बाळ

मुलींसाठी अर्थासहित १३० छोटी नावे

    In this Article

बाळाचे नाव ठेवणे हे एक अवघड काम असू शकते, विशेषत: जर तुम्हाला बरेच लोक नाव सुचवत असतील तर तुमच्या मनात बरीच नावे असतील पण त्यातील कुठले नाव निवडावे ह्या विचाराने तुमची व्दिधा मनःस्थिती होईल. जर तुम्ही मुलासाठी नाव निवडून ठेवले असेल आणि मुलीसाठी योग्य नावाच्या शोधात असाल तर काळजी करू नका. मुलीचं नाव खूप महत्वाचे आहे कारण ते नाव तिच्यासोबत तिच्या आयुष्यभर राहणार आहे. त्या नावाला अर्थ असावा, तसेच ते तुमच्या कल्पनेतली असावे आणि ते चांगले सुद्धा असावे. तुम्हाला तुमच्या मुलीचे नाव ठरवण्यास मदत करण्यासाठी, खाली दिलेल्या १०० छोट्या आणि गोड नावांवर नजर टाकुयात.

छोट्या मुलींसाठी सर्वोत्तम छोटी नावे

मुलींसाठी चांगली छोटी नावे सापडणे सोपे नाही, परंतु खाली मुलींची नावे दिलेली आहेत जी तुमच्या मुलींसाठी योग्य असतील.
नाव नावाचा अर्थ
आभा ह्याचे संस्कृत भाषांतर 'चमक' असे आहे
आंशी याचा अर्थ आहे 'देवाची भेट'
आरल फूल
आर्णा हे देवी लक्ष्मीचे दुसरे नाव आहे
आशी स्मित, आनंद, हशा, आशीर्वाद
आसमी मी, आत्मविश्वास
अभिलाषा इच्छा
अभिनती मैत्री
आदर्श परिपूर्ण
अद्वैता अद्वितीय
आद्या प्रथम
आयेशा इच्छा
अग्निजीता अग्नीला जिंकणारी
आग्नेयी अग्नीची मुलगी
अहल्या हिंदू पौराणिक कथांमध्ये हे नाव गौतम ऋषींच्या पत्नीचे आहे
अहाना जो मारला जाऊ शकत नाही
अजिता जो पराभूत होऊ शकत नाही
अमाया निर्दोष, कपटी नसलेली
अमोली अनमोल, अमूल्य
अनाया देवाचे उत्तर, काळजी घेणारा, संरक्षक, संरक्षित
अनुपा तलाव
अनुरा जाणकार, हुशार, दयाळू
अर्द्रा सहावा तारा
अरिया एक सुंदर चाल
आर्या देवी
अशना मैत्रीण, सुगंधित, परफ्युम, प्रिय, प्रेमासाठी एकनिष्ठ,प्रशंसा
अश्नी प्रकाश
असिन सुंदर किंवा परिपूर्ण
असिता यश, अमर्याद, रात्री, गडद शांत, निळी, उबदार, गरम
ऑरा वारा किंवा हवा
अविका सूर्यकिरण
बानी याचा अर्थ संस्कृतमधील अर्थ देवी आहे
बद्रीया पौर्णिमा
बसंती वसंत ऋतू
बेला वेळ किंवा पवित्र लाकूड
बिनी विनम्र किंवा नम्र
बुद्धी बुद्धिमत्ता किंवा शांत मनाची
किताना बुद्धिमत्ता किंवा तेज
चहना प्रेमाचे भाषांतर
चित्रा नयनरम्य, सुंदर
सिया मूळ शब्द ग्रीक आहे आणि त्याचे भाषांतर 'चंद्राच्या' असे आहे
दक्ष, कुशल आणि प्रतिभाशाली, भगवान शिवची पत्नी
दामिनी विजयी
द्वान सूर्योदय होण्याची वेळ
दीया दिव्य, दिवा
दिप्ती चमक किंवा चमकदार
दिशा दिशा
दित्या दुर्गा देवीचे एक नाव, प्रार्थनांचे उत्तर, लक्ष्मीचे दुसरे नाव
दिवा देवी गायिका, लोकप्रिय संगीताची एक प्रसिद्ध महिला गायिका, एक मागणी
द्रिधा हे बौद्ध देवीचे नाव आहे
दुर्गा हे एका हिंदू देवीचे नाव आहे
ड्यूमना तेजस्वी
एधा संपत्ती किंवा सामर्थ्य
ईशा देवी पार्वतीचे दुसरे नाव, प्रार्थना, शुद्धता आणि देवाकडून मिळालेली भेट
इला पृथ्वी आणि हिंदू पौराणिक कथांनुसार मनुची मुलगी आहे
एका अद्वितीय आणि दुर्गा देवीचे नाव
एकांता एकाला समर्पित
एम्मा वैश्विक, एक उत्कृष्ट मोहक नाव
इरीन एक अद्वितीय नाव, याचा अर्थ आयरिश भाषेत शांतताआहे
एटा चमकदार
इति आगमन
फलक तारा, स्वर्ग, भव्यता
गार्गी एक शिक्षित स्त्री, देवी दुर्गा, विचार करण्यास प्रेरणा देणारी व्यक्ती
गया शहाणी
गिवा टेकडी, उंच जागा
ग्रेस लॅटिन मूळ असलेले नाव, ज्याचा अर्थ आहे देवाची कृपा
हाफिजा संरक्षित
हिता प्रत्येकाचे चांगले चिंतणारी
होप आशा
हृदा शुद्ध
इडा हुशार
आयनिका छोटी पृथ्वी
इनू आकर्षक किंवा सुंदर
इप्सा महत्वाकांक्षा, इच्छा
इप्शा इच्छा
इरा पृथ्वी, सरस्वती देवीचे नाव, जागरूक, वंशज, हिंदी युग
झील तलाव
जिया प्रिय
जुही एक सुंदर फूल
काई महासागर
कनन कलात्मक, हुशार किंवा सर्जनशील
कला कला, हुशार
कानी मुलगी
कियारा केशरचना, देवाची अमूल्य भेट, सूर्याचा पहिला किरण, प्रकाश, स्पष्ट
किरा याचा अर्थ रशियन भाषेत दूरदर्शीअसा आहे
किआ एक पक्षी किंवा मधुर, शुद्ध, धन्य, प्रिय, धार्मिक
क्रांती निसर्गाची शक्ती
क्रिया या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये कामगिरीआहे
लारा प्रसिद्ध आणि मोहक
लावण्य दुर्गा देवीचे दुसरे नाव
लया संगीतमय ताल
लीरा देवी कालीचा भक्त
लोपा शिकलेली
माबेल प्रेमळ
मानवी सर्वगुणसंपन्न
मीली शोध
मेघा ढग
नभा आकाश, अमर्याद
नामी श्रीविष्णू भक्त, विष्णूचे नाव घेणारी
नव्या तरुण, ​​प्रशंसनीय
नीरा पाणी, अमृत किंवा शुद्ध पाणी, देवाचा भाग, रस, मद्य
नीसा शुद्ध, हुशार
नित्य चिरंतन, देवी पार्वती, सतत
ओजा चैतन्य
ओम विश्वाच्या निर्मिती दरम्यान केलेला आवाज
ओमा आयष्याची निर्मिती करणारी
ओरजा ऊर्जा
पहल प्रारंभ
पारू तज्ञ किंवा जाणकार
कादिरा सक्षम
राय राधेचे दुसरे नाव
रेहा शत्रूंचा किंवा तारकेचा विनाशक
रिया देवी लक्ष्मीचे एक नाव, एक रत्न, सुंदर आणि गायक
रुआ देवी पार्वतीचे दुसरे नाव आणि परिपूर्णतेच्या जवळ
साहा सहन करणारी , पृथ्वी, हिंदू पुराणकथांमधील अप्सरेचे दुसरे नाव
सारा राजकुमारी
सेरेना शांत किंवा प्रसन्न
शोनी लाल कमळासारखी
सिया सीतेचे दुसरे नाव, भगवान श्रीरामाची पत्नी
तशा जन्म
तया याचा अर्थ परिपूर्णपणे तयार केलेला किंवा राजकुमारी असा आहे
उना सौंदर्य, सत्य आणि ऐक्य यांचे अवतार. याचा अर्थ एकआणि देखील
उर्वी पृथ्वी
वरा हे पार्वती देवीचे दुसरे नाव आहे आणि याचा अर्थ इच्छा असा आहे
वाया शाखा, ऊर्जा, शक्ती आणि पवित्र
याना हा स्लाव्हिक शब्द आहे आणि याचा अर्थ देव दयाळू आहेअसा आहे
याशी प्रसिद्ध किंवा यशस्वी
झिया म्हणजे सौंदर्य, वैभव आणि प्रकाशाची चमक
आधुनिक काळात लहान मुलांची छोटी नावे वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहेत, कारण ती स्टाइलिश आणि उच्चारायला सुद्धा सोपी आहेत. लहान नावे आपल्या बाळास भविष्यात बर्‍याच लोकांशी संवाद साधण्यास सुलभ करतात आणि ऐकणाऱ्याच्या प्रत्येकाच्या लक्षात राहतात. तुम्ही त्यांचे टोपणनाव म्हणून देखील ते वापरू शकता. चांगल्या गोष्टी नेहमी छोट्या पॅकेट्स मध्ये येतात आणि त्यामुळे मोठ्या नावांपेक्षा लहान नावे अधिक चांगली मानली जात आहेत. पूर्वीच्या पिढ्यांमध्ये मुलींसाठी लहान टोपणनावे सर्वसामान्यपणे असायची कारण लोकांना नेहमीच तिचे पूर्ण नाव वापरुन हाक मारणे कठीण होते. पालकांसाठी दुसरा पर्याय म्हणजे त्यांच्या बाळाचे मधले नाव छोटे ठेवणे जेणेकरून ते नंतर लांबलचक नावाचे पूरक असेल. तथापि, लोक आजकाल या ट्रेंडपासून दूर जात आहेत. पहिली नावे लहान होत आहेत, जेव्हा जेव्हा हे नाव उच्चारले जाते तेव्हा एक अनोखा प्रभाव पडतो. अशा नावांमध्ये दोन पेक्षा जास्त अक्षरे नसतात. या नावाचा टोन प्रभावी असतो आणि प्रत्येक नावात आवश्यक लय आणि साधेपणा देखील असतो. तथापि, छोट्या नावांसाठी कुठलीही दोन अक्षरे एकत्र करून आपल्या बाळाला हाक मारू नका. प्रत्येक नावाला अर्थ असू द्या. ते तुमच्या मुलीशी संबंधित असू द्या. इथे आम्ही तुम्हाला नावांची यादी दिलेली आहे - एखाद्या नावाला अर्थ असणे आवश्यक आहे. तुमचे बाळ मोठे होताना त्याचे नाव हा त्याच्या आयुष्याचा एक भाग आहे. त्यामुळे चांगला अर्थ असलेले कुठलेही छोटे नाव निवडा आणि आपल्या बाळास सक्षम बनवा! आणखी वाचा: छोट्या मुलींसाठी अर्थासहित १०० स्टायलिश नावे मुलींसाठी सर्वोत्तम नवीनतम आणि आधुनिक १८० नावे
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved