Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण आहार आणि पोषण गरोदरपणात मखान्याचे (लोटस सीड्स) ८ आरोग्यविषयक फायदे

गरोदरपणात मखान्याचे (लोटस सीड्स) ८ आरोग्यविषयक फायदे

गरोदरपणात मखान्याचे (लोटस सीड्स) ८ आरोग्यविषयक फायदे

जेव्हा तुम्ही आई होणार असता, तेव्हा तुमच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी तुम्हाला काही पदार्थ खाणे टाळावे लागते. काही खाद्यपदार्थांचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, परंतु काही खाद्यपदार्थ अत्यंत फायदेशीर असतात. विशेषत: गरोदरपणात हे पदार्थ खाल्ल्याने मदत होते. असाच एक पदार्थ म्हणजे मखाना. त्यास इंग्रजीत फॉक्स नट्स किंवा लोटस सीड्स असे देखील म्हणतात.

मखाना म्हणजे काय?

मखाना, म्हणजेच लोटस सीड्स त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी आशियामध्ये लोकप्रिय आहेत. विविध पाककृतींमध्ये देखील मखान्याचा वापर केला जातो.

मखाना कच्चा किंवा शिजवून दोन्ही पद्धतीने खाता येतो. मखान्यामध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक असतात. गरोदरपणात मखान्याचे आरोग्यविषयक फायदे कुठले आहेत हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

मखान्याचे पौष्टिक मूल्य

मखान्याचे पौष्टिक मूल्य

मखान्यामध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात. गरोदरपणात आईने खाल्ले पाहिजेत अश्या पौष्टिक पदार्थांपैकी मखाना एक आहे. मखान्याचे सेवन प्रामुख्याने दक्षिणपूर्व आणि दक्षिण आशियामध्ये केले जाते. मखान्यामध्ये खालील पौष्टिक घटक आहेत.

  • कॅल्शियम
  • स्फुरद
  • लोखंड
  • मॅंगनीज
  • व्हिटॅमिनबी कॉम्प्लेक्स
  • पोटॅशियम
  • अमीनो ऍसिडस् आणि
  • अँटिऑक्सिडंट्स

गरोदरपणात तुम्ही मखाना कुठल्या स्वरूपात खाता ह्यावर त्याचे सेवन अवलंबून असते. मखाना सूप, करी किंवा तळून स्नॅक्स म्हणून वापरले जाऊ शकते.

गरोदरपणात मखान्याचे फायदे

गरोदरपणात मखान्याचे सेवन करण्याचे काही फायदे येथे दिलेले आहेत:

. निद्रानाशावर उपचार

मखना निद्रानाशावर उपचार करण्यासाठी उत्तम आहे. निद्रानाश हा हार्मोन्समधील बदल, ताण आणि खाण्याच्या सवयी यासारख्या विविध कारणांमुळे होऊ शकतो. मखान्याची निद्रानाशावर उपचार करण्यास मदत होऊ शकते कारण मखान्यामध्ये आयसोक्विनॉलिन अल्कलॉइड्स असतात. त्यामुळे शांत प्रभाव पडतो आणि झोप येते. मखान्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे शरीराच्या कार्यप्रणालीचे अशा प्रकारे नियमन करतात की एखाद्या व्यक्तीला झोपेची वेळ झाल्यावर बरोबर झोप येते.

. अतिसार प्रतिबंधित करण्यास मदत होते

अतिसाराची समस्या मखाना खाऊन सहज हाताळली जाऊ शकते. संप्रेरकांच्या पातळीमध्ये बदल झाल्यामुळे बर्‍याच स्त्रियांना समस्यांचा सामना करावा लागतो. यात अतिसाराचाही समावेश होतो आणि मखाना यावर उत्तम उपाय असल्याचे म्हटले जाते. मखाना तुमच्या पचनसंस्थेची ताकद वाढवू शकतो आणि या टप्प्यात अन्नाचे पचन योग्य प्रकारे होते. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात दररोज मखाना खाल्ल्याने अतिसार आणि पचनाशी संबंधित इतर समस्या टाळण्यास मदत होईल.

. रक्तदाब नियंत्रण

गरोदरपणात तुम्हाला रक्तदाबाची समस्या असल्यास, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मखाना खाणे हा योग्य पर्याय आहे. मखान्याच्या मधल्या भागामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात आणि शरीरावर थंड प्रभाव प्रदान करतात. मखान्याचा मधला भाग रक्तप्रवाह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो तर इतर कडू भाग म्हणजेच आयसोक्विनोलीनरक्तवाहिन्यांचे प्रसरण करतात. त्यांच्यामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते, तर पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि रक्तदाब कमी होतो.

. वेदनादायक हिरड्यांना आराम मिळतो

गर्भारपणामुळे जर तुम्हाला हिरड्यांमध्ये वेदना होऊन रक्तस्त्राव होत असेल तर ते संप्रेरकांमधील बदलांमुळे आहे. जास्त पाणी टिकून राहिल्यामुळे हिरड्या दुखू शकतात .

मखाना खाऊन तुम्ही शरीरातील व्हिटॅमिनबी कॉम्प्लेक्स वाढवू शकता. झिंक तुमच्या हिरड्या स्वच्छ करण्यात आणि वेदना कमी करण्यास मदत करेल.

. वजन नियंत्रित होते

गरोदरपणात तुमचे वजन वाढेल आणि हे वाढणारे वजन नियंत्रित करणे कठीण होऊ शकेल. आपण चांगले खाणे महत्वाचे आहे. परंतु, जास्त खाऊ नका. गरोदरपणात मखाना खाणे चांगले असते कारण त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि त्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत होते. मखान्यामध्ये इतर बरीच खनिजे देखील असतात, त्यामुळे तुम्हाला इतर भरपूर पौष्टिक घटक मिळतात.

. रक्तातील साखर नियंत्रित होते

गरोदरपणात तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मखान्याची मदत होते. तणावामुळे तसेच हार्मोन्समुळे तुमच्या शरीरातील साखर वाढण्याची शक्यता असते. आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास मखान्याची मदत होऊ शकते. मखान्यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात आणि कॅलरीज कमी असतात. मखाने खाल्ल्याने कॅलरी बर्न करण्यास आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत होते.

. ऊर्जा वाढते

गरोदर असताना सर्वात त्रासदायक भावना म्हणजे तुम्ही थकवा येणे. थकव्यायवर मात करणे खूप कठीण आहे, विशेषतः जर तुम्हाला काही काम पूर्ण करायचे असेल तर थकवा नाहीसा व्हावा असे वाटते. थकव्याशी सामना करण्यासाठी मखाना खाणे हा एक उत्तम मार्ग आहे कारण त्यात लोह, जस्त, पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात आणि त्यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटू शकते.

. गर्भाचा विकास

कमळाच्या बियांमध्ये असलेल्या प्रथिनांच्या उच्च पातळीमुळे, तुम्ही तुमच्या गर्भाचा योग्य पद्धतीने विकास करण्यास मदत करू शकता. मखान्यामध्ये असलेली प्रथिने, इतर महत्वाच्या पोषक तत्वांसह गर्भाच्या मध्यवर्ती पचनसंस्थेचा विकास करण्यासाठी मदत करू शकतात आणि जीवनसत्त्वे बाळाला खाल्लेल्या अन्नातून इतर पोषक द्रव्ये शोषून घेण्यास मदत करतात. मखाना खाल्ल्याने गर्भाच्या वाढीस आणि विकासालाही खूप चालना मिळते कारण त्यात भरपूर खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात.

मखाना कसा खावा?

दैनंदिन आहारात मखान्याचा समावेश कसा करायचा असा विचार बऱ्याच स्त्रिया करत असतात. खरं तर, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मखान्याचा समावेश तुमच्या आहारात करू शकता. गरोदरपणात तुम्ही मखना कसा खाऊ शकता ते इथे दिलेले आहे.

. साधे भाजलेले

मखाना भाजून खाल्ल्यावर पॉपकॉर्नला तो एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला फक्त मखाने एक चमचा लोणी किंवा तुपात हलके भाजायचे आहे. छान चवीसाठी तुम्ही मीठ, मिरची पावडर किंवा इतर कोणताही मसाला घालू शकता.

. खीर

मखना घालून खीर पौष्टिक तर होतेच परंतु ती घट्ट होण्यासही मदत होते. वर सांगितल्याप्रमाणे काही साधे मखना फक्त भाजून घ्या आणि स्वयंपाक पूर्ण होण्याआधी पाच मिनिटे, बारीक करून खिरीमध्ये घाला.

. लाडू

थोडासा साधा मखना भाजून त्याची बारीक पूड बनवा. आता, ही पूड रेसिपीमधील इतर घटकांसोबत मिसळा, आणि तुमच्यासाठी आता ते पौष्टिक आणि आरोग्यदायी लाडू आहेत.

गर्भधारणेसाठी मखना चांगला आहे का?” असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर तुमचे उत्तर स्पष्ट आहे होय! मखना हा शरीर आणि मनासाठी पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहे. मखान्याचे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत. मखना खाल्ल्याने तुम्हाला तुमचे वजन आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच मखान्याची इतरही बरीच मदत होते म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला मखाने खावेसे वाटतील तेव्हा अजिबात संकोच करू नका.

आणखी वाचा:

गरोदरपणात भेंडी (ओकरा) खाणे चांगले आहे का?
गरोदरपणात काबुली चणे (छोले) खाणे – आरोग्यविषयक फायदे आणि दुष्परिणाम

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article