बाळाचा जन्म हा स्त्रीच्या आयुष्यातील एक रोमांचक तसेच चिंताजनक टप्पा असू शकतो. गेले नऊ महिने तुम्ही घेत असलेले कष्ट आणि काळजी आता बाळाच्या जन्मानंतर संपणार आहे. तुमच्या प्रसूतीची तारीख आधीच ठरलेली असो अथवा नसो तुम्ही प्रसूतीसाठी रुग्णालयात जाण्यासाठी अगदी केव्हाही तयार असले पाहिजे. ह्या तयारीमध्ये तुम्हाला रुग्णालयात आवश्यक असलेल्या गोष्टींची बॅग भरून ठेवण्याचा सुद्धा समावेश होतो.
रुग्णालयात प्रसूतीसाठी जाताना, तुम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टींची बॅग तुम्ही केव्हा भरून ठेवावी?
तुमच्या गरोदरपणाच्या ३४ व्या आणि ३५ व्या आठवड्यात तुम्ही हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी बॅग भरून ठेवावी. जर तुमची गर्भधारणा उच्च - जोखीम असलेली असेल, तर तुम्ही दोन आठवडे आधी बॅग भरून ठेवू शकता. रुग्णालयात जाताना लागणाऱ्या गोष्टींची बॅग तुम्ही गरोदरपणाच्या ३८ व्या आठवड्या आधी भरून ठेवावी. बाळ कोणाचीही वाट पाहत नाही!
प्रसूतीसाठी जाताना बॅग मध्ये कुठल्या गोष्टी घ्याव्यात?
नॉर्मल प्रसूतीसाठी रुग्णालयात जाणाऱ्या स्त्रियांना एक किंवा दोन दिवस रुग्णालयात राहावे लागेल, आणि सी-सेक्शन ठरले असेल तर ३ ते ४ दिवसांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात राहावे लागेल. तुमची बॅग भरताना तुम्ही हॉस्पिटल मध्ये किती दिवस राहणार आहात ह्याचा विचार करणे आवश्यक आहे. रुग्णालयातून तुम्हाला कुठल्या गोष्टी दिल्या जाणार आहेत ह्याची चौकशी तुम्ही करून ठेवावी. ज्या गोष्टी रुग्णालयातून पुरवल्या जाणार आहेत त्या तुम्ही यादीमधून वगळू शकता. आई आणि बाळासाठी लागणाऱ्या गोष्टींची एक यादी तयार करा. कारण तुमच्याकडे त्यातील कुठल्या गोष्टी आहेत आणि कुठल्या आणाव्या लागणार आहेत ह्याचा मागोवा ठेवण्यास तुम्हाला त्यामुळे मदत होऊ शकते.
- कागदपत्रे: तुमची सर्व कागदपत्रे ठेवण्यासाठी तुम्ही एक फोल्डर तयार करा. ह्या कागदपत्रांमध्ये ओळखपत्र, विम्याची कागदपत्रे आणि रुग्णालयातील फॉर्म ह्यांचा समावेश होतो.
- कपडे: पुढे बटन असलेले सैलसर कपडे घेतले आहेत ना ते पहा. स्तनपान करताना असे कपडे असल्यास स्तनपान करणे सोपे जाईल. ह्या नाजूक अवस्थेत आराम महत्त्वाचा असल्याने सैलसर कपडे सर्वोत्तम असतात. रुग्णालयात जाताना, तुमच्याकडे वेळ असल्यास, जुने सैलसर कपडे घाला. कारण ह्या कपड्यांवर विविध द्रवपदार्थांचे डाग पडू शकतात.
- पादत्राणे: स्लीपर घ्या कारण त्या काढायला आणि घालायला खूप सोप्या असतात. एअर कंडिशनर असल्यावर तुम्ही पायमोजे सुद्धा सोबत पॅक करू शकता.
- लिप बाम: बहुतेक स्त्रियांना रुग्णालयात एअर कंडिशनर असल्यामुळे ओठ कोरडे पडण्याचा अनुभव येतो त्यामुळे ओठ कोरडे होऊ नयेत म्हणून सोबत लीप बाम ठेवा.
- स्नॅक्स आणि पेये: प्रसूती कळा काही तास सुरु राहू शकतात. तुमच्यासोबत तोंडात टाकण्यासाठी काही स्नॅक्स असतील तर तुम्हाला बरे वाटेल. शुगर-फ्री कँडीज हा एक उत्तम पर्याय आहे.
- उशा: प्रसूती कळांच्या वेदना कमी करण्यास उश्यांची मदत होऊ शकते. तसेच, बाळाच्या जन्मानंतर लगेच वापरण्यासाठी स्तनपानासाठीची उशी सोबत नेण्यास विसरू नका.
- अंडरवेअर आणि सॅनिटरी नॅपकिन्स: प्रसूतीनंतर रुग्णालयातील तुमच्या मुक्कामादरम्यान तुम्हाला अंडरवेअर आणि सॅनिटरी नॅपकिन्सचे जास्तीचे जोड लागतील. 'बेला मामा' ह्या ब्रँडची प्रसूती अंतर्वस्त्रांची चांगली श्रेणी आहे आणि ती आरामदायक आहेत. ह्या ब्रँड च्या अंडरवेअर मध्ये पोटाकडील भागात विस्तारण्यायोग्य पट्ट्या असतात.
- प्रसाधने: जर तुम्हाला विशिष्ट ब्रँडची टूथपेस्ट लागत असेल तर खरेदीसाठी वेळ काढून बॅग मध्ये ठेवा.
- स्तनपानास आवश्यक गोष्टी: स्तनपान अधिक आरामदायक होण्यासाठी नर्सिग ब्रा आणि पॅड बॅग मध्ये ठेवा.
- चष्मा किंवा लेन्स: जेव्हा आपल्याला प्रसूतीची चिंता नसते तेव्हा सुद्धा आपण चष्मा किंवा लेन्स सहज विसरून जातो त्यामुळे ह्या परिस्थितीत एखादा चष्मा आणून आधीपासून तुमच्या बॅग मध्ये ठेवा.
- गॅझेट्स: प्रसूती वेदना कमी करण्यासाठी तुम्हाला गाणी ऐकायची असल्यास तुमचा मोबाइल आणि टॅबलेट चार्जर आणि एमपी ३ प्लेयर बॅग मध्ये ठेवा.
- अक्सेसरीज: प्रसूतीदरम्यान केस नीट राहण्यासाठी दोन हेडबँड आणि जास्तीच्या क्लिप्स खरेदी करून ठेवा. प्रसूतीनंतर,बाळाला स्तनपान देताना सुद्धा ह्यांचा उपयोग होऊ शकतो.
- घरी जातानाचे कपडे: तुम्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर घरी जाताना घालण्यासाठी तुमच्यासाठी आरामदायक कपडे घ्या.
- पुस्तके: शांत आणि आरामशीर राहण्यासाठी तुम्हाला पुस्तकांची मदत होईल. अलेक्झांडर मॅककॉल स्मिथ प्रमाणे पीजी वोडहाउस हा एक उत्तम पर्याय आहे.
- नर्सिंग ब्रा: नर्सिंग ब्राच्या विविध प्रकारांबद्दल वाचा आणि तुम्हाला सर्वात सोयीस्कर असलेला प्रकार निवडा. कमीतकमी दोन नर्सिंग ब्रा पॅक करा. वायरलेस असलेल्या मॅटर्निटी ब्रा मुळे खूप फरक पडतो आणि नवीन आई म्हणून तुमचे जीवन खरोखर सोपे होते!
- ब्रेस्ट पॅड्स: जेव्हा तुम्ही स्तनपान करायला शिकता तेव्हा अनपेक्षितरित्या दुधाची गळती होते तेव्हा ह्या पॅड्सची मदत होते.
- मॅटर्निटी पॅड: तुम्हाला जन्मानंतर पॅडची आवश्यकता असेल आणि किमान एक संपूर्ण पॅक सोबत ठेवा
- नाइटशर्ट: पुढून बटणे असलेला नाइटशर्ट निवडा कारण त्यामुळे स्तनपानास मदत होईल. तुम्ही नर्सिंग स्लीपवेअर देखील खरेदी करू शकता, ह्या कापड्याना कडेला बटणे असतात ही बटणे तुमच्या बाळाला पाजताना तुम्ही उघडू शकता.
- प्रसाधन सामग्री: टॉवेल, साबण, शैम्पू, टूथपेस्ट, हेअरब्रश आणि फ्लॉस घेण्यास विसरू नका.
- जुने किंवा स्वस्त अंडरवेअर: नवीन किंवा महाग अंडरवेअर घेऊ नका. कॉटनच्या अंडरवेअर ला प्राधान्य द्या.
- आय मास्क किंवा इअरप्लग्स: तुमच्या रुग्णालयात आवाज किंवा गोंगाट असल्यास ह्यामुळे तुम्हाला झोपायला मदत होईल.
- माहितीविषयक कागदपत्रे: तुमचे प्रसूती वर्ग किंवा कन्सलटेशन्स दरम्यान तुम्हाला स्तनपान कसे करावे ह्याबद्दल माहितीविषयक मटेरियल देतील. ते बॅग मध्ये ठेवा.
- पुस्तके: मनोरंजनासाठी काही पुस्तके सोबत ठेवा त्यामुळे तुमची मनःस्थिती चांगली राहील.
तुमच्या पतीने कुठल्या गोष्टी सोबत घेतल्या पाहिजेत?
प्रसूतीसाठी रुग्णालयात जाताना तुमच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी पॅक करत असतानाच तुमच्या पतीशी संवाद साधून त्यांना रुग्णालयात कशाची गरज लागू शकेल हे पहा. तुमच्या बाळाच्या जन्मदरम्यान तुम्हाला त्यांच्याकडून कशाची गरज भासेल यासाठी ह्यासाठी त्यांनी तयार असणे महत्त्वाचे आहे, तुम्हाला खालील गोष्टींची गरज भासू शकते.
- मानेच्या उशा
- शांत करणारे संगीत
- ब्लॅंकेट
- इअरफोन्स
- रोख रक्कम
- आरामदायक शूज
- योग्य कपडे
नवजात बाळासाठी कुठल्या गोष्टी घेऊन ठेवाव्यात?
तुमच्या नवजात बाळाच्या हॉस्पिटल बॅगमध्ये खालील गोष्टींचा समावेश असावा:
- बाळासाठी दोन ते तीन कपड्यांचे जोड
- जेव्हा तुम्ही बाळाला घेऊन घरी याल तेव्हा बाळाला ठेवण्यासाठी उबदार ब्लॅंकेट
- लंगोट: नवजात बाळाला १२ लंगोट लागू शकतात त्यामुळे तितके पॅक करण्यास विसरू नका
- दूध पुसण्यासाठी मऊ रुमाल
- घरी येताना घालण्यासाठी मोजे आणि बूटांची एक जोडी
- घरी जाताना तुमच्या बाळाला घालण्यासाठी लोकरीची टोपी
- तुम्ही आणि तुमच्या बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर घरी जाण्यासाठी प्रत्येकी एक ड्रेस
- तुमच्या बाळाला घरी परत नेण्यासाठी बेबी कार सीट हा सर्वोत्तम मार्ग असू शकतो कारण ते सुरक्षित आणि आरामदायक असते
- जर हवामान थंड असेल तर जॅकेट किंवा स्वेटर
हॉस्पिटलच्या बॅगमध्ये तुम्ही नेऊ नयेत अश्या गोष्टी
खाली दिलेल्या गोष्टी तुम्ही हॉस्पिटल बॅग मध्ये नेऊ नयेत
- दागिने: तुमच्या चाचण्या आणि प्रक्रियांमध्ये अडथळा आणू शकतात आणि चोरीला जाऊ शकतात.
- रोख रक्कम किंवा इतर मौल्यवान वस्तू मोठ्या इस्पितळात चोरीला जाण्याची शक्यता असते
- तुमच्या डॉक्टरांनी शिफारस न केलेली औषधे. ह्यामध्ये अगदी जीवनसत्वांचा सुद्धा समावेश असतो
- ब्रेस्ट पंप रुग्णालयाकडून पुरवले जातात. तुम्हाला तुमचे स्वतःचे ब्रेस्टपम्प हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची गरज नाही
गरोदरपणाचा नववा महिना सुरू होण्याच्या काही आठवडे आधी तुमची बॅग भरण्यास सुरुवात करा. हॉस्पिटलमध्ये जाताना बॅग मध्ये आईसाठी आणि बाळासाठी काय काय घ्यावे ह्याचा ताण घेऊ नका. कारण घरातलं कुणीही एखाददुसरी विसरलेली वस्तू तुम्हाला आणून देऊ शकते. तुमच्या पतीसोबत प्रसूतीसाठी रुग्णालयात जाताना काय तयारी करायला लागू शकते ह्याचा सराव सुद्धा करू शकता.
आणखी वाचा:
प्रसूतीची तारीख कशी काढावी?
तुम्ही लक्ष ठेवण्याची गरज असलेली प्रसूतीची लक्षणे