बाळ

तुमच्या बाळास स्तनपानाची सुरुवात कशी कराल?

स्तनपान ही एक नैसर्गिक, अत्यंत आवश्यक आणि सहज क्रिया आहे. आई आणि बाळ दोघांसाठीही ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे. स्तनपानामुळे तुम्ही आणि तुमच्या बाळामध्ये एक विशेष बंध निर्माण होण्यास मदत होते, शिवाय बाळाला आजारांपासून संरक्षण मिळते. तसेच बाळाची पुरेशी शारीरिक तसेच मानसिक वाढ होते.

स्तनपान सर्वोत्तम का आहे?

आईचे दूध हे नवजात बाळांसाठी नक्कीच सर्वात आरोग्यदायी अन्न आहे. तुमच्या बाळासाठी ते सर्वोत्तम आणि सुरक्षित आहे. फक्त पहिल्या ६ महिन्यांसाठी स्तनपानाची शिफारस का केली जाते याची काही कारणे येथे दिलेली आहेत.

स्तनपान केव्हा सुरू करावे?

बाळाच्या जन्मानंतर काही वेळाने लगेच तुम्ही स्तनपान सुरू केले पाहिजे, कारण बाळाच्या जन्मानंतर तुमचे शरीर जेव्हा पहिले दूध म्हणजे कोलोस्ट्रम तयार करते तेव्हा त्यामध्ये भरपूर पोषणमूल्ये असतात. सुरुवातीच्या काळात बाळाची स्तनाग्रे चोखण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे बाळाला पाजल्यास त्याचा सकारात्मक फायदा होतो. स्तनपानामुळे आई आणि बाळामध्ये चांगला बंध निर्माण होण्यास मदत होते. जन्मानंतर शक्य तितका वेळ बाळाला तुमच्या त्वचेच्या संपर्कात ठेवणे ही चांगली कल्पना आहे. लहान बाळांना स्तनाजवळ घेतल्यावर स्तनाग्र चोखणे किंवा शोधणे यासारख्या क्रिया बाळे करतात. जेव्हा बाळाला दोन वेळा स्तनपान केले जाते, तेव्हा बाळ अधिक वेळा दुधाची मागणी करण्यास शिकेल. सामान्य सक्रिय बाळांना दर एक तासाने स्तनपान द्यावे लागते. मध्यरात्री सुद्धा हे लागू होते. एकदा तुमच्या बाळाची भूक भागली की, बाळाची चिडचिड कमी होईल आणि बाळ शांतपणे झोपेल.

स्तनपानाची तयारी

बाळाला दूध पाजण्यापूर्वी तुम्ही आणि बाळ दोघेही आरामदायक स्थितीत असणे महत्वाचे आहे. स्तनपान देताना बाळाला कसे घ्यावे ह्यासाठी अनेक स्थिती आहेत. तुमची परिचारिका किंवा आरोग्य सेवा प्रदाता तुम्हाला सर्वात योग्य असलेली स्थिती निवडण्यास मदत करेल ह्याची खात्री आहे. ज्या स्थिती मध्ये तुम्ही काही काळ आरामात बसू शकता ती स्थिती तुमच्यासाठी आरामदायक स्थिती असू शकते. बाळ स्तनपान घेत असताना तुम्हाला बाळाकडे बघता आले पाहिजे.

येथे काही स्तनपानाच्या स्थिती दिलेल्या आहेत

बाळाला स्तनपान देताना तुम्ही बाळावर लक्ष ठेवले पाहिजे आणि बाळ जास्तीत जास्त दूध ओढते आहे ना हे पहिले पाहिजे.

नवजात बाळाला स्तनपान कसे सुरू करावे?

बाळाला स्तनपान कसे करावे हे चांगले समजल्यास काम सोपे होते.

तुमच्या बाळाला तुमच्या छातीजवळ धरा जेणेकरून बाळ तुमच्या स्तनाग्रांना तोंड लावू शकेल. तुमच्या स्तनाग्रांना बाळाच्या वरच्या ओठानी स्पर्श करू द्या आणि बाळाने तोंड उघडताच बाळाला स्तनावर ओढा. बाळाच्या तोंडाने स्तनाग्रभोवतीचा जास्त गडद भाग झाकलेला असल्याची खात्री करा.

बाळाला स्तनपान सुरु केल्यावर ते तुमच्यासाठी फार वेदनादायी नाही ना ह्याकडे लक्ष द्या. स्तनपानानंतर स्तनाग्रे मऊ रहात आहे ना हे पहा. जर बाळ स्तनाग्रांना नीट लॅच झालेले असेल तर स्तनाग्रांभोवतीचा जास्तीत जास्त भाग बाळाच्या तोंडात असेल आणि बाळ दूध ओढत असल्याचे तुम्हाला जाणवेल.

जर बाळ लॅच होत असताना दुखत असेल तर, तोंड आणि स्तन यांच्यामध्ये बोट सरकवून,स्तनपान थांबवा. एकदा आरामदायक आणि योग्य स्थितीत आल्यावर, तुम्ही पुन्हा स्तनपान देण्यास सुरुवात करू शकता.

स्तनपानासाठी आरामदायक स्थिती

तुम्ही वेगवेगळ्या स्तनपान स्थिती वापरून पाहू शकता. येथे काही स्थिती आहेत त्यांचा तुम्ही विचार करून बघू शकता.

. क्रेडल होल्डिंग टेक्निक

ही एक सामान्य स्थिती आहे. मानेवर चांगले नियंत्रण असलेल्या बाळांसाठी ही आरामदायक स्थिती आहे

ह्या पद्धतीमध्ये बाळाला स्तनांना लॅच होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो

. क्रॅडल क्रॉस होल्डिंग टेक्निक

याला क्रॉसओवर होल्ड देखील म्हणतात. ह्या पद्धतीमध्ये आई तिच्या एका हाताने बाळाला आधार देऊ शकते.

. फुटबॉल होल्डिंग टेक्निक

ज्या स्त्रियांचे सिझेरीयन झाले आहे किंवा ज्यांचे स्तन मोठे आहेत त्यांच्यासाठी ह्या स्थितीमध्ये स्तनपान देण्याचा सल्ला दिला जातो. अकाली जन्मलेल्या बाळांना सुद्धा स्तनपान देण्याची शिफारस केली जाते.

. जुळ्या मुलांसाठी सुधारित फुटबॉल होल्डिंग टेक्निक

जुळ्या बाळांच्या माता त्यांना स्वतंत्रपणे किंवा एकाच वेळी खायला देऊ शकतात. जर दोन्ही बाळांना एकाच वेळी स्तनपान देणार असाल तर तुम्ही ही स्थिती निवडू शकता.

. साइड ले टेक्निक

ही स्थिती स्तनपान देताना आईसाठी आरामदायी जाते. ह्यासाठी काही कौशल्य आवश्यक आहे, परंतु एकदा शिकून सराव केल्यानंतर, ही स्थिती बहुतेक मातांना आवडते. ज्या मातांचे सिझेरियन झाले आहे त्यांच्यासाठी देखील ही स्थिती चांगली आहे.

बाळाला किती वेळ स्तनपान द्यावे?

विविध अभ्यास आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे असे सूचित करतात की वयाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांसाठी पाणी, पूरक आहार, फळांचे रस, दुग्धजन्य पदार्थ किंवा इतर अन्नपदार्थ न देता सतत स्तनपान करत रहा. बाळ बारा महिन्यांचे होईपर्यंत स्तनपान दिल्यास ते सुरक्षित आहे आणि तसे करण्याची शिफारस केली जाते.

तुमच्या बाळाला पुरेसे दूध मिळत आहे की नाही हे कसे जाणून घ्यावे?

बाळाच्या जन्मानंतर, आईच्या पहिल्या दुधाला कोलोस्ट्रम म्हणतात. हा पिवळसर द्रवपदार्थ असतो आणि त्यामध्ये बाळाची प्रतिकारशक्ती वाढवणारी प्रतिपिंडे भरपूर प्रमाणात असतात. बाळाला पुरेसे दूध मिळते आहे की नाही ही एक सामान्य चिंता आहे. जर तुम्ही बाळाला मागणीनुसार स्तनपान देत असाल आणि बाळाला वेळेवर लघवी होत असेल तसेच दिवसातून ७-८ वेळा शौचास होत असेल आणि शौच पिवळे आणि पातळसर असेल तर बाळाला चांगले स्तनपान मिळत असल्याची खात्री बाळगा.

परंतु, जर बाळामध्ये खालील लक्षणे दिसली तर आपण आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा:

तुम्ही तुमच्या बाळाला किती वेळा स्तनपान दिले पाहिजे?

नवजात बाळाला स्तनपान देण्याचे कोणतेही निश्चित वेळापत्रक नाही, परंतु सामान्यतः निरोगी बाळ दिवसातून आठ किंवा अधिक वेळा स्तनपान घेते. जेव्हा तुमच्या बाळाला भूक लागेल तेव्हा त्यास स्तनपान देणे ही एक चांगली सवय आहे. जास्त स्तनपान देणे हे सुद्धा हानिकारक आहे आणि ते टाळले पाहिजे.

ज्या बाळाला भूक लागलेली असते ते बाळ सहसा अस्वस्थ असते. बाळ भूक लागल्यावर जास्त रडते आणि अंगठा चोखते. ही चिन्हे म्हणजे नवजात बाळासाठी स्तनपानाच्या महत्त्वाच्या टिप्स आहेत. जेव्हा बाळाला स्तनपानाची गरज असते तेव्हा ह्या टिप्स तुम्हाला उपयोगी पडू शकतात.

सिझेरिअन प्रसूती नंतर स्तनपान

सिझेरिअन प्रसूतीमुळे स्तनपानावर परिणाम होत नाही. शस्त्रक्रिया किंवा औषधांमुळे तुमच्यावर शारीरिक ताण येऊ शकतो. तुम्ही बाळाच्या जन्माच्या काही तासांनंतर, साधारणतः सहा ते बारा तासांनी बाळाला वारंवार स्तनपान देण्यास सुरुवात करा. एकदा सुरुवात केल्यावर, दुधाचा पुरवठा सुरळीत सुरु होईल आणि स्तनपानामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. बाळाला स्तनपान देताना कसे घ्यावे ह्यासाठी तुम्ही तुमच्या पतीची मदत घेऊ शकता. क्रेडल होल्डिंग, साईड ले टेक्निक किंवा फुटबॉल होल्डिंग पोझीशन ह्या पैकी तुम्हाला आरामदायक वाटणारी कुठलीही स्थिती तुम्ही निवडू शकता.

स्तनपान करणाऱ्या मातांनी कोणते अन्न खावे?

स्तनपान देणाऱ्या मातेला विशेष कशाचीही गरज नसते परंतु तिला संतुलित आहार मिळणे आवश्यक असते

सर्व परिस्थितीत, स्तनपान करणा-या आईने स्वतःला धूम्रपान आणि मद्यपान ह्यापासून परावृत्त केले पाहिजे.

स्तनपानासाठी काय खरेदी करावे?

स्तनपान करताना नर्सिंग ब्रा वापरण्याचा सल्ला दिला जातो, कारण अश्या प्रकारच्या ब्रा स्तनांना चांगला आधार देतात. ह्या ब्रा ला झिप आणि हुक असतात त्यामुळे वारंवार स्तनपान देताना ते सोईचे होते. तुम्ही पूर्णपणे उघडणारे फ्लॅप असलेले सुसज्ज ब्रा वापरा. जर, स्तन अर्धवट उघडे असतील किंवा पॅडचा स्तनांवर दाब पडत असेल तर त्यामुळे स्तनदाह (स्तनाच्या ऊतींची जळजळ) होऊन नलिका अवरोधित करू शकतात.

ऑक्सिटोसिन ह्या संप्रेरकांमुळे स्तनांमधून दूध गळू शकते. स्वत:ला कोरडे आणि आरामदायी ठेवण्यासाठी प्रवास करताना पुन्हा वापरता येण्याजोगे ब्रेस्ट पॅड सोबत ठेवा. नाईटवेअर लाइट ब्रा देखील उपलब्ध आहेत. आवश्यक असल्यास दूध काढण्यासाठी ब्रेस्ट पंप उपयुक्त ठरू शकतो.

तुमच्या बाळाला स्तनपान करताना तुम्हाला कुठल्या समस्या येऊ शकतात?

खालील परिस्थितीत स्तनपान करणे कठीण होऊ शकते:

नवीन आईसाठी बाळाला स्तनपान देणे ही एक आवश्यक कला आहे. तुमच्या बाळाला स्तनपान देताना संयम, सराव आणि जागरूकता आवश्यक आहे. तुम्हाला बाळाला स्तनपान देण्याची सवय झाल्यावर , तुमच्या लक्षात येईल की तुमचे दूध म्हणजे बाळाला तुमच्या कडून मिळणारी सर्वोत्तम गोष्ट आहे. आईचे दूध हे बाळाच्या उत्तम आरोग्याची खात्री देते.

आणखी वाचा:

बाळाला स्तनपान कसे कराल? नवजात बाळाला स्तनपान देण्यासाठी टिप्स

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved