बाळ

नवजात बाळाला स्तनपान देण्यासाठी १० टिप्स

    In this Article

नवजात बाळाला स्तनपान केल्याने आई आणि नवजात बाळामधील बंध मजबूत होतो. जर तुम्ही गरोदर असाल किंवा नुकतीच तुमची प्रसूती झाली असेल, तर तुमच्या बाळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे दूध आहे की नाही ह्याचा विचार तुम्ही करत असाल. तुम्ही बाळाला स्तनपानाचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही आरामात राहून स्वतःला शांत करणे गरजेचे आहे. जर कधीकधी स्तनपान तुम्हाला नैसर्गिकरित्या येत नसले तरीसुद्धा तुम्हाला आणि तुमच्या बाळाला काही तडजोडी कराव्या लागतील, परंतु स्तनपानामुळे आई आणि बाळामधील बंध अधिक दृढ होतो. स्तनपान हे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नवीन आहे आणि काही दिवसात तुम्हाला त्याची सवय होईल.

नवजात बाळाला स्तनपान कसे करावे?

नवीन मातांसाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत ज्यामुळे त्यांच्यासाठी स्तनपान हा एक आरामदायक आणि सुलभ अनुभव असेल.

. आरामात रहा

पहिल्याच दिवशी आपल्या नवजात बाळाला स्तनपान करताना, तुम्ही आरामात असणे आवश्यक आहे. स्तनपान हा केवळ आईसाठी आरामदायी अनुभव नसावा, तर तो बाळासाठी सुद्धा एक सुखदायक आणि दिलासा देणारा अनुभव असावा. बाळाला स्तनपान देताना तुम्ही शांत खोलीत बसा. चांगले संगीत आणि प्रकाशयोजना तुम्हाला आराम, शांत आणि आनंदी वाटण्यास मदत करू शकते.

. शक्य तितक्या वेळा स्तनपान करा

जन्मानंतरचे पहिले काही दिवस तुम्ही तुमच्या बाळाला वारंवार दूध पाजणे फार महत्वाचे आहे. याचे कारण असे की बाळाला वारंवार स्तनपान दिल्याने तुमचा दुधाचा पुरवठा योग्य आणि बाळाच्या गरजेनुसार होईल. जर तुम्हाला बाळाच्या स्तनपानाच्या वेळेबद्दल काळजी वाटत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोला.

. बाळाला गुंडाळणे

दुपट्यामध्ये गुंडाळून ठेवल्यावर बाळ शांत राहते आणि जास्त वेळ झोपते तसेच दुधासाठी सुद्धा ते उठत नाही त्यामुळे तुम्‍हाला तुमच्‍या बाळाला गुंडाळून ठेवण्याचा मोह होऊ शकतो. परंतु तुमच्या दुधासाठी ते चांगले नाही. दूध पुरवठा सुरू करण्यासाठी, तुमच्या बाळाला जास्त वेळा दूध पाजले पाहिजे.

. वेगवेगळ्या स्थिती वापरून पहा

जर तुम्हाला तुमच्या बाळाला एखाद्या विशिष्ट स्थितीत किंवा तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे स्तनपान करवण्यास सोयीस्कर वाटत नसेल, तर तुम्ही तुम्हाला आरामदायक वाटेल अशा स्थितीत स्तनपान करा. स्तनपानाच्या सत्रादरम्यान तुम्हाला आणि तुमच्या बाळाला आरामदायी वाटणे हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला अतिरिक्त जास्तीचा मिळण्यासाठी तुम्ही काही उशा वापरू शकता. परंतु, तुमचे बाळ नीट लॅच होत असल्याची खात्री करा.

. तुमच्या बाळाला लॅच होण्यास मदत करा

नुकत्याच आई झालेल्या बऱ्याचशा स्त्रिया बाळ नीट लॅच झालेले आहे किंवा नाही ह्याकडे लक्ष देत नाहीत. चुकीचे लॅचिंग केल्यास ते तुमच्या स्तनाग्रांसाठी चांगले नाही तसेच त्यामुळे बाळाला पुरेसे दूध सुद्धा मिळत नाही. बाळ स्तनाग्रांना नीट लॅच होण्यासाठी तुमच्या बाळाला स्तनाग्राच्या भोवतालच्या काळ्या भागावर किंवा स्तनाग्रावर तोंड लावण्यास मदत करा.

. तुमच्या बाळाला जाग येते तेव्हा त्याला स्तनपान द्या

नवजात बालके त्यांचा बराचसा वेळ झोपण्यात घालवतात आणि जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हाच उठतात. तुमचे बाळ झोपेतून जागे होताच, त्यांना स्तनपान देण्यास सुरुवात करणे चांगले. यामुळे बाळ चिडचिड करणार नाही तसेच तुमचा दुधाचा पुरवठा सुद्धा सुरळीत होईल.

. पॅसिफायर वापरू नका

काही माता नवजात बाळासाठी पॅसिफायर वापरू शकतात. तुमच्या बाळासाठी पॅसिफायर वापरणे टाळा कारण बाळ ते चोखते. चोखणे हा तुमच्या बाळासाठी एक प्रकारचा व्यायाम आहे आणि स्तनपानाच्या वेळेला बाळाला थकवा जाणवू शकतो .त्यामुळे फक्त स्तनपानाच्या वेळेला बाळाने स्तनाग्रे चोखली पाहिजेत. तुम्ही तुमच्या नवजात बाळाला पॅसिफायर देण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्याचे वजन वाढण्याची वाट पहा.

. घाबरू नका

तुम्ही तुमच्या नवजात बाळाला २४ तासांमध्ये ८ ते १२ वेळा दूध पाजत असाल. त्यामुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो. पण घाबरण्याची गरज नाही. नवजात बाळे इतके वेळा दूध पितात कारण त्यांचे पोट लहान असते आणि त्यांना वारंवार स्तनपान द्यावे लागते.

. तुमच्या बाळाला आरामदायक कपडे घाला

बाळाला उबदार राहण्याची गरज आहे असा विचार करून आपण त्यांना जास्त कपडे घालतो. बाळांनी उबदार वातावरणात असणे आवश्यक आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण त्यांना अनेक कपड्यांचे एकावर एक थर घातले पाहिजेत. तुम्ही तुमच्या बाळाला स्वतःसारखेच कपडे घालणे चांगले. अस्वस्थ आणि अत्याधिक कपड्यांमुळे बाळ विक्षिप्त होते आणि ते झोपू शकत नाहीत आणि चांगला आहार घेऊ शकत नाही.

१०. मदत घ्या

नवीन मातांना स्तनपान करणे कधीकधी कठीण होऊ शकते आणि त्यांना ते हाताळणे कठीण होऊ शकते. अशा कोणत्याही परिस्थितीत, तुम्ही मदतीसाठी विचारण्यास मागे पुढे बघू नका. कुटुंबातील सदस्य, मैत्रिणी किंवा डॉक्टरांची मदत घ्यायला संकोच बाळगू नका.

जन्म दिल्यानंतर पहिले काही दिवस किंवा अगदी एक महिना, नवजात आईसाठी स्तनपान करणं थोडंसं कठीण असतं. हे अगदी नैसर्गिक आहे आणि तुमचा दिनक्रम लवकरच सुरळीत होईल. नवजात बाळाला स्तनपान देण्याबाबत तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा चिंता वाटत असेल तर , तुम्ही त्यासाठी बालरोगतज्ञांशी संपर्क साधू शकता.

आणखी वाचा:

बाळाला स्तनपान कसे कराल? स्तनपानाविषयी नेहमी विचारल्या जाणाऱ्या २० प्रश्नांची उत्तरे

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved