक्त आहे परंतु लहान बाळासाठी त्याचा वापर करण्याची शिफारस केलेली नाही कारण त्याचे कोणतेही आरोग्यविषयक फायदे सिद्ध झालेले नाहीत आणि डब्ल्यूएचओ द्वारे लहान बाळांसाठी कोणत्याही प्रीलेक्टियल फीडचा वापर करण्याची शिफारस केलेली नाही.

ग्राईप वॉटर विकणाऱ्या कंपन्यांचे नियमन केले जात नाही. त्यामुळे ते द्रवपदार्थावर प्रक्रिया करण्यासाठी वापरत असलेल्या घटकांचा नेमका उल्लेख करत नाहीत. हे घटक सुरक्षित आहेत की नाही हे आपल्याला माहिती नाही. ग्राईप वॉटर फायदेशीर किंवा हानिकारक नाही. ग्राईप वॉटर हे फक्त बडीशेपचे पाणी आहे. कधीकधी त्यात रसायने देखील असतात. म्हणून, आम्ही पालकांना त्यांच्या बाळाला ग्राईप वॉटर देण्याचा सल्ला देत नाही. भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या ग्राईप वॉटरचे ब्रँड अल्कोहोलमुक्त आहेत परंतु त्यात सोडियम बायकार्बोनेट आहे. जेव्हा सोडियम बायकार्बोनेट मोठ्या प्रमाणात दिले जाते तेव्हा त्यामुळे अल्कोलोसिस आणि मिल्क अल्कली सिंड्रोम होऊ शकतो.

नैसर्गिक घटक आणि बाळाच्या आहाराबद्दल जागरूकता वाढलेली असूनही, काही ब्रँडच्या ग्राईप वॉटरमध्ये पॅराबेन्स, व्हेजिटेबल कार्बन किंवा दुग्धजन्य पदार्थ असू शकतात आणि ते आदर्शपणे टाळले पाहिजेत. काही डॉक्टरांचा असा विश्वास आहे की ग्राईप वॉटर लहान बाळांना दिले जाऊ शकते, तर काहींच्या मते ते टाळले पाहिजे. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे ग्राईप वॉटर उपलब्ध आहे आणि बाळांना त्यांच्या स्थितीनुसार योग्य असे हे पाणी द्यावे. बाळाला ग्राईप वॉटर देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ग्राईप वॉटरचा उपयोग काय आहे?

असे मानले जाते की लहान बाळांमध्ये पोटशूळ उपचार करण्यासाठी ग्राईप वॉटर उपयुक्त आहे. काही पचनाच्या समस्या आणि उचकी कमी करण्यास देखील ग्राईप वॉटरची मदत होते. दात येणारी बाळे चिडखोर असतात आणि खूप रडतात. रडताना बाळ हवा गिळू शकते त्यामुळे पोटशूळ होऊ शकतो. पोट फुगणे किंवा ऍसिडिटी सारख्या पोटाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या बाळांना ग्राईप वॉटरचे सेवन केल्याने फायदा होऊ शकतो. उचकी लागल्यास बाळाला ग्राईप वॉटर देणे हा एक चांगला उपाय आहे. डायफ्रॅम मध्ये अस्वस्थता आल्यास उचकी लागते, आणि ते बाळांना त्रासदायक ठरू शकते आणि पोट फुगते. ऍसिड रिफ्लक्स किंवा अपचनामुळे असे होते. ग्राईप वॉटर डायाफ्रामला शांत करते आणि अशा प्रकारे, उचकीपासून आराम देते.

लहान बाळांना ग्राईप वॉटर तुम्ही कधी देऊ शकता?

ग्राईप वॉटरचे उत्पादक दावा करतात की दोन आठवड्यांपर्यंतच्या लहान बाळांना ग्राईप वॉटर दिले जाऊ शकते. परंतु, सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळांना ते देणे योग्य नाही, कारण त्यांची पचनक्रिया अजूनही विकसित होत आहे आणि ती संवेदनशील आहे. बरेच लोक असेही मानतात की बाळांना सहा महिन्यांचे होईपर्यंत आईच्या दुधाशिवाय किंवा फॉर्म्युलाशिवाय तुम्ही दुसरे काहीही देऊ नये. त्यामुळे, तुमच्या बाळाला ग्राईप वॉटर देण्यापूर्वी तुमच्या बालरोगतज्ञांशी सल्लामसलत करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

बाळाला ग्राईप वॉटर कसे द्यावे?

बाळांना ग्राईप वॉटर देणे योग्य नसले तरी पारंपारिकपणे ते फीड केल्यानंतर सुमारे दहा मिनिटे दिले जाते. हे ड्रॉपर किंवा चमच्याने बाळाला दिले जाऊ शकते. ग्राईप वॉटर च्या चांगल्या चवीमुळे, बहुतेक बाळे कोणताही त्रास न देता ग्राईप वॉटर घेतात. ग्राईप वॉटर सहसा दिवसातून एकदा दिले जाते, परंतु, तुमचे डॉक्टर तुम्हाला बाळाला ग्राईप वॉटर किती प्रमाणात द्यावे ह्याचा सल्ला देतील.

ग्राईप वॉटरचे दुष्परिणाम

ग्राईप वॉटरचे कोणतेही वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले दुष्परिणाम नाहीत. तथापि, तुमच्या बाळाला विशिष्ट ब्रँडमधील एक किंवा अधिक घटकांची ऍलर्जी असू शकते. घटकांची यादी तपासणे तुम्हाला ते ब्रँड टाळण्यास मदत करू शकते. अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी, पाणीदार डोळे, सुजलेले ओठ किंवा जीभ, उलट्या होणे, खाज सुटणे आणि ग्राईप वॉटर पयायल्यानंतर तुमच्या बाळाच्या श्वासोच्छवासाच्या पद्धतीमध्ये होणारा कोणताही बदल ही ऍलर्जीची लक्षणे असू शकतात. तुमच्या बाळामध्ये यापैकी कोणतीही चिन्हे दिसल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या.

फॉर्म्युला मिल्कमध्ये ग्राईप वॉटर मिसळता येते का?

ग्राईप वॉटर फॉर्म्युलामध्ये मिसळल्यावर फॉर्म्युला मिल्क तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये ग्राईप वॉटर घातले जाते. त्यामुळे फॉर्मुल्याची चव बदलू शकते. तुम्ही हा फॉर्मुला पाण्यात किंवा आईच्या दुधात मिसळू शकता, परंतु तुमचे बाळ ह्या मिश्रणाची सतत मागणी करण्याची शक्यता असते. सर्वोत्तम परिणामांसाठी, बाळाला ग्राईप वॉटर मूळ स्वरूपात द्या.

ग्राईप वॉटरला पर्याय

ग्राइप वॉटर व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या बाळाला शांत करण्यासाठी आणि त्याला बरे वाटण्यास मदत करण्यासाठी काही पर्याय निवडू शकता.

1. मसाज

पोटातील तणाव आणि गॅसपासून मुक्त होण्यासाठी पोटाला हलक्या हाताने मालिश करून पहा. बाळाच्या पोटावर हलका दाब देऊन त्याचे पोट चोळल्याने त्याला आराम मिळण्यास मदत होऊ शकते.

2. फॉर्म्युला दूध बदला

फॉर्म्युला दुधाचा ब्रँड बदलणे काही बाळांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर तुमच्या बाळाला जठराची समस्या असेल तर तुम्ही त्याला देत असलेले फॉर्म्युला दूध कदाचित योग्य नसेल. तुमच्या बाळाच्या बालरोगतज्ञांशी चर्चा करा आणि फॉर्म्युला दूध बदला.

3. ढेकर काढा

जेव्हा तुमचे बाळ विक्षिप्त असेल, तेव्हा त्याला तुमच्या बाळाला खांद्यावर घ्या आणि हलक्या हाताने त्याच्या पाठीला घासून ढेकर काढण्यास मदत करा. तुम्ही त्याला तुमच्या मांडीवर बसवू शकता आणि हलक्या हाताने त्याच्या पाठीवर थाप देऊ शकता. काही वेळा, तुमच्या बाळाला बरे वाटण्यासाठी हे सर्व आवश्यक असते

4. बाळाला गुंडाळून पहा

बाळाला गुंडाळल्यामुळे बरे वाटू शकते आणि त्याला आराम करण्यास मदत करू शकते. जर बाळ जास्त उत्तेजित किंवा चिडचिड करत असेल तर बाळाला शांत केल्याने मदत होऊ शकते.

शक्य असल्यास, तुमचे बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत केवळ स्तनपानच द्या, कारण बाळाची पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी आईचे दूध हा सर्वोत्तम पर्याय आहे.

ग्राईप वॉटर निवडण्यासाठी आणि बाळाला ते देण्यासाठी काही टिप्स

जर तुम्हाला तुमच्या बाळाला ग्राइप वॉटर द्यायचे असेल तर, तुमच्या लहान बाळासाठी योग्य प्रकारचे ग्राईप वॉटर शोधायचे असेल तर त्यासाठी ह्या टिप्स वापरा.

जोपर्यंत ह्या जगात बाळे जन्माला येतील तोपर्यंत ह्या जगात चिडचिड करणारी बाळे आणि पोटशूळ ह्या दोन्ही गोष्टी राहतील! परंतु प्रत्येक वेळी ग्राईप वॉटर हा उपाय असू शकत नाही. तुमच्या बाळाची चिडचिड का होत आहे किंवा वेदना का होत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. पुढील पायरी म्हणजे कोणत्याही बाह्य घटकाचा वापर न करता लहान बाळाचे सांत्वन करून त्याला शांत करणे. तुम्ही पहिल्यांदाच पालक झालेला असाल तर हे कठीण होऊ शकते कारण तुम्ही करत असलेल्या उपायांचा उपयोग होत नाही. तथापि, एकदा का तुम्‍हाला ते जमू लागले तर, सर्व काही स्थिर होईल आणि तुमच्‍या बाळाला कसे शांत करायचे ते तुम्हाला कळेल.

अस्वीकरण: ही माहिती केवळ एक मार्गदर्शक आहे आणि पात्र व्यावसायिकांच्या वैद्यकीय सल्ल्याला तो पर्याय नाही

आणखी वाचा:

बाळांना नारळ पाणी देणे सुरक्षित आहे का बाळाला पाणी देण्यास केव्हा आणि कशी सुरुवात करावी?

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved