दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

तुमचे ४७ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमच्या ४७ आठवड्यांच्या बाळाला आता अधिकाधिक शब्द समजू लागले आहेत. ‘तुझे नाक कुठे आहे?’ किंवा तुझे डोळे कुठे आहेत?’ असे प्रश्न विचारलेले त्याला आवडतील. त्याला कदाचित ह्या प्रश्नांची अचूक उत्तरे देता येणार नाहीत परंतु त्याला हा खेळ आवडेल. ह्या टप्प्यावर, बाळाचा मेंदू देखील क्रम आणि खेळ ओळखण्यास सुरवात करेल आणि तो सभोवतालच्या वातावरणाचा अधिकाधिक शोध घेईल. ह्या टप्प्यावर तुमचे बाळ जास्तीत जास्त हालचाल करत असल्याने ह्या कालावधीत बाळाला दुखापत होण्याची जास्त शक्यता असते. तुम्ही बऱ्याचशा गोष्टी उचलून ठेवण्यात आणि बाळापासून दूर ठेवण्यात व्यस्त असाल. तुमचे उत्साही बाळ कशावर तरी चढून किंवा ओढून त्या वस्तू घेतील त्यामुळे तुम्ही सदैव बाळावर लक्ष ठेवा!

तुमच्या ४७ आठवड्यांच्या बाळाचा विकास

रांगत असताना कशाचा तरी आधार घेऊन तुमच्या बाळाला चालताना पाहणे आश्चर्यकारक आहे आणि ते ह्या टप्प्यापासून सुरु होईल. जेव्हा बाळ स्वतंत्रपणे चालण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते अनेकदा अडखळते आणि पडते. बाळाची काही पावले डळमळीत असू शकतात. परंतु बाळ सतत त्याच्या शरीराची स्थिती, तोल आणि स्नायूंची ताकद टिकवून ठेवते. ४७ व्या आठवड्यात बाळाला त्याच्या खेळण्यांपेक्षा मोबाईल फोन, रिमोट कंट्रोल किंवा कटलरी यांसारख्या गोष्टी आवडण्याचा कल वाढेल. ह्याचे कारण म्हणजे त्याने तुम्हाला ह्या वस्तू वापरताना पाहिले असेल आणि त्याला तुमचे अनुकरण करावेसे वाटेल. तुमचे बाळ एक वर्षाचे होताना त्याचे वजन थोडे कमी होऊ लागेल. कारण बाळ आता खायला त्रास देऊ लागते तसेच जेवणाच्या वेळी इकडे तिकडे पळत असते. बाळ जर झोपताना पॅसिफायर वापरत असेल तर तो सोडवण्याची हीच योग्य वेळ आहे. त्याऐवजी तुम्ही बाळासाठी एखादे नवीन खेळणे किंवा ब्लॅंकेट आणू शकता.

आणखी वाचा: तुमच्या ११ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

४७ आठवड्यांच्या बाळाचे विकासात्मक टप्पे

४७ आठवड्यांच्या बाळाचे विकासाचे काही टप्पे खाली दिलेले आहेत

बाळाला आहार देणे

तुमच्या बाळाच्या आहारात आता घन पदार्थ अधिक महत्त्वाचे असतील, परंतु बाळ त्याच्या गरजेनुसार स्तनपान करत राहील. ह्याला इंग्रजी मध्ये 'बेबी- लेड ब्रेस्टफीडिंग' असे म्हणतात. जर तुम्ही दुस-या वर्षीही बाळाला स्तनपान देणार असाल तर तुम्हाला तुमच्या बाळाच्या आहार पद्धतीत बदल करण्याची गरज नाही. पहिल्या वर्षात, आईचे दूध हे तुमच्या बाळासाठी पोषणाचा मुख्य स्त्रोत असतो, परंतु बाळ जसजसे घन पदार्थ खाण्यास सुरुवात करते तसे फक्त बरे वाटावे म्हणून बाळ स्तनपान घेते. तुमच्या बाळाला अन्न, हायड्रेशन, आराम आणि रोगप्रतिकारक समर्थनाचा स्रोत म्हणून स्तनपानाचा फायदा होत राहील. बाळ मोठे झाल्यानंतर फक्त संक्रमणांपासून लढा देण्यासाठी स्तनपानाचा उपयोग होतो. आईच्या दुधातील पोषक घटकांमुळे स्तनपान करणा-या बालकांना आणि लहान मुलांना आजारी पडण्याचा धोका कमी असतो. त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या ४७ आठवड्यांच्या बाळाला स्तनपान थांबवण्याची घाई नसेल, तर तुम्ही तुमची इच्छा असेल तोपर्यंत स्तनपान चालू ठेवू शकता.

आणखी वाचा: ११ महिन्यांच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे पर्याय

बाळाची झोप

शेवटी, ह्या टप्प्यावर तुमच्या बाळाच्या झोपेचा त्रास कमी होईल आणि बाळाच्या झोपेच्या विशिष्ट वेळा ठरतील. बाळ दिवसापेक्षा रात्री अधिक झोपायला सुरुवात करेल. हा बदल वेगाने होणार नाही, तुमच्या बाळाची झोपेची पद्धत सुरुवातीला बदलेल. बाळ अधिक सहजपणे झोपेल आणि पुन्हा जागे होण्यापूर्वी जास्त वेळ झोपेल. तुमच्या बाळाच्या नवीन पद्धतीनुसार तुम्ही तुमच्या दिवसाचे प्लॅनिंग करू शकता. तुमचे बाळ जर अजूनही चालायचे शिकत असेल, तर तुमच्या झोपेमध्ये अजूनही थोडा काळ व्यत्यय येणे सुरु राहणार आहे. जसजसे बाळ चालायला लागते, तसतसे शरीराला पोषणाची गरज जास्त असते. हिमोग्लोबिनच्या कमी पातळीचा बाळाला त्रास होऊ शकतो. दिवसभर सक्रिय राहिल्यामुळे बाळाला रात्री स्नायूंचा थकवा जाणवतो आणि वेदना अधिक जाणवतात. अशावेळी बाळाच्या हातापायांना मसाज करा आणि हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर लोह सप्लिमेंट सुरू करा.

तुमच्या ४७ आठवड्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी ह्याविषयी टिप्स

तुम्ही तुमच्या ४७ आठवड्यांच्या बाळाची खालील प्रकारे काळजी घेऊ शकता:

चाचण्या आणि लसीकरण

सहसा, डॉक्टर या महिन्यात बाळांची नियमित वैद्यकीय तपासणी करत नाहीत.

. चाचण्या

तुमच्या बाळाच्या रक्तातील हिमोग्लोबिन, लोह आणि शिसे यांची पातळी सामान्य आहे की नाही हे तपासण्यासाठी तसेच बाळामध्ये ऍनिमिया किंवा इतर कोणत्याही विकाराची लक्षणे दिसल्यास डॉक्टर त्याची रक्त तपासणी करू शकतात.

. लसीकरण

ह्या वयात, जपानी एन्सेफलायटीस, हिपॅटायटीस ए, व्हॅरिसेला आणि इन्फ्लूएंझा, ह्या लशी वैकल्पिक आहेत, बालरोगतज्ञांशी चर्चा केल्यानंतर त्या घ्याव्यात.

खेळ आणि उपक्रम

तुम्ही तुमच्या ४७ आठवड्यांच्या बाळासोबत खालील खेळ आणि क्रियाकलाप खेळू शकता:

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

खालील कारणांसाठी तुम्ही तुमच्या ४७-आठवड्याच्या बाळाच्या विकासासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता:

काळजी करू नका, तुमचे बाळ आता ४७ आठवड्यांचे झाले आहे. तुमचे बाळ आता ज्या टप्प्यावर आहे तो टप्पा बाळासाठी खूप रोमांचक आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्या लहान बाळासाठी, आतापासून आयुष्य अधिक मजेदार होईल! म्हणून, ह्या काळात आपल्या बाळासोबत आनंद घ्या!

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved