दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

तुमचे ४ आठवड्यांचे बाळ: विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमच्या बाळाच्या जन्माला आता जवळजवळ एक महिना होत आला आहे आणि तुम्ही गेले महिनाभर त्याची काळजी घेत आहात. बाळाला दूध पाजणे, झोपवणे आणि त्याच्याशी खेळणे हे चक्र बऱ्याच कालावधीपासून सुरु असेल. तुमच्या बाळाची वाढ वेगाने होत आहे आणि काही वर्षातच बाळाचे रूपांतर छोट्या मुलीमध्ये किंवा मुलामध्ये होणार आहे.

४ आठवड्यांच्या बाळाचा विकास

सुमारे एका महिन्यात, बाळाचा विकास एकाधिक टप्प्याटप्प्याने होतो आणि ती किंवा जन्माला आल्याची वेळ तुम्हाला आठवेल. ४ आठवड्याच्या वयात बाळाच्या वाढीचा वेग सामान्यत: निरनिराळ्या मार्गांनी होतो. बाळ त्याच्या हातांचे निरीक्षण करेल आणि ते काय आहेत आणि ते कसे वापरावे हे शोधण्याचा प्रयत्न करेल. आवाजासाठी त्याला दिलेला प्रतिसाद पूर्वीपेक्षा आणखी मजबूत असेल. डोळे अधिक बळकट होत असले तरी, लक्ष केंद्रित करण्यासाठी संघर्ष केल्यामुळे ते कदाचित तिरळे भासतील. बाळाची मान अधिक मजबूत होईल ज्यायोगे ते पूर्वीपेक्षा जास्त डोके हलविण्याचा प्रयत्न करेल.

चार आठवड्यांच्या बाळाच्या वाढीचे टप्पे

बाळ एक महिन्याचे झाल्यावर बाळाला आपले स्वतःचे शरीर आहे ह्याचा शोध लागेल. ह्या काळात बाळाचे वजन बऱ्यापैकी वाढलेले असेल. ४ आठवड्यांच्या बाळाचे वजन दर आठवड्याला सुमारे १५० ते २०० ग्रॅम पर्यंत वाढते. जसजसे बाळ आपल्या सभोवतालच्या वातावरणाचे निरीक्षण करू लागते तसे शरीराच्या प्रतिक्षेपांमुळे त्यांना स्वतःचे हात व पाय ओळखू येऊ लागतात. ते त्यांच्या तळवे, बोटांकडे पाहण्यास सुरवात करतील परंतु ते त्यांचे स्वतःचे आहेत आणि स्वतः त्याचा वापर करू शकतो हे समजण्यास अयशस्वी ठरतात. त्यांच्या स्वत: च्या अवयवांचा आणि आजूबाजूच्या इतर गोष्टींचा लागलेला शोध बाळ विविध आवाज काढून आणि रेकून व्यक्त होतात. मूलतः जेव्हा बाळ वेगवेगळे छान आवाज काढू लागते तेव्हासुद्धा हेच होते. आता, तुमचे लक्ष वेधण्यासाठी, बाळ कदाचित नेहमीपेक्षा जोरात आवाज काढेल आणि लगेच रडणार नाही. आणि त्यामुळे तुमची बाळासोबत दीर्घ संभाषणे होऊ शकतात आणि ती दुपारपर्यंत चालू राहतात.

दूध पाजणे

४ आठवड्यांच्या बाळास आवश्यक ते वजन वाढवण्यास मदत करणे गरजेचे आहे. ह्या काळात आपल्या बाळाला वारंवार आपली जीभ बाहेर काढायची प्रवृत्ती असते, आपण कदाचित जिभेवर दुधाचे लहान लहान डाग पाहू शकता. हे सामान्य आहे आणि काळजी करण्याचे कारण नाही. प्रौढांच्या तुलनेत बाळाच्या अन्ननलिकेच्या झडपा तुलनेने शिथिल असतात आणि काहीवेळा थोडेसे दूध तोंडात परत येऊ शकते. हे अधूनमधून पुसून घेणे चांगले. बाळाला दूध देण्याच्या वारंवारितेत वाढ झाल्यामुळे तुमच्या लक्षात येईल की तुमच्या स्वतःच्या स्तनपानाचे प्रमाण खाली जात आहे, विशेषत: संध्याकाळी हे प्रमाण जास्त कमी होते. दुपारच्या वेळी डुलकी घेत किंवा झोपून असताना आपल्या बाळाशी खेळत राहिल्याने ह्या समस्येचे निराकरण केले जाऊ शकते. आपल्या स्वत: च्या जेवणाचे वेळापत्रक पाळा, ते देखील महत्वाचे आहे आणि आपल्या बाळाला पाजण्यास उशीर करू नका. दुधाचा पुरवठा सातत्याने चालू ठेवण्यासाठी अन्न आणि विश्रांती दोन्ही अत्यंत आवश्यक आहेत.

झोप

ह्या काळात बाळ नवीन गोष्टी शोधत असते आणि त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त काळ जागे राहण्याची वृत्ती वाढते. एकदा दूध प्यायल्यानंतर, तुमचे बाळ शांत झोपू शकेल आणि त्याच्या हातांनी खेळू शकेल किंवा झोपी जाण्यापूर्वी तुमच्याशी गप्पा मारेल. ह्या काळात आपले बाळ नैसर्गिकरित्या शांत आहे की जास्त ऊर्जावान आहे किंवा तुमचे लक्ष त्याला वेधून घ्यायला आवडते हे तुम्हाला समजू लागते. ४ त्या आठवड्यात झोपेचे वेळापत्रक अद्याप थोडे अनियमित असल्याने, तुम्ही तुमच्या बाळास जास्त काळ आपल्या जवळ ठेवावे आणि झोप लागावी म्हणून कुशीत घ्यावे. ह्या अवस्थेत बाळाला सुरक्षित वाटण्याची आवश्यकता आहे कारण तुम्ही सतत बाळाजवळ नसता हे बाळाला आता समजू लागेल.

वागणूक

मागील आठवड्यांमधील संभाषणांमधून, तुमच्या बाळाला त्याच्या तोंडाचे वेगवेगळे उपयोग समजतील. बाळ वेगवेगळे आवाज काढू लागेल तसेच काही वेळा गुळण्या काढताना जसा आवाज येतो तसा आवाज काढू लागेल . या टप्प्यावर बाळांना आजूबाजूला माणसे हवी असतात आणि सतत सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावे किंवा आपल्याशी बोलावे असे बाळाला वाटू लागते. आपल्या सगळ्या भावना चेहऱ्यावरील हावभावांद्वारे बाळ व्यक्त करू शकत नसले तरी बाळाच्या चेहऱ्यावर चिडचिडेपणा, अस्पष्ट हास्य किंवा वेदनादेखील दिसू शकतात. ह्यामुळे आपल्या बाळास काय आवश्यक आहे हे आधीच समजण्यास मदत होईल. बाळाच्या डोळ्याची हळुवार उघडझाप होणे हे त्याला झोप आल्याचे लक्षण आहे. अशा वेळी बाळाला अलगद खाली ठेवून झोका दिल्यास, अंगाई गीत गायल्यास बाळ झोपी जाईल. बाळाच्या शरीराच्या वरच्या भागाची शक्ती वेगाने विकसित होत आहे आणि ती अधिक वाढण्यासाठी तुमच्या देखरेखीखाली बाळाला पोटावर झोपवणे आवश्यक आहे. ह्या कालावधीत बाळाने मान धरणे किंवा स्वतःचे शरीर पेलणे ह्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे.

४ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

चाचण्या आणि लसीकरण

सहसा, बाळाच्या पहिल्या महिन्याच्या शेवटी आणि दुसरा महिना संपण्यापूर्वी, डॉक्टर हेपेटायटीस बी लसीची दुय्यम फेरी देण्याची शिफारस करतात. हि लस प्रामुख्याने यकृताचा संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी आहे.

खेळ आणि क्रियाकलाप

तुमच्या बाळाचे ऐकण्याचे कौशल्य विकसित होते, तुम्ही बाळासोबत ध्वनीविषयक गेम खेळून त्याचा अनुभव विकसित करू शकता. तुमचा चेहरा तुमच्या तळहातांनी बंद करून आणि वेगवेगळे आवाज करून, काय घडत आहे हे शोधण्याचा बाळाला प्रयत्न करू द्या. तुम्ही त्याच्या कानाजवळ जाऊन हळू हळू कुजबुज करू शकता आणि त्याच्याशी बोलू शकता. सर्व भिन्न तंत्रांमुळे खूप गोष्टी शिकून घेण्यासाठी बाळाचा उत्साह वाढेल. असे केल्याने बाळ हळू किंवा मोठ्याने आवाज काढू शकते आणि तुम्ही जसा त्याचाशी संवाद साधता तसेच तो करण्याचा प्रयत्न करेल. कानाच्या दिशेने आवाज करा. त्यामुळे बाळाला दोन्ही बाजूने ऐकू येते हे समजेल आणि आणि आपल्याला दोन कान आहेत हे सुद्धा बाळाच्या लक्षात येईल. ह्या वयात मुलांना सामान्यतः जाणीव असणारा एकमेव वास म्हणजे त्यांच्या आईच्या दुधाचा गंध. ह्या गंधामुळे बाळ तुम्हाला ओळखू शकेल. म्हणूनच, जर आपण त्याला त्याच्यासाठी सुरक्षित असलेल्या इतर वस्तूंच्या गंधांची ओळख करून देऊ शकलात तर ते छान आहे. त्याला आपल्या कुशीत घ्या, चादरीमध्ये छान गुंडाळा जेणेकरून त्याला सुरक्षित वाटेल. नंतर एक लहान कापड घ्या आणि पावडरच्या डबीतील थोडी पावडर हलकेच टिपून घ्या. जास्त घेऊ नका. ते बाळाच्या नाकाजवळ आणा आणि त्याला सुगंध समजू द्या. सेनिटायझरच्या बाबतीत सुद्धा असे केले जाऊ शकते. प्रत्येक सुगंध घेतल्यानंतर त्याला तुमचा चेहरा बघू द्या आणि त्याला प्रतिक्रिया देऊ द्या. वास आणि चेहऱ्यावरील प्रतिक्रिया यांच्यातील संबंध बाळाला काय चांगले आहे आणि काय चांगले नाही हे समजावण्यास मदत करेल आणि त्यानुसार आपल्याशी संवाद साधण्यास त्याची मदत होईल.

आपल्या डॉक्टरांशी केव्हा संपर्क साधाल?

सुमारे एक महिना किंवा त्याहून अधिक काळ लोटल्यानंतर बाळाची निरोगी वाढ होत असल्याची पुरेशी लक्षणे दिसू लागतात. म्हणूनच, काही लक्षणांची पस्थिती किंवा अनुपस्थिती लक्षात घेणे आणि त्यांना वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यकता असल्यास ते समजणे महत्वाचे आहे. जर ४ आठवड्याच्या बाळामध्ये बद्धकोष्ठतेची समस्या दिसत असेल आणि बाळाला एक दिवसाहून अधिक काळ शौचास होत नसेल तर त्यामुळे नंतर गुंतागुंत निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे ते त्वरित डॉक्टरांच्या लक्षात आणून द्यावे.
खाद्या बाळास आसपासच्या वस्तू आणि निरनिराळ्या ध्वनी व्यवस्थित जाणून घेण्यास सुमारे एक महिना लागतो. परंतु त्यानंतरही, जर आपले बाळ कोणत्याही प्रकारच्या टाळ्यांना किंवा हाकेला प्रतिसाद देत नसेल, मोठा आवाज केल्यावर डोळे मिचकावत नसेल, वस्तूंवर लक्ष केंद्रित करत नसेल किंवा तुमचा चेहरा ओळखत नसेल, त्याच्या बुबुळांचा रंग अस्पष्ट असेल, तर ही सगळी लक्षणे एखाद्या डिसऑर्डरची असू शकतात आणि त्याविषयी लवकर डॉक्टरना कळविले पाहिजे. ह्या वयात लहान बाळे खूप आवाज करतात. ते त्यांचे हात पाय हलवतात आणि शरीराचे विविध भाग समजून घेण्याचा प्रयत्न करतात. बाळांना खूप कुतूहल आणि उत्सुकता असते. बरीच बाळे शांत असतात, परंतु तरीही अधूनमधून अनेक प्रतिक्रिया व्यक्त करतात. त्या तुलनेत, जर आपले बाळ अनैसर्गिक शांत असेल, जास्त हालचाल करीत नसेल, हातापायांची हालचाल करीत नसेल किंवा इतरांपेक्षा किंचित वेगळे असेल तर डॉक्टरांच्या नजरेत ही बाब आणून देणे आवश्यक असू शकते. तुमचे बाळ आता एक महिन्यांचे झाल्यामुळे बाळ आता स्वतः एक वेगळी व्यक्ती आहे हे त्याला समजू लागले आहे. कुटुंबात एकत्र वेळ घालवून आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी नियमित संवाद साधून तुम्ही तुमच्या बाळामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करू शकता. मागील आठवडा: तुमचे ३ आठवड्यांचे बाळ - विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी पुढील आठवडा: तुमचे ५ आठवड्यांचे बाळ - विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved