बाळ

तुमच्या मुलीसाठी हिंदू देवता सरस्वतीची अर्थासहित ७५ नावे

    In this Article

देवी सरस्वती ही ज्ञान, संगीत, बुद्धी आणि कलेची देवता आहे. तसेच ती सर्व वेदांची जननी आहे.

मुलींसाठी देवी सरस्वतीची नावे

नाव नावाचा अर्थ
ऐश्वी या नावाचा मूळ अर्थ पवित्रआहे. त्याचा आणखी एक अर्थ आहे - ‘विजयी.
अशवी या नावाचा अर्थ विजयीआहे. हे सरस्वती देवीचे दुसरे नाव आहे.
आशवी या नावाचा अर्थही धन्यआणि विजयीआहे. हे नाव देवी सरस्वतीचे आहे
आयरा याचा अर्थ आदरणीय व्यक्तीआहे. इतर अर्थ म्हणजे पृथ्वीआणिजागरुक. ’ हे सरस्वती देवीचे नाव आहे.
अक्षरा सरळ अर्थ म्हणजे अक्षर. हे थोड्या जुन्या पद्धतीचे नाव आहे पण चांगले आहे. सरस्वती देवीचा संदर्भ असल्यामुळे ते नाव जादुई वाटते.
अनिशा शुद्ध, ‘अविरत, ‘कृपा, ‘सर्वोच्च, ‘दिवस, ‘आशादायीअसे विविध अर्थ आहेत. 'चमकदार' आणि 'अखंड' असेही ह्या नावांचे अर्थ आहेत.
आयना हे नाव एकमेवाद्वितीय आहे कारण याचा अर्थ आहे 'सुंदर बहर' आणि 'निर्दोष'.
बाणी हे एक आकर्षक नाव आहे आणि याचा अर्थ देवी सरस्वतीआहे. ‘आवाजकिंवा भाषणअसेही त्याचे काही अर्थ आहेत.
भराडी विज्ञानआणि शहाणपणाअसे ह्या नावाचे अर्थ आहेत. याचा अर्थइतिहासावरचे प्रेमदेखील आहे. यात देवी सरस्वतीचे गुण दर्शविले गेले आहेत.
भारथी याचा अर्थ आहे "शिक्षणाची आणि ज्ञानाची देवी" आणि हे सरस्वती देवीचे आणखी एक नाव आहे.
भारती या नावाचा अर्थ सद्गुण, “विजयीअसा आहे
बिलवाणी या नावाचा अर्थ आहे मोहक, “मजबूतआणि धाडसी. हे नाव म्हणजे आधुनिक आणि प्राचीन काळाचे मिश्रण आहे.
बीना हे नाव संगीताशी संबंधित आहे आणि याचा अर्थ आहे कर्णमधुर, “ताजेतवाने करणारेआणि मधुरअसा आहे. सरस्वती देवीचे वाद्य असाही ह्याचा अर्थ होतो.
ब्राह्मणी ह्या नावाचा अर्थ विश्वाचा निर्माता भगवान ब्रह्मा याची पत्नी असा आहे.आणि ह्याचा अर्थ भगवान ब्रह्माची शक्तीअसा देखील आहे.
चंद्रवदन जिचा चेहरा चंद्रासारखा तेजस्वी आहे.
चंद्रिका म्हणजे चंद्रकिंवा चांदणे. हे एक स्त्रीलिंगी आणि स्वर्गीय नाव आहे.
दिव्यंगा शुभ शरीर असलेली.
गिरवाणी या नावाचा अर्थ राणीआहे. हे नाव सरस्वती आणि पार्वती या दोन्ही देवींसाठी वापरले जाते.
ज्ञानेश्वरी हे अद्वितीय नाव ज्ञानाच्या देवीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरले जाते, ती देवी सरस्वती किंवा लक्ष्मी देवी आहे.
ज्ञानदा या नावाचा अर्थ म्हणजे ज्ञान देणारी. या नावाचा दुसरा अर्थ म्हणजे वेदांची देवी.
हंसीनी या नावाचा एक सुंदर अर्थ आहे आणि तो म्हणजे 'जिचे वाहन हंस अशी. सरस्वती देवीचे हे रूपक आहे.
हंसिनी हे नाव सरस्वती देवीचे आणखी एक रूपक आहे आणि याचा अर्थ हंसआणिसुंदर बाईआहे.
हंसिहां हे नाव खूपच लोकप्रिय आहे कारण ते अधिकृत वाटते. ह्याचा अर्थसर्वात भाग्यवान मुलगीअसा आहे.
इरा या असामान्य नावाचा अर्थ आहे स्वच्छ नितळ पाणी', 'पृथ्वी'. ह्याचा अर्थ शांती देवता असा सुद्धा होतो.
इर्शिता हे सरस्वती देवीचे दुसरे नाव आहे आणि ते खूप लोकप्रिय आहे.
जानविका ह्याचा अर्थ गंगा नदी असा आहे. ही ऋषी जाहिनूची मुलगी आहे.
जान्हवी या नावाचा अर्थ गंगा नदी देखील आहे. दुसरा अर्थ हा आहे योग्य व्यक्तीआणि शिक्षित.
कादंबरी नावाचा अर्थ मादी कोकिळाआहे. इतर अर्थ म्हणजे देवी, ‘कादंबरीआणि कथा.
कामरूप देवी जी इच्छेनुसार विविध रूपे घेते
कांता तेजस्वी
काव्या हे नाव खूप शांत भासते कारण याचा अर्थ आहे कवितात्याला एक काव्यात्मक भावना आहे आणि याचा अर्थ गोडदेखील आहे.
महाभद्र गंगा नदी
महामाया दैवी
महाश्वेता हे नाव वेगळे आहे कारण याचा अर्थ आहे 'परिपूर्ण पांढरा'.
मालिनी या गोड नावाचा अर्थ "सुवासिक" आहे.
मंजुश्री या नावाचा अर्थ दिव्य सौंदर्यआहे. याचा अर्थ चिरतरुणआणिबलवानआहे आणि तो अंतर्दृष्टीकिंवा प्रज्ञाशी संबंधित आहे.
मेधा मेधा नावाचा अर्थ बुद्धिमत्ताआणि शहाणपणाआहे. इतर अर्थप्रेमाने तेजोमय झालेली किंवा बुद्धीआहेत.
मेधास्वी शहाणपण, जीवनशैली, सामर्थ्य, शक्ती,सामर्थ्य, बुद्धी
निहारिका या नावाचा अर्थ धुके, ‘दव'’ आहे. प्रेमपूर्वक किंवा ताऱ्यांचा समूह असेही अर्थ आहेत. शांत आत्मा असा देखील अर्थ आहे.
निरंजना याचा अर्थ चांगली व निष्कलंक बाईआहे आणि हा शब्द धार्मिक सूत्रे आणि हिंदू मंत्रांमध्ये वापरला जातो.
न्यारा या नावाचा मूळ अर्थ गुलाबआहे. हे सरस्वती देवीच्या चिरंतन सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते.
पद्मक्षी कमळासारखे डोळे असलेली
पद्मनायलय कमळावर बसलेली देवता
पावाकी या नावाचा अर्थ आहे 'शुद्धता' आणि 'अग्निपासून जन्मलेला'. बुद्धी, शिक्षणाची देवता असाही ह्याचा अर्थ होतो
प्रज्ञा म्हणजे बुद्धिमत्ता, ‘शहाणपणाआणि सामर्थ्य. दुसरा अर्थ म्हणजे बुद्धीआणि देवी सरस्वतीचे दुसरे नाव.
प्रग्या शांतआणि पराक्रमअसा अर्थ आहे. याचा उपयोग बुद्धिमत्ताआणिशहाणपणादर्शविण्यासाठी देखील केला जातो.
प्रजना हुशार आणि समंजस स्त्री, बुद्धिमत्ता, समजूतदारपणा, विवेकबुद्धी
प्रणिक्य या नावाचा मूळ अर्थ म्हणजे हुशारआणि सर्वांना प्रिय. याचा अर्थ ज्ञानदेखील आहे.
राहीनी चंद्र, एक तारा
रमा मोहक
रिचा हे नाव वेदांमधील लेखन, स्तोत्र आणि जप यांचे वर्णन करत असल्याने हे नाव अद्वितीय आहे. 'चिरंतन' असा सुद्धा त्याचा अर्थ आहे
रिधिमा हे नाव मोत्याचा आणि त्याच्या शुद्धतेचा संदर्भ आहे. याचा अर्थप्रेमाने परिपूर्णदेखील आहे.
सरस्वती हे नाव म्हणजे शिक्षणाची देवीआणि दुसरा अर्थ म्हणजे सारांश.
सौदामिनी विजेसारखी चमकणारी
सौम्या या नावाचा मूळ अर्थ मृदू स्वभावआहे. ब्रह्म पुराणानुसार नमूद केल्याप्रमाणे, हे विशिष्ट नाव भारतवर्षाच्या नऊ क्षेत्रांपैकी एक आहे.
सावित्री प्रकाशाचा किरण
शारदा हे नाव साहित्य आणि कलेच्या देवीचे चित्रण करण्यासाठी वापरले जाते.
श्रावणिका या नावाचा अर्थ इच्छुकआणि ऐकण्यास पात्रआहे. ‘नदीचा प्रवाहकिंवा भगवान शिवाचा आशीर्वादअसाही ह्याचा अर्थ आहे.
सुरवंदिता देवांना प्रिय देवता
स्वरात्मिका संगीताच्या आत्म्यात असणारी
त्रैगुण तिन्ही गुणांचे मूर्त रूप असणारी
वाची ह्या गोड नावाचा अर्थ म्हणजे मधुरज्याला देवी सरस्वती म्हणून ओळखले जाते.
वाग्देवी शिक्षणाची देवी
वागीश्वरी वाणीची देवी, एका रागाचे नाव
वैष्णवी भगवान विष्णूची उपासक
वाणी नावाचा अर्थ भाषणकिंवाचिंतन' आहे. याचा अर्थ आवाजआणिबोललेलाअसा देखील आहे.
वनिश्री भाषण किंवा वाणीची देवी
वानमयी भाषण, संपन्न
वेदश्री हे विशिष्ट नाव वेदांशी संबंधित आहे कारण याचा अर्थ आहे वेदांचे सौंदर्यकिंवा सर्व वेद ज्ञात असलेली' असा होतो.
वीणावाणी वीणा किंवा वाद्य
विदुषी हे विशिष्ट नाव म्हणजे बुद्धिमत्ताकिंवा शिकलेली
विद्यादेवी ज्ञानदेवता
विमला ह्या नावाचा अर्थ 'शुद्ध' असा आहे .
विंध्यावास विंध्य पर्वत निवासस्थान असलेली देवता
सरस्वती देवतेची नावे बऱ्याच गोष्टींचे प्रतिबिंब असते. जर तुम्हाला तुमच्या मुलीचे नाव बुद्धीची हिंदू देवता सरस्वतीचे ठेवायचे असेल तर तुम्ही ह्यापैकी कोणतीही नावे निवडू शकता. आणखी वाचा: तुमच्या बाळासाठी श्री गणेशाची ७५ नावे एकमेवाद्वितीय अशी भारतीय मुलींची अर्थासहित १५० नावे
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved