खाणे

फॉर्म्युला फीडिंग विषयी सर्वकाही

बाळ आनंदाने स्तनपान घेत आहे आणि आई सुद्धा त्याच्याकडे बघून खूप आनंदी आणि समाधानी असलेल्या प्रतिमांचा नव्यानेच आई झालेल्या स्त्रीवर भडीमार केला जातो. स्तनपान हे निश्चितपणे सर्वोत्कृष्ट आणि आवश्यक आहे, परंतु काही वेळा परिस्थिती स्तनपान देण्यास अनुकूल नसते आणि तेव्हा बाळाला पोषण देण्याच्या अतिरिक्त स्रोताची आवश्यकता असू शकते आणि तेव्हा फॉर्मुला फिडींगची गरज भासते.

फॉर्म्युला का वापरायचा?

बाळाला फॉर्मुला देण्याचा निर्णय हा काही सोपा निर्णय नाही, परंतु काही बाबतीत, हा एकमेव पर्याय आहे. जेव्हा आई एकतर मानसिक किंवा शारीरिकरित्या आजारी असेल किंवा एखादी विशिष्ट औषधे घेत असेल तर ते बाळासाठी हानिकारक असू शकते. स्तनपान सुरु असताना एखादी महिला पुन्हा गर्भवती झाल्यास आणि गर्भाच्या आयुष्याला धोका निर्माण होत असेल तर तिला स्तनपान थांबवण्याचा सल्ला देण्यात येईल. कधीकधी खूप प्रयत्न करून सुद्धा आईला बाळासाठी पुरेसे दूध येत नाही. अशा परिस्थितीत, त्यांना स्तनपानासह फॉर्म्युला दूध देण्याचा सल्ला दिला जातो. जरी आईच्या दुधाचे खूप फायदे असले तरी फॉर्म्युला फीडिंगमध्ये सोयीसुविधा असतात - ते प्रवासासाठी उत्कृष्ट आहे, बाळाला फॉर्म्युला दुधामुळे जास्त वेळ भूक लागत नाही, बाळाला कमी वेळा फॉर्म्युला देण्याची आवश्यकता असते आणि बाळाला फॉर्म्युला दूध कुणीही देऊ शकते - त्यामुळे बाळाचा बाबांसोबत चांगला बंध तयार होतो. परंतु फॉर्म्युला फीडिंग देखील खूप आव्हानात्मक असते!

फॉर्म्युला फीडिंगसाठी काही टिप्स

फॉर्म्युला पोषित बाळांना स्तनपान घेणाऱ्या बाळांपेक्षा वेगळी शौचास होते तसेच शौचास वास येणे सुद्धा सामान्य आहे; फॉर्म्युला-पोषित बाळांना घट्ट शौचास होते. प्रत्येक वेळेला बाळाला फॉर्म्युला दिल्यावर बाळ रडत असेल किंवा फॉर्म्युला बाहेर काढत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. बाळाला कदाचित ऍलर्जी असू शकते किंवा तुम्ही वापरत असलेल्या ब्रॅण्डमुळे बाळाला गॅस होत असेल. तुमचे डॉक्टर नक्कीच तुम्हाला योग्य पर्याय सुचवतील. आणखी वाचा: बाळाची ढेकर कशी काढावी?
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved